मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद
ा

h 2

Showing posts with label चालू घडामोडी. Show all posts
Showing posts with label चालू घडामोडी. Show all posts

Wednesday, October 28, 2026

विधान परिषद निवडणूक निकाल 2026


मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा 



 विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालामध्ये महायुतीने दोन आणि महाविकास आघाडीने तीन जागा जिंकल्या आहेत.


पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपचे कौस्तुभ गावडे हे विजयी झाले आहेत.

पुणे पदवीधरमधून हर्षदा देशमुख-जाधव या विजयी झाल्या आहेत. अमरावतीमधून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे किरण सरनाईक विजयी झाले आहेत.


औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून तीन वेळेचे आमदार सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतापसिंह पाटील यांनी पराभूत करत विजय मिळवला आहे. तर, नागपूरमध्ये काँग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी झाले आहेत.

Monday, October 12, 2026

राज्यपाल नियुक्ती 2026..

राष्ट्रपतींकडून सहा राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील सहा राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. या फेरबदलांतर्गत विविध राज्यांच्या राज्यपालांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत.


या नियुक्त्यांनुसार,


* केरळ — ओम प्रकाश माथुर


* तामिळनाडू — राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर


* ओडिशा — ब्रज मोहन राम


* कर्नाटक — डॉ. सुधा यादव


* उत्तराखंड — डॉ. ढाल सिंह बिसेन


* सिक्कीम — दुष्यंत गौतम


पलामू येथील माजी लोकसभा खासदार ब्रज मोहन राम यांची ओडिशाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते हरि बाबू कंभमपती यांची जागा घेतील. कंभमपती यांनी जानेवारी २०२५ मध्ये ओडिशाच्या राज्यपालपदाची शपथ घेतली होती.


हरियाणातील महेंद्रगड येथील माजी भाजप खासदार आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या माजी सदस्या डॉ. सुधा यादव यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या थावरचंद गेहलोत यांची जागा घेतील.


मध्य प्रदेशातील बालाघाटचे माजी लोकसभा खासदार डॉ. ढाल सिंह बिसेन यांची उत्तराखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते लेफ्टनंट जनरल (निवृत्त) गुरमीत सिंह यांची जागा घेतील.


भाजपचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी राज्यसभा खासदार दुष्यंत गौतम यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते ओम प्रकाश माथुर यांची जागा घेतील.


टीप: वरील मजकूर तुम्ही दिलेल्या हिंदी बातमीचे मराठी भाषांतर आहे. नियुक्त्यांची सद्यस्थिती स्वतंत्रपणे पडताळलेली नाही.


Wednesday, November 5, 2025

पदवीधर मतदार नोंदणी 2025

 नोंदणी करण्याची मुदत 6 नोव्हेंबर 2025 आहे..

https://mahaelection.gov.in




आपले नाव मतदार यादीमध्ये शोधण्यासाठी अधिकृत लिंक:  

👉 https://electoralsearch.eci.gov.in — ही भारत निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाइट आहे.


🗳️ मतदार यादीत नाव कसे शोधावे?


तुमच्याकडे असलेला EPIC क्रमांक (मतदान कार्डवरील क्रमांक) किंवा तुमचे वैयक्तिक तपशील वापरून तुम्ही नाव शोधू शकता:


1. EPIC क्रमांक वापरून:

- वरील लिंकवर क्लिक करा

- “Search by EPIC No.” पर्याय निवडा

- EPIC क्रमांक, राज्य, आणि कॅप्चा कोड टाका

- “Search” बटनावर क्लिक करा


2. वैयक्तिक तपशील वापरून:

- “Search by Details” पर्याय निवडा

- तुमचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख/वय, राज्य, जिल्हा, आणि विधानसभा क्षेत्र निवडा

- कॅप्चा कोड टाकून “Search” क्लिक करा


3. मोबाईल नंबर वापरून (जर EPIC सोबत लिंक केलेला असेल):

- “Search by Mobile” पर्याय निवडा

- मोबाईल नंबर टाका → OTP मिळवा → OTP टाकून “Search” क्लिक करा.


📱 मोबाईल अ‍ॅप पर्याय:  

तुम्ही “Voter Helpline” अ‍ॅप Google Play Store वरून डाउनलोड करूनही नाव शोधू शकता.

Tuesday, July 29, 2025

FIDE Women's World Cup 2025

मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा 💐 💐 💐 




 जॉर्जियातील बटुमी येथे संपन्न झालेल्या FIDE Women's World Cup 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन भारतीय खेळाडू दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांच्यात झालेला सामना बुद्धिबळातील भारताच्या उल्लेखनीय कामगिरीचं प्रतीक ठरला. विजेतेपद, ग्रँडमास्टर टायटल आणि भारतीय लेकींचा अंतिम सामना हा भारतीय बुद्धिबळाचा सुवर्णक्षणच म्हणावा लागेल!


सामन्या अंती विजेत्या बुद्धिबळपटू FIDE Women's World Cup जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय ठरणार होत्या आणि तो मान दिव्या देशमुख ह्यांनी पटकाविला त्याबद्दल दिव्या देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांचं, टीमचं मनापासून अभिनंदन. तसंच गेली अनेक वर्ष भारतासाठी गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या उपविजेत्या कोनेरू हम्पी ह्यांचंही कौतुक करावं तितकं कमीच आहे. खरं तर आज आपल्या देशाला विजेत्या आणि उपविजेत्या अशा एक नव्हे तर दोन ग्रँडमास्टर लाभल्या. जय हिंद ! 🇮🇳

Saturday, July 12, 2025

युनेस्को'ने जागतिक वारसास्थळ 2025

 छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांचा युनोस्कोने जागतिक वारसा स्थळात केला समावेश...

युनेस्को'ने जागतिक वारसास्थळात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ गड-किल्ले हे जागतिक वारसा संकल्पने खाली नामांकित केले आहेत. त्यात महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडूचा जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले पन्हाळा गडचा समावेश झाला आहे.


साल्हेर किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड, खांदेरी किल्ला, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजय दुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूमधील जिंजी किल्ला यांचा समावेश केला आहे . 

Saturday, June 7, 2025

HSRP नंबर प्लेट बसवण्याची ऑनलाइन प्रोसेस

15 ऑगस्ट 2025 एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदतवाढ आहे..








 HSRP नंबर प्लेट बसवण्याची ऑनलाइन प्रोसेस (HSRP Number Plate Online Registration Process)

  • सर्वप्रथम तुम्हाला

  •   https://bookmyhsrp.com/

  • या  वेबसाईटवर जायचे आहे.

  • यानंतर तुम्हाला तुमचे राज्य आणि वाहनाचा प्रकार म्हणजे (टू व्हिलर की फोर व्हिलर) हे निवडायचे आहे.

  • यानंतर तुम्हाला तुमच्या गाडीची सर्व माहिती भरायची आहे. यात आरसी नंबर, इंजिन नंबर, चेसिस नंबर ही माहिती असणार आहे. ही माहिती रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटमध्ये दिलेली असणार आहे.

  • यानंतर नंबर प्लेटची डिलिव्हरी तुम्हाला कुठे हवी आहे त्याचा पत्ता भरा त्यानंतर वेळ आणि तारीख निवडा.

  • यानंतर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करायचे 

  • यानंतर तुम्हाला हाय सिक्युरीटी नंबर प्लेटची रिसिप्ट मिळेल. त्याचे पीडीएफ किंवा प्रिंट काढून ठेवा. हे जेव्हा नंबर प्लेट लावली जाईल तेव्हा दाखवावे लागेल.

Sunday, May 18, 2025

संसद रत्न सन्मान 2025..

 प्राइम पॉइंट फाउंडेशनने स्थापित केलेले हे पुरस्कार संसदेत योगदान देणाऱ्या खासदारांना दिले जातात. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे (एनसीबीसी) अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने पुरस्कार विजेत्यांची निवड केली.भाजप खासदार भर्तृहरी महताब, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, शिवसेना- शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आणि क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे एन. के. प्रेमचंद्रन यांना 'संसदीय लोकशाहीत उल्लेखनीय आणि सातत्यपूर्ण योगदान' यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्कार विजेते..

● सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी शरद पवार गट)

● वर्षा गायकवाड (काँग्रेस)

● अरविंद सावंत (शिवसेना उद्धव ठाकरे गट)

● नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट)

● श्रीरंग बारणे (शिवसेना शिंदे गट)

● स्मिता वाघ (भाजप)

● मेधा कुलकर्णी (भाजप)

● भर्तृहरी महताब (भाजप)

● प्रवीण पटेल (भाजप)

● रवी किशन (भाजप)

● निशिकांत दुबे (भाजप)

● विद्याुत बरन महातो (भाजप)

● पी. पी. चौधरी (भाजप)

● मदन राठोड (भाजप)

● सी. एन. अण्णादुराई (द्रमुक)

● दिलीप सैकिया (भाजप)

● एन. के. प्रेमचंद्रन (आरएसपी)

Wednesday, May 14, 2025

न्यायमूर्ती बीआर गवई _ भारत देशाचे 52 वे सरन्यायाधीश

 


न्यायमूर्ती बीआर गवई बनले देशाचे ५२ वे सरन्यायाधीश बनले आहेत. 13 मे रोजी भारताचे माजी मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना सेवानिवृत्त झाले.

त्यानंतर खन्ना यांनी बी.आर. गवई यांच्या नावाची शिफारस केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे केली होती. त्यानूसार 14 मे रोजी राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी बी. आर. गवई  यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. यानंतर गवई यांनी सभागृहात उपस्थित असलेल्या त्यांच्या आईचे नमस्कार करत आशीर्वाद घेतले. बी. आर. गवई हे भारताचे दुसरे दलित सरन्यााधीश असणार आहेत. याआधी के.जी. बालकृष्णन हे पहिले दलित सरन्यायाधीश होते. न्यायमूर्ती गवई यांचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असेल आणि ते २३ डिसेंबर 2025 रोजी निवृत्त होतील.


Tuesday, May 13, 2025

MH 59 RTO क्रमांक जत सांगली

 महाराष्ट्रातील एका तालुक्याला नवा RTO क्रमांक मिळाला आहे. MH 59 असा हा RTO क्रमांक आहे. जाणून घेऊया कोणत्या तालुक्याला हा नवा RTO क्रमांक मिळाला आहे. 1 मार्च 2025 रोजी राज्यातील 58 वे उपप्रदेशिक परिवहन कार्यालय मीरा-भाईंदर येथे मंजूर करण्यात आले.

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला नवा RTO क्रमांक मिळाला आहे. सांगली जिल्ह्याचा RTO क्रमांक हा MH 10 असा आहे. तर, आता सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला MH 59 असा नवा RTO क्रमांक मिळाला आहे. एमएच ५९ (MH 59) अशी आता जत तालुक्याची नवी ओळख असणार आहे. जतसाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय मंजूर झाले आहे. त्यानुसार MH 59 म्हणून जत तालुक्याला नवी ओळख मिळाली आहे. त्यामुळे जत तालुक्यातील नागरिकांना वाहन नोंदणी, अनुज्ञप्ती (परवाने), करभरणा यासाठी आता इतर ठिकाणी जाण्याची गरज राहणार नाही.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी नविन RTO ची मागणी केली होती. जत तालुक्यातील नागरिकांना वाहनाच्या संदर्भात नोंदणी तसेच ड्रायव्हिंग लायसन्स यासह इतर कामाकरिता सांगली येथे जावे लागत होते. यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत होती.

नवनियुक्त जिल्हाध्यक्षांची माहिती 2025

 राज्यातील जिल्ह्यांच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांची माहिती महाराष्ट्र भाजपने पत्रक जाहीर करून दिली. त्यानुसार जिल्हावार जिल्हाध्यक्षांची नावे पुढे दिली आहेत.


कोकण विभाग:


1. सिंधुदुर्ग- प्रभाकर सावंत


2. रत्नागिरी उत्तर- सतिष मोरे


3. रत्नागिरी दक्षिण- राजेश सावंत


4. रायगड उत्तर- अविनाश कोळी


5. रायगड दक्षिण- धैर्यशील पाटील


6. ठाणे शहर- संदिप लेले


7. ठाणे ग्रामीण- जितेंद्र डाकी


8. भिवंडी- रविकांत सावंत


9. मिरा भाईंदर- दिलीप जैन


10. नवी मुंबई- डॉ. राजेश पाटील


11. कल्याण- नंदु परब


12. उल्हासनगर- राजेश वधारिया


पश्चिम महाराष्ट्र:


13. पुणे शहर- धिरज घाटे


14. पुणे उत्तर (मावळ)- प्रदिप कंद


15. पिंपरी चिंचवड शहर- शत्रुघ्न काटे


16. सोलापूर शहर- श्रीमती रोहिणी तडवळकर


17. सोलापूर पूर्व- शशिकांत चव्हाण


18. सोलापूर पश्चिम- चेतनसिंग केदार


19. सातारा- अतुल भोसले


20. कोल्हापूर पूर्व (हातकणंगले)- राजवर्धन निंबाळकर


21. कोल्हापूर पश्चिम (करवीर)- नाथाजी पाटील


22. सांगली शहर- प्रकाश ढंग


23. सांगली ग्रामीण- सम्राट महाडिक


उत्तर महाराष्ट्र:


24. नंदुरबार- निलेश माळी


25. धुळे शहर- गजेंद्र अंपाळकर


26. धुळे ग्रामीण- बापु खलाने


27. मालेगांव- निलेश कचवे


28. जळगांव शहर- दिपक सुर्यवंशी


29. जळगाव पूर्व- चंद्रकांत बाविस्कर


30. जळगाव पश्चिम- राध्येश्याम चौधरी


31. अहिल्यानगर उत्तर- नितीन दिनकर


32. अहिल्यानगर दक्षिण- दिलीप भालसिंग


मराठवाडा विभाग:


33. नांदेड महानगर- अमर राजूरकर


34. परभणी महानगर- शिवाजी भरोसे


35. हिंगोली- गजानन घुगे


36. जालना महानगर- भास्करराव मुकुंदराव दानवे


37. जालना ग्रामीण- नारायण कुचे


38. छत्रपती संभाजीनगर उत्तर- सुभाष शिरसाठ


39. छत्रपती संभाजीनगर पश्चिम- संजय खंबायते


40. धाराशिव- दत्ता कुलकर्णी


विदर्भ विभाग:


41. बुलढाणा- विजयराज शिंदे


42. खामगांव- सचिन देशमुख


43. अकोला महानगर- जयवंतराव मसणे


44. अकोला ग्रामीण- संतोष शिवरकर


45. वाशिम- पुरुषोत्तम चितलांगे


46. अमरावती शहर- डॉ. नितीन धांडे


47. अमरावती ग्रामीण (मोरणी)- रविराज देशमुख


48. यवतमाळ- प्रफुल्ल चव्हाण


49. पुसद- श्रीमती डॉ. आरती फुफाटे


50. मेळघाट- प्रभुदास भिलावेकर


51. नागपूर महानगर- दयाशंकर तिवारी


52. नागपूर ग्रामीण (रामटेक)- अनंतराव राऊत


53. नागपूर ग्रामीण (काटोल)- मनोहर कुंभारे


54. भंडारा- आशु गोंडाने


55. गोंदिया- श्रीमती सिता रहांगडाले


56. उत्तर मुंबई- दिपक बाळा तावडे


57. उत्तर पूर्व मुंबई- दिपक दळवी


58. उत्तर मध्य मुंबई- विरेंद्र म्हात्रे

Monday, May 12, 2025

SSC results 2024-25

   SSC (दहावीचा) निकाल उद्या १३ मे, २०२५ रोजी दुपारी १:०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे..*

खालील वेबसाईटवर निकाल पाहावा  

मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक १३ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.


अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.


. https://results.digilocker.gov.in


. https://sscresult.mahahsscboard.in


. http://sscresult.mkcl.org


. https://results.targetpublications.org


. https://results.navneet.com


 https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams


 https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results


https://www.indiatoday.in/education-today/results


https://www.aajtak.in/education/board-exam-results





Sunday, May 4, 2025

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने विविध पदांसाठी भरती जाहीर..

 इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि संगणक विज्ञान या विषयांमध्ये शास्त्रज्ञ/अभियंता ‘एससी’ पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार या पदांसाठी १९ मे २०२५ पर्यंत https://www.isro.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.

 ६३ रिक्त जागा भरण्याचे आहे, त्यापैकी २२ रिक्त जागा शास्त्रज्ञ/अभियंता 'एससी' (इलेक्ट्रॉनिक्स), ३३ रिक्त जागा शास्त्रज्ञ/अभियंता 'एससी' (मेकॅनिकल) आणि ०८ रिक्त जागा शास्त्रज्ञ/अभियंता 'एससी' (कॉम्प्युटर सायन्स) आहेत.

अर्जदारांना २५० रुपये शुल्क भरावे लागेल. सर्व महिला/अनुसूचित जाती (SC)/ अनुसूचित जमाती (ST); माजी सैनिक [EX] आणि बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्ती (PwBD) उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.





Hsc result 2024-25 Maharashtra

  










महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल सोमवार, दि. ०५ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.



खालील लिंक वरती निकाल पाहावा


खालील संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येतील : (Where can I check HSC 12th result See A to Z information)


mahresult.nic.in


results.digilocker.gov.in


mahahsscboard.in


https://hscresult.mkcl.org/

https://mahresult.nic.in/mbhsc2024/mbhsc2024.htm

Thursday, March 20, 2025

HSRP नंबर प्लेट.मुदतवाढ

 


हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अर्थात HSRP नंबर प्लेट सर्व प्रकारच्या वाहनांना बसवणं आता शासनानं बंधनकारक केलं आहे. त्यानुसार २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना ही नंबर प्लेट बसवण्यासाठी सध्या राज्यात मोहिम सुरु आहे.

राज्य शासनानं काढलेल्या परिपत्रकानुसार, राज्य शासनानं मुदतवाढ का देण्यात येत आहे? याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. परिपत्रकात म्हटलं की, १ एप्रिल २०२९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक अर्थात HSRP नंबर प्लेट 31 मार्च 2025 पर्यंत बसवण्याचे निर्देश देण्यात आले होते. पण आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्याच काम फारच कमी झालं आहे. त्यामुळं जुन्या वाहनांना ही HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी आता ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. 


HSRP नंबर प्लेटचे फायदे काय?


HSRP नंबर प्लेट्स अशा पद्धतीनं बनवलेल्या असतात ज्यामध्ये कोणाला बदल करता येत नाही. बनावट पाटी बनवणं कठीण आहे. त्यामुळं वाहन चोरीपासून प्रतिबंध होतो.


HSRP नंबर प्लेट्स चोरीची वाहनं आणि बनावट नंबर प्लेट्स ओळखण्यात मदत करतात. त्यामुळं फसवणूक टाळता येते.


HSRP नंबर प्लेट्समुळं अपघाताला कारणीभूत ठरलेलं वाहनं आणि वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणारं वाहनं ओळखण्यास मदत होते.


HSRP नंबर प्लेट्सची इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं नोंदणी होते आणि तुमच्या वाहनाशी जोडल्या जातात. त्यामुळं वाहन कोणाच्या मालकीचं आहे हे लगेच शोधता येतं.


ही नंबर प्लेट तुम्हाला घरी बसवता येत नाही, कारण याला नट बोल्टचं फिटिंगला परवानगी नाही.


HSRP नंबर प्लेटची वैशिष्ट्ये?


होलोग्राम : अशोक चक्राची प्रतिमा असलेला हॉट-स्टॅम्प केलेला क्रोमियम-आधारित होलोग्राम


लेसर-एच्ड पिन: लेसर तंत्रज्ञान वापरून कायमस्वरूपी ओळख क्रमांक (पिन) कोरला जातो


छेडछाड-प्रूफ स्नॅप लॉक : नंबर प्लेट बसवताना पुन्हा वापरता न येणारा रिबीट लॉक वापरला ज्यामुळं नंबर प्लेट कोणालाही काढता येत नाही, फक्त लॉक तोडूनच ती काढली जाऊ शकते.


रिफ्लेक्टीव्ह शीटिंग: नंबर प्लेटवर रिफ्लेक्टीव्ह शीटिंग वापरण्यात आल्यानं अंधारातही तुमच्या वाहनाची नंबर प्लेट चमकते.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार..2025

मनःपूर्वक अभिनंदन ...

जगभरात भारताची मान अभिमानानं उंचावणारा गुजरातमधील ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा घडवणारे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यासंदर्भातली घोषणा केली आहे. २५ लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र व शाल असं या पुरस्काराचं स्वरूप असून या माध्यमातून राम सुतार यांच्या कामाचा गौरव केला जाणार आहे. कोकणात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं कामदेखील राम सुतार यांनाच देण्यात आलं आहे. 

महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र सरकारकडून दरवर्षी देण्यात येतो. या पुरस्काराचं स्वरूप २५ लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह व शाल असं आहे. १२ मार्च २०२५ रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत महाराष्ट्र भूषण २०२२४ या पुरस्कारासाठी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या नावाला मान्यता देण्यात आली आहे. राम सुतार यांचं वय १०० वर्षं आहे. अजूनही ते शिल्प तयार करत आहेत. चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्माराकासाठीची मूर्तीही राम सुतार हेच घडवत आहेत”, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली. 


Sunday, February 16, 2025

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ २०२५

 मुख्यमंत्री ...देवेंद्र फडणवीस 

उपमुख्यमंत्री ..एकनाथ शिंदे अजित पवार



 कॅबिनेट मंत्री

1.चंद्रशेखर बावनकुळे - महसूल

2.राधाकृष्ण विखे पाटील - जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)

3.हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण

4.चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

5.गिरीश महाजन - जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

6.गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा

7.गणेश नाईक - वन

8.दादाजी भुसे - शालेय शिक्षण

9.संजय राठोड - माती व पाणी परीक्षण

10.*धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा आणि जो ग्राहक संरक्षण*

11.मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

12.उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा

13.जयकुमार रावल - विपणन, प्रोटोकॉल

14.पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

15.अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर

16.अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय

17.शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

18.आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान 

19.दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय

20.अदिती तटकरे - महिला व बालविकास 

21.शिवेंद्रराजे भोसले - सार्वजनिक बांधकाम

22.माणिकराव कोकाटे - कृषी 

23.जयकुमार गोरे - ग्रामविकास, पंचायत राज

24.नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन

25.संजय सावकारे - कापड

26.संजय शिरसाट - सामाजिक न्याय 

27.प्रताप सरनाईक - वाहतूक 

28.भरत गोगावले - रोजगार हमी,फलोत्पादन

29.मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन

30.नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे 

31.आकाश फुंडकर - कामगार 

32.बाबासाहेब पाटील - सहकार 

33.प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण 


राज्यमंत्री (State Ministers )

34. माधुरी मिसाळ - सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण 

35. आशिष जयस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय 

36. मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा 

37. इंद्रनील नाईक - उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन 

38. योगेश कदम - गृहराज्य शहर


39. पंकज भोयर - गृहनिर्मा

Sunday, February 2, 2025

अंडर-19 महिला टी20 विश्वचषकाचे विजेतेपद..

 


अभिनंदन टीम इंडिया..


इंडियाने 2025 च्या अंडर-19 महिला टी20 विश्वचषकाचे विजेतेपद जिंकले आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने पराभव करून विजेतेपद पटकावले. 19 वर्षांखालील महिला संघाचे हे सलग दुसरे विजेतेपद होते.

टी20 विश्वचषकातील सलग विजयासाठी बीसीसीआयने भारतीय महिला अंडर19 संघाचे अभिनंदन केले आहे. विजेत्या संघाला 5 कोटी रुपये आणि मुख्य प्रशिक्षक नुशीन अल खादीर यांच्या नेतृत्वाखालील सपोर्ट स्टाफला 5 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे."

Sunday, January 26, 2025

पद्मभूषण पुरस्कार 2025

 मनःपूर्वक अभिनंदन...

1. मनोहर जोशी (मरणोत्तर ) (महाराष्ट्र)- सार्वजनिक व्यवहार


2. पंकज उधास (मरणोत्तर ) (महाराष्ट्र)- कला


3. शेखर कपूर (महाराष्ट्र)- कला


4. सूर्य प्रकाश (कर्नाटक)- साहित्य आणि पत्रकारिता 


5. आनंत नाग (कर्नाटक )- कला


6. विवेक देबरॉय (मरणोत्तर) ( दिल्ली)- साहित्य आणि शिक्षण

7. जतीन गोस्वामी (आसाम)- कला

8. जोस चाको पेरीयापुरम (केरळ)- वैद्यकीय


9. कैलास नाथ दीक्षित (दिल्ली)- पुरातत्व


10. नल्ली कुपुस्वामी चेट्टी ( तामिळनाडू)- व्यापार आणि उद्योग

11. नंदामुरी बालकृष्ण (आंध प्रदेश )- कला


12. पी. आर. श्रीजेश ( केरळ)- खेळ


13. पंकज पटेल ( गुजरात )- व्यापार आणि उद्योग


14. राम बहादूर राय (उत्तर प्रदेश)- साहित्य, शिक्षण आणि पत्रकारिता


15. साध्वी ऋतंभरा (उत्तर प्रदेश)- समाजसेवा


16. एस. अजीथ कुमार (तामिळनाडू)- कला 


17. शोभना चंद्रकुमार (तामिळनाडू)- कला


18. सुशील कुमार मोदी (मरणोत्तर) (बिहार)- सार्वजनिक सेवा


19. विनोद धाम (अमेरिका)- विज्ञान आणि अभियांत्रिकी

पद्मविभूषण पुरस्कार 2025

 पद्मविभूषण पुरस्कार 2025...


1. दुव्वुर नागेश्वर रेड्डी (तेलंगणा)- वैद्यकीय


2. न्यायमूर्ती (निवृत्त) जगदीश सिंह (चंदीगड)- सार्वजनिक व्यवहार


3. कुमुदिनी रजनीकांत लखिया (गुजरात)- कला


4. लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम (कर्नाटक)- कला


5. एम. टी. वासुदेवन नायर (मरणोत्तर) (केरळ)- साहित्य आणि शिक्षण


6. ओसामू सुझुकी (मरणोत्तर) (जपान)- व्यापार आणि उद्योग


7. शारदा सिन्हा (मरणोत्तर) (बिहार)- कला

पद्मश्री पुरस्कार विजेते 2025 भारत सरकार

 पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन...

पद्मश्री पुरस्कार विजेते

1. आद्वैत चरण गदनायक - कला, ओडिशा
2. अच्युत रामचंद्र पालव - कला, महाराष्ट्र
3. अजय व्ही. भट्ट - विज्ञान आणि अभियांत्रिकी, अमेरिका
4. अनिल कुमार बोरो - साहित्य आणि शिक्षण, आसाम
5. अरिजित सिंग - कला, पश्चिम बंगाल
6. अरुंधती भटाचार्य - व्यापार आणि उद्योग, महाराष्ट्र
7. अरुणोदय साहा - साहित्य आणि शिक्षण, त्रिपुरा
8. अरविंद शर्मा - साहित्य आणि शिक्षण, कॅनडा
9. आशोक कुमार महापात्र - वैद्यकीय, ओडिशा

10. अशोक लक्ष्मण सराफ - कला, महाराष्ट्र

11. आशुतोष शर्मा - विज्ञान आणि अभियांत्रिकी, उत्तर प्रदेश

12. अश्विनी भिदे देशपांडे - कला, महाराष्ट्र

13. बैजनाथ महाराज - इतर - आध्यात्म, राजस्थान

14. बॅरी गॉडफ्रे जॉन - कला, दिल्ली

15. बेगम बटूल - कला, राजस्थान

16. भरत गुप्त - कला, दिल्ली

17. भेरूसिंह चौहान - कला, मध्य प्रदेश

18. भीम सिंग भवेश - सामाजिक कार्य, बिहार

19. भीमाव्वा डोडाबालप्पा शिल्लेकीअथारा - कला, कर्नाटका

20. बधेंद्र कुमार जैन - वैद्यकीय, मध्य प्रदेश

21. सी. एस. वैद्यनाथन - सार्वजनिक कार्य, दिल्ली

22. चैत्राम देवचंद पवार - सामाजिक कार्य, महाराष्ट्र

23. चंद्रकांत शेठ (मरणोत्तर) - साहित्य आणि शिक्षण, गुजरात

24. चंद्रकांत सोमपुरा - इतर - वास्तुकला, गुजरात

25. चेतन ई. चित्रणीस - विज्ञान आणि अभियांत्रिकी, फ्रान्स

26. डेव्हिड आर. स्येमलियह - साहित्य आणि शिक्षण, मेघालय

27. दुर्गाचरण रणबीर - कला, ओडिशा

28. फारूक अहमद मीर - कला, जम्मू आणि काश्मीर

29. गणेश्वर शास्त्री द्रविड - साहित्य आणि शिक्षण, उत्तर प्रदेश

30. गीता उपाध्याय - साहित्य आणि शिक्षण, आसाम

31. गोकुलचंद्र दास - कला, पश्चिम बंगाल

32. गुरुवायूर दोराई - कला, तमिळनाडू

33. हरचंदन सिंह भत्ती - कला, मध्य प्रदेश

34. हरीमण शर्मा - इतर - कृषी, हिमाचल प्रदेश

35. हर्जिंदर सिंह श्रीनगर वाले - कला, पंजाब

36. हरविंदर सिंह - क्रीडा, हरियाणा

37. हसन रघु - कला, कर्नाटका

38. हेमंत कुमार - वैद्यकीय, बिहार

39. हृदय नारायण दीक्षित - साहित्य आणि शिक्षण, उत्तर प्रदेश

40. ह्यूग आणि कॉलिन गॅन्टझर (मरणोत्तर) (विभागून) - साहित्य आणि शिक्षण - पत्रकारिता, उत्तराखंड

41. इनिवलप्पिल मणी विजय - क्रीडा, केरळ

42. जगदीश जोशिला - साहित्य आणि शिक्षण, मध्य प्रदेश

43. जसबिंदर नरुला - कला, महाराष्ट्र

44. जोनास मसेटी - इतर - आध्यात्म, ब्राझील

45. जोयनाचरण बाथारी - कला, आसाम

46. जुमदे योंगम गॅमलिन - सामाजिक कार्य, अरुणाचल प्रदेश

47. के. दामोदरन - इतर - पाककला, तमिळनाडू

48. के.एल कृष्णा - साहित्य आणि शिक्षण, आंध्रप्रदेश

49. कोमणाकुट्टी अम्मा - कला, केरळ

50. किशोर कुणाल (मरणोत्तर) - नागरी सेवा, बिहार

51. एल. हंगथिंग - इतर - कृषी, नागालँड

52. लक्ष्मिपाथी रामासुब्बैयेर - साहित्य आणि शिक्षण - पत्रकारिता, तमिळनाडू

54. लामा लोबजंग (मरणोत्तर) - इतर - आध्यात्म, लडाख

55. लिबिया लोबो सरदेसाई - सामाजिक कार्य, गोवा

56. एम.डी. श्रीनिवास - विज्ञान आणि अभियांत्रिकी, तमिळनाडू

57. मदुगुला नागफणी शर्मा - कला, आंध्रप्रदेश

58. महाबीर नायक - कला, झारखंड

59. ममता शंकर - कला, पश्चिम बंगाल

60. मंदा कृष्णा मॅडीगा - सार्वजनिक कार्य, तेलंगणा

61. मारुती भुजंगराव चितांपल्ली - साहित्य आणि शिक्षण, महाराष्ट्र

62. मिरियाला अर्पारो (मरणोत्तर) - कला, आंध्रप्रदेश

63. नागेंद्रनाथ रॉय - साहित्य आणि शिक्षण, पश्चिम बंगाल

64. नारायण (भुलाई भाई) (मरणोत्तर) - सार्वजनिक कार्य, उत्तर प्रदेश

65. नरेन गुरूंग - कला, सिक्कीम

66. नीरजा भटला - वैद्यकीय, दिल्ली

67. निर्मला देवी - कला, बिहार

68. नितीन नोहरिया - साहित्य आणि शिक्षण, अमेरिका

69. ओंकारसिंग पाहवा - व्यापार आणि उद्योग, पंजाब

70. पी. दच्चनमूर्ती - कला, पुद्दूचेरी 

71. पंड़ी राम मंडावी - कला, छत्तीसगड

72. परमल लव्हजीभाई नागजीभाई - कला, गुजरात

73. पवन गोएंका - व्यापार आणि उद्योग, पश्चिम बंगाल

74. प्रशांत प्रकाश - व्यापार आणि उद्योग, कर्नाटक

75. प्रतिभा सत्यपथी - साहित्य आणि शिक्षण, ओडिशा

76. पुरसाई कन्नप्पा सांबंदन - कला, तमिळनाडू

77. आर. अश्विन - क्रीडा, तमिळनाडू

78. आर. जी. चंद्रमोगन - व्यापार आणि उद्योग, तमिळनाडू

79. राधा बाहिन भट - सामाजिक कार्य, उत्तराखंड

80. राधाकृष्णन देवसेनापथी - कला, तमिळनाडू

81. रामदर्श मिश्रा - साहित्य आणि शिक्षण, दिल्ली

82. रणेंद्र भानू मजुमदार - कला, महाराष्ट्र

83. रतन कुमार परीमू - कला, गुजरात

84. रेबाकांत महंता - कला, आसाम

85. रंथलाई लालरावना - साहित्य आणि शिक्षण, मिझोराम

86. रिकी ज्ञान केज - कला, कर्नाटका

87. सज्जन भजनका - व्यापार आणि उद्योग, पश्चिम बंगाल

88. सैली होलकर - व्यापार आणि उद्योग, मध्य प्रदेश

89. संत राम देसवाल - साहित्य आणि शिक्षण, हरियाणा

90. सत्यपाल सिंह - क्रीडा, उत्तर प्रदेश

91. सेनी विश्वनाथन - साहित्य आणि शिक्षण, तमिळनाडू

92. सेथुरामन पचनाथन - विज्ञान आणि अभियांत्रिकी, अमेरिका

93. शेखा शैख अली अल-साबाह - वैद्यकीय, कुवेत

94. शीन काफ निझाम (शिव किशन बिस्सा) - साहित्य आणि शिक्षण, राजस्थान

95. श्याम बिहारी अग्रवाल - कला, उत्तर प्रदेश

96. सोणिया नित्यनंद - वैद्यकीय, उत्तर प्रदेश

97. स्टीफन नॅप - साहित्य आणि शिक्षण, अमेरिका

98. शुभाश खेचुलाल शर्मा - इतर - कृषी, महाराष्ट्र

99. सुरेश हरीलाल सोनी - सामाजिक कार्य, गुजरात

100. सुरिंदर कुमार वासल - विज्ञान आणि अभियांत्रिकी, दिल्ली

101. स्वामी प्रदीप्तानंद (कार्तिक महाराज) - इतर - आध्यात्म, पश्चिम बंगाल

102. सयद ऐनुल हसन - साहित्य आणि शिक्षण, उत्तर प्रदेश

103. तेजेंद्र नारायण मजुमदार - कला, पश्चिम बंगाल

104. थियाम सुर्यमुखी देवी - कला, मणिपुर

105. तुषार दुर्गेशभाई शुक्ला - साहित्य आणि शिक्षण, गुजरात

106. वदीराज राघवेंद्रचाऱ्य पंचमुखी - साहित्य आणि शिक्षण, आंध्रप्रदेश

107. वासुदेव कामत - कला, महाराष्ट्र

108. वेलू आसान - कला, तमिळनाडू

109. वेंकप्पा अंबाजी सुगतेकर - कला, कर्नाटका

110. विजय नित्यानंद सुरीश्वरजी महाराज - इतर - आध्यात्म, बिहार

111. विजयालक्ष्मी देशमाने - वैद्यकीय, कर्नाटका

112. विलास डांगरे - वैद्यकीय, महाराष्ट्र

113. विनायक लोणी - सामाजिक कार्य, पश्चिम बंगाल


Talathi Bharti Practice Test 4 (100 Questions) / तलाठी सराव प्रश्नपत्रिका ४ (१०० प्रश्न)

Talathi Bharti Practice Test 4 (100 Questions) / तलाठी सराव प्रश्नपत्रिका ४ (१०० प्रश्न) Talathi Bharti Practice Test 4 (100 Quest...