WEL COME MY JOB....... BLOG आपले सर्वांचे सहर्ष स्वागत ... माझ्या WEBSITE ला भेट दिल्या बद्दल मी मनापासून आभारी आहे

नोकरीसाठी उपयुक्त जनरल नॉलेज

Sunday, December 8, 2024

जागतिक ध्यान दिवस

 २१ डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा केला जावा हा लिकटेंस्टिन या देशाने मांडलेला व भारतासह अनेक देशांनी अनुमोदन दिलेला प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने शुक्रवारी एकमताने मंजूर केला. 

२१ डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केला. वसुधैव कुटुंबकम (संपूर्ण जग एक कुटुंब आहे) अशी भारताची धारणा आहे. माणसाच्या कल्याणासाठी सर्व जगाने एकजुटीने प्रयत्न करायला हवे

Monday, November 25, 2024

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ-३

 





महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ-३ या पदाकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पध्दतीने विहित नमून्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक दि. २६.११.२०२४ पासून महानिर्मिती कंपनीच्या www.mahagenco.in या संकेतस्थळावर Career / Advertisement विभागातर्गत प्रसिध्द करण्यात येत आहे. महानिर्मिती कंपनीच्या पात्र प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी प्रकल्पग्रस्तांना प्रचलित धोरणाप्रमाणे आरक्षण देण्यात आले आहे.


Thursday, November 21, 2024

ज्ञानदीप कॉ ऑप क्रेडिट सोसायटी कनिष्ठ अधिकारी” (Junior Officer) भरती..

 नमस्कार मित्रांनो ज्ञानदीप कॉ ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड विभाग अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीमध्ये “कनिष्ठ अधिकारी” (Junior Officer) या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सदरील भरतीमध्ये खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.


सदरील भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ज्ञानदीप कॉ ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड बँकेत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला आकर्षक वेतन सुद्धा दिले जाणार आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, वेतनश्रेणी, पदाचे नाव, पदसंख्या आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

भरती नाव : ज्ञानदीप कॉ ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड | Dnyandeep Co Op credit Society Bharti Notification


भरती विभाग : ज्ञानदीप कॉ ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड मध्ये सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.


पदाचे नाव : “कनिष्ठ अधिकारी” (Junior Officer) या पदांसाठी सदरील भरती राबवली जाणार आहे.



वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्ष असावे.


अर्ज करण्याची मुदत : भरतीमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे आणि 13 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.


नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी मिळणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत : भरतीचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे. भरतीचा अर्ज खाली पत्त्यावर पाठविणे. 


अर्ज शुल्क/फी : अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. 


वेतनश्रेणी/पगार : नियमानुसार (आकर्षक वेतन, ग्रॅड्युटी, पीफ, रजा आणि इतर सवलती


आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे :


जन्म दाखला (असल्यास)

आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)

10 वी व 12 वी मार्कशीट

पदवी प्रमाणपत्र

पासपोर्ट साईज फोटो

उमेदवाराची स्वाक्षरी

जातीचा दाखला (असल्यास)

शैक्षणिक प्रमाणपत्रे

अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)


पदाचे नाव : “कनिष्ठ अधिकारी”

शैक्षणिक पात्रता 

बी. कॉम / बी. एस. सी./बी. सी. एस/बी. सी. ए/बी. एम. एस./बी. ई. इत्यादी मान्यताप्राप्त नियमित विद्यापीठाचा पदवीधारक असावा. किमान ५० टक्के मार्क्स, संगणक ज्ञान, एम. एस. सी. आय. टी. आवश्यक, इंग्रजी टायपिंगचा कोर्स केलेला असावा.

वरील पात्रता धारण केलेल्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स सह आपले अर्ज खालील पत्त्यावर पाठवावेत. 


ज्ञानदीप कॉ ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड,

मुंबई, 201 , 202 साई एनक्लेव,

दुसरा मजला, हरियाली व्हिलेज,

विक्रोळी (पूर्व) मुंबई 400083 .

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस उपनिरीक्षक

 इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये उपनिरीक्षक (टेलिकम्युनिकेशन), हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) आणि कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरतीसाठी आवश्यक पात्रता, अनुभव, अर्ज प्रक्रिया, तसेच निवड प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती लेखात देण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

खालील  लिंक व्दारे..

पात्र उमेदवार

 recruitment.itbpolice.nic.in

 या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. आयटीबीपीमध्ये ज्यांना नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांना १ ५ नोव्हेंबरपासून १४ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करता येईल.

उपनिरीक्षक (टेलिकम्युनिकेशन) या पदाच्या एकूण ९२ जागा भरल्या जाणार आहेत. यापैकी ७८ पुरुष उमेदवारांसाठी तर १४ महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या पदावर निवड होणाऱ्या उमेदवारांना ३५४०० ते ११२४०० रुपये वेतनश्रेणीनुसार वेतन मिळेल. या पदासाठी अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचं वय २० ते २५ वर्ष असणं आवश्यक आहे.


हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) या पदाच्या एकूण ३८३ जागांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी ३२५ आणि महिला उमेदवारांसाठी ५८ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना २५५०० ते ८११०० रुपये वेतनश्रेणीनुसार पगार दिला जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय १८-२५ वर्ष दरम्यान असावं.


कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) या पदासाठी एकूण ५१ जागा भरल्या जाणार आहेत. यापैकी ४४ जागा पुरुष उमेदवारांसाठी राखीव आहेत. ७ जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय १८ ते २३ वर्ष असणं आवश्यक आहे. निवड होणाऱ्या उमेदवारांना २१७०० रुपये ते ६९१०० रुपये वेतनश्रेणीनुसार वेतन मिळेल. या भरतीपैकी १० टक्के जागा माजी सैनिकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

उपनिरीक्षक पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी अर्जाचं शुल्क म्हणून २०० रुपये भरावे लागतील. हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणाऱ्यांना १०० रुपये शुल्क भरावं लागेल. महिला, माजी सैनिक, अनुसूचित जाती, अनूसुचित जमाती या प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरावं लागणार नाही.

Tuesday, November 19, 2024

सामान्य ज्ञान

1. २०२४ चा 'बुकर पुरस्कार' कोणाला जाहीर झाला आहे ? 


सामंथा हार्वे, ब्रिटिश लेखिका 

2. ब्रिटिश लेखिका सामंथा हार्वे यांच्या कोणत्या कादंबरीला २०२४ चा बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे ?

ऑर्बिटल ( अंतराळातील आयुष्य सांगणारी)

3. VVPAT चा फुल फार्म काय आहे ?

व्होटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट ट्रेल

6. 'यान' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?

अंतराळवाहन

5. थादाऊ जमात कोणत्या राज्यातील आहे ?

मणिपूर

6 'ने मजसि ने मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला' ही कविता कोणी लिहिली ?

स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर

7.पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात ?

मालगुझारी  

8.बांधवगड व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

मध्यप्रदेश

9.भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिशांनी कधी मंजूर केला ?

१८ जुलै १९४७

10.५ मार्च १९४८ रोजी कोणाची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली.

सी. राजगोपालाचारी

विविध क्रांती आणि उत्पादने

 हरित क्रांती = अन्नधान्य व पिके उत्पादन 


◼ पीतक्रांती = तेलबिया उत्पादन 


◼ तंतू क्रांती = कापूस उत्पादन 


◼ सुवर्ण क्रांती = फळे व मधुमक्षिका पालन 


◼ चंदेरी क्रांती = कोळंबी उत्पादन 


◼ गुलाबी क्रांती = झिंगे उत्पादन 


◼ करडी क्रांती = खते उत्पादन 


◼ नील क्रांती = मत्सोत्पादन 


◼ लाल क्रांती = टोमॅटो व मांस उत्पादन 


◼ ऑपरेशन फ्लड = दुग्ध उत्पादन 


◼ श्वेत क्रांती = रेशीम उत्पादन 


◼ सुवर्ण तंतू क्रांती = ताग क्रांती 


◼ रुपेरी क्रांती = अंडी उत्पादन









भारतातील आणीबाणी

 भारतात तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

◾️ पहिली आणीबाणी - 26 ऑक्टोबर 1962 - 10 जानेवारी 1968 


◾️ दुसरी आणीबाणी 1971:- भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान. 


◾️ तिसरी आणीबाणी 25 जून 1975 पासून लागू झाली आणि 23 मार्च 1977 रोजी संपली


🛑 आणीबाणी विषयक कलमे 🛑


◾️कलम 352 - राष्ट्रीय आणीबाणी


◾️कलम 356 - राज्य आणीबाणी


◾️कल म 360 - आर्थिक आणीबाणी

सामान्य ज्ञान

 १) मायकेल जॅक्सन कोण होता ?

अमेरिकन गायक, गीतकार, नर्तक

२) अथर्ववेदाच्या संहितेला कोणत्या ऋषींचे नाव देण्यात आले आहे ?

अथर्व ऋषी 

३) इंजिनचा वेग मोजण्यासाठी जे एकक वापरले जाते त्याला काय म्हणतात ?


 अश्व शक्तीहॉर्स पॉवर


४) 'मूषक' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?


उंदीर

५) कोणत्या प्राण्याला अश्व म्हणतात ?

घोडा 


6. भारतीय कुक्कुटपालन उद्योगाचे जनक कोण ?

पद्मश्री डॉ. बी. व्ही. राव


7.न्युझीलंडच्या कोणत्या क्रिकेटपटूला त्याचे संघ सहकारी 'लायन ऑफ मुंबई' असे म्हणतात ?

एजाज पटेल


8.यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्रांचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन कोणत्या वेदात असते ?

यजुर्वेद

9.'मुलगी' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?

तनया, दुहिता, कन्या, तनुजा, लेक, सुता, पुत्री, आत्मजा


10. रोमन संख्याचिन्ह पद्धतीत कोणत्या संख्येसाठी चिन्ह वापरले जात नाही ?

शून्य

11. वेद वांड्मयावर आधारलेली संस्कृती कोणत्या नावाने ओळखली जाते ?

वैदिक संस्कृती

12.वैदिक वांड्मयाची भाषा कोणती होती ?


संस्कृत

13. वैदिक वांड्मयातील मूळ ग्रंथ कोणता ?


ऋग्वेद

14. ऋचा म्हणजे काय ?


स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य

15.ऋचांनी बनलेला वेद म्हणजे कोणता वेद होय ?


ऋग्वेद

16. बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते ?

गौतम बुद्ध

17. गौतम बुद्धाचे मूळ नाव काय होते ?

सिद्धार्थ

18. गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला ?

लुंबिनी, नेपाळ

19.यातना' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?

दुःख, वेदना

20. गौतम बुद्धांच्या आईवडिलांचे नाव काय ?

शुद्धोधन व मायादेवी

  


 



Thursday, November 14, 2024

राजीनामा. कोण कोणाकडे देतात

 राष्ट्रपती- उपराष्ट्रपतीकडे


उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे


पंतप्रधान - राष्ट्रपतीकडे


■केंद्रीय मंत्री राष्ट्रपतीकडे


■ राज्यपाल राष्ट्रपतीकडे


■संरक्षण दलाचे प्रमुख - राष्ट्रपतीकडे


■ महालेखापाल - राष्ट्रपतीकडे


■ महान्यायवादी - राष्ट्रपतीकडे


■राज्यसभा सभापती / उपराष्ट्रपती -


राष्ट्रपतीकडे


लोकपाल - राष्ट्रपतीकडे


लोकपाल मंडळ सदस्य - राष्ट्रपतीकडे


मुख्य निवडणुक आयुक्त - राष्ट्रपतीकडे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश -


राष्ट्रपतीकडे लोकसभा सदस्य - लोकसभा सभापतीकडे


लोकसभा सभापती - लोकसभा उपसभापतीकडे


लोकसभा उपसभापती - लोकसभा सभापतीकडे


राज्यसभा सदस्य राज्यसभा सभापतीकडे


राज्यसभा उपसभापती - राज्यसभा सभापतीकडे


■ मुख्यमंत्री राज्यपालाकडे


■ राज्याचे इतर मंत्री राज्यपालाकडे


■ महाधिवक्ता राज्यपालाकडे


■महाराष्ट्र-लोकायुक्त - राज्यपालाकडे


■ महाराष्ट्र-उपलोकायुक्त -


राज्यपालाकडे


राष्ट्रपतीकडे उच्च न्यायालयाचे न्यायाधिश


■ विधानसभा अध्यक्ष- विधानसभा उपाध्यक्षाकडे

लेखक व त्यांचे टोपण नावे

 दादोबा पांडुरंग तरखडकर - मराठी भाषेचे पाणिनी



 विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भाषेचे शिवाजी




• कृष्णाशास्त्री चिपलूणकर मराठी भाषेचे जॉनसन


• त्रिंबक बापूजी ठोंबरे- बालकवी


• कृष्णाजी केशव दामले -केशवसुत


• प्रल्हाद केशव अत्रे- केशवकुमार


• नारायण मुरलीधर गुप्ते 


• चिंतामन् त्र्यंबक मुरलीधर -आरतीप्रभु


• राम गणेश गडकरी-गोविंदाग्रज/बालकराम


• गोपाल हरि देशमुख - लोकहितवादी


• विष्णु वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज


• माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस


• दिनकर गंगाधर केलकर - अज्ञात निवासी


•यशवंत दिनकर पेंढारकर - महाराष्ट्र कवी




• सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व


• श्रीपाद नारायण राजहंस बालगंधर्व


• नारायण सूर्यजीपंत ठोसर रामदास


• बा. सी. मर्देकर -निसर्गप्रेमी


• सेतु माधवराव पगड़ी - कृष्णकुमार


• शंकर काशीनाथ गर्गे - दिवाकर


•ना धो महानोर रानकवी 




• काशीनाथ हरि मोदक माधवानुज


• हरिहर गुरुनाथ कुलकर्णी - कुंजविहारी

जागतिक ध्यान दिवस

  २१ डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा केला जावा हा लिकटेंस्टिन या देशाने मांडलेला व भारतासह अनेक देशांनी अनुमोदन दिलेला प्रस्ताव सं...