मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

राजमाता जिजाऊ

 


           *राजमाता जिजाऊ*

   *जिजाबाई शहाजीराजे भोसले*


   *जन्म : १२ जानेवारी १५९८*

(सिंदखेडराजा,बुलढाणा, महाराष्ट्र)


    *मृत्यू : १७ जून १६७४*

   (पाचड, रायगडचा पायथा)


वडील : लखुजीराव जाधव

आई : म्हाळसाबाई उर्फ 

           गिरिजाबाई

पती : शहाजीराजे भोसले

संतती : छत्रपती शिवाजीराजे भोसले, संभाजी शहाजी भोसले

राजघराणे : भोसले

चलन : होन

जिजाबाई (इतर नावे: जिजामाता, जिजाऊ, राजमाता, माँसाहेब, इत्यादी) ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.


🔱 *भोसले व जाधवांचे वैर*

                   पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसाळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाई यांचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व शरफोजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले. हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्‍यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला.

                          या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले. नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता.


🌀 *अपत्ये*

              जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.

                     जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. त्‍यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. १९ फेब्रुवारी १६३०, फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले.


⚜ *मुलाचे संगोपन व राजकारभार*

              शिवाजी राजे १४ वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकार्‍यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी राजे पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्‍यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजी राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवाजी राजांना पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि  रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणार्‍या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता, वगैरे. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच .शिवाजीराजे घडले. जिजाबाईंनी नुसत्याच गोष्टी सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.

                     शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईने लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत.


🔮 *जीवन*

                 शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.

                   राजांच्या प्रथम पत्‍नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.

              राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.

                        शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.

                 जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता होय.


📚 *पुस्तके*

                  राजमाता जिजाबाईंचे गुणवर्णन करणारी अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी काही ही-


जिजाऊंची निष्ठा (काव्यसंग्रह, कवयित्री - मेधा टिळेकर

जेधे शकावली

शिवभारत

जिजाऊ (डॉ प्रतिमा इंगोले )

जिजाई : मंदा खापरे 

गाऊ जिजाऊस आम्ही : इंद्रजीत भालेराव

अग्निरेखा


🎞 *चित्रपट*

                  जिजाबाईंची भूमिका असणारे अनेक मराठी चित्रपट व मराठी नाटके आहेत. शिवाजी राजांवरच्या चित्रपट-नाटकांत जिजाबाईंचे पात्र बहुधा असते. परंतु जिजाबाईंवर स्वतंत्र असे फारच थोडे चित्रपट निघाले, त्यांपैकी काही हे :-


राजमाता जिजाऊ (दिग्दर्शक - यशवंत भालकर)

स्वराज्यजननी जिजामाता (दूरचित्रवाणी मालिका, निर्माते : अमोल कोल्हे)


  *जय जिजाऊ...जय शिवराय*


   

ज्ञानाई..सावित्रीबाई ज्योतीराव फुले..

 

        

             *आद्यशिक्षिका*

     *ज्ञानज्योती, क्रांतिज्योती*

                  *ज्ञानाई*

   *सावित्रीबाई ज्योतीराव फुले*


   *जन्म : ३ जानेवारी १८३१*

     (नायगाव, सातारा, महाराष्ट्र)

       *मृत्यू : १० मार्च १८९७*

  (पुणे, सातारा जिल्हा, महाराष्ट्र)


चळवळ : मुलींची पहिली शाळा 

              सुरु करणे

संघटना : सत्यशोधक समाज

पुरस्कार : क्रांतीज्योती

प्रमुख स्मारके : जन्मभूमी नायगाव

धर्म : हिंदू

वडील : खंडोजी नेवसे(पाटील)

आई : सत्यवती नेवसे

पती : जोतीराव फुले

अपत्ये : यशवंत फुले

                  सावित्रीबाई जोतीराव फुले ह्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. फुले यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. आपल्या नायगाव या गावावर त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली आहे. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला असून त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्यांचा मृत्यु प्लेग या आजाराने झाला.


💁‍♀ *चरित्र*

                 सावित्रीबाईंच्या आईचे नाव सत्यवती तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. इ.स. १८४० साली जोतीराव फुले यांचेशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतीरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीबाईचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे गोरे, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना "फुले" हे आडनाव मिळाले.


सावित्रीबाईंचे पती जोतीराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतीरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतीरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतीरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.


१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. गुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी "भिडेवाड्यात" जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. साऱ्या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत १८ शाळा उघडल्या आणि चालवल्या. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.


(यापूर्वी मिशनऱ्यांनी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तर भारतात होत्या.) या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टूडन्ट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटीने ’कमळाबाई हायस्कूल’ नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली, ती शाळा २०१६ सालीही चालू आहे. (मिशनरी नसलेले पिअरी चरण सरकार यांनी मुलींसाठी पहिली शाळा बारासात टाऊन येथे १८४७ मध्ये काढली. शाळेसाठी नवीन कृष्ण मित्र आणि काली कृष्ण मित्र या दोन भावांनी आर्थिक मदत केली. ही शाळा कालीकृष्ण हायस्कूल या नावाने चालू आहे. मुंबईत पारशी लोकांनी १८४९ मध्ये मुले आणि मुलींसाठी पहिली सहशिक्षण शाळा काढली, पण काही दिवसातच या शाळेच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी अशा दोन शाखा झाल्या.)


सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी "धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला...." असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. पण अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.


शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.


जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. या बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.


केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.


इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.


इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून १० मार्च, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.


सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या. प्लेग मुळेच त्यांचे निधन झाले.


🎖 *सत्कार*

           पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही सावित्रीबाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत. *सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासुन ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.*

 

🌐 *गूगल डूडल*


३ जानेवारी, २०१७ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या १८६ व्या जन्मदिनानिमीत्त त्यांचे गूगल डूडल प्रसिद्ध करुन गूगलने त्यांना अभिवादन केले.


📺 *दूरदर्शन मालिका*


सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर दूरदर्शनच्या ’किसान’ वाहिनीवर २८ सप्टेंबर २०१५ पासून सोमवार ते शुक्रवार या काळात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील का हिंदी मालिदाखविली जात आहे.


📙 *सावित्रीबाईंची प्रकाशित पुस्तके*


काव्यफुले (काव्यसंग्रह)

सावित्रीबाईंची गाणी (१८९१)

सुबोध रत्नाकर

बाव नकशी


📚 *सावित्रीबाई फुले यांच्यावरचे प्रकाशित साहित्य, कार्यक्रम वगैरे*


Savitribai - Journey of a Trailblazer (Publisher : Azim Premji University)

'हाँ मैं सावित्रीबाई फुले' (हिंदी), (प्रकाशक : अझीम प्रेमजी विद्यापीठ)

सावित्रीबाई फुले (लेखक : अभय सदावर्ते)

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (लेखिका उषा पोळ-खंदारे)

Savitribai Phule (इंग्रजी, N. K. Ghorpde)

कर्मयोगिनी सावित्रीबाई फुले (लेखिका डाॅ. किरण नागतोडे)

सावित्रीबाईचा संघर्ष (के.डी. खुर्द)

थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले (केतन भानारकर)

पुण्यश्लोक सावित्रीबाई फुले (गौरी पाटील)

युगस्त्री सावित्रीबाई फुले (विठ्ठल लांजेवार)

सावित्रीबाई फुले (लेखक : जी.ए. उगले)

सावित्रीबाई फुले (लेखक : डी.बी. पाटील )

जोतिकांता सावित्री (दा.स. गजघाटे)

सावित्रीबाई फुले (प्रा. झुंबरलाल कांबळे)

Shayera.Savitri Bai Phule (in urdu) Author Dr. Nasreen Ramzan Sayyed

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखक : ना.ग. पवार)

सावित्रीबाई फुले : अष्टपैलू व्यक्तिमत्त्व (लेखक : ना.ग. पवार)

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखक : नागेश सुरवसे)

स्त्री महात्मा सावित्रीबाई फुले (नाना ढाकुलकर)

मी जोतीबांची सावित्री (नारायण अतिवाडकर)

सावित्रीबाई फुले (लेखिका : निशा डंके)

सावित्रीबाई फुले (लेखिका : प्रतिमा इंगोले )

सावित्रीबाई फुले (प्रमिला मोडक)

थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले (प्रेमा गोरे)

साध्वी सावित्रीबाई फुले (लेखिका : फुलवंता झोडगे). - चिनार प्रकाशन

सावित्रीबाई फुले चरित्र (बा.गं. पवार)

तेजाचा वारसा सावित्रीबाई फुले (लेखिका : प्रा. मंगला गोखले)

क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले (डाॅ. मा.गो. माळी) - मॅजेस्टिक प्रकाशन

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (डाॅ. मा.गो. माळी) - स्नेहवर्धन प्रकाशन

सावित्रीबाई फुले - श्रद्धा (लेखक : मोहम्मद शाकीर)

सावित्रीबाई फुले (लीला शाह)

ज्ञान ज्योती माई सावित्री फुले (लेखिका : विजया इंगोले)

त्या होत्या म्हणून (लेखिका : डॉ. विजया वाड)

Savitribai Phule (इंग्रजी, विठ्ठलराय भट)

युगस्त्री : सावित्रीबाई फुले (विठ्ठल लांजेवार)

सावित्रीबाई जोतिबा फुले : जीवनकार्य (शांता रानडे)

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखिका : शैलजा मोलक)

साध्वी सावित्रीबाई फुले (सविता कुलकर्णी) - भारतीय विचार साधना प्रकाशन

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (सौ. सुधा पेठे)

'व्हय मी सावित्रीबाई फुले' (नाटक) (एकपात्री प्रयोगकर्ती आद्य अभिनेत्री : सुषमा देशपांडे) (अन्य सादरकर्त्या - डॉ. वैशाली झगडे)

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (विद्याविकास) (लेखक : ज्ञानेश्वर धानोरकर)


🏵 *सावित्रीबाई संमेलन/अभ्यासकेंद्र/पुरस्कार*


सावित्रीबाई फुले यांच्या नावाने एक सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन भरते. याशिवाय, द्वितीय ज्योती-सावित्री साहित्य संमेलन या नावाचे पहिले राज्यस्तरीय संमेलनही नागपूर येथे २-३ जानेवारी २०१२ या तारखांना भरले होते.


*पुणे विद्यापीठाच्या नावाचा विस्तार करून ते ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे करण्यात आले आहे.*


*पुणे विद्यापीठात ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र' या नावाचे एक अभ्यासकेंद्र आहे.*


🏆 *सावित्रीबाई फुले यांच्या नावाने काही संस्थांनी पुरस्कार ठेवले आहेत. ते असे :-*


▪कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार.

▪पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सामाजिक कार्यासाठीचा 'सावित्रीबाई फुले पुरस्कार'. हा पुरस्कार २०११-१२ सालापासून दरवर्षी, महिला-बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या एका समाजसेविकेस दिला जातो. ५००१ रुपये रोख, व सन्मानपत्र, शाल व श्रिफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

▪महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार

▪चिंचवडगाव येथील महात्मा फुले मंडळाचे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले पुरस्कार

▪महात्मा फुले प्रतिभा संशोधन अकादमी (पुणे) तर्फे सावित्रीबाई तेजस कला राष्ट्रीय पुरस्कार

▪क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले 'आदर्श माता' पुरस्कार

▪क्रांतिज्योती सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार

▪मध्य प्रदेश सरकारचा उत्तम शिक्षिकेसाठीचा एक लाख रुपयांचा वार्षिक सावित्रीबाई पुरस्कार (२०१२ सालापासून)

▪सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना दिले जाणारे स्त्रीरत्‍न पुरस्कार : आदर्श माता रत्‍न, उद्योग रत्‍न, कला रत्‍न, क्रीडा रत्‍न, जिद्द रत्‍न, पत्रकारिता रत्‍न, प्रशासकीय रत्‍न, वीरपत्‍नी रत्‍न, शिक्षण रत्‍न

▪मराठी पत्रकार परिषदेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार

▪महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचा सर्वोत्कृष्ट नर्सला देण्यात येणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार

▪महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवडचे शाखेतर्फे सामाजिक / शैक्षणिक कामासाठीचा सावित्रीबाई पुरस्कार

▪माझी मैत्रीण ट्रस्टतर्फे देण्यात येणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार : २११६ साली हा पुरस्कार सहेली संस्थेच्या तेजस्वी सेवेकरी यांना देण्यात आला.

▪युनाइटेड ओबीसी फोरमचा सावित्रीवाई फुले वैचारिक वाङ्मय पुरस्कार.

▪वसईच्या लोकमत सखी मंच आणि प्रगत सामाजिक शिक्षण संस्था यांच्यातर्फे देण्यात येत असलेला सावित्रीबाई फुले पुरस्कार

▪सावित्रीवाई फुले यांच्या नावाची दत्तक-पालक योजना आहे.


         

भारत अणुऊर्जा आधारित टेस्ट

भारत अणुऊर्जा क्रांती | MCQ टेस्ट

भारत अणुऊर्जा क्रांती – MCQ टेस्ट

1) भारतातील अणुऊर्जा क्रांतीचे जनक कोण?
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
डॉ. होमी भाभा
विक्रम साराभाई
सॅम पित्रोदा
2) भारतात अणुऊर्जा आयोगाची स्थापना कधी झाली?
1945
1948
1956
1962
3) अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते?
विक्रम साराभाई
डॉ. होमी भाभा
राजा रामण्णा
ए.पी.जे. अब्दुल कलाम
4) भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणता?
तारापूर
कलपक्कम
रावतभाटा
काकरापार
5) तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
गुजरात
राजस्थान
महाराष्ट्र
तामिळनाडू
6) अणुऊर्जा उत्पादनाचा मुख्य उपयोग कशासाठी होतो?
शेती
वीज निर्मिती
वाहतूक
शिक्षण
7) BARC संस्थेचे पूर्ण नाव काय?
Bhaba Atomic Research Centre
Bhabha Atomic Research Centre
Bharat Atomic Research Centre
Basic Atomic Research Centre
8) BARC कोठे स्थित आहे?
दिल्ली
मुंबई
चेन्नई
हैदराबाद
9) भारताने पहिली अणुचाचणी कधी केली?
1965
1974
1990
1998
10) पहिल्या अणुचाचणीचे नाव काय होते?
ऑपरेशन शक्ती
ऑपरेशन स्माईलिंग बुद्धा
ऑपरेशन विजय
ऑपरेशन अग्नी
11) अणुऊर्जा ही कोणत्या प्रकारची ऊर्जा आहे?
अपारंपरिक
पारंपरिक
जैविक
सौर
12) भारतात अणुऊर्जा प्रकल्प कोण चालवतो?
ISRO
NPCIL
DRDO
NTPC
13) NPCIL चे पूर्ण नाव काय?
Nuclear Power Corporation of India Limited
National Power Corporation of India
Nuclear Production Council of India
None
14) अणुऊर्जा क्रांतीचा फायदा कोणता?
प्रदूषण वाढते
स्वस्त वीज
जंगलतोड
पाणी टंचाई
15) अणुऊर्जा प्रकल्पासाठी कोणते इंधन वापरले जाते?
कोळसा
युरेनियम
पेट्रोल
सौरऊर्जा
16) कलपक्कम अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
केरळ
कर्नाटक
तामिळनाडू
आंध्र प्रदेश
17) भारतातील अणुऊर्जा संशोधनाचे प्रमुख केंद्र कोणते?
ISRO
BARC
IIT
AIIMS
18) अणुऊर्जा क्रांतीमुळे भारत कोणत्या क्षेत्रात सक्षम झाला?
संरक्षण व ऊर्जा
फक्त शेती
वस्त्रोद्योग
पर्यटन
19) अणुऊर्जा क्रांतीचा तोटा कोणता?
किरणोत्सर्ग धोका
रोजगार वाढ
वीज निर्मिती
विकास
20) भारताची अणुऊर्जा धोरणे कोणत्या उद्देशाने आहेत?
शांततामय वापर
युद्धासाठी
व्यापारासाठी
मनोरंजनासाठी

संगणक क्रांती आधारित टेस्ट..

संगणक क्रांतीचे जनक – भारत | MCQ टेस्ट

संगणक क्रांतीचे जनक – भारत (MCQ टेस्ट)

1) भारतातील संगणक क्रांतीचे जनक कोण?
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
डॉ. विजय भटकर
सॅम पित्रोदा
होमी भाभा
2) डॉ. विजय भटकर कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
अंतराळ
अणुऊर्जा
संगणक विज्ञान
कृषी
3) PARAM 8000 हा काय आहे?
सॉफ्टवेअर
मोबाइल
सुपरकॉम्प्युटर
वेबसाइट
4) PARAM 8000 कधी विकसित झाला?
1980
1985
1991
2000
5) C-DAC संस्थेची स्थापना कोणी केली?
डॉ. कलाम
डॉ. विजय भटकर
नॉर्मन बोरलॉग
राजीव गांधी
6) C-DAC चे पूर्ण रूप काय?
Centre for Digital Application
Centre for Development of Advanced Computing
Computer Department of Asia
Central Data Analysis Centre
7) संगणक क्रांतीमुळे कोणत्या क्षेत्राला गती मिळाली?
माहिती तंत्रज्ञान
हस्तकला
पशुपालन
खाणकाम
8) भारतातील पहिला स्वदेशी सुपरकॉम्प्युटर कोणता?
TIFRAC
PARAM 8000
ENIAC
CRAY
9) डॉ. विजय भटकर यांना कोणते पदक मिळाले आहे?
भारतरत्न
पद्मभूषण
पद्मश्री
अर्जुन पुरस्कार
10) संगणक क्रांतीमुळे कोणती संकल्पना उदयास आली?
ई-गव्हर्नन्स
गुरुकुल पद्धत
मौखिक परंपरा
हस्तलिखित
11) संगणक क्रांतीचा थेट परिणाम कोणत्या सेवांवर झाला?
ऑनलाइन बँकिंग
बैलगाडी
टपाल घोडा
पत्रलेखन
12) भारतात संगणक क्रांतीला वेग कधी मिळाला?
1960
1970
1980 नंतर
1950
13) सुपरकॉम्प्युटरचा उपयोग कशासाठी होतो?
गेम खेळण्यासाठी
हवामान अंदाज
चित्रकला
टायपिंग
14) संगणक क्रांती कोणत्या युगाशी संबंधित आहे?
दगडी युग
औद्योगिक युग
माहिती युग
कृषीय युग
15) भारतातील IT राजधानी कोणती?
मुंबई
पुणे
बेंगळुरू
चेन्नई
16) संगणक क्रांतीमुळे कोणती संधी वाढली?
बेरोजगारी
रोजगार
अज्ञान
अपव्यय
17) ई-शिक्षण म्हणजे काय?
शाळा बंद
ऑनलाइन शिक्षण
मौखिक शिक्षण
हस्तलिखित शिक्षण
18) संगणक क्रांतीमुळे कोणता व्यवहार सोपा झाला?
रोख व्यवहार
डिजिटल व्यवहार
बार्टर
उधारी
19) संगणक क्रांतीचा नकारात्मक परिणाम कोणता?
सायबर गुन्हे
शिक्षण वाढ
रोजगार
माहिती उपलब्धता
20) डॉ. विजय भटकर यांचे योगदान मुख्यतः कशासाठी ओळखले जाते?
हरित क्रांती
संगणक क्रांती
धवल क्रांती
जलक्रांती

महाराष्ट्र हरितक्रांती आधारित टेस्ट.

महाराष्ट्र हरित क्रांती – आधारित टेस्ट

महाराष्ट्रातील हरित क्रांती – MCQ टेस्ट

1) हरित क्रांतीचा मुख्य उद्देश काय होता?
2) महाराष्ट्रात हरित क्रांतीसाठी कोणता घटक महत्त्वाचा ठरला?
3) महाराष्ट्रातील हरित क्रांतीसाठी कोणते पीक महत्त्वाचे होते?
4) महाराष्ट्रातील कोणत्या भागात हरित क्रांतीचा प्रभाव जास्त दिसतो?
5) महाराष्ट्रात हरित क्रांतीला चालना देणारा प्रमुख प्रकल्प कोणता?
6) हरित क्रांतीत कोणत्या बियाण्यांचा वापर झाला?
7) महाराष्ट्रातील हरित क्रांतीमुळे शेतकऱ्यांना काय लाभ झाला?
8) महाराष्ट्रात कोणत्या क्षेत्रात हरित क्रांतीचा लाभ कमी झाला?
9) महाराष्ट्रातील हरित क्रांतीचा एक नकारात्मक परिणाम कोणता?
10) महाराष्ट्रातील हरित क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

जागतिक हरित क्रांती आधारित टेस्ट..

जागतिक हरित क्रांती – आधारित टेस्ट

जागतिक हरित क्रांती – MCQ टेस्ट

1) जागतिक हरित क्रांतीचे जनक कोण मानले जातात?
2) जागतिक हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या दशकात झाली?
3) हरित क्रांतीचा मुख्य उद्देश काय होता?
4) नॉर्मन बोरलॉग यांनी मुख्यतः कोणत्या पिकावर संशोधन केले?
5) हरित क्रांतीमध्ये कोणत्या बियाण्यांचा वापर झाला?
6) जागतिक हरित क्रांतीचा सर्वाधिक फायदा कोणत्या खंडाला झाला?
7) भारतात हरित क्रांतीचे नेतृत्व कोणी केले?
8) हरित क्रांतीसाठी कोणती गोष्ट अत्यावश्यक होती?
9) जागतिक हरित क्रांतीचा एक नकारात्मक परिणाम कोणता?
10) नॉर्मन बोरलॉग यांना कोणता पुरस्कार मिळाला?

वन महोत्सवाचे जनक आधारित टेस्ट..

वन महोत्सवाचे जनक – आधारित टेस्ट

वन महोत्सवाचे जनक – MCQ टेस्ट

1) वन महोत्सवाचे जनक कोण आहेत?
2) भारतात वन महोत्सवाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
3) वन महोत्सव साजरा करण्यामागील मुख्य उद्देश काय आहे?
4) वन महोत्सव सहसा कोणत्या महिन्यात साजरा केला जातो?
5) वन महोत्सव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
6) के. एम. मुन्शी हे कोणत्या क्षेत्रातील नेते होते?
7) वन महोत्सवामुळे कोणती जाणीव निर्माण होते?
8) वन महोत्सवाचा थेट फायदा कशाला होतो?
9) वन महोत्सव कोणत्या प्रकारचा उपक्रम आहे?
10) वन महोत्सव साजरा करण्यामागील संदेश कोणता?

दूरसंचार क्रांती आधारित टेस्ट..

दूरसंचार क्रांती – भारत | MCQ टेस्ट

दूरसंचार क्रांती – भारत (MCQ टेस्ट)

1) दूरसंचार क्रांतीचा संबंध कशाशी आहे?
2) भारतात दूरसंचार क्रांतीला खरी गती कधी मिळाली?
3) दूरसंचार क्रांतीचा सर्वाधिक उपयोग कोणत्या साधनातून झाला?
4) ‘डिजिटल इंडिया’ हा उपक्रम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
5) खालीलपैकी कोणती दूरसंचार सेवा भारतात आहे?
6) 5G तंत्रज्ञानाचा मुख्य फायदा कोणता?
7) दूरसंचार क्रांतीमुळे कोणती सेवा शक्य झाली?
8) भारतातील पहिली मोबाईल कॉल सेवा कोणत्या दशकात सुरू झाली?
9) दूरसंचार क्रांतीमुळे कोणता व्यवसाय वाढला?
10) दूरसंचार क्रांतीचा एक नकारात्मक परिणाम कोणता?

हरित क्रांती आधारित टेस्ट..

हरित क्रांती (Green Revolution) हरित क्रांती म्हणजे भारतात अन्नधान्य उत्पादनात झालेली मोठी वाढ होय. या क्रांतीमुळे भारत अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला. --- 🌾 हरित क्रांतीची प्रमुख माहिती सुरुवात: 1960 च्या दशकात जनक (भारत): डॉ. एम. एस. स्वामीनाथन प्रेरणा: नॉर्मन बोरलॉग मुख्य पिके: गहू, तांदूळ मुख्य राज्ये: पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश --- 🎯 उद्दिष्टे अन्नधान्य उत्पादन वाढवणे उपासमार व अन्नटंचाई दूर करणे आधुनिक शेती पद्धती वापरणे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे --- 🧪 वापरलेल्या पद्धती उच्च उत्पादनक्षम बियाणे (HYV) रासायनिक खते व कीटकनाशके सिंचन सुविधा आधुनिक कृषी अवजारे --- ✅ परिणाम गहू व तांदूळ उत्पादनात प्रचंड वाढ भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली ग्रामीण विकासाला चालना --- ⚠️ मर्यादा मातीची सुपीकता कमी झाली पाण्याचा अति वापर लहान शेतकऱ्यांना कमी लाभ हरित क्रांती आधारित टेस्ट

हरित क्रांती आधारित बहुपर्यायी चाचणी

1) हरित क्रांतीचा संबंध कशाशी आहे?
2) भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण?
3) हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या दशकात झाली?
4) हरित क्रांतीमुळे कोणते पीक विशेष वाढले?
5) हरित क्रांतीचा सर्वाधिक फायदा कोणत्या राज्यांना झाला?
6) HYV बियाणे म्हणजे काय?
7) हरित क्रांतीमुळे भारत काय झाला?
8) हरित क्रांतीमध्ये कोणत्या साधनांचा वापर झाला?
9) हरित क्रांतीचा नकारात्मक परिणाम कोणता?
10) हरित क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

धवल क्रांती वर आधारित टेस्ट..

 

धवल क्रांती (White Revolution)

धवल क्रांती म्हणजे भारतातील दुग्ध उत्पादनात झालेली ऐतिहासिक वाढ होय. या क्रांतीमुळे भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला.

🔹 धवल क्रांतीची प्रमुख माहिती

  • सुरुवात: 1970 साली
  • मुख्य कार्यक्रम: ऑपरेशन फ्लड (Operation Flood)
  • नेतृत्व: डॉ. वर्गीज कुरियन
  • टोपणनाव: भारताचे दुग्ध पुरुष (Father of White Revolution)

🔹 उद्दिष्टे

  • दूध उत्पादन वाढवणे
  • शेतकरी व दुग्ध उत्पादकांचे उत्पन्न वाढवणे
  • ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे
  • दूध संकलन, प्रक्रिया व वितरण सुधारणा

🔹 महत्त्वाचे परिणाम

  • दूध उत्पादनात प्रचंड वाढ
  • सहकारी दुग्धसंस्था (जसे अमूल) बळकट झाल्या
  • ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती
  • शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न

🔹 भारतातील प्रसिद्ध दुग्ध सहकारी संस्था

  • अमूल (गुजरात)
  • वारणा (महाराष्ट्र)
  • मदर डेअरी (दिल्ली)

🔹 धवल क्रांतीचे महत्त्व

धवल क्रांतीमुळे भारतात पोषण, आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य वाढले. ही क्रांती भारतीय कृषी इतिहासातील एक मैलबाचा दगड मानली जाते.


धवल क्रांती आधारित MCQ टेस्ट

धवल क्रांती आधारित बहुपर्यायी चाचणी

1) धवल क्रांतीचा संबंध कशाशी आहे?
2) धवल क्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
3) धवल क्रांतीचे जनक कोण आहेत?
4) धवल क्रांतीशी संबंधित प्रमुख योजना कोणती?
5) ‘अमूल’ ही सहकारी संस्था कोणत्या राज्यात आहे?

राजमाता जिजाऊ

             *राजमाता जिजाऊ*    *जिजाबाई शहाजीराजे भोसले*    *जन्म : १२ जानेवारी १५९८* (सिंदखेडराजा,बुलढाणा, महाराष्ट्र)     *मृत्यू : १७ जू...