Main Menu
h 2
Labels
- Exam परीक्षा (4)
- jk (57)
- चालू घडामोडी (24)
- टेस्ट TEST (28)
- टेस्ट TEST स्पर्धा परीक्षा टेस्ट (8)
- नोकरी जाहिरात (5)
- नोकरी जाहिरात.. (50)
- महान / विशेष व्यक्ती (78)
- विज्ञान विषयावर टेस्ट (17)
- विशेष प्रश्नमंजुषा (19)
- सातारा प्रज्ञाशोध परीक्षा (1)
- स्कॉलरशिप नवोदय परीक्षा टेस्ट (9)
जिल्हा न्यायाधीश भरती 2026
रेल्वे मध्ये 311 पदांची भरती.2026
देशभरातील एकूण ३११ रिक्त पदे भरली जाणार आहेत.
रेल्वेत स्थिर व प्रतिष्ठेची नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही अत्यंत महत्वाची संधी आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही 30 डिसेंबर 2025 पासून सुरू झाली असून शेवटची तारीख 29 जानेवारी 2026 आहे.
तरी इच्छुक उमेदवारांना https://www.rrbapply.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात.
पदांची माहिती
वरिष्ठ प्रसिद्ध निरीक्षक: 15
प्रयोगशाळा सहाय्यक श्रेणी- III (रसायनशास्त्रज्ञ व धातूशास्त्रज्ञ): 39
मुख्य विधी सहाय्यक : 22
कनिष्ठ अनुवादक (हिंदी): 202
कर्मचारी व कल्याण निरीक्षण: 24
सरकारी वकील: 07
वैज्ञानिक सहाय्यक / प्रशिक्षण: 02
एकूण पदे: 311
शैक्षणिक पात्रता
प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता निर्धारित करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात (Notification) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
किमान वय: १८ वर्षे
कमाल वय: ३५ वर्षे
(आरक्षित प्रवर्गासाठी शासन नियमानुसार सलवत लागू)
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी (CBT) द्वारे केली जाईल.
तसेच अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी
https://www.rrbapply.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
बँक ऑफ महाराष्ट्रने पदवीधरांसाठी ६०० शिकाऊ उमेदवारांची (Apprentices) भरती जाहीर ..
बँक ऑफ महाराष्ट्रने पदवीधरांसाठी ६०० शिकाऊ उमेदवारांची (Apprentices) भरती जाहीर केली आहे. या भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांची निवड कोणत्याही लेखी परीक्षेविना, केवळ गुणवत्तेच्या आधारावर केली जाणार आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) ने तब्बल ६०० शिकाऊ उमेदवारांची (Apprentices) भरती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.
उमेदवारांची निवड ही कोणत्याही कठीण परीक्षेविना, केवळ 'गुणवत्तेच्या' (Merit) आधारावर केली जाणार आहे. पदवीच्या गुणांवर आधारित तुमची निवड होऊ शकते, त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांनी यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एकूण पदे: ६०० (अप्रेंटिस)
वयोमर्यादा: २० ते २८ वर्षे.
शिक्षण: कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) पूर्ण.
महत्त्वाची अट: उमेदवाराला स्थानिक भाषेचे (मराठी) ज्ञान असणे आवश्यक आहे. (१० वी किंवा १२ वी स्थानिक भाषेतून उत्तीर्ण असणे अनिवार्य).
१. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला bankofmaharashtra.in भेट द्या.
२. 'Careers' सेक्शनमध्ये जाऊन 'Apprenticeship' लिंकवर क्लिक करा.
३. नवीन नोंदणी (New Registration) करून लॉग-इन करा.
४. अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरा.
५. आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करून फॉर्म सबमिट करा.
६. भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
25 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज करता येणार...
RRB मध्ये भरती 2026
RRB मध्ये भरती ! अर्ज प्रक्रियेला सुरुवात; 'या' तारखेपर्यंत करता येईल अर्ज
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमध्ये भरतीला सुरुवात
ही भरती जाहिरात २० डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित
RRBच्या अधिकृत वेबसाइट rrbapply.gov.in ला भेट द्या
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमध्ये भरतीला सुरुवात झाली आहे.
अर्ज करण्याच्या प्रक्रियेला वेग मिळाला असून उमेदवारांना २९ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी rrbapply.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) यांनी मिनिस्टीरियल आणि आयसोलेटेड कॅटेगरी भरती २०२६साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार २९ जानेवारी २०२६ पर्यंत RRBच्या अधिकृत संकेतस्थळावर
येथे अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे विविध मंत्रीस्तरीय आणि स्वतंत्र (Isolated) श्रेणीतील पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ही भरती जाहिरात २० डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित करण्यात आली होती. त्यानुसार ३० डिसेंबर २०२५ रोजी रात्री १२ वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या फॉर्म भरावे..
धन्यवाद
मुंबई उच्च न्यायालय एकूण पदे : 2331
मुंबई उच्च न्यायालयाने लिपिक, शिपाई, स्टेनोग्राफर, चालक यासह विविध पदांसाठी 2331 जागांची मेगा भरती जाहीर केली. ही भरती मुंबई, नागपूर, औरंगाबाद खंडपीठांसाठी असून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 15 डिसेंबर 2025 पासून सुरू होणारय.
एकूण पदे : 2331
खंडपीठे : मुंबई, नागपूर, औरंगाबाद
अर्ज पद्धत : Online
अधिकृत वेबसाइट : bombayhighcourt.nic.in
अर्ज सुरू : 15 डिसेंबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 जानेवारी 2026
अर्ज शुल्क : सर्व वर्गांसाठी ₹1000
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा + मुलाखत
लघुलेखक (हायर)
जागा : 19
आवश्यक पात्रता:
पदवीधर
शॉर्टहँड 100 WPM
इंग्रजी टायपिंग 40 WPM
लघुलेखक (लोअर)
जागा : 56
पात्रता:
पदवीधर
शॉर्टहँड 80 WPM
इंग्रजी टायपिंग 40 WPM
3) लिपिक (Clerk)
जागा : 1332
पात्रता:
पदवीधर
GCC-TBC / ITI (इंग्रजी टायपिंग 40 WPM)
MS-CIT किंवा समतुल्य संगणक प्रमाणपत्र
4) वाहनचालक (Driver)
जागा : 37
पात्रता:
किमान 10वी उत्तीर्ण
LMV वाहन परवाना
3 वर्षांचा ड्रायव्हिंग अनुभव
शिपाई / हमाल / फरश
जागा : 887
पात्रता:
किमान 7वी उत्तीर्ण
वयोमर्यादा
सामान्य उमेदवार : 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय उमेदवार : 5 वर्षे शिथिलता
सेंट्रल बँक ऑफ इंडियाने भरती...
सेंट्रल बँक ऑफ इंडियाने भरती जाहीर केली आहे. फॅकल्टी पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी www.centralbankofindia.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहेत. नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याजवळ आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही. तुमची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०२५ आहे. अर्ज करण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट वाहू नका. त्याआधीच अर्ज करावेत.
सेंट्रल बँकेतील या नोकरीसाठी २२ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतत. या नोकरीसाठी अर्ज करताना कोणतेही शुल्क भरायचे नाहीत.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती 2025
इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती 2025
इंडिया पोस्ट India Post पेमेंट बैंक Payments Bank
सरकारी बँक मध्ये नोकरी.
एकूण पदे : 0309 जागा.
PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक येथे
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) भरती 2025: बँकिंग क्षेत्रात करिअरची मोठी संधी |
मित्रांनो, जर तुम्ही सरकारी बँकेत काम करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक जबरदस्त बातमी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) मध्ये भरती...
इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती 2025.
एकूण पदे : 0309 जागा.
सरकारी बँक मध्ये नोकरी.
महिला व बालविकास विभागात तब्बल २५८ पदांसाठी जाहिरात ..
Mpsc मार्फत.महिला व बालविकास विभागात तब्बल २५८ पदांसाठी जाहिरात देण्यात आलेली आहे.
महिला व बालविकास आयुक्तालयांतर्गत अधीक्षक / निरीक्षक प्रमाणित शाळा व तत्सम संवर्गाकरीता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ची जाहिरात एमपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. एकूण पदे २५८ असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ डिसेंबर आहे.
महिला व बाल विकास आयुक्तालयांतर्गत अधिक्षक / निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था /रचना व कार्यपध्दती अधिकारी / अधिव्याख्याता / जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी /सांख्यिकी अधिकारी गट-ब (राजपत्रित) आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयांतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण), गट-ब या पदांवर निवडीद्वारे नियुक्तीकरीता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५ करिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
फक्त महिला व बाल विकास विभागातील आणि ग्राम विकास विभागातील कर्मचा-यांना खालील संवर्गातील पदावर निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महिला व बाल विकास आयुक्तालयांतर्गत अधिक्षक / निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था / रचना व कार्यपध्दती अधिकारी / अधिव्याख्याता / जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी / सांख्यिकी अधिकारी गट-ब (राजपत्रित) आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयांतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण), गट-ब या पदांवर निवडीद्वारे नियुक्तीकरीता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ आयोजित करण्यात येईल. प्रस्तुत परीक्षेचा दिनांक, परीक्षा केंद्र, परीक्षेचे स्वरुप (Online/Offline) स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
२. संवर्गाचे नाव :- महिला व बाल विकास आयुक्तालयांतर्गत अधिक्षक / निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था / रचना व कार्यपध्दती अधिकारी / अधिव्याख्याता / जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी / सांख्यिकी अधिकारी गट-ब (राजपत्रित) आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयांतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण), गट-ब
३. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया/कालावधी – विषयांकित संवर्गाच्या जाहिरातीस अनुसरून ऑनलाईल पद्धतीने अर्ज सादर करण्याचा कालावधी खालीलप्रमाणे राहील :-
दिनांक २४ नोव्हेंबर, २०२५ पासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल. तर १४ डिसेंबर, २०२५ पर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी १४ डिसेंबर, २०२५ पर्यंत मुदत आहे.
9000 पेक्षा जास्त पदे
२०२५ साठी एकूण 9000 पेक्षा जास्त पद भरणार आहेत. यामध्ये PGT, TGT, PRT तसेच प्राचार्य, उपप्राचार्य आणि विविध नॉन-टीचिंग पदांचा समावेश आहे. अर्ज प्रक्रिया १४ नोव्हेंबर पासून सुरु झाली असून 4 डिसेंबर 2025 ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी navodaya.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाणून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अधिक माहितीसाठी तुम्ही KVS pfd डाउनलोड करू शकतात.
या भरतीमध्ये कोणती पदे आहेत?
१. पीजीटी - १४६५ पदे
केंद्रीय विद्यालयात पदव्युत्तर शिक्षकांच्या १४६५ पदे उपलब्ध आहेत. विषयानुसार, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, वाणिज्य, संगणक विज्ञान इत्यादी विषयांमध्ये भरती केली जाईल.
२. TGT (टीजीटी) - २७९४ पदे
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदांसाठी, हिंदी, इंग्रजी, सामाजिक विज्ञान, संस्कृत, गणित, विज्ञान आणि विशेष शिक्षक यासारख्या विषयांमध्ये २७९४ पदे जाहीर करण्यात आली आहेत.
३. PRT (पीआरटी) - ३३६५ पदे
प्राथमिक शिक्षक (पीआरटी) भरतीमध्ये, सामान्य पीआरटी, विशेष शिक्षण पीआरटी आणि पीआरटी संगीत या पदांमध्ये ३३६५ रिक्त जागा भरायच्या आहेत.
४. प्राचार्य आणि उपप्राचार्य - १९२ पदे
प्राचार्य - १३४ पदे
उपप्राचार्य - ५८ पदे
सहाय्यक आयुक्त - ८ पदे
५. शिक्षकेतर - १३०२ पदे
विभागाच्या रचनेत ग्रंथपाल, वित्त अधिकारी, प्रशासन अधिकारी, कनिष्ठ/वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, स्टेनो, अनुवादक, सहाय्यक विभाग अधिकारी इत्यादींचा समावेश आहे.
अर्ज कसा करायचा?
- अधिकृत KVS/CBSE वेबसाइट उघडा.
- मुख्य पानावर दिसणाऱ्या "Recruitment 2025" किंवा "Apply Online" लिंकवर .
- आपले नवीन रजिस्ट्रेशन करा (मोबाईल नंबर व ईमेल आयडी आवश्यक).
- योग्य पद निवडा - PGT/TGT/PRT/Non-Teaching.
- अर्ज फॉर्म पूर्णपणे भरा
- वैयक्तिक माहिती
- शैक्षणिक पात्रता
- अनुभव (लागू असल्यास)
- आवश्यक कागदपत्रांचे स्कॅन अपलोड करा.
- फी ऑनलाइन पद्धतीने भरा (डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग).
- अर्ज सबमिट करा व त्याची प्रिंट कॉपी जतन करा.
पोलीस शिपाई भरती पुणे 2024 ..25
महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) शिपाई नियम २०११ व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक १७/१०/२०२५ च्या आदेशांन्वये केलेल्या सुधारणांनुसार पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या आस्थापनेवर सन २०२४-२०२५ मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी १७०० व बॅण्ड्समन करीता ३३ अशी एकूण १७३३ पदे भरण्यासाठी पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे.
चालक पोलीस शिपाई भरती 2025
महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम २०१९ व त्यानंतर शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा आणि दिनांक २७/१०/२०२५ च्या आदेशांन्वये केलेल्या सुधारणांनुसार पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या आस्थापनेवर सन २०२४-२०२५ मध्ये चालक पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी १०५ पदे भरण्यासाठी पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे.
एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) भरती 7267 पदे
B.Ed. असणार्या विद्यार्थ्यां साठी खूप imp आहे. एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS)
मध्ये ७२६७ पदांसाठी मेगा भरती जाहीर
झाली आहे!
अर्जाची शेवटची तारीख: २३ ऑक्टोबर
२०२५
अधिकृत वेबसाईट: tribal.nic.in
शरद पवार इन्सपायर फेलोशिप : शिक्षण 2026
*शरद पवार इन्सपायर फेलोशिप : शिक्षण*
शिक्षण उद्यासाठी असते. उद्याचे सुजाण, सतर्क, सर्जनशील, कर्तबगार व सुसंस्कृत नागरिक घडविणे हे शिक्षणातून अपेक्षित असते. शिकावे कसे, शिकण्याचा आनंद कसा घ्यावा-द्यावा आणि आजन्म शिकत कसे राहावे हे शिकविते ते खरे शिक्षण. शिकता-शिकता जे उद्याची आव्हाने पेलायला सज्ज करते, उद्याच्या संधींचे सोने करायला शिकवते ते खरे शिक्षण.
शिक्षण क्षेत्रात नवे काही करु पाहणाऱ्या, ध्येयाने झपाटलेल्या व त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या होतकरु गुणवंत शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्याना हक्काचं व्यासपीठ मिळावं, त्यांच्याकडून गुणवत्तापूर्ण काम व्हावे तसेच मुलभूत संशोधनास वाव मिळावा हा या फेलोशीपचा हेतू आहे.यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने २० प्राथमिक शिक्षक आणि १० माध्यमिक शिक्षकांना ही फेलोशिप दिली जाणार आहे.
सध्या देशभर आणि राज्यभर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०च्या अंमलबजावणीचे काम सुरू आहे.त्या संदर्भाने या धोरणात सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची प्रभावी अंमलबजावणी, त्यामधील साधने व तंत्राचा परिणामकारक रीतीने उपयोग ह्या बाबी अंतर्भूत आहेत. ही मूल्यांकन प्रक्रिया सातत्यपूर्ण आणि आकारिक क्षमता आधारित आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटर, शिक्षण विकास मंच यांच्यावतीने यावर्षी शरद पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी शिक्षकांकडून *राष्ट्रीय शिक्षण धोरण -२०२० शालेय शिक्षणातील मूल्यांकन* प्रक्रियेला केंद्रस्थानी मानून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. यासाठी- https://www.sharadpawarfellowship.com/fellowships/education-fellowship/education-fellowship-primary-secondary-education या वेबसाईटवर *भूमिका, फेलोशिपचे तपशील, फेलोशिपची नियमावली* यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे.
२०२६- २७च्या फेलोशिपसाठीची अर्ज प्रक्रिया १५ ऑगस्ट २०२५ पासून सुरु झाली आहे. तरी इच्छुक शिक्षकांनी दिनांक १२ऑक्टोबर २०२५ अखेर *https://www.sharadpawarfellowship.com/ या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करताना वेबसाईटवर फेलोशिपबाबत सविस्तर माहितीचे टीपण* दिले आहे.ते टीपण काळजीपूर्वक वाचावे, फार्म भरण्यासाठी,विषय निवडीसाठी त्याचा उपयोग होईल.
टीप : प्रस्ताव लेखन कसे करावे? याकरिता हा खालील व्हिडिओ पहा-
भारतीय जीवन विमा महामंडळाने 841 जागांची पदभरती..
भारतीय जीवन विमा महामंडळाने 841 सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO) आणि सहाय्यक अभियंता पदांसाठी 2025 ची भरती जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया 16 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली असून, 8 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करता येतील.
DSSSB दिल्ली उच्च न्यायालयात विविध 334 पदे भरती 2025
दिल्लीमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळाने (DSSSB) दिल्ली उच्च न्यायालयात विविध पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.
भरतीअंतर्गत एकूण 334 पदे भरली जातील, ज्यामध्ये कोर्ट अटेंडंट, रूम अटेंडंट आणि सिक्युरिटी अटेंडंट सारख्या महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. अर्ज प्रक्रिया 26 ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल आणि 24 सप्टेंबर 2025 पर्यंत चालेल.
या भरतीअंतर्गत एकूण 334 पदे भरली जातील, ज्यामध्ये कोर्ट अटेंडंटची 295 पदे, कोर्ट अटेंडंट (एस) ची 22 पदे, कोर्ट अटेंडंट (एल) ची 1 पदे, रूम अटेंडंट (एच) ची13 पदे आणि सुरक्षा अटेंडंटची 3 पदे समाविष्ट आहेत.
पात्रता आणि वयोमर्यादा
दिल्ली उच्च न्यायालयात या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी किमान शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण आहे. उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे, तर राखीव श्रेणींसाठी नियमांनुसार वयातसूट दिली जाईल.
अर्ज शुल्क
या भरतीसाठी अर्ज करताना, जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल, तर एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ते मोफत आहे. अर्ज शुल्क फक्त ऑनलाइन पद्धतीने भरता येते, ज्यामध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा समावेश आहे.
परीक्षा नमुना आणि मुलाखत
टियर-1 : पूर्वपरीक्षा म्हणजेच टियर-1 परीक्षा ही वस्तुनिष्ठ प्रकारची (MCQ) असेल. यात एकूण 100 प्रश्न असतील आणि एकूण गुण देखील 100 असतील, परीक्षेचा कालावधी 150 मिनिटे आहे. अभ्यासक्रमात हिंदी (25गुण), इंग्रजी (25 गुण), सामान्य ज्ञान (25 गुण - द्विभाषिक) आणि अंकगणित (25 गुण - द्विभाषिक) यांचा समावेश आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25गुणांची नकारात्मक गुणांकन आहे.
उत्तीर्ण गुण श्रेणीनुसार निश्चित केले जातील: अनारक्षित - 50 गुण, अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी/ईडब्ल्यूएस/पीडब्ल्यूडी/माजी सैनिक - 45 गुण. टियर-1मध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल, जर निवडलेल्या उमेदवारांची संख्या उपलब्ध रिक्त पदांच्या पाचपट पेक्षा जास्त नसेल.
टियर-2 : टियर-2 म्हणजेच मुलाखतीत एकूण 15 गुण असतील. या टप्प्यासाठी किमान पात्रता गुण निश्चित केलेले नाहीत. मुलाखतीचा उद्देश उमेदवाराची वैयक्तिक क्षमता, वर्तन आणि संवाद कौशल्यांचे मूल्यांकन करणे आहे. फक्त टियर-1 मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच या टप्प्यासाठी बोलावले जाईल आणि अंतिम निवडीसाठी त्याचे गुण जोडले जातील.
अर्ज कसे कराल
सर्वप्रथम DSSSB च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
होमपेजवर दिलेल्या "ऑनलाइन अर्ज करा" लिंकवर क्लिक करा.
जर तुम्ही नवीन उमेदवार असाल तर आधार कार्ड आणि ईमेल/मोबाइल नंबर सारखी माहिती देऊन नोंदणी करा.
नोंदणीनंतर लॉगिन करा आणि अर्ज भरा.
सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशील योग्यरित्या भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा.
फॉर्म भरल्यानंतर आणि फी भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढा.
बँक ऑफ महाराष्ट्र 500 पदे भरती 2025
बँक ऑफ महाराष्ट्रने नोकरीच्या शोधात असेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रने 2025-26 या वर्षासाठी 500 कायमस्वरूपी जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II) पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ही भरती देशभरातील पात्र उमेदवारांसाठी खुली असून इच्छुकांनी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर (bankofmaharashtra.in) 30 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
पात्रता आणि वयोमर्यादा
या भरतीसाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60 टक्के गुणांसह पदवी किंवा चार्टर्ड अकाउंटंट (CA) अर्हता असावी. SC/ST/OBC/PwBD प्रवर्गातील उमेदवारांसाठी 55 टक्के गुणांसह सवलत आहे. याशिवाय बँकिंग क्षेत्रात ऑफिसर म्हणून किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. वयोमर्यादा 22 ते 35 वर्षे असून आरक्षणानुसार सवलत लागू आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व पात्रता निकष आणि अटी काळजीपूर्वक तपासाव्या.
निवड प्रक्रिया आणि पगार
ऑनलाइन लेखी परीक्षा (75% वेटेज) आणि मुलाखत (25% वेटेज) अशा दोन टप्प्यात निवड प्रक्रिया पार पडेल. या दोन्ही टप्प्यांत यशस्वी झालेल्या उमेदवारांना स्केल II अंतर्गत 64,820 ते 93,960 रुपये मासिक वेतन, तसेच विविध भत्ते आणि सुविधांचा लाभ मिळेल.
अर्ज कसा करावा?
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत संकेतस्थळ bankofmaharashtra.in वर भेट द्यावी. त्यानंतर 'Careers' विभागात 'Recruitment of Officers in Scale II - Project 2025-26' या पर्यायावर क्लिक करून नोंदणी करावी. सर्व सूचनांचे पालन करत अर्ज भरावा आणि आवश्यक शुल्क ऑनलाइन पद्धतीने जमा करावे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 ऑगस्ट 2025 आहे. अधिक तपशील आणि अधिसूचना (Bank of Maharashtra Recruitment 2025 Notification PDF) बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भारतीय रेल्वेमध्ये 30307 पदांची भरती ..
भारत सरकारच्या रेल्वे विभागामध्ये विविध पदांची भरती होणार असून त्याच्यात तपशील खालील प्रमाणे आहे
फॉर्म भरण्याची सुरुवात 30 ऑगस्ट 2025
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2025...
तरी नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्वांनी वेळेत अर्ज भरावा धन्यवाद..
ग्राउंड स्टाफ आणि लोडर पदे भरती 2025
विमानतळावर नोकरी करण्याचे स्वप्न बघणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. IGI Aviation Services Pvt. Ltd. कडून 1,446 पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, यामध्ये ग्राउंड स्टाफ आणि लोडर पदांचा समावेश आहे.
इच्छुक उमेदवारांना 21 सप्टेंबर 2025 पूर्वी अर्ज सादर करावा लागेल. (Airport Jobs 2025)
ग्राउंड स्टाफ - 1,017 पदे
लोडर - 429 पदे
एकूण - 1,446 पदे
शैक्षणिक पात्रता काय आहे? :
ग्राउंड स्टाफ - किमान 12वी पास (मान्यताप्राप्त मंडळातून)
लोडर - किमान 10वी पास (मान्यताप्राप्त मंडळातून)
ग्राउंड स्टाफ - 18 ते 30 वर्षे
लोडर - 20 ते 40 वर्षे
निवड प्रक्रिया कशी असेल? :
निवड पूर्णपणे लेखी परीक्षेवर आधारित असेल.
परीक्षा स्वरूप:
100 बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
विषय - सामान्य ज्ञान, गणितीय क्षमता, तर्कशक्ती, इंग्रजी, विमानचालन
- नकारात्मक गुण नाहीत
ग्राउंड स्टाफ - ₹25,000 ते ₹35,000 दरमहा
लोडर - ₹15,000 ते ₹25,000 दरमहा
अर्ज प्रक्रिया कशी कराल? :
अधिकृत वेबसाईटवर जा:
ऑनलाईन अर्ज फॉर्म भरावा.
आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत
ग्राउंड स्टाफ: ₹350
लोडर: ₹250
अर्ज अंतिम सबमिट करावा
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज करण्याची अंतिम तारीख - 21 सप्टेंबर 2025
आश्रमशाळेतील शिक्षकांची १७९१ पदे
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची १७९१ पदे बाहयस्रोतांद्वारे भरण्याकरिता GeM Portal वर निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी रु.
८४,७४,५५,०००/- (अक्षरी रुपये चौऱ्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख पंचावन्न हजार मात्र) इतक्या अंदाजित रकमेच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.
1. उक्त पदे बाहयस्रोतांद्वारे उपलब्ध करुन घेण्याच्या अनुषंगाने "शासकीय विभागाने करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीची नियम पुस्तिका" याबाबत उद्योग उर्जा व कामगार विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णय क्र. भांखस-२०१४/प्र.क्र.८२/भा-॥/ उद्योग-४, दि. १ डिसेंबर, २०१६ मध्ये नमुद केलेल्या विहित कार्यपद्धतीचे अनुपालन करण्यात यावे. तसेच शासनाच्या प्रचलित नियम व कार्यपध्दतीचे पालन करण्यात यावे.
उक्त पदे बाहयस्रोतांद्वारे भरण्याकरिता GeM Portal वर निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी.
ii. सदर प्रशासकीय मान्यतेच्या आधारे ई-निविदेस विहित पध्दतीने व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी.
iv. निविदा अंतिम करण्यापुर्वी निविदा पूर्व (Pre bid) बैठक घेण्यात यावी, जेणेकरून निविदाधारकांच्या निविदेसंदर्भातील अडचणी वेळीच निदर्शनास येवून त्याची त्वरीत सोडवणूक करता येईल.
v. प्रस्तुत ई-निविदेतील न्युनतम दरधारक (L-१) यांना उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक १ डिसेंबर, २०१६ रोजीच्या शासन निर्णयासोबतच्या "शासकीय विभागाने करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीची नियमपुस्तिकेत विहीत केलेली
कार्यपध्दती तसेच शासनाचे प्रचलित नियम व Central Vigilance Commission (CVC) यांची मार्गदर्शक तत्वे विचारात घेऊन निविदा अंतिम कराव्यात.
vi. व्यापारी लिफाफा उघडल्यानंतर पात्र पुरवठाधारकास पुरवठा आदेश देण्यापुर्वी संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयास अनुसरुन सेवा खरेदीस शासनाची वित्तीय मान्यता घेण्यात यावी.
३. आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळा उघडण्याची मुदत लक्षात घेता, उक्त निविदाप्रक्रीया दोन आठवड्यांत पूर्ण करावी, तसेच जीएसटी लागू करण्याच्या अनुषंगाने जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून आवश्यक असल्यास त्याप्रमाणे निर्णय घेण्यात यावा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्राध्यापक भरती...2025
Online applications are invited from eligible Indian citizens and Overseas Citizens of India (OCIs) in the prescribed format for the positions of Professor (08), Associate Professor (12) and Assistant Professor (53) in various Teaching Departments of the University at main campus & sub campus.
Minimum Qualification, Experience, Reservation, Relaxation in Age, Service Conditions, Emoluments, Age of Superannuation etc. are as prescribed by the University/UGC/Government of Maharashtra are available at University Website, www.bamu.ac.in.
राष्ट्रपिता महात्मा.मोहनदास करमचंद गांधी
*राष्ट्रपिता महात्मा* *मोहनदास करमचंद गांधी* *जन्म: २ऑक्टोबर १८६९* (पोरबंदर, काठियावाड, ब्रिटिश भारत, सध्य...







