होमगार्ड संघटनेअंतर्गत मोठी भरती

 

होमगार्ड संघटनेअंतर्गत मोठी भरती होणार आहे. ३४ जिल्ह्यातील एकूण ९७०० होमगार्ड पदे भरली जाणार आहे. यासाठी पत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावी पास उत्तीर्ण उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकणार आहेत 

होमगार्ड जवान या पदासाठी ९७०० जागा रिक्त आहेत. २० ते ५० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.शारिरीक विकलांग आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकत नाही.


१६ ऑगस्ट २०२४ पासून या भरती  सुरुवात होणार आहे. होमगार्ड नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.या नोकरीसाठी शारीरिक पात्रता चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर मैदानी चाचणी आणि कागदपत्रे पडताळणी केली जाईल.

या नोकरीसाठी उमेदवार ज्या जिल्ह्याचा रहिवासी आहे त्याच जिल्ह्यात नोकरी मिळणार आहे.त्यामुळे उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी जाऊन काम करणे गरजेचे नाही. याबाबत अर्ज प्रक्रिया १६ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.


No comments:

Post a Comment

आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक 2025..

 आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक ३० चेंडू - ख्रिस गेल, (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया, २०१३) ३५ चेंडू - वैभव सूर्यवंशी, (रा...