महत्त्वपूर्ण सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे
०१) प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान किती सभा होणे बंधनकारक आहे ?
- किमान सहा.
०२) आलमगीर ही उपाधी कोणी धारण केली होती ?
- औरंगजेब.
०३) मानवी शरीरातील सर्वांत मोठे हाड कोणते आहे ?
- मांडीचे हाड.( फिमर )
०४) कोणत्या मंत्रालयात विज्ञान ज्योती कार्यक्रमाची सुरूवात केली ?
- विज्ञान व तंत्रज्ञान विभाग.
०५) कोणत्या दिवशी भारतात राष्ट्रीय उत्पादकता दिन म्हणून साजरा करतात ?
- १२ फेब्रुवारी.
०६) सिंगापूर या देशाचे राष्ट्रीय फूल कोणते ?
- ऑर्किड.
०७) 'महाराष्ट्र एक्सप्रेस' कोणत्या दोन स्टेशन दरम्यान धावते ?
- गोंदिया - कोल्हापूर.
०८) भारतातील सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता आहे ?
- परमवीर चक्र.
०९) कोणत्या राज्यात सर्वांधिक सहकारी साखर कारखाने आहेत ?
- महाराष्ट्र.
१०) ग्रामसभेची तरतूद महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कोणत्या कलमात दिली आहे ?
- कलम ६.
११) चीन या देशाचे राष्ट्रीय फूल कोणते ?
- ब्लॉसम.
१२) मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ?
- परभणी.
१३) लोकायुक्ताची नेमणूक कोण करतात ?
- राज्यपाल.
१४) कोणास भारताची सुवर्ण कन्या असे म्हणतात ?
- पी.टी.उषा.
१५) ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते ?
- ७ ते १७.
१६) भारत या देशाचे राष्ट्रीय फूल कोणते ?
- कमळ.
१७) कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे आहे ?
- महाबळेश्वर.
१८) अजिंक्यतारा हा प्रसिद्घ किल्ला कोठे आहे ?
- सातारा.
१९) बँक्टेरियालॉजी कोणत्या अभ्यासाशी संबंधित आहे ?
- जीवाणू.
२०) ग्रामपंचायतीच्या मतदार संघाला काय म्हणतात ?
- वार्ड.
Post a Comment