मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

Showing posts with label महान / विशेष व्यक्ती. Show all posts
Showing posts with label महान / विशेष व्यक्ती. Show all posts

भारतरत्न इंदिरा गांधी..

 


        *भारतरत्न इंदिरा गांधी*

  (५ वी व ८ वी भारतीय पंतप्रधान)

     *जन्म : १९ नोव्हेंबर १९१७*

            (मुघलसराई)

   *मृत्यू : ३१ ऑक्टोबर  १९८४*

        ( नवी दिल्ली, भारत)

          *कार्यकाळ*

जानेवारी १५ इ.स. १९८० – ऑक्टोबर ३१ इ.स. १९८४


              *राष्ट्रपती*

नीलम संजीव रेड्डी

झैल सिंग

मागील : चौधरी चरण सिंग

पुढील : राजीव गांधी


               *कार्यकाळ*

जानेवारी १९ इ.स. १९६६ – मार्च २४ इ.स. १९७७


                *राष्ट्रपती*

सर्वपल्ली राधाकृष्णन, झाकीर हुसेन, वराहगिरी वेंकट गिरी, मोहम्मद हिदायत उल्लाह, वराहगिरी वेंकट गिरी आणि फक्रुद्दीन अली अहमद

मागील : गुलजारी लाल नंदा

पुढील : मोरारजी देसाई


*भारतीय परराष्ट्रमंत्री कार्यकाळ*

मार्च ९ इ.स. १९८४ – ऑक्टोबर ३१ इ.स. १९८४

मागील : पी.व्ही. नरसिंहराव

पुढील : राजीव गांधी


            *कार्यकाळ*

ऑगस्ट २१ इ.स. १९६७ – मार्च १४ इ.स. १९६९

मागील : एम.सी. छगला

पुढील : दिनेश सिंह


*भारतीय अर्थमंत्री कार्यकाळ*

जून २६ इ.स. १९७० – एप्रिल २९ इ.स. १९७१

मागील : मोरारजी देसाई

पुढील : यशवंतराव चव्हाण


राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय 

                      कांग्रेस

पती : फिरोज गांधी

अपत्ये : राजीव गांधी आणि 

             संजय गांधी

निवास : १, सफदरजंग रोड, 

              नवी दिल्ली

धर्म : हिंदू

चिरविश्रांती : शक्तीस्थळ


इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता.


लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदाच्या प्राप्तीसाठी त्यांना मोरारजी देसाई यांच्याशी सामना करावा लागला. त्या १९६६ मध्ये देशाच्या पाचव्या पंतप्रधान (पहिल्या महिला पंतप्रधान) बनल्या. त्यांनी पोखरण येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली.


इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९५५ मध्ये त्या काँग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या. फेब्रुवारी १९५९ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. केंद्रीय मंत्रिमंडळात त्या १९६४ साली प्रथम रुजू झाल्या. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात माहिती व नभोवाणी मंत्री म्हणून त्यांनी त्यावेळी कार्य केले. लालबहादुर शास्त्री यांचा ताश्कंद येथे १९६६ मधे मृत्यू झाल्यानंतर कॉँग्रेस अध्यक्ष कामराज याच्या पाठिंब्याने १८६ मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या २४ जानेवारी १९६६ रोजी श्रीमती इंदिरा गांधी प्रधानमंत्री म्हणून विजयी झाल्या. १४ प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी, ऑपरेशन ब्लू स्टार या त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या.


१९७७ साली त्यानी देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. यामुळे १९८० पर्यंत त्या सत्तेपासून दूर राहिल्या. १९८० च्या निवडणुकांत जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण यावेळी त्यांना अशांत पंजाबचा सामना करावा लागला. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला. पण अखेर त्यामुळेच त्यांच्या दोन सुरक्षारक्षकांकडून त्यांची हत्या झाली. इंदिरा गांधी यांच्या पतीचे नाव फिरोजशहा असे होते.


💁🏻‍♀️ *बालपण*

           जवाहरलाल आणि कमला या नेहरु दाम्पत्याचे इंदिरा गांधी हे एकमेव अपत्य होते. १९ नोव्हेंबर १९१७ ला इंदिराचा जन्म झाला. मुळात नेहरु हे काश्मिरीपंडित होते. इंदिरांचे आजोबा मोतीलाल नेहरु व्यवसायाने वकील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आघाडीचे नेते होते. भारताच्या राजकारणात त्यांना मानाचे स्थान होते. ते स्वरूप राणी यांसोबत विवाह करून अलाहाबाद येथे स्थायिक झाले. जवाहरलाल नेहरोइओ यांचे शिक्षण इंग्लंड मध्ये झाले, पुढे ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले अतिशय लोकप्रिय, महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले. तसेच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधानही बनले. इंदिरा गांधींचे बालपण आपल्या घराच्या स्वातंत्र्य लढ्याच्या संस्कारांतच झाले. पुढे त्यांनी लहान मुलामुलींची वानरसेना चळवळ सुरू केली. निदर्शने, मोर्चे काढणे, बंदी घातलेल्या गोष्टींची वाहतूक करणे वगैरे गोष्टी ही सेना करीत असे.


इंदिरा गांधी ६ वर्षांच्या असतांना त्यांनी दिल्ली येथे केलेले उपोषण

१९३६ मध्ये इंदिरा गांधी यांच्या आई कमला नेहरू यांचे दीर्घ आजाराने देहावसान झाले. यावेळी इंदिरा गांधींचे वय केवळ १८ होते. त्यांचे शिक्षण सोमरविले कॉलेज, ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे झाले. याच दरम्यान त्या लंडनमधील इंडिया लीगच्या सदस्या झाल्या. १९४० च्या दशकात इंदिरा गांधींनी फुप्फुसाच्या आजारातून बरे होण्यासाठी काही काळ स्वित्झर्लंड मध्ये व्यतीत केला. याच दरम्यान जवाहरलाल यांनी इंदिरा गांधींना लिहलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. युरोपातल्या वास्तव्यादरम्यानच त्यांची ओळख फिरोज गांधी या तरुणाशी झाली. ही ओळख नंतर प्रेमात बदलून अखेर त्या दोघांनी विवाह केला.

 

👫 *फिरोज गांधींसोबत विवाह*

             इंदिरा गांधींनी इतक्यातच लग्न करू नये म्हणत जवाहरलाल नेहरु यांनी त्यास विरोध केला. पण इंदिरा ठाम होत्या व त्यांनी मार्च १९४२ मध्ये विवाह केला. फिरोज गांधींसुद्धा राजकारणात सक्रिय होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे फिरोज व इंदिरा दोघे सदस्य होते. १९४२ च्या लढ्यात भाग घेतला म्हणून दोघांना अटक झाली होती. फिरोज गांधीं हे स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशातून संसदेवर निवडून गेले होते. या दांपत्याला राजीव व संजय अशी दोन मुले झाली. पण त्यानंतर दोघात दुरावा वाढत गेला. दरम्यानच्या काळात फिरोज गांधींना हृदयविकाराचा झटका आला. अखेर १९६० मध्ये फिरोज गांधींचा मृत्यू झाला.


💠 *राजकारणातला प्रवास*


*भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पद*

           १९५९ मध्ये इंदिरा गांधींनी निवडणुकीत भाग घेतला आणि त्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या.


📺 *माहिती व नभोवाणी मंत्री*

                 जवाहरलाल नेहरूंच्या मृत्युनंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. यात त्यांनी माहिती व नभोवाणीमंत्री हे पद सांभाळले. याचदरम्यान त्यावेळच्या मद्रास राज्यात हिंदीला राष्ट्रीय भाषा घोषित करण्याविरोधात दंगे उसळले होते, तेव्हा त्यांनी मद्रासला भेट दिली. सरकारी अधिकारी, सामाजिक नेते यांची भेट घेउन राग शांत करण्याचा प्रयत्‍न केला. १९६५ चे भारत-पाक युद्ध या दरम्यान त्या श्रीनगर च्या आसपास सुट्या व्यतीत करत होत्या. पाकिस्तानी सैन्य फार जवळ पोहोचले आहे असे संदेश भारतीय सैन्याकडून मिळूनही त्यांनी जम्मू अथवा दिल्ली येथे जाण्यास नकार दिला. अशा प्रकारच्या धाडसी कामांमुळे त्यांची लोकप्रिय छबी निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या.


पाकचे आक्रमण परतून लावण्यात भारताला यश आले. १९६६ च्या जानेवारी महिन्यात तत्कालीन सोव्हियत संघात ताश्कंद येथे पाकिस्तानचे अयुब खान आणि लालबहादुर शास्त्री यात शांती समझोता झाला. पण त्यानंतर काही तासातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पंतप्रधान पदासाठी स्पर्धाच सुरू झाली. मोरारजी देसाई यांनी आपला अर्ज भरला. पण तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी अंतर्गत राजकारणातून इंदिरा गांधीना पाठिंबा दिला. ३५५ विरुद्ध १६९ मतांनी विजय मिळवला. त्या भारताच्या पाचव्या पंतप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.


👩‍🦰 *पंतप्रधान* ⚜️

                               इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर लगेच काँग्रेसमध्ये फूट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणून संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात काँग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवून सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्री पद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची दोन शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळवून त्यांनी सरकार वाचवले.


जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.


💣 *१९७१ चे भारत पाक युद्घ*

                   १९७१ च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तानात जनतेवर अत्याचाराचे सत्र आरंभले. शेख मुजीबुर रेहमान हे पूर्व पाकिस्तानातून असल्यामुळेच बहुमत असूनही त्यांना पंतप्रधान होण्यापासून थांबवले गेले. पूर्व पाकिस्तानातून सुमारे १ कोटी निर्वासित भारतात आले. त्यांचा भार भारतावर पडत होता तरी पाकिस्तान भारतालाच दूषणे देत होता. दरम्यान अतिरेक्यांनी भारताच्या प्रवासी विमानाचे अपहरण करून ते पाकिस्तानात नेऊन जाळले. अखेर १९७१ च्या डिसेंबर मध्ये भारताने युद्धाची घोषणा केली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी पाकिस्तानला पाठिंबा देत इंदिरा गांधींना संयुक्त राष्ट्राच्या कारवाईची धमकी देऊन पाहिली, पण इंदिरा गांधी बधल्या नाहीत.


📝 *इंदिरा गांधी यांचे चरित्रलेखक*

इंदर मल्होत्रा

उषा भगत (इंदिराजी थ्रू माय आईज)

कॅथेरीन फ्रँक (मराठी अनुवाद - लीना सोहोनी)

डॉम मोराईस (मिसेस गांधी)

पी.सी. ॲलेक्झांडर (My years with Indira Gandhi; इंदिरा गांधी अंतिम पर्व)

पुपुल जयकर (Indira Gandhi - Biography, मराठी अनुवाद अशोक जैन)

प्रणय गुप्ते (मूळ इंग्रजीत, मदर इंडिया. मराठी अनुवाद : पंढरीनाथ सावंत, रमेश दिघे)

सागरिका घोष (इंग्रजीत, India's Most Powerful Prime Minister)

 

📕 *इंदिरा गांधी यांच्यावरील अन्य पुस्तके*

               अनोखे मैत्र (अनुवादित, अनुवादक - सुजाता गोडबोले; मूळ इंदिरा गांधीलिखित Letters to an American Friend)

इंदिरा गांधी : एक वादळी पर्व (माधव गोडबोले)

दृष्टिआडच्या इंदिरा गांधी (अनुवादित; अनुवादक - सुजाता गोडबोले; मूळ इंग्रजी The Unseen Indira Gandhi; लेखक - डॉ. के.पी. माथुर)


🔲 *टपालाचे तिकीट*

                        इंदिरा गांधी यांची छबी असलेले पाच रुपये किमतीचे टपालाचे तिकीट होते. सप्टेंबर २०१५ पासून त्याची छपाई बंद करण्यात आली.

                      

          

सरदार वल्लभ भाई पटेल..

                                          

            *भारतरत्न लोहपुरुष* 

      *सरदार वल्लभ भाई पटेल*

*(भारतीय स्वतंत्रता संग्राम सेनानी)*


   *जन्म : 31 अक्टोबर 1875*

(नडियाद, बंबई प्रेसीडेंसी, ब्रिटिश भारत)

     *मृत्यु :15 डिसेंबर 1950* 

                   (वय 75)

वडिल : झावेरभाई पटेल

आई : लाडबाई

पत्नी : झावेरबा

मुलांची नावं : दहयाभाई पटेल, मणिबेन पटेल 

शिक्षण : एन.के. हायस्कुल पेटलाड, इंस ऑफ कोर्ट लंडन इंग्लंड

पुस्तक : राष्ट्र के विचार, वल्लभभाई पटेल, वल्लभभाई पटेल  के संग्रहित कार्य, 15 खंड

स्मारक : स्टॅच्यू ऑफ युनिटी     *भारताचे उप-प्रधानमंत्री*

                *पद बहाल*

15 अॉगष्ट 1947 – 15 डिसेंबर 1950

प्रधानमंत्री : जवाहरलाल नेहरु

पूर्वा धिकारी : पद सृजन

उत्तरा धिकारी : मोरारजी देसाई

            *गृह मंत्रालय*

             *पद बहाल*

15 अॕॉगष्ट 1947 – 15 डिसेंबर 1950

प्रधानमंत्री : जवाहरलाल नेहरु

पूर्वा धिकारी : पद सृजन

उत्तरा धिकारी : चक्रवर्ती  

                       राजगोपालाचारी

🔸 *वल्लभभाई पटेलांचा जन्म आणि प्रारंभिक जीवन*

वल्लभाईंचा जन्म नडियाद येथे 31 ऑक्टोबर 1875 ला एका जमीनदार परिवारात झाला. झवेरभाई पटेल आणि लाडबाईंचे हे चैथे अपत्य. वल्लभाईंचे वडिल शेतकरी आणि आई एक गृहिणी व आध्यात्मिक धर्मपरायण महिला. वल्लभभाईंना तीन मोठे भाऊ नरसीभाई, विðलभाई व सोमाभाई आणि एक बहिण जीचे नाव दहीबा पटेल असे होते.


👫🏻 *वल्लभभाई पटेल यांचा विवाह*

            त्या काळी बालविवाहाची प्रथा असल्याने वल्लभभाई पटेल यांचा विवाह वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी 1891 साली झावेरबा नावाच्या कन्येशी करून देण्यात आला. त्यांच्या पासुन दहयाबाई आणि मणिबेन पटेल अशी दोन अपत्ये झालीत.


♦️ *पत्नीच्या मृत्युची बातमी ऐकुन देखील कोर्टात करत राहीले कामकाज*

        वल्लभभाईंची पत्नी झावेरबा कॅंसर ने पीडित असल्याने त्यांचा आणि वल्लभभाईंचा संसार दिर्घकाळ टिकला नाही 1909 साली त्यांचे निधन झाले.

                  ज्यावेळी झावेरबांच्या निधनाची बातमी वल्लभभाईंना मिळाली त्यावेळी ते कोर्टात कामात व्यस्त होते. ही बातमी मिळाल्यानंतर देखील त्यांनी आपले कामकाज पुर्ण केले कोर्टातील खटला जिंकले देखील त्यानंतर आपल्या पत्नीच्या मृत्युची बातमी त्यांनी सर्वांना दिली. पुढे आपले संपुर्ण जीवन आपल्या अपत्यांसमवेत विधुर म्हणुन व्यतीत केले.


💁🏻‍♂️ *वल्लभभाई पटेलांचे शिक्षण आणि वकिलीची सुरूवात*

       आपले प्रारंभिक जीवन त्यांनी गुजराती मीडियम स्कुल मधुन पुर्ण केले. पुढे त्यांनी इंग्लिश मिडियम शाळेत प्रवेश घेतला. शिक्षण पुर्ण करण्याकरीता त्यांना विलंब लागला. 1897 ला वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी 10 वी ची परिक्षा उत्तीर्ण केली.

               घरची परिस्थीती बेताची असल्याने महाविद्यालयात न जाता वल्लभभाईंनी घरी राहुनच पुस्तकं उधार घेउन शिक्षण घेतले. शिवाय जिल्हाधिकारी होण्याकरता दिल्या जाणा-या परिक्षेचा अभ्यास सुध्दा त्यांनी घरूनच केला. अभ्यासात ते एवढे हुशार होते की या परिक्षेत त्यांना सगळयात जास्त गुण मिळाले.

            1910 साली लाॅ ची पदवी मिळविण्याकरता वल्लभभाई इंग्लंड ला गेले. काॅलेज चा त्यांना कुठलाही अनुभव नव्हता परंतु ते बुध्दीने एवढे तल्लख होते की 36 महिन्यांचा कोर्स त्यांनी अवघ्या 30 महिन्यांमधे पुर्ण केला.  अश्याप्रकारे 1913 साली वल्लभभाईंनी इंस ऑफ कोर्ट मधून वकिलीची पदवी मिळवीली, या परिक्षेत सर्वाधिक गुण मिळवले आणि काॅलेज मधुन पहिले आले.

        त्यानंतर वल्लभभाई भारतात परतले गुजरात मधील गोधरा येथे त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली. वकिलीतील त्यांची समज पाहुन ब्रिटीश सरकारने त्यांना कित्येक मोठया पदांवर नियुक्ती देण्यास आमंत्रीत केले परंतु वल्लभभाई पटेलांनी ब्रिटीश शासनाचा एकही प्रस्ताव स्विकारला नाही कारण त्यांना ब्रिटींशांचा एकही कायदा अजिबात पसंत नव्हता आणि ते त्यांचे कट्टर विरोधक होते त्यामुळे ब्रिटींशाकडुन आलेला एकही प्रस्ताव त्यांनी स्विकारला नाही.


🔆 *वल्लभभाई गांधीवादी विचारांनी प्रभावित झाले*

          पुढे ते अहमदाबाद येथे एक यशस्वी बॅरिस्टर म्हणुन काम करू लागले, सोबतच ते गुजरात क्लब चे सदस्य देखील झाले या दरम्यान त्यांनी महात्मा गांधीजींच्या एका व्याखानात भाग घेतला त्यावेळी ते गांधीजींच्या विचारांनी फार प्रभावित झाले. पुढे गांधीजींचा कट्टर अनुयायी बनण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अश्यातऱ्हेने ते गांधीवादी सिध्दांतावर चालु लागले हळुहळु राजकारणाचा हिस्सा बनले.

🔸 *वल्लभभाई पटेलांची राजकिय कारकिर्द*

⚜️ *स्वातंत्र्य संग्रामात सरदार वल्लभभाई पटेलांची भुमिका*

                  भारताच्या स्वातंत्र्याचे महानायक महात्मा गांधी यांच्या प्रभावशाली विचारांनी प्रेरित होउन वल्लभभाईंनी अस्पृश्यता, जातीयवाद, स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचारा विरोधात आवाज उठविला आणि समाजात पसरलेली नकारात्मकता दुर करण्याकरीता भरपुर प्रयत्न केलेत.

                    सोबतच गांधीजींच्या विचारधारेला स्विकारत स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.


🔮 *शेतकरी संघर्षात वल्लभभाईंची महत्वाची भुमिका*

                    महात्मा गांधीजींच्या शक्तिशाली विचारांनी प्रभावित झालेल्या वल्लभभाई पटेलांनी 1917 साली शेतकऱ्यांच्या आंदोलनात महत्वाची भुमिका बजावली. त्या दरम्यान गुजरात मधील ग्रामीण भाग मोठया प्रमाणात दुष्काळाचा सामना करीत होता अश्यात शेतकरी ब्रिटीशांनी लावलेले अवास्तव कर देण्यास समर्थ नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांनी ब्रिटीश शासनाला करात सवलत देण्याची विनंती केली होती.

                  परंतु शेतकऱ्यांच्या या प्रस्तावाला ब्रिटीश शासनाने धुडकावुन लावले त्यावेळी सरदार वल्लभ भाई पटेल यांनी मोठया प्रमाणावर ’नो टॅक्स कॅंपेन ’ या मोहिमेचे नेतृत्व केले आणि शेतकऱ्यांना कर न भरण्यास प्रोत्साहन दिले.

                   या संघर्षामुळे ब्रिटीश शासनाला सरदार पटेलांच्या दृढ संकल्पापुढे झुकण्यास मजबुर व्हावे लागले आणि शेतकऱ्यांना करा मधे सवलत द्यावी लागली. स्वातंत्र्य समरात सरदार वल्लभ भाई पटेलांचे हे पहिले मोठे यश मानल्या गेले.                               ♦️ *महात्मा गांधीजींच्या असहकार आंदोलनासमवेत सर्व आंदोलनांना सरदार वल्लभ भाई पटेलांनी दिले समर्थन*   

वल्लभ भाई पटेल गांधीजींच्या विचारांनी एवढे प्रभावित होते की 1920 साली असहकार आंदोलनादरम्यान त्यांनी स्वदेशी खादी वस्तुंचा स्विकार केला आणि विदेशी कपडयांची होळी केली.

                  याशिवाय वल्लभभाई पटेलांनी गांधीजींनी शांततापुर्वक केलेल्या देशव्यापी आंदोलन उदा. स्वातंत्र्य संग्राम, भारत छोडो आंदोलन, दांडी यात्रा यात गांधीजींचे समर्थन करीत सहकार्य केले.

 *अशी मिळाली सरदार ही पदवी*

                     आपल्या वक्र्तृत्वाने जनसामान्यांना प्रभावित करणा-या सरदार पटेलांनी 1928 साली सायमन कमिशन विरोधात पुकारलेल्या बारडोली सत्याग्रहा दरम्यान लोकांना आपल्या महान विचारांनी फार प्रभावित केले त्यामुळे इंग्रजांनी अवाजवी वाढवलेल्या करांना न भरण्यावर जनता सहमत झाली त्यामुळे ब्रिटीश व्हाईसराय ला पराभव पत्करावा लागला.

               या आंदोलनात आपल्या सशक्त नेतृत्वाने वल्लभभाई पटेल जनतेत चांगलेच प्रसिध्द झाले आणि बारडोलीतील लोक त्यांना सरदार म्हणु लागले त्यामुळे पुढे सरदार त्यांच्या नावा आधी जोडल्या गेले.


🌀 *काॅर्पोरेशनच्या अध्यक्षांपासुन ते देशाच्या पहिल्या गृहमंत्रीपदापर्यंतचा प्रवास*

                     दिवसेंदिवस सरदार वल्लभभाई पटेलांची ख्याती वाढत चालली होती आणि त्यामुळेच अहमदाबाद येथील निवडणुकांमधे त्यांनी सतत विजय मिळवला. 1922, 1924 आणि 1927 ला ते अहमदाबाद नगरपालीकेचे अध्यक्ष म्हणुन निवडल्या गेले.

             1931 साली वल्लभभाई पटेल कॉंग्रेस च्या 36 व्या अहमदाबाद अधिवेशनात स्वागत समितीचे अध्यक्ष बनले आणि ते गुजरात प्रदेशाच्या कॉंग्रेस समितीचे पहिले अध्यक्ष म्हणुन नियुक्त झाले पुढे 1945 पर्यंत ते गुजरात कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदावर राहिले.

           या दरम्यान त्यांना अनेकदा कारागृहात देखील जावे लागले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वल्लभभाई पटेल भारताचे गृहमंत्री आणि उपप्रधानमंत्री झाले. तसे पाहाता सरदार वल्लभभाई पटेल यांची ख्याती आणि प्रसिध्दी एवढी पसरली होती की प्रधानमंत्री होण्याचे सामथ्र्य त्यांच्यात होते परंतु महात्मा गांधीजीं मुळे त्यांनी स्वतःला या स्पर्धेपासुन दुर ठेवले आणि जवाहरलाल नेहरूंना देशाचे पहिले प्रधानमंत्री बनविण्यात आले.


♨️ *स्वदेशी साम्राज्यांना एकत्रीत करण्याकरीता सरदार पटेल यांनी निभावली महत्वपुर्ण भुमिका*

                स्वतंत्र भारताचे गृहमंत्री झाल्यानंतर वल्लभभाई पटेल यांनी सर्वात आधी भारतातील वेगवेगळया साम्राज्यातील राजांना आपल्या राजनैतिक दुरदर्शीपणाचा आणि बुध्दीमत्तेचा वापर करत संघटीत केले आणि वेगवेगळया राज्यांचे स्वप्न सत्यात उतरणे शक्य नसल्याची जाणीव भारतीय संघातील 565 साम्राज्यांच्या राजांना करून दिली.

              त्यानंतर भारतात विलीन होण्याकरता सर्व राज्यांनी सहमती दर्शवली परंतु हैदराबाद चे निजाम, जुनागढ आणि जम्मु कश्मीर च्या नवाबांनी मात्र आपले साम्राज्य भारतात विलीन करण्यास विरोध दर्शविला. वल्लभभाई पटेल यांनी आपल्या कुशाग्र बुध्दीमत्तेच्या बळावर सैन्याचा वापर करीत या तिन राज्यांना आपले साम्राज्य भारतात विलीन करण्यास सहमत करून घेतले.

          वल्लभभाई पटेलांनी अश्या तऱ्हेने भारतीय संघाला कोणत्याही युध्दाशिवाय शांततेच्या मार्गाने एकत्रीत केले. या महान कार्यामुळे त्यांना लोहपुरूष ही पदवी देण्यात आली.


🔰 *सरदार वल्लभभाई पटेल आणि भारताचे विभाजन*

                   फाळणी संघर्ष आणि आंदोलनात मुस्लीम लीग नेता मुहम्मद अली जिन्ना यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्यप्राप्तीच्या अगदी आधी पेटलेल्या हिंदु मुस्लीम संघर्षाला हिंसात्मक स्वरूप देण्यात आले होते.

               सरदार पटेल यांच्या मते स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अश्यात तऱ्हेने हिंसात्मक आणि सांप्रदायिक दंगे केंद्र सरकारच्या कार्यक्षमतेला कमजोर बनवतील परिणामी असे संघर्ष लोकतांत्रिक राष्ट्राला मजबुत करण्याकरीता बाधा पोहोचवतील.

                  या समस्येला निकाली काढण्याकरीता पटेल यांनी 1946 ला सिव्हील वर्कर वी.पी मेनन यांच्यासमवेत काम केलं आणि फाळणी परिषदेदरम्यान भारताचे प्रतिनीधीत्व केले.


🪔 *निधन* 

                    1950 साली सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वास्थ्य बिघडु लागले. 2 नोव्हेंबर 1950 ला त्यांची प्रकृती एवढी बिघडली की ते अंथरूणावरून उठण्यास देखील असमर्थ होते. पुढे 15 डिसेंबर 1950 ला आलेल्या हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने या महान आत्म्याची प्राणज्योत मालवली.


📜 *सरदार वल्लभभाई पटेल यांना मिळालेले सन्मान*

       1991 साली त्यांना मरणोत्तर भारताच्या सर्वोच्च नागरिक सन्मान भारत रत्न ने गौरविण्यात आले. त्यांचा जन्मदिवस 31 ऑक्टोबर ला 2014 साली राष्ट्रीय एकता दिवसाच्या रूपात घोषित करण्यात आले.


या व्यतिरीक्त भारत सरकार व्दारा 31 ऑक्टोबर 1965 ला सरदार पटेल यांच्या स्मरणार्थ पोस्टाने डाक तिकीट प्रकाशित केले. एवढेच नव्हे तर त्यांच्या नावावर अनेक शिक्षण संस्था, रूग्णालयं आणि विमानतळांचे नामकरण करण्यात आले… जसे की


सरदार वल्लभभाई पटेल कृषी आणि प्रौद्योगिकी विश्वविद्यालय मेरठ

सरदार वल्लभभाई राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, सुरत

सरदार पटेल विश्वविद्यालय, गुजरात

सरदार पटेल विद्यालय, नई दिल्ली

सरदार वल्लभभाई पटेल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी, वासद

स्मारक सरदार पटेल मेमोरियल ट्रस्ट

सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय स्मारक, अहमदाबाद

सरदार सरोवर बांध, गुजरात

सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एयरपोर्ट, अहमदाबाद

सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, अहमदाबाद

🎯 *सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर एक दृष्टीक्षेप*

▪️1913 साली लंडन येथुन बॅरिस्टरची पदवी संपादन करून भारतात परतले

▪️1916 मध्ये लखनौ येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कॉंग्रेस अधिवेशनात वल्लभभाईंनी गुजरात चे प्रतिनिधीत्व केले.           ▪️ 1917 साली ते अहमदाबाद नगरपालिकेच्या निवडणुकीत निवडुन आले.

▪️1917 मधे शेतकऱ्यांच्या सत्याग्रहाचे त्यांनी प्रतिनीधीत्व केले, शेतसारा बंदी आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले, अखेर ब्रिटीशांना झुकावेच लागले, सगळे कर माफ केले, सरदार पटेलांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाला यश मिळाले 1918 साली जुन महिन्यात शेतकऱ्यांनी विजयोत्सव साजरा केला त्यावेळी महात्मा गांधीजींना आमंत्रीत करून त्यांच्या हस्ते वल्लभभाईंना मानपत्र देण्यात आले.

▪️ 1919 साली रौलेट अॕक्ट विरोधात वल्लभभाई पटेलांनी अहमदाबाद येथे खुप मोठा मोर्चा काढला

▪️ 1920 ला गांधीजींनी असहकार आंदोलन सुरू केले. या आंदोलनात वल्लभभाईंनी आपले संपुर्ण जीवन देशाला समर्पीत केले. प्रत्येक महिन्याला हजारो कमवुन देणारी वकिली देखील त्यांनी देशाकरता सोडुन दिली.

▪️ 1921 मधे गुजरात प्रांतीय कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षस्थानी त्यांची निवड झाली.

▪️1923 साली ब्रिटीश शासनाने तिरंग्यावर बंदीचा कायदा केला त्या विरोधात वेगवेगळया ठिकाणांवरून हजारो सत्याग्रही नागपुर येथे एकत्रीत झाले, साडेतीन महिने जोशपुर्ण लढाई सुरू झाली. या लढाईला संपवण्याकरीता ब्रिटीशांनी अनेक अयशस्वी प्रयत्नं केले.

▪️1928 मधे बारडोली येथे वल्लभभाईंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या हिताकरता शेतसारा बंदी आंदोलन सुरू झाले. सुरूवातीला वल्लभभाईंनी ब्रिटीश सरकारला शेतसारा कमी करण्याचे निवेदन दिले परंतु सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. वल्लभभाईंनी योजनाबध्द आणि सावधानतेने आंदोलन सुरू केले. आंदोलनाला दाबण्याकरीता ब्रिटीशांनी अनेक अयशस्वी प्रयत्नं केले परंतु त्याच वेळी मुंबईत विधानसभेच्या काही सदस्यांनी आपापल्या पदांचा राजिनामा दिला. याचा परिणाम हा झाला की सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या सशर्त मान्य केल्या. बारडोलीत शेतकऱ्यांनी वल्लभभाईंना ’सरदार’ हा बहुमान दिला.

▪️1931 कराचीत झालेल्या राष्ट्रीय कॉंग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी वल्लभभाई होते.

▪️1942 ला ’भारत छोडो’ आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्यांना जेल मधे जावे लागले.

▪️1946 ला स्थापन झालेल्या मध्यवर्ती अभिनय मंत्रीमंडळात ते गृहमंत्री होते. पटेल घटनासमितीचे सदस्य देखील होते.

▪️15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यप्राप्ती नंतर पहिल्या मंत्रीमंडळात उपपंतप्रधान पदाचे स्थान त्यांना मिळाले त्यांच्या जवळ गृह, माहिती, प्रसारण, तसेच घटक राज्य संबंधीत प्रश्नांची खाती देण्यात आली.                                 ▪️वल्लभभाईंनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जवळ जवळ सहाशे साम्राज्यांचे भारतात विलीनीकरण केले, हैद्राबाद संस्थान देखील त्यांनी घेतलेल्या पोलिस कारवाईमुळे 17 सप्टेंबर 1948 ला भारतात विलीन झाले.                                           🎞️📽️ *सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर आधारीत चित्रपट*

                    1993 साली सरदार वल्लभभाई पटेल यांची बायोपिक फिल्म ’सरदार’ प्रदर्शित झाली होती या चित्रपटाचे दिग्दर्शक केतन मेहता होते या चित्रपटात सरदार वल्लभभाईंची भुमिका परेश रावल यांनी साकारली होती.


🗽 *स्टैच्यू ऑफ यूनिटी*

       लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ जगातील सर्वात उंच मूर्ति स्टैच्यू ऑफ यूनिटी तयार करण्यात आली. त्याची उंची जवळपास 182 मीटर आहे. या मुर्तीची कोनशिला 2013 साली सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते ठेवण्यात आली होती आणि नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच 2018 ला जगातील सर्वात उंच प्रतिमेचे उद्घाटन करण्यात आले.

                    अश्या तऱ्हेने सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपले संपुर्ण जीवन देशाला समर्पित केले. त्यांनी केवळ अनेक भागांत वाटल्या गेलेल्या भारतिय संघाला एकिकृत करण्यात आपली महत्वाची भुमिका बजावली असे नाही तर आपल्या बुध्दीमत्तेच्या आणि दुरदर्शितेच्या जोरावर कित्येक असे निर्णय घेतले ज्याचा उपयोग आधुनिक भारताच्या निर्मीतीत झाला. भारताकरीता अश्या महान वीर सुपुत्राचा जन्म होणे गौरवपुर्ण आहे.

 

         

भारतरत्न नानाजी देशमुख...



          *भारतरत्न नानाजी देशमुख*

      (चंडिकादास अमृतराव देशमुख)

            (सामाजिक कार्यकर्ता)


    *जन्म : ११ ऑक्टोबर १९१६*

कडोळी, ता. हिंगोली जि. परभणी, महाराष्ट्र,

(आता - कडोळी, ता. जि. हिंगोली, महाराष्ट्र)

    *मृत्यू : २७ फेब्रुवारी २०१०*

राष्ट्रीयत्व : भारतीय

नागरिकत्व : भारतीय

प्रशिक्षणसंस्था : बिर्ला तंत्रशास्त्र संस्था, पिलानी, राजस्थान

धर्म : हिंदू

वडील : अमृतराव देशमुख

पुरस्कार : भारतरत्न- (जाने २०१९)                                              चंडिकादास अमृतराव देशमुख ऊर्फ नानाजी देशमुख हे मराठी सामाजिक कार्यकर्ते होते. भारतीय शासनाने त्यांना त्यांच्या कार्यासाठी आधी पद्मविभूषण आणि नंतर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवले. १९९७ मधे पुणे विद्यापीठाने त्यांना ’डॉक्टर ऑफ लेटर्स’ ही पदवी प्रदान केली.

💁🏻‍♂️  *चरित्र*

                    हिंगोली जिल्ह्यातील कडोळी या गावी जन्मलेल्या नानाजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते. लहानपणी भाजी विकून पैसे मिळवून शिक्षण पूर्ण करणारे नानाजी संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या संपर्कात आले व संघाशी कायमचे जोडले गेले. पुढे काही वर्षे त्यांनी देशाच्या राजकारणात प्रमुख भूमिका निभावली. राजकारण किंवा सत्ताकारणाच्या मर्यादा लक्षात घेऊन अखेरीस त्यांनी शाश्र्वत विकास साधणारे समाजकार्य करायचे ठरवलेसाचा:स्पष्टीकरण हवे भारतीय संस्कृतीच्या आधारावर मनुष्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो या विचाराला मध्यवर्ती स्थान देऊन रचनात्मक कामाचे अनेक प्रकल्प नानाजी देशमुख यांनी देशभरात उभे केले.

                प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व नंतर उत्तर प्रदेशात पूर्णवेळ कार्यकर्ते असलेल्या नानाजींनी संघाचे तत्कालीन प्रमुख (सरसंघचालक) श्री गोळवलकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय चारित्र्याच्या आधारावर एक नवीन राजकीय पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न केले. यातूनच जनसंघाची स्थापना झाली. दीनदयाळ उपाध्याय, सुंदरलाल भंडारी, अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्यासमवेत नानाजी जनसंघ पक्षाच्या माध्यमातून कार्यरत होते. नंतर जनता पक्षाच्या माध्यमातूनही ते राजकारणात सक्रिय सहभागी झाले. पांचजन्य, राष्ट्रधर्म व स्वदेस या नियतकालिकांचे कामही त्यांनी काही काळ पाहिले. दरम्यानच्या काळात आचार्य विनोबा भावेंच्या भूदान चळवळीतही ते सहभागी झाले होते. सुमारे दोन महिने ते विनोबाजींबरोबर प्रवास करत होते. पण त्यानंतरच्या काळात मनुष्यविकास व सामाजिक विकास याबाबतच्या पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्मिक मानवतावाद या तत्त्वज्ञानाचा प्रभाव त्यांच्यावर पडला. याच तत्त्वज्ञानाच्या आधारावर रचनात्मक, विधायक कामांची उभारणी करण्याचा ध्यास घेतलेल्या नानाजींनी जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्रिपद नाकारले. त्या काळात राजनीतीतील चाणक्य म्हणून त्यांचा दिल्लीत दबदबा होता, अनेक महत्त्वाची सत्तापदे त्यांच्याकडे सहजगत्या येत होती. पण त्यांनी तो मोह निग्रहाने नाकारून, राजकारण-संन्यास घेऊन अखंडपणे सेवाकार्य करण्याचा निर्णय घेतला. या विचारातूनच त्यांनी दीनदयाळ संशोधन संस्था स्थापन केली.

                   पुढील काळात त्यांनी दीनदयाळ शोध संस्थानच्या माध्यमातून सर्वप्रथम उत्तर प्रदेशामधील गोंडा जिल्ह्यात सिंचनाचे कार्य केले. सुमारे ४०,००० कूपनलिकांच्या माध्यामातून त्याठिकाणच्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचे काम केले. त्यानंतर मध्य प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात ८० दुर्गम, पहाडी गावांमधील जनतेला विविध प्रकल्पांद्वारे आत्मनिर्भर व उद्योगशील बनवण्यावर त्यांनी मुख्य लक्ष केंद्रित केले. पाणी अडवा - पाणी जिरवा या योजनेतून सिंचनक्षेत्रात वाढ, गोवंशसंवर्धन, पारंपरिक कृषी पद्धतींचा विकास व प्रसार, गुरुकुल पद्धतीने शालेय शिक्षण, उद्योजकता विद्यापीठाच्या मार्गाने स्वयंरोजगाराला प्राधान्य, आरोग्यधाम योजनेअंतर्गत आयुर्वेदिक वनौषधींविषयी संशोधन व याच पद्धतीचे अनेक प्रकल्प चित्रकूट परिसरात कार्यान्वित केले. येथेच नानाजींनी चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय हे भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ स्थापन केले. हे प्रकल्प सक्षमतेने चालवण्यासाठी त्यांनी समाजसेवेची इच्छा असणाऱ्या दांपत्यांना त्यांनी समाजशिल्पी बनवले. या समाजशिल्पींच्या माध्यमातून दीनदयाळ शोध संस्थेची विधायक, विकासात्मक कामे वेगाने, योग्य दिशेने व निष्ठेने चालू आहेत. आर्थिक, औद्योगिक व सामाजिकदृष्ट्या स्वयंपूर्ण गावांची संकल्पना येथे अस्तित्वात आलेली दिसते.

                या सर्व कार्याला धर्माचे अधिष्ठान असावे या हेतूने व आपल्या सर्वांच्या जीवनात काय आदर्श असावेत हे सूचित करण्यासाठीच चित्रकूटमध्ये अभूतपूर्व असे श्रीरामदर्शन हे कायमस्वरूपी प्रदर्शन उभे करण्यात आले आहे. रामायणातील घटना डोळ्यासमोर उभ्या करणाऱ्या या प्रदर्शनासह येथे प्राणिसृष्टीही उभी करण्यात आली आहे. वास्तवातील जंगलात प्राण्यांचे हुबेहूब पुतळे बसवण्यात आले आहेत.

           चित्रकूट हे त्यांचे कर्मस्थान होते. आरोग्यधाम व गोशाळा उद्यमिता विद्यापीठ, ग्रामोद्योग विद्यालय, आश्रमशाळा गुरुकुल, ग्रंथालय, मातृसदन, दंतचिकित्सा केंद्र इत्यादी त्यांनी तेथे उभारली. ग्रामीण लोकांचे जीवनमान उंचावण्यास व त्यांना स्वावलंबी बनविण्याचा त्यांना ध्यास होता. त्यांनी सुमारे इ.स. १९९० चे दरम्यान मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यांतील प्रत्येकी सुमारे २५० गावे दत्तक घेतली व त्या गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. शिक्षण, स्त्रियांना गृहोद्योग, स्वच्छता, शुद्ध बोलणे इत्यादी शिकविण्यास त्यांनी कार्यकर्त्यांचा एक चमू उभारून ग्रामविकासाचे काम चालवले. नानाजींच्या याच कामाचे फलित म्हणजे चित्रकूट क्षेत्रातील ८० खेड्यांमधील कोर्टामध्ये चालू असलेले जवळजवळ ६० टक्के खटले लोकांनी मागे घेतले व एकत्र बसून त्यावर निर्णय घेतले. चित्रकूटबरोबरच भारतातील इतर राज्यांमधील सर्वात मागास जिल्हे निवडून त्या ठिकाणी दीनदयाळ शोध संस्थानच्या माध्यमातून काम सुरू आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील होमरी येथे प्रकल्प कार्यरत आहे. सोनदरा गुरुकुल, कृषिविकास, आरोग्य शिक्षण, योगाभ्यास, कलांचे शिक्षण व औद्योगिक प्रशिक्षण या प्रकल्पांद्वारे येथे काम चालते.

         आणीबाणीनंतरच्या काळात (इ.स. १९७७) नानाजी काही काळ लोकसभेचे सदस्य होते. इ.स. १९९९ मध्ये त्यांची राज्यसभेवरही निवड करण्यात आली.


📜 *पुरस्कार*

               देशमुखांच्या सामाजिक कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना १९९९ साली पद्मविभूषण हा किताब बहाल केला. २०१९ साली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

       

         

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज..



          *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज*


        (महाराष्ट्रातील समाजसुधारक,      

    स्वातंत्र्यसेनानी, कवी, गायक)


मूळ नाव : माणिक बंडोजी इंगळे


   *जन्म : ३० एप्रिल, १९०९*

      (यावली, जि. अमरावती)

   *निर्वाण : ११ ऑक्टोबर, १९६८*

       (मोझरी, जि. अमरावती)

गुरू : आडकोजी महाराज

भाषा : मराठी, हिंदी

साहित्यरचना : ग्रामगीता, 

                     अनुभव सागर 

                      भजनावली,   

                      सेवास्वधर्म, 

                      राष्ट्रीय भजनावली

कार्य : अंधश्रद्धा निर्मूलन, 

           जातिभेद निर्मूलन

वडील : बंडोजी

आई : मंजुळाबाई

             तुकडोजी महाराज  यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.

     तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. त्यांनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. "आते है नाथ हमारे" हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.

        भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.

          अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्‌मयसेवेची पूर्तीच होय. स्वत:ला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती.

       खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्‍न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्‍न केले.

                    सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.

   तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंडव्रतासारखे चालवीत आहेत.

           महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.

               देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला.

                   ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्ये कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते.

                   तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण आश्विन कृष्ण पंचमी शके १८९० (११ ऑक्टोबर, १९६८) रोजी झाले.

     राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारे केले जाते.


               ग्रामगीता हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या शिवाय हिंदीतून लिहिलेला लहरकी बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांचे ग्रामगीता ग्रंथामधील विचार सर्व सामान्यापर्यंत पोहचावे याकरिता महाराष्ट्र शासनाने ग्रामगीता हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून, सवलतीच्या १० रुपये या किंमतीत उपलब्ध करून दिला आहे.


📒 *साहित्य संमेलने*

             तुकडोजी महाराज यांच्या नावाने (१) तुकडोजी महाराज साहित्य संमेलन आणि (२) तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन अशी दोन संमेलने भरतात.

 

📚 *पुस्तके*

            अनुभव सागर भजनावली (कवी - तुकडोजी महाराज)

आठवणी (सचित्र) : राष्ट्रसंत जन्मशताब्दीच्या (गंगाधर श्रीखंडे)

ग्रामगीता (कवी - तुकडोजी महाराज)

डंका तुकाडोजींचा (राजाराम कानतोडे)

राष्ट्रसंत तुकडोजी (बालसाहित्य, लेखक - प्रा. राजेंद्र मुंढे)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (चरित्र, लेखक - डॉ. भास्कर गिरधारी)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मौलिक विचार (संकलन - लेखक - प्रा. राजेंद्र मुंढे). (लोकवाङ्मय प्रकाशन)

राष्ट्रसंताची अमृतधारा : भाग १, २, ३ (तुकडोजी महाराज)

राष्ट्रीय भजनावली (कवी - तुकडोजी महाराज)

लहरकी बरखा (हिंदी)

सेवास्वधर्म (कवी - तुकडोजी महाराज)


📙 *ग्रामगीता*

       ग्रामगीता या ग्रंथात तुकडोजी महाराज म्हणतात :


संत देहाने भिन्न असती। परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती।

साधने जरी नाना दिसती। तरी सिद्धान्तमति सारखी।।


        संत तुकडोजी महाराज यांनी अनेक भजने/कविता लिहिल्या. त्यातीलच ही एक :


या झोपडीत माझ्या

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली

ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे

प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या

दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥३॥

जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला

भिती नं यावयाला, या झोपडीत माझ्या ॥४॥

महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने

आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥५॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा

कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥६॥

पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे

शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥७॥


       राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे एक भजन. हे भजन जपान येथे झालेल्या विश्वधर्म परिषदेत म्हटले होते.


*हे भजन दिल्ली येथील राजघाटावर नियमीत ऐकविले जाते. :-*

           हर देश में तू ...

हर देश में तू , हर भेष में तू , तेरे नाम अनेक तू एकही है ।

तेरी रंगभुमि यह विश्वभरा, सब खेलमें, मेलमें तु ही तो है ॥टेक॥

सागर से उठा बादल बनके, बादल से फ़टा जल हो कर के ।

फ़िर नहर बनी नदियाँ गहरी,तेरे भिन्न प्रकार तू एकही है ॥१॥

चींटी से भी अणु-परमाणुबना,सब जीव जगत् का रूप लिया ।

कहिं पर्वत वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा,तू एकही है ॥२॥

यह दिव्य दिखाया है जिसने,वह है गुरुदेवकी पूर्ण दया ।

तुकड्या कहे कोई न और दिखा, बस! मै और तू सब एकही है ॥३॥

       

          

पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील

                              

          *पद्मभुषण कर्मवीर*

         *भाऊराव पाटील*


    *जन्म : २२ सप्टेंबर १८८७*

         (कुंभोज, महाराष्ट्र)

     *मृत्यू : ९ मे १९५९*


टोपणनाव : कर्मवीर

पुर्ण नाव : भाऊराव पायगौडा 

                 पाटील

पेशा : समाजसुधारणा, 

                            शिक्षणप्रसार

प्रसिद्ध कामे : रयत शिक्षण संस्था

पुरस्कार : पद्मभूषण (१९५९)


              कर्मवीर भाऊराव पाटील हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' ही योजना सुरू करुन मोठे काम केले. ते जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला.


कर्मवीर भाऊराव यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगौडा पाटील असे होते. आईचे नाव गंगाबाई होते. त्यांचे मूळ गाव कर्नाटक राज्यात दक्षिण कन्नड जिल्यातील मूडब्रिदी गावचे. कर्मवीर यांचे पुर्वज नशीब अजमावण्यासाठी महाराष्ट्रात आले. पूर्वीचे त्यांचे आडनाव देसाई होते. पुढे ते एतवडे जि. सांगली येथे स्थिर झाले. पुढे त्यांच्या घराण्यात पाटीलकी आली त्यामुळे त्यांचे देसाई हे नाव जाऊन पाटील हे नाव रूढ झाले .कोल्हापूर जिल्यात हातकनंगले नावाचा तालुका आहे .या तालुक्यात बाहुबली चा डोंगर आहे. या डोंगरावर पार्श्व्नाथाचे सुंदरभव्य स्मारक आहे. या डोंगराच्या कुशीत कुंभोज नावाचे छोटेशे गाव आहे या गावी २२सप्टेंबर 1887रोजी (आश्विन शुद्ध पंचमी ,ललिता पंचमी ) कर्मवीरांचा जन्म झाला. त्यांचे बालपण कुंभोज या गावी गेले. भाऊरावांच्या आईला इतर जातीचीच नव्हे तर ब्राह्मणाची शिवाशिवही चालत नसे, एवढे हे कर्मठ घराणे होते. असे असले तरी भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. त्यांचे बालपण कुंभोजमधील अस्पृश्य मुलांच्यात , खेळण्यात गेले. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा आणि इतरही काही गावांत झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला. कर्मवीर लहानपणापासून बेडर वृत्तीचे होते. ते पट्टीचे पोहणारे होते.


🏢 *शिक्षण संस्था*

    पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदि मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला.


दिनांक ऑक्टोबर ४, इ.स. १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी यांनी रयत शिक्षण संस्थेला १,११,१११ रुपयांची देणगी दिली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. संस्थेची काही अशी उद्दिष्टे होती -


*शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.*


*मागासलेल्या वर्गांतील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.*


*निरनिराळ्या जातिधर्मांतील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे*


*अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्‍या विकासाचे वळण लावणे.*


*संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे.*


*सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.*


*बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.*


ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.


साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली. २५ फेब्रुवारी, इ.स. १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली. जून १६, इ.स. १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली साताऱ्यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले. बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी भाऊराव पाटलांना सातार्‍यात हायस्कूल काढण्यासाठी ४००० रुपये दिले, व बडोद्यात महाराजांच्या राज्यारोहणास साठ वर्षे झाल्यानिमित्त होणाऱ्या समारंभाचे आमंत्रण दिले.


त्या देणगीतून भाऊरावांनी देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले ‘फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. इ.स. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर इ.स. १९५४ साली कऱ्हाड येथे ‘सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज‘ची स्थापना केली. शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली, म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे इ.स. १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे भाऊरावांच्या डोळ्यासमोर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. ‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ - या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.


महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती. रयत शिक्षण संस्था हि आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे. महाराष्ट्र व कर्नाटक मिळून ६७५ शाखा आहेत.त्यामध्ये २० पूर्वप्राथमिक ,२७ प्राथमिक,४३८ माध्यमिक, ८ अध्यापक विद्यालय,२ आय.टी.आय व ४१ महाविद्यालयांचा समावेश आहे.


ह.रा. महाजनी यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे. सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन आहे. तेथे भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, इ.स. १९५९ रोजी मालवली. कर्मवीरांचे पूर्ण नाव भाऊसाहेब पायगौंडा पाटील. वडिलांचे नाव पायगौंडा तर आई चे नाव गंगाबाई होते. कर्मवीरांचे मूळ घराणे कर्नाटक राज्यातील,दक्षिण कन्नड जिल्यातील मुडबीद्री गावचे. देसाई हे त्यांचे आडनाव. कर्मवीरांचे पूर्वज नशीब अजमावण्यासाठी महाराष्ट्रात आले.व एतवडे बुद्रुक. जि. सांगली येथे स्थिरावले.


📯  *रयतगीत-*


रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. || धृ ||


कर्मवीरांचे ज्ञान पीठ हे शक्तीपीठ हे ठरते आहे. शाहू-फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मुरते आहे. धर्म जातीच्या पार गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.|| १ ||


गरिबांसाठी लेणी मोडून , लक्ष्मी वाहिनी झाली आई. कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेऊनि, ज्ञानसाधना करतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. || २||


दिन-दलितांसाठी आण्णा तुमची झिजली चंदन काया अनाथ जीवा सदा लाभली मातृ हृदयी तुमची माया. शून्या मधुनी नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||३||


जीवनातला तिमिर जावा, प्रबोधनाची पहाट व्हावी, इथे लाभले पंख लेवुनी उंच भरारी नभात घ्यावी प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||४|| ... गीतकार - विठ्ठल वाघ


📚 *पाटीलांची चरित्रे*

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार : कर्मवीर भाऊराव पाटील (प्रा. प्रभाकर नानकर)

कर्मवीर भाऊराव पाटील (बा.ग. पवार)

कर्मवीर भाऊराव पाटील (प्रा.डॉ. रमेश जाधव)

कर्मवीर भाऊराव पाटील (संध्या शिरवाडकर)

कर्मवीर भाऊराव पाटील (सौ. सुधा पेठे)

कर्मवीर भाऊराव पाटील : काल आणि कर्तृत्व (डॉ. रा.अ. कडियाळ)

कुमारांचे कर्मवीर (द.ता भोसले) इंग्रजी अनुवाद Karmaveer Bhauraao Patil)

ग्रामीण महाराष्ट्राची शिक्षण परंपरा - कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिक्षणानंद बापूजी साळुंखे (रा. ना. चव्हाण)

थोर रयतसेवक कर्मवीर भाऊराव पाटील (लीला शांतिकुमार शाह)

समाजसेवक कर्मवीर भाऊराव पाटील (तृप्ती अंतरकर)

माणसातील देव, अजित पाटील


🎖 *सन्मान*

                सन १९५९ : पद्मभूषण

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर

      

        

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज


                                                           

             *धर्मवीर छत्रपती*

         *श्री संभाजी महाराज*

          *जन्म : १४ मे , १६५७*                                                                                           

            (पुरंदर किल्ला , पुणे)

          *मृत्यू : ११ मार्च , १६८९*                                                   

                      वढू (पुणे)

उत्तराधिकारी : राजाराम

वडील : शिवाजीराजे भोसले  

आई : सईबाई

पत्नी : येसूबाई

संतती : शाहू महाराज

राजघराणे : भोसले

चलन : होन , शिवराई (सुवर्ण होन , रुप्य  होन)

अधिकारकाळ : जानेवारी १६८१ - मार्च ११ , १६८९

राज्याभिषेक : जानेवारी १६८१

राज्यव्याप्ती : पश्चिम महाराष्ट्र,

कोकण , सह्याद्री डोंगररांगापासून नागपूरपर्यंत

आणि उत्तर महाराष्ट्र , खानदेशापासून दक्षिण भारतात तंजावर पर्यंत

राजधानी : रायगड   


   *!! शेर शिवा का छावा था !!*


`देश धरम पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था । महापराक्रमी परमप्रतापी, एक ही शंभू राजा था ।।`


♻️ *Chhava movie download link*

https://www.shaleyshikshan.in/2025/02/chhava-movie-download-link.html

                तेज:पुंज तेजस्वी आँखे, निकल गयी पर झुका नही । दृष्टी गयी पर राष्ट्रोन्नती का, दिव्य स्वप्न तो मिटा नही ।।


                          दोनो पैर कटे शंभूके, ध्येयमार्ग से हटा नही । हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी भी छुटा नही ।।


                   जिव्हा काटी खून बहाया, धरम का सौदा किया नही । शिवाजी का ही बेटा था वह, गलत राह पर चला नही ।।


                      रामकृष्ण, शालिवाहन के, पथसे विचलित हुआ नही ।। गर्व से हिंदू कहने मे, कभी किसी से डरा नही ।।


                               वर्ष तीन सौ बीत गये अब, शंभू के बलिदान को । कौन जिता कौन हारा, पूछ लो संसार को ।।


                     मातृभूमी के चरण कमल पर, जीवन पुष्प चढाया था । है दूजा दुनिया में कोई, जैसा शंभूराजा राजा था ।।


   💁‍♂️ *लहानपण*


              संभाजीराजांचा जन्म मे १४, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई जिजाबाई यांनी केला. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली.

अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते.त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मोंगली सैनिकांचा संभाजीराजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.


  🌀 *तारूण्य आणि राजकारण्यांशी मतभेद*


                   १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते.त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना जिंकून घेतले.

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाबाईंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते. सळसळत्या रक्ताच्या तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकर्‍यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. महाराजांचे अमात्य संभाजीराजांचा अण्णाजी दत्तोंच्या भ्रष्ट कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अनेकदा अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे दुर्लक्ष केले. पण संभाजीराजांना ते मान्य करणे कठीण होते. एकदा भर दरबारात अण्णाजी येताच संभाजीराजांनी, 'आबासाहेब, हे बघा आपले लबाड अमात्य आले' असे उद्गार काढल्याचे इतिहासात नमूद केले आहे. या कारणांमुळे अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले.

सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिन्दुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले. अफझलखान, शाहिस्तेखान यांच्यासारख्या बलाढय शत्रूंना खडे चारणारे युगपुरुष शिवाजी महाराज घरातील बेबनावापुढे दुर्दैवाने हतबल ठरले. आपल्याला दक्षिण हिन्दुस्थानच्या मोहिमेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेल्याचा सल संभाजीराजांच्या मनात कायम राहिला.

शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांनी दुष्काळग्रस्त प्रजेकडून एक वर्ष करवसुली न करायचा निर्णय घेतला. तेव्हा सोयराबाई आणि दरबारातील मानकर्‍यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला. सोयराबाईंची अपेक्षा होती की शिवाजी महाराज राज्याचे वारस म्हणून राजारामांचे नाव जाहीर करतील.


 🤴🏻 *छत्रपती* 


                १६ जानेवारी१६८१ मध्ये संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतःकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजीराजांविरुद्ध कट केला आणि त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्‍यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारले.

औरंगजेबाने १६८२ मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. त्याचे सैन्य स्वराज्याच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर त्याचे राज्य स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. जगातीला सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली मराठयांनी हिमतीने लढा दिला. मराठयांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा! औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठयांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्‍याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरूद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. यांपैकी कोणत्याही शत्रूचा पूर्णपणे बिमोड करणे संभाजीराजांना शक्य झाले नाही. पण त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरूद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठयांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.

१६८७-८८ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. त्यामुळे परिस्थिती कठीण झाली. त्यातच संभाजीराजांच्या पाठीत खंजीर खुपसायला अनेक फितुर सदैव तत्पर होते. संभाजीराजांच्या दुर्दैवाने त्यांचे सख्खे मेहुणे-- गणोजी शिर्के, महादजी निंबाळकर आणि हरजीराजे महाडिक काही गावांच्या वतनासाठी शत्रूला सामील झाले.


🤺 *संभाजी महाराज-एक उपेक्षित लढवय्या*


                        पण कुणी हा विचार करतो का की , ज्या शिवाजी महाराजांना औरंगजेबाने पकडल्यावर फक्त कैद करून ठेवले , तिकडे संभाजी महाराजांचे इतके हाल करायचे कारण काय ? असे काय घडले होते , की औरंगजेब इतका दुखावला होता ? महाराजांनी औरंगजेबाची सुरत दोन वेळा लुटली , ( ह्या गोष्टीमुळे औरंगजेबाने केला नसेल इतका राग आजही काही गुजराती माणसे महाराजांचा करतात. त्याच्या मामाची म्हणजे शाहिस्तेखानाची बोटे कापली. पण त्याचा बदला म्हणून देखील औरंगजेब महाराजांचे बोट वाकडे करू शकला नाही , मग नेमके संभाजी महाराजांनी असे काय केले होते की , त्यांच्याबद्दल औरंगजेबाच्या मनात इतका राग होता ?

शिवाजी महाराज हे सरदार पुत्र होते तर संभाजी महाराज हे युवराज होते , त्यामुळे त्यांच्या वृत्तीत फरक हा असणारच. दिसायला ते राजबिंडे होते. उंची ६ फुट ३ इंच होती. धाडसी आणि हजरजबाबी होते. त्यांच्या हजरजबाबी आणि रोखठोक बोलण्यामुळेच त्यांना स्वराज्यात देखील बरेच शत्रू निर्माण झाले होते. त्यांच्या हजरजबाबीपणाचा एक किस्सा म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग सोबत तह केला तेव्हा , तहाची पूर्तता होत नाही तोवर मिर्झाराज्यांनी शंभूबाळाला वज्रगडावर ओलीस ठेवले होते. तहाची पूर्तता झाल्यावर जेव्हा शंभूराजे परत निघाले तेव्हा दिलेलखानाने त्यांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि विचारले कि , ' इतका मोठा हत्ती तुम्ही दक्खनला कसा काय घेवून जाणार ?' तेव्हा शंभूराजे म्हणाले की , ' हत्ती तर आम्ही कसा ही घेऊन जाऊ , पण आमच्या आबासाहेबांनी जे किल्ले दिले आहेत ते परत कसे नेता येतील ह्याचा आम्ही विचार करतो आहोत .' दिलेलखान तर सोडा पण हे असले फटके संभाजी महाराजांनी वेळोवेळी औरंजेबालासुद्धा लगावलेले आहेत.

औरंगजेबाचा चौथा मुलगा अकबर ह्याने जेव्हा औरंगजेबा विरुद्ध बंड केले तेव्हा त्याला संभाजी महाराजांनी आसरा दिला होता. आणि त्या दरम्यान त्यांनी अकबराची बहिण झीनत हिला एक पत्र लिहिले होते , जे औरंगजेबाच्या माणसांच्या हाती लागले आणि ते भर दरबारात औरंगजेबाला वाचून दाखवले गेले होते. ते पत्र असे होते , ' तुमचे बंधू शहजादे अकबर यांनी हिंदुस्तान सोडण्यापूर्वी आम्हाला तुमच्या बद्दल सांगितलं . तुम्ही त्यांना पत्र पाठवलं होतं . त्याचा जबाब त्यांनी तुम्हाला परत पाठवला नव्हता . तो निरोप त्यांनी जाताना आमच्याकडे देवून ठेवला आहे तो असा : बादशहा सलामत हे नुसते मुसलमानांचे बादशहा नाहीत . हिंदुस्तान रयत वेगवेगळ्या धर्माची आहे . त्या साऱ्यांचेच हजरत बादशहा आहेत . जी गोष्ट मनात ठेवून ते या दक्खनच्या पठारावर आले ती आता साध्य झाली आहे . त्यात समाधान मानून त्यांनी आता हिंदुस्तानांत परत कूच करावं . एकदा त्यांच्या तावडीतून आम्ही आणि आमचे तीर्थरूप सुखरूप सुटून आलो आहोत . पण बादशहा अशीच आपली जिद्द चालवणार असतील तर आमच्या पकडीतून मात्र ते सुटून परत हिंदुस्तानात जाणार नाहीत . त्यांची तशीच इच्छा असेल तर त्यांनी आपल्या कबरीसाठी या दक्खनमध्ये लवकरच जागा शोधलेली बरी.


   ⚙️ *दगाफटका*


                                  १६८९ च्या सुरवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. ती बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्केने कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठयांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठयांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहित. शत्रूने संभाजीराजांना जिवंत पकडले.


  ⛓️ *शारीरिक छळ व मृत्यू*


                          त्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून धिंड अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही.

बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडख्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदुशकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते. गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा, कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानूसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे 'तख्तेकुलाह' म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेऊन त्याला दोन्ही हात बांधलेले होते. त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती अन् त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती.

अशी ती धिंड मोगली फौजेमधून काढलेली होती. मोगलांमध्ये ईदपेक्षाही उत्साहाचे वातावरण होते. दुतर्फा फौजेतील सैनीक महाराजांवर व कवी कलशांवर दगडे भिरकावीत होते. त्यांना भाल्याने टोचीत होते. त्यांचे नगारे वाजत होते, कर्णे थरारत होते. बारा ईमामांचे झेंडे फडकत होते. रायगडचा राजा, महाराजांचा व जीजाआऊचा शंभूबाळ आज रांडा पोरांच्या विटंबनेचा विषय झालेला होता.

पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. इथे तुळापूरच्या संगमावर त्याला हिंदू राजास हलाल करावयाचे होते. संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या तप्त - लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलशाचेही डोळे काढण्यात आले.

बलिष्ठ शरीर यष्टीचा एक पठाण कविराजांच्या छातीवर बसला. दोघांनी त्यांचे पाय उसाचे कांडे पिळगटावे तसे मागे खेचले. दोघांनी आपल्या राकट हातांनी कविराजांची मुंडी धरली. त्या पठाणाने कविराजांच्या जबड्यात हात घातला. कविराजांचे मुख रक्ताने भरून गेले. त्या धटींगणाने कविराजांची जीभ हाताने बाहेर खसकन खेचली. एकाने ती वीतभर लांब बाहेर आलेली जीभ कट्यारीने खचकन छाटली. कविराजांच्या तोंडातून रक्ताचा डोंब उबळला. संभाजी महाराजांचीही जीव्हा अशीच छाटली गेली. पहाणार्‍यांचेही डोळे पांढरे पडले. असूरी आनंदाने अवघी छावणी गर्जत होती.

कवी कलशांवर होणारे अत्याचार ही जणू संभाजी महाराजांवर होणार्‍या अत्याचारांची रंगीत तालीमच असायची. संध्याकाळ झाली. शंभू महादेव खांबास घट्ट बांधून ठेवलेले होते. स्वाभीमानाने तळपत झळकणार्‍या तेजस्वी योग्यासारखे. ज्यांच्या तेजाने शेशही डळमळून जावा अशा तेजस्वी श्रीकृष्णासारखे. अविचल. अभेद्य ! आभाळात अभिमानाने मस्तक उंचावून बाणेदारपणे उभे असलेल्या रायगडाच्या टकमक टोकासारखे.

दोन दैत्य पुढे सरसावले. एकाने पाठीच्या वरच्या मणक्यापासून आणि दुसर्‍याने समोरून गळ्यापासून शंभूराजांच्या अंगात वाघनख्या घुसवल्या. त्या राक्षसांना जोर चढावा म्हणून कुराणातील आयते वाचले जात होते. रण वाद्यांचा दणदणाट होत होता. "दीन दीन" "अल्लाहो अकबर" च्या घोषात राजांची त्वचा डाळिंबाच्या टरफला सारखी सोलली जात होती. जास्वंदीसारखा लाल बुंद देह यातनांनी तळमळत होता. रक्ता मासाच्या चिंध्या होत होत्या. संपूर्ण देहाची चाळणी झाल्यावर मग फरशा व खांडे पेलत दोन गाझी (धर्मेवीर) पुढे आले. त्या दोघांचेही हात पाय असे अवयव एक एक करून तोडून टाकले. एकाने खांड्याचे धारधार पाते संभाजी राजांच्या मानेत घुसवले. व हळू हळू कुराणातील आज्ञेप्रमाणे 'हलाल' करीत शिर चिरत धडावेगळे केले !!!

मार्च ११, १६८९ रोजी संभाजीराजांची शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली.


📚  *छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील ग्रंथांची सूची-*

छावा - शिवाजी सावंत - कॉन्टिनेन्टल प्रकाशन

संभाजी - विश्र्वास पाटील - मेहता पब्लिशिंग हाउस

शिवपुत्र संभाजी - डॉ. कमल गोखले - कॉन्टिनेन्टल प्रकाशन

छत्रपती संभाजी - वा. सी. बेंद्रे

मराठ्यांची धारातीर्थे - प्रवीण व. भोसले - नरसिंह पब्लिकेशन्स

शंभूराजे - प्रा. सु. ग. शेवडे - धर्मसेवा प्रकाशन

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज - अरुण जाखडे - पद्मगंधा प्रकाशन

रौद्र - प्रा. नितीन बानगुडे पाटील                                                          .                               🚩 *हर हर महादेव...* 🚩

       

ब्रह्मगुप्त..महान भारतीय गणितज्ञ

 ब्रह्मगुप्त हे सातव्या शतकातील एक महान भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी गणित आणि खगोलशास्त्राच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

जीवन आणि कार्य:

 * ब्रह्मगुप्त यांचा जन्म 598 मध्ये राजस्थानमधील भीनमाल येथे झाला.

 * ते उज्जैनमधील खगोलशास्त्रीय वेधशाळेचे प्रमुख होते.

 * त्यांनी 'ब्रह्मस्फुटसिद्धान्त' आणि 'खंडखाद्यक' हे दोन महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले.

ब्रह्मगुप्त यांचे योगदान:

 * शून्याचा वापर:

   * ब्रह्मगुप्त यांनी शून्याचा (0) वापर आणि त्याचे महत्त्व स्पष्ट केले.

   * त्यांनी शून्यासाठी नियम विकसित केले, जसे की शून्याने गुणाकार केल्यास उत्तर शून्य येते.

 * गणित:

   * त्यांनी बीजगणित आणि अंकगणित यांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.

   * त्यांनी वर्गसमीकरणे सोडवण्यासाठी सूत्रे विकसित केली.

   * त्यांनी चक्रीय चतुर्भुजाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र दिले.

 * खगोलशास्त्र:

   * त्यांनी ग्रहांच्या गती आणि स्थितीचा अभ्यास केला.

   * त्यांनी ग्रहण कसे होते, हे स्पष्ट केले.

ब्रह्मगुप्त यांचे महत्त्व:

 * ब्रह्मगुप्त हे मध्ययुगीन भारतातील महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञांपैकी एक मानले जातात.

 * त्यांच्या कार्याचा भारतीय गणित आणि खगोलशास्त्राच्या विकासावर मोठा प्रभाव पडला.

 * त्यांच्या कार्याचा जगभरातील गणितज्ञांनी आणि खगोलशास्त्रज्ञांनी अभ्यास केला आहे.

 * त्यांना 'गणक चक्र चूड़ामणि' या नावाने ओळखले जाते.

ब्रह्मगुप्त यांचे ग्रंथ:

 * ब्रह्मस्फुटसिद्धान्त:

   * हा ग्रंथ 628 मध्ये लिहिला गेला.

   * यात गणित आणि खगोलशास्त्राच्या विविध विषयांवर माहिती दिली आहे.

 * खंडखाद्यक:

   * हा ग्रंथ 665 मध्ये लिहिला गेला.

   * यात खगोलशास्त्रातील विविध विषयांवर माहिती दिली आहे.


जगदीश चंद्र बोस..भारतीय शास्त्रज्ञ

 जगदीश चंद्र बोस हे एक बहुआयामी भारतीय शास्त्रज्ञ होते, ज्यांनी भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि पुरातत्वशास्त्र या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.

जीवन आणि सुरुवातीचे करिअर:

 * जगदीश चंद्र बोस यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1858 रोजी बंगालमध्ये (आता बांगलादेश) झाला.

 * त्यांनी कलकत्ता विद्यापीठ आणि केंब्रिज विद्यापीठामध्ये शिक्षण घेतले.

 * 1885 मध्ये ते कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक बनले.

महत्त्वाचे योगदान:

 * रेडिओ आणि सूक्ष्म लहरी:

   * बोस यांनी रेडिओ आणि सूक्ष्म लहरींच्या प्रकाशिकीवर महत्त्वपूर्ण कार्य केले.

   * त्यांनी बिनतारी संदेशवहनाचा शोध लावला आणि त्यांना "रेडिओ विज्ञानाचे जनक" मानले जाते.

   * त्यांनी कोहेररचा शोध लावला, जे रेडिओ लहरी शोधण्याचे उपकरण आहे.

 * वनस्पतींमधील जीवन:

   * बोस यांनी क्रेसकोग्राफचा शोध लावला, जे वनस्पतींच्या वाढीचे मोजमाप करणारे उपकरण आहे.

   * त्यांनी हे सिद्ध केले की वनस्पतींमध्ये भावना असतात आणि त्या उत्तेजनांना प्रतिसाद देतात.

   * त्यांनी हे देखील दाखवले की वनस्पतींमध्ये एक प्रकारची मज्जासंस्था असते.

 * इतर योगदान:

   * बोस यांनी धातूची थकवा आणि अर्धवाहक यांवरही संशोधन केले.

   * त्यांना बंगाली विज्ञान कथा साहित्याचे जनक देखील मानले जाते.

वारसा:

 * जगदीश चंद्र बोस यांना एक महान वैज्ञानिक आणि दूरदर्शी म्हणून ओळखले जाते.

 * त्यांच्या कार्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अनेक क्षेत्रांत क्रांती झाली.

 * त्यांना रॉयल सोसायटीचे फेलो आणि नाईट बॅचलरसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

प्रमुख शोध:

 * बोस यांनी रेडिओ लहरी शोधण्यासाठी कोहेररचा शोध लावला.

 * त्यांनी क्रेसकोग्राफचा शोध लावला, जो वनस्पतींच्या वाढीचे मोजमाप करतो.

 * त्यांनी हे शोधले की वनस्पती देखील उत्तेजनांना प्रतिसाद देतात.

जगदीश चंद्र बोस हे एक महान वैज्ञानिक आणि दूरदर्शी होते, ज्यांच्या कार्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अनेक क्षेत्रांत क्रांती झाली.


विक्रम साराभाई..भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक

 विक्रम साराभाई हे एक महान भारतीय वैज्ञानिक, उद्योगपती आणि दूरदर्शी होते, ज्यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानले जाते. त्यांनी भारताला अंतराळ संशोधन आणि अणुऊर्जेच्या क्षेत्रात आघाडीवर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

जीवन आणि प्रारंभिक कारकीर्द:

 * विक्रम साराभाई यांचा जन्म 12 ऑगस्ट 1919 रोजी अहमदाबाद, गुजरात येथे एका समृद्ध उद्योगपती कुटुंबात झाला.

 * त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून भौतिकशास्त्रात डॉक्टरेट पदवी प्राप्त केली.

 * 1947 मध्ये, त्यांनी अहमदाबाद येथे भौतिक संशोधन प्रयोगशाळा (PRL) ची स्थापना केली, जी अंतराळ विज्ञान आणि संबंधित क्षेत्रातील संशोधनासाठी एक प्रमुख संस्था बनली.

भारतीय अंतराळ कार्यक्रमात योगदान:

 * विक्रम साराभाई यांनी 1962 मध्ये भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन समिती (INCOSPAR) ची स्थापना केली, जी नंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) म्हणून ओळखली जाऊ लागली.

 * त्यांनी भारतात उपग्रह प्रक्षेपण केंद्र स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे 1975 मध्ये भारताच्या पहिल्या उपग्रह, आर्यभट्टचे यशस्वी प्रक्षेपण झाले.

 * त्यांनी उपग्रह दळणवळण, दूरसंवेदन आणि हवामानशास्त्र या क्षेत्रात भारताच्या क्षमता विकसित करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

इतर योगदान:

 * विक्रम साराभाई यांनी अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, वस्त्रोद्योग आणि औषध यांसारख्या क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले.

 * त्यांनी भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM), अहमदाबादच्या स्थापनेतही महत्त्वाची भूमिका बजावली.

 * त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम केले आणि ग्रामीण विकासात तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन दिले.

वारसा:

 * विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानले जाते.

 * त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि प्रयत्नांमुळे भारत अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक आघाडीचा देश बनला आहे.

 * त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आणि संघटना आजही भारताच्या वैज्ञानिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

निधन:

 * 30 डिसेंबर 1971 रोजी कोवलम, केरळ येथे त्यांचे निधन झाले.


महाराष्ट्र राज्याची प्रतीके आधारित टेस्ट

महाराष्ट्र राज्याची प्रतीके टेस्ट महाराष्ट्र राज्याची प्रतीके टेस्ट सूचना: प्रत्येक प्रश्नासाठी योग्य उत्...