मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

बँक ऑफ महाराष्ट्र 500 पदे भरती 2025

 

बँक ऑफ महाराष्ट्रने नोकरीच्या शोधात असेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रने 2025-26 या वर्षासाठी 500 कायमस्वरूपी जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II) पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ही भरती देशभरातील पात्र उमेदवारांसाठी खुली असून इच्छुकांनी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर (bankofmaharashtra.in) 30 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.



पात्रता आणि वयोमर्यादा


या भरतीसाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60 टक्के गुणांसह पदवी किंवा चार्टर्ड अकाउंटंट (CA) अर्हता असावी. SC/ST/OBC/PwBD प्रवर्गातील उमेदवारांसाठी 55 टक्के गुणांसह सवलत आहे. याशिवाय बँकिंग क्षेत्रात ऑफिसर म्हणून किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. वयोमर्यादा 22 ते 35 वर्षे असून आरक्षणानुसार सवलत लागू आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व पात्रता निकष आणि अटी काळजीपूर्वक तपासाव्या.



निवड प्रक्रिया आणि पगार


ऑनलाइन लेखी परीक्षा (75% वेटेज) आणि मुलाखत (25% वेटेज) अशा दोन टप्प्यात निवड प्रक्रिया पार पडेल. या दोन्ही टप्प्यांत यशस्वी झालेल्या उमेदवारांना स्केल II अंतर्गत 64,820 ते 93,960 रुपये मासिक वेतन, तसेच विविध भत्ते आणि सुविधांचा लाभ मिळेल.



अर्ज कसा करावा?


अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत संकेतस्थळ bankofmaharashtra.in वर भेट द्यावी. त्यानंतर 'Careers' विभागात 'Recruitment of Officers in Scale II - Project 2025-26' या पर्यायावर क्लिक करून नोंदणी करावी. सर्व सूचनांचे पालन करत अर्ज भरावा आणि आवश्यक शुल्क ऑनलाइन पद्धतीने जमा करावे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 ऑगस्ट 2025 आहे. अधिक तपशील आणि अधिसूचना (Bank of Maharashtra Recruitment 2025 Notification PDF) बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment

DSSSB दिल्ली उच्च न्यायालयात विविध 334 पदे भरती 2025

  दिल्लीमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळाने (DSSSB) दिल्ली उच्च न्याय...