अभिनंदन टीम इंडिया
क्रीडा विश्वातून एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली. पहिलाच खो खो विश्वचषक (Kho Kho World Cup 2025) भारतात खेळवला गेला आणि भारताच्या महिला-पुरूष दोन्ही संघांनी इतिहास घडवला आहे.
महिला खो खो संघानंतर पुरूष खो-खो संघानेही नेपाळवर अंतिम सामन्यात मात विश्वचषकावर नाव कोरलं. टीम इंडियाच्या महिला संघाने नेपाळला ३८ गुणांच्या फरकाने हरवले.
महिला खो-खो विश्वचषक स्पर्धेला १३ जानेवारी रोजी इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरूवात झाली. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला १७६ धावांच्या मोठ्या फरकाने हरवून भारतीय संघाने शानदार सुरुवात केली होती. सुरुवातीच्या सामन्यापासूनच भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवली होती. भारतीय संघाने तशीच कामगिरी अंतिम सामन्यातही केली आणि नेपाळला ७८-४० च्या फरकाने हरवून विश्वचषक ट्रॉफी जिंकली.
No comments:
Post a Comment