इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि संगणक विज्ञान या विषयांमध्ये शास्त्रज्ञ/अभियंता ‘एससी’ पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार या पदांसाठी १९ मे २०२५ पर्यंत https://www.isro.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.
६३ रिक्त जागा भरण्याचे आहे, त्यापैकी २२ रिक्त जागा शास्त्रज्ञ/अभियंता 'एससी' (इलेक्ट्रॉनिक्स), ३३ रिक्त जागा शास्त्रज्ञ/अभियंता 'एससी' (मेकॅनिकल) आणि ०८ रिक्त जागा शास्त्रज्ञ/अभियंता 'एससी' (कॉम्प्युटर सायन्स) आहेत.
अर्जदारांना २५० रुपये शुल्क भरावे लागेल. सर्व महिला/अनुसूचित जाती (SC)/ अनुसूचित जमाती (ST); माजी सैनिक [EX] आणि बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्ती (PwBD) उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment