समूहदर्शक शब्द. मराठीमध्ये समूहदर्शक शब्दाला एक महत्त्व आहे परीक्षेच्या दृष्टीने हा घटक खूप महत्त्वाचा आहे...
काजूची,माशांची – गाथण
किल्ल्यांचा – जुडगा
केसांचा – झुबका,पुंजका
केसांची – बट,जट
केळ्यांचा – लोंगर , घड
खेळाडूंचा – संघ
गवताचा – भारा
आंब्यांच्या झाडांची – राई
उतारुंची – झुंड ,झुंबड
उपकरणांचा – संच
उंटांचा, लमाणांचा – तांडा
करवंदाची – जाळी
गवताची – गंजी , पेंढी
गाईगुरांचे – खिल्लार
गुरांचा – कळप
चोरांची, दरोडेखोरांची – टोळी
जहाजांचा – काफिला
तारकांचा – पुंज
ताऱ्यांचा – पुंजका
नारळांचा - ढीग
नोटांचे – पुडके
पक्ष्यांचा – थवा
प्रवाशांची – झुंबड
फुलझाडांचा – ताटवा
फुलांचा – गूच्छ
बांबूंचे – बेट
भाकऱ्यांची ,रुपयांची – चवड
मंडक्यांची – उतरंड
प्रश्नपत्रिकांचा – संच
पाठ्यपुस्तकांचा – संच
पालेभाजीची – गड्डी,जुडी
32) द्राक्षांचा – घड,घोस
दुर्वांची – जुडी
धान्यांची – रास
नाण्यांची – चळत
पिकत घातलेल्या आंब्यांची – अढी
पुस्तकांचा,वह्यांचा – गट्ठा
पोत्यांची,नोटांची – थप्पी
फळांचा – घोस
माणसांचा – जमाव
वाद्यांचा – वृंद
विटांचा, कालिंगडांचा – ढीग
विद्यार्थ्यांचा – गट
विमानांचा – ताफा
मुलांचा – घोळका
मुंग्यांची – रांग
मेंढयांचा – कळप
लाकडांची,उसांची – मोळी
वस्तूंचा – संच
वेलिंचा – कुंज
साधूंचा – जथा
वानरांची - टोळी
घरांची - चाळ
ढगांचा - घनमंडल
सैनिकांचे/सैनिकांची - तुकडी,पथक,फलटण
हत्तींचा – कळप
हरिणांचा – कळप
मातीचा ,विटांचा - ढिगारा
वाळूचा - ढीग
No comments:
Post a Comment