भरारी मारणे झेप घेणे
मशागत करणे काळजीपूर्वक मेहनत करणे
माशी शिंकणे विघ्न येणे
मागमूस नसणे - ठावठिकाणा न सापडणे
माधुकरी मागणे भिक्षा मागणे
मात करणे वरचढ होणे
माग काढणे वाट काढणे
यातायात करणे खूप प्रयत्न करावे लागणे
रुद्रावतार धारण करणे - खूप रागावणे
राबराब राबणे खूप कष्ट करणे
ललकारी देणे जयघोष करणे
लक्ष वेधून घेणे
लक्ष ओढून घेणे
लक्ष्मीचा वरदहस्त असणे श्रीमंती असणे
लोणी लावणे
खुशामत करणे
वहिवाट असणे रीत असणे
व्यथित होणे दुःखी होणे
व्यग्र होणे मग्न होणे
वर्ज्य करणे टाळणे
वाट लावणे - विल्हेवाट लावणे
विश्वासघात करणे दिलेला शब्द न पाळणे
वीरगती मिळणे लढाईत मरण येणे
वीट येणे नकोसे वाटणे
वणवण करणे पायपीट करणे
शरमिंदे होणे - लाजणे
शह देणे - हुसकावून लावणे
श्रीगणेशा होणे आरंभ होणे
शपथ घेणे प्रतिज्ञा करणे
सतीचे वाण घेणे अवघड काम करण्याचा निश्चय करणे
निपचीत पडणे हालचाल न करता पडून राहणे
पाठ थोपटणे कौतुक करणे
पाठ राखणे मदत करणे
पाठ दाखवणे - समोरून पळून जाणे
पाय काढणे एखाद्या कामातून अंग काढणे
पाय पसरणे हळूहळू बस्तान बसविणे
पोटात खड्डा पडणे खूप भीती वाटणे
पायाखालची जमीन हादरणे भीतीने धसका घेणे
पायावर उभे राहणे स्वावलंबी होणे
पोटावर पाय देणे एखाद्याचे उदरनिर्वाहाचे साधन नष्ट करणे
पोट भरणे उदरनिर्वाह करणे
पोटात कावळे ओरडणे अतिशय भूक लागणे
पोपटपंची करणे अर्थ समजून न घेता पाठांतर करणे
प्रतिक्षा करणे वाट पाहणे
प्रफुल्लित होणे आनंदित होणे
फज्जा उडणे फजिती होणे
फसगत होणे - फसवणूक होणे
फारकत घेणे संबंध तोडणे
पटाईत असणे तरबेज असणे
बोल लावणे दोष देणे
बाजी मारणे यशस्वी होणे
बभ्रा करणे बोभाटा करणे
बस्तान बसविणे चांगला जम बसणे
बगल उडविणे थट्टा करणे
'ब्र' न काढणे चूप बसणे
बांगडी फुटणे - वैधव्य येणे
भगवे घेणे संन्यास पत्करणे
भरून पावणे - पूर्ण समाधान होणे
प्रचिती येणे - अनुभव येणे
पाठीशी घालणे - संरक्षण देणे
पाय धरणे शरण जाणे
पायावर धोंडा पाडून घेणे - आपले आपणच नुकसान
करून घेणे
पाठबळ असणे आधार असणे
पाण्यात पाहणे - मत्सर करणे
पारा चढणे - संताप वाढणे/खूप रागावणे
पाणी मुरणे - दोषाला जागा असणे
पराचा कावळा करणे - क्षुल्लक गोष्टीला महत्त्व देणे
पोबारा करणे पलायन करणे
पाणउतारा करणे अपमान करणे
पोटात घाबरा पडणे खूप घाबरणे
फुशारकी मारणे - बाता मारणे
पाणी पाजणे पराभव करणे
फडशा पाडणे संपविणे
फत्ते होणे विजयी होणे
फुशारकी मारणे - बढाई मारणे
फस्त करणे संपविणे
बार उडवणे - कार्य पूर्ण करणे
बेचैन होणे अस्वस्थ होणे
बुचकळ्यात पडणे - गोंधळून जाणे
बोटावर नाचवणे - पूर्ण ताब्यात ठेवणे
बारा महिने तेरा काळ - सदासर्वदा
बिनभाड्याच्या घरात जाणे - तुरुंगात जाणे
बोऱ्या उडणे - फजिती होणे
भीतीने थरथर कापणे खूप घाबरणे
भडभडून येणे - रडू येणे
भ्रमण करणे - फिरणे
भरभराट होणे प्रगती होणे
मुठीत असणे ताब्यात असणे
मेतकूट जमणे स्नेह जुळणे
मेटाकुटीस येणे - काकुळतीस येणे
माशा मारणे निरर्थक वेळ घालवणे
मूग गिळणे गप्प बसणे
राम नसणे अर्थ नसणे
राम म्हणणे मरण पावणे
राशीस लागणे वैर धरणे
रेषा उमटणे भाग्यवंत होणे
लष्कराच्या भाकऱ्या भाजणे नको ती कामे करणे
लौकिक मिळविणे - प्रसिद्धी मिळविणे
लाळ घोटणे उगीच दुसऱ्याची मनधरणी करणे
लाखोली वाहणे शिव्या देणे
वचपा काढणे सूड उगवणे
वाकुल्या दाखविणे - चिडवणे
व्याकूळ होणे - कासावीस होणे
वाळीत टाकणे बहिष्कार घालणे
विडा उचलणे प्रतिज्ञा करणे
वाहत्या गंगेत हात धुणे आलेल्या संधीचा फायदा घेणे
वाट वाकडी करणे वाट बदलून दुसरीकडे जाणे
वीरश्री संचारणे अंगी शौर्य येणे
शहानीशा करणे खरे-खोटे याची खात्री करणे
शिष्टाई करणे मध्यस्थी करणे
श्रीगणेशा होणे आरंभ होणे
सुतोवाच करणे प्रारंभ करणे
सुळावर चढवणे फासावर लटकावणे
सुगावा लागणे- अंदाज लागणे
अर्धचंद्र देणे - हकालपट्टी करणे
उजेड पाडणे - मोठे काम करणे
कणिक तिंबणे - मार देणे
चाहा करणे - स्तुती करणे
त्रेधा उडणे - फजिती होणे
खडे फोडणे - दोष देणे
खसखस पिकणे - मोठ्याने हसणे
गुण उधळणे - दुर्गुण दाखवणे
चतुर्भुज होणे - अटक/लग्न होणे
शेणसडा होणे - वाया जाणे
सद्गदित होणे - गहिवरणे
तारे तोडणे - वेड्यासारखे बोलणे
इतिश्री करणे - शेवट करणे
उखळ पांढरे होणे - पुष्कळ द्रव्य मिळणे
त्राटिका कजाग बायको
तिलांजली देणे त्याग करणे
दीड शहाणा - मुर्ख
धूळ चारणे पराभव करणे
पांघरूण घालणे - दोष झाकणे
पोबारा करणे - पळून जाणे
बांगडी फुटणे - वैधव्य येणे
राम नसणे - अर्थ नसणे
विडा उचलणे - प्रतिज्ञा करणे
डोळे फाटणे - विश्वास न बसणे
तोंडात शेण घालणे फजिती करणे
तोंड शिवणे गप्प बसणे
तोंडात बोट घालणे - आश्चर्यचकीत होणे
तोंडचे पाणी पळणे अतिशय घाबरणे
तोंड आवरणे गप्प बसणे
थरकाप होणे - खूप घाबरणे
थैमान घालणे गोंधळ घालणे
दात ओठ खाणे - द्वेष करणे
दात पाडणे फजिती करणे
दुधात साखर पडणे अधिक चांगले घडणे
दिग्विजय करणे - चहुदिशांनी विजय मिळविणे
देवाज्ञा होणे मरण पावणे
दबदबा निर्माण करणे दरारा निर्माण करणे
दूम नसणे पत्ता नसणे
दाह होणे - आग होणे
दम लागणे धाप लागणे
धूम ठोकणे - पळून जाणे
धूळ चारणे पराभव करणे
धाबे दणाणणे खूप घाबरणे
धारातीर्थी पडणे लढताना विरमरण येणे
धरतीवर कोसळणे मरण पावणे
नाव मिळणे प्रसिद्धी मिळणे
नवल वाटणे आश्चर्य वाटणे
नजर ठेवणे लक्ष ठेवणे
नक्षा उतरविणे - गर्वहरण करणे
नजरेत भरणे - उठून दिसणे
नजरेआड करणे - दुर्लक्ष करणे
नाकासमोर चालणे - सरळपणे वागणे
नाकावर राग असणे - पटकन चिडणे
तहानभूक हरपणे - तहानभूक विसरून गुंग होणे
तिळपापड होणे राग येणे
तोंडघशी पाडणे विश्वासघात करणे
तोंड देणे परिस्थितीस सामोरे जाणे
थक्क होणे आश्चर्य वाटणे
थांग न लागणे कल्पना न येणे
थुकी झेलणे लाचारी पत्करणे
दात धरणे - डुख ठेवणे
दाताच्या कण्या करणे खूप वेळा विनंती करून सांगणे
दाती तृण धरणे शरणागती पत्करणे
दगडाखाली हात सापडणे अडचणीत सापडणे
दात घशात घालणे फजिती करणे
दाद न देणे लक्ष न देणे
दैना उडणे वाईट अवस्था होणे
दणाणून सोडणे सतत आवाज होत राहणे
धारेवर धरणे खरडपट्टी काढणे
धिंड काढणे - बेइज्जत करणे
धूम ठोकणे पळून जाणे
धुळधाण करणे - नुकसान करणे
ध्यान लावणे - डोळे मिटून एकाग्र होणे
नाक मुरडणे नापसंती दाखवणे
नाक घासणे शरण येणे
नाक उडविणे चेष्टा करणे
नाकाने कांदे सोलणे जास्त शहाणपणा दाखवणे
नाकी नऊ आणणे खूप दमणे
नांगी टाकणे पराभव मान्य करणे
नाक घालणे उगीच दुसऱ्याच्या कामात लक्ष देणे
निरुत्तर होणे उत्तर न सुचणे
नात्यातील वीण गहिरी असणे नाते घट्ट करणे
No comments:
Post a Comment