मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

MH 59 RTO क्रमांक जत सांगली

 महाराष्ट्रातील एका तालुक्याला नवा RTO क्रमांक मिळाला आहे. MH 59 असा हा RTO क्रमांक आहे. जाणून घेऊया कोणत्या तालुक्याला हा नवा RTO क्रमांक मिळाला आहे. 1 मार्च 2025 रोजी राज्यातील 58 वे उपप्रदेशिक परिवहन कार्यालय मीरा-भाईंदर येथे मंजूर करण्यात आले.

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला नवा RTO क्रमांक मिळाला आहे. सांगली जिल्ह्याचा RTO क्रमांक हा MH 10 असा आहे. तर, आता सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला MH 59 असा नवा RTO क्रमांक मिळाला आहे. एमएच ५९ (MH 59) अशी आता जत तालुक्याची नवी ओळख असणार आहे. जतसाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय मंजूर झाले आहे. त्यानुसार MH 59 म्हणून जत तालुक्याला नवी ओळख मिळाली आहे. त्यामुळे जत तालुक्यातील नागरिकांना वाहन नोंदणी, अनुज्ञप्ती (परवाने), करभरणा यासाठी आता इतर ठिकाणी जाण्याची गरज राहणार नाही.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी नविन RTO ची मागणी केली होती. जत तालुक्यातील नागरिकांना वाहनाच्या संदर्भात नोंदणी तसेच ड्रायव्हिंग लायसन्स यासह इतर कामाकरिता सांगली येथे जावे लागत होते. यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत होती.

No comments:

Post a Comment

DSSSB दिल्ली उच्च न्यायालयात विविध 334 पदे भरती 2025

  दिल्लीमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळाने (DSSSB) दिल्ली उच्च न्याय...