WEL COME MY JOB....... BLOG आपले सर्वांचे सहर्ष स्वागत ... माझ्या WEBSITE ला भेट दिल्या बद्दल मी मनापासून आभारी आहे

नोकरीसाठी उपयुक्त जनरल नॉलेज

Friday, July 19, 2024

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS व हवालदार पदे

 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS व हवालदार पदाच्या तब्बल 8,326 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff selection commission Recruitment for MTS & Havaldar post Number of Post Vacancy – 8326 )





जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 31 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .




शरद पवार इन्सपायर फेलोशिप 2024-25

  *शरद पवार इन्सपायर फेलोशिप : शिक्षण* 




शिक्षण उद्यासाठी असते. उद्याचे सुजाण, सतर्क, सर्जनशील, कर्तबगार व सुसंस्कृत नागरिक घडविणे हे शिक्षणातून अपेक्षित असते. शिकावे कसे, शिकण्याचा आनंद कसा घ्यावा-द्यावा आणि आजन्म शिकत कसे राहावे हे शिकविते ते खरे शिक्षण. शिकता-शिकता जे उद्याची आव्हाने पेलायला सज्ज करते, उद्याच्या संधींचे सोने करायला शिकवते ते खरे शिक्षण.


शिक्षण क्षेत्रात नवे काही करु पाहणाऱ्या, ध्येयाने झपाटलेल्या व त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या होतकरु गुणवंत शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्याना हक्काचं व्यासपीठ मिळावं, त्यांच्याकडून गुणवत्तापूर्ण काम व्हावे तसेच मुलभूत संशोधनास वाव मिळावा हा या फेलोशीपचा हेतू आहे.यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने २० प्राथमिक शिक्षक आणि १० माध्यमिक शिक्षकांना ही फेलोशिप दिली जाणार आहे. सदर फेलोशिपची रक्कम साठ हजार असेल.  


आज घडीला शालेय शिक्षणाच्या मुलभूत पुनर्रचनेची नितांत आवश्यकता वाटते आहे. यावर्षी (२०२४ -२५) महाराष्ट्रातील २०  प्राथमिक आणि १० माध्यमिक शिक्षकांना आणि १० एकात्मिक बी. एड. करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही फेलोशिप देण्यात आली. या फेलोशिप अंतर्गत भारतीय संविधानाच्या तरतुदींच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण रुजविणे, स्वयंअध्ययन आणि सहअध्ययन यांचा अध्ययन-अध्यापन आणि मूल्यमापन प्रक्रियेत प्रभावी वापर, कला व खेळ यांच्याशी समन्वय साधून विद्यार्थ्यांचे आकलन वाढविणे, वाचन आणि आकलन वाढवण्यासाठीचे उपक्रम, पालक आणि स्थानिक समाज यांचा शालेय कामकाजात आणि अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत सहभाग, शाळेची इमारत आणि परिसर यांचा शैक्षणिक साधन म्हणून वापर, अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत डिजिटल लर्निंगचा प्रभावी वापर, असे उपक्रम या वर्षीच्या फेलोशिप प्राप्त शिक्षकांनी निवडले आहेत.


ही केवळ उदाहरणे म्हणून दिली आहेत, तरी परंतु आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या गरजा  लक्षात घेऊन, कोणते उपक्रम निवडावे याचे संपूर्ण स्वातंत्र्य शिक्षकांना असेल. २०२५- २६ च्या फेलोशिपसाठीची अर्ज प्रक्रिया १८ जुलै २०२४ पासून होत आहे. तरी इच्छुक शिक्षकांनी दिनांक १८ ऑक्टोबर २०२४ अखेर *https://apply.sharadpawarfellowship.com* या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.


टीप : प्रस्ताव लेखन कसे करावे? याकरिता हा खालील व्हिडिओ पाहवा- 


*https://youtu.be/agPkuW4MnVI?si=RWZFv8OU3_FRbDKl*

जागतिक ध्यान दिवस

  २१ डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा केला जावा हा लिकटेंस्टिन या देशाने मांडलेला व भारतासह अनेक देशांनी अनुमोदन दिलेला प्रस्ताव सं...