मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद
ा

h 2

Showing posts with label नोकरी जाहिरात... Show all posts
Showing posts with label नोकरी जाहिरात... Show all posts

Saturday, October 31, 2026

भूकरमापकांची (लायसन्स सर्वेअर) तातडीने नियुक्ती...

 राज्यातील जमीन मोजणीची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी तब्बल ५ हजार परवानाधारक खासगी भूकरमापकांची (लायसन्स सर्वेअर) तातडीने नियुक्ती केली जाणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.


या पदासाठी निवड झालेल्या तरुणांना शासनाकडून दरमहा ३५ हजार रुपये मानधन दिले जाणार असून, अवघ्या एका महिन्यात ही संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत महसूलमंत्र्यांनी या नव्या भरतीची आणि कार्यपद्धतीची सविस्तर माहिती दिली.


कोणाला मिळणार संधी?


या भरती प्रक्रियेत तांत्रिक शिक्षण घेतलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले की:


शैक्षणिक पात्रता : आयटी (IT) आणि इंजिनिअरिंगचे (Engineering) शिक्षण पूर्ण केलेल्या पदवीधर व पदविकाधारक तरुणांना या भरतीत प्राधान्य दिले जाईल.


आधुनिक प्रशिक्षण : निवड झालेल्या सर्व ५ हजार उमेदवारांना आधुनिक 'रोव्हर' (Rover) आणि 'ड्रोन' (Drone) तंत्रज्ञान वापरून जमिनीची अचूक मोजणी कशी करावी, याचे १५ दिवसांचे विशेष तांत्रिक प्रशिक्षण सरकारमार्फत दिले जाईल.


कामाचे स्वरूप : प्रत्येक परवानाधारक सर्वेअरला दरमहा किमान २० जमीन मोजण्या कराव्या लागतील


सध्या भूमी अभिलेख विभागाकडे नियमित मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर प्रत्यक्ष मोजणी व्हायला ६० ते ९० दिवस लागतात. त्यामुळे जमिनीच्या वाटणीवरून आणि सीमांवरून ग्रामीण भागात मोठे वाद निर्माण होतात. "सध्या राज्यात १ हजार २०० सरकारी सर्वेअर कार्यरत आहेत. आता आणखी ५ हजार खासगी सर्वेअर आल्यानंतर अर्ज आल्यापासून केवळ १५ दिवसांत मोजणी पूर्ण करण्याचा सरकारचा संकल्प पूर्ण होईल. खासगी सर्वेअरनी केलेल्या मोजणीला सरकारी भूकरमापक अधिकृतपणे प्रमाणित (Certified) करतील, ज्यामुळे शेतजमिनीचे खरेदीखत आणि फेरफार तात्काळ करणे शक्य होईल," असा विश्वास महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला.


१०६ मोजणी अधिकाऱ्यांना पदोन्नती; विदर्भ, मराठवाड्याला प्राधान्य


यासोबतच, भूमी अभिलेख विभागातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या १०६ मोजणी अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, मुख्यमंत्र्यांनी या फाईलला मंजुरी दिली आहे. हे सर्व पदोन्नत अधिकारी येत्या सोमवारी प्रत्यक्ष कामावर रुजू होणार आहेत. यामध्ये विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील रिक्त पदे भरण्यावर विशेष भर देण्यात आला आहे

Wednesday, October 28, 2026

दि. हिंदुस्थान को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई 100 पदे भरती..

 दि. हिंदुस्थान को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई लिपिक आणि शिपाई पदांच्या भरतीसाठी जाहिरात


दि. हिंदुस्थान को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई ही महाराष्ट्र राज्यात कार्यक्षेत्र असलेली सहकारी बँक असून, बँकेच्या महाराष्ट्रात एकूण 26 शाखा आहेत.


बँकेमध्ये रिक्त असलेल्या पदांसाठी खालीलप्रमाणे भरती करण्यात येणार आहे.


* लिपिक पदे: 60


* शिपाई पदे: 50


* एकूण रिक्त पदे: 110


### अर्ज करण्याची माहिती


* अर्ज पद्धत: ऑनलाइन


* अर्ज सुरू होण्याची तारीख: 17 ऑक्टोबर 2026


* अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 ऑक्टोबर 2026, सायंकाळी 5 वाजेपर्यंत


* परीक्षा शुल्क: ₹1,000 + 18% GST + व्यवहार शुल्क

 अधिकृत वेबसाइट


अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्जासाठी जाहिरातीत दिलेली वेबसाइट:

https://sznsbal.com



 जाहिरातीत दिलेली अर्जाची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2026 आहे. 


Friday, July 24, 2026

ग्राम महसूल अधिकारी भरती 2026

 महसूल व वन विभागातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) या अत्यंत महत्त्वाच्या पदाच्या तब्बल १ हजार ५३९ जागांचा नवीन समावेश करण्यात आला आहे.


नवीन पदांची भर पडल्यामुळे आता या गट-क परीक्षेंतर्गत भरल्या जाणाऱ्या एकूण रिक्त पदांची संख्या थेट ५ हजार ७०७ वर पोहोचली आहे. या बदलामुळे अनेक दिवसांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांना मोठा दिलासा मिळाला असून, आयोगाने उमेदवारांच्या हि लक्षात घेऊन ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देखील जाहीर केली आहे.




पदनाम व विभाग: ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (महसूल व वन विभाग)

नवीन समाविष्ट पदे: १५३९ जागा (एकूण गट-क पदे: ५७०७)

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक.

वयोमर्यादा गणण्याचा दिनांक: ०५ ऑगस्ट २०२६ रोजी ग्राह्य धरली जाईल.

अधिकृत अर्ज लिंक: https://mpsconline.gov.in/candidate/login

Tuesday, March 3, 2026

रेल्वे भरती बोर्डाने २१९९७ पदांसाठी भरती

 रेल्वे भरती बोर्डाने २१९९७ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. याआधी शेवटची तारीख २ मार्च होती. तर अॅप्लिकेशन फी भरण्याची शेवटची तारीख ११ मार्च करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

रेल्वे ग्रुप डी पदांसाठी असिस्टंट ब्रिज, लोको शेड, असिस्टंट ऑपरेशन्स, असिस्टंट पी-वे, असिस्टंट ट्रॅक मशीन, पॉइंट्समॅन पदे भरली जाणार आहे. 

 www.rrbapply.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

रेल्वे ग्रुप डी पदांसाठी अर्जप्रक्रिया ३१ जानेवारीपासून सुरु झाली आहे. आता ११ मार्चपर्यंत अर्ज करु शकतात.१८ ते ३३ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, पीईटी, कागदपत्र पडताळणी, मेडिकल आणि मेरिट लिस्टद्वारे होणार आहे.

रेल्वेतील या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना बेसिक  पगार १८००० रुपये मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांनी ५०० रुपये फी भरायची आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी २५० रुपये फी भरायची आहे.

Wednesday, February 11, 2026

भारतीय टपाल विभाग भरती.2026

 

भारतीय टपाल विभागाकडून देशभरातील विविध राज्यांमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांच्या एकूण २८, ७४० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी नोंदणीची अंतिम तारीख १४ फेब्रुवारी तर अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १६ फेब्रुवारी निश्चित करण्यात आली आहे. 

इच्छुक उमेदवारांनी अर्ज स्वतःही भरू शकतात. त्यामुळे सायबर कॅफे किंवा इतर ठिकाणी अतिरिक्त शुल्क देण्याची गरज लागणार नाही. खाली दिलेल्या सोप्या पद्धतीने अर्ज भरा.


सर्वप्रथम

 indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.


"GDS ऑनलाइन एंगेजमेंटसाठी नोंदणी" या मुख्य पृष्ठाशी संबंधित लिंकवर .


नवीन पनवार, "नोंदणी/अर्ज करण्यासाठी येथे " वर .


"नवीन उमेदवार नोंदणी" निवडा आणि आवश्यक माहिती भरून नोंदणी पूर्ण करा.


त्यानंतर आवश्यक तपशील भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.


अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील वापरासाठी प्रिंटआउट सुरक्षित ठेवा.


अर्ज शुल्क


या भरतीसाठी अर्ज करताना, सामान्य आणि ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागेल.


अनुसूचित जाती, जमाती आणि शारीरिकदृष्ट्या अपंग श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज मोफत आहे.


पात्रता


या भरतीत सहभागी होण्यासाठी उमेदवार हा भारतीय नागरिक असावा


कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळ/संस्थेतून दहावी (मॅट्रिक) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.


दहावीमध्ये गणित आणि इंग्रजी विषय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.


या भरतीसाठी किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ४० वर्षांपेक्षा जास्त आवश्यक आहे.


राखीव श्रेणीतील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सूट दिली जाईल.



Thursday, January 29, 2026

जिल्हा न्यायाधीश भरती 2026









मुंबई येथील उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्यातील जिल्हा न्यायाधीशांच्या ८९ रिक्त पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. पदाची वेतनश्रेणी, पात्रता निकष, अनुभव, वय, इत्यादी माहिती सविस्तर जाहिरातीत नमूद केलेली आहे. ही सविस्तर जाहिरात व अर्ज, उच्च न्यायालयाच्या https://bombayhighcourt.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरून दिनांक ३० जानेवारी, २०२६ रोजी सकाळी १०.३० नंतर प्राप्त होऊ शकेल. ऑनलाईन अर्ज सदर संकेतस्थळामार्फत दिनांक १७ फेब्रुवारी, २०२६ च्या सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर सदर संकेतस्थळ दुवा (वेबलिंक) बंद करण्यात येईल.

रिक्त पदांत बदल संभवतो. जो केवळ अधिकृत संकेतस्थळावर सुचित केला जाईल, तशा परिस्थितीत पुन्हा नव्याने अर्ज मागवले जाणार नाहीत.


 

Saturday, January 17, 2026

रेल्वे मध्ये 311 पदांची भरती.2026

 देशभरातील एकूण ३११ रिक्त पदे भरली जाणार आहेत.

रेल्वेत स्थिर व प्रतिष्ठेची नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही अत्यंत महत्वाची संधी आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही 30 डिसेंबर 2025 पासून सुरू झाली असून शेवटची तारीख 29 जानेवारी 2026 आहे. 

तरी इच्छुक उमेदवारांना https://www.rrbapply.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात.

पदांची माहिती

वरिष्ठ प्रसिद्ध निरीक्षक: 15

प्रयोगशाळा सहाय्यक श्रेणी- III (रसायनशास्त्रज्ञ व धातूशास्त्रज्ञ): 39

मुख्य विधी सहाय्यक : 22

कनिष्ठ अनुवादक (हिंदी): 202

कर्मचारी व कल्याण निरीक्षण: 24

सरकारी वकील: 07

वैज्ञानिक सहाय्यक / प्रशिक्षण: 02

एकूण पदे: 311

शैक्षणिक पात्रता

प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता निर्धारित करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात (Notification) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

किमान वय: १८ वर्षे

कमाल वय: ३५ वर्षे

(आरक्षित प्रवर्गासाठी शासन नियमानुसार सलवत लागू)

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी (CBT) द्वारे केली जाईल.

तसेच अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी

https://www.rrbapply.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.


Friday, January 16, 2026

बँक ऑफ महाराष्ट्रने पदवीधरांसाठी ६०० शिकाऊ उमेदवारांची (Apprentices) भरती जाहीर ..


बँक ऑफ महाराष्ट्रने पदवीधरांसाठी ६०० शिकाऊ उमेदवारांची (Apprentices) भरती जाहीर केली आहे. या भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांची निवड कोणत्याही लेखी परीक्षेविना, केवळ गुणवत्तेच्या आधारावर केली जाणार आहे. 

बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) ने तब्बल ६०० शिकाऊ उमेदवारांची (Apprentices) भरती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. 


उमेदवारांची निवड ही कोणत्याही कठीण परीक्षेविना, केवळ 'गुणवत्तेच्या' (Merit) आधारावर केली जाणार आहे. पदवीच्या गुणांवर आधारित तुमची निवड होऊ शकते, त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांनी यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


एकूण पदे: ६०० (अप्रेंटिस)


वयोमर्यादा: २० ते २८ वर्षे.


शिक्षण: कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) पूर्ण.


महत्त्वाची अट: उमेदवाराला स्थानिक भाषेचे (मराठी) ज्ञान असणे आवश्यक आहे. (१० वी किंवा १२ वी स्थानिक भाषेतून उत्तीर्ण असणे अनिवार्य). 


१. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला bankofmaharashtra.in भेट द्या.


२. 'Careers' सेक्शनमध्ये जाऊन 'Apprenticeship' लिंकवर क्लिक करा.


३. नवीन नोंदणी (New Registration) करून लॉग-इन करा.


४. अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरा.


५. आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करून फॉर्म सबमिट करा.


६. भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

 25 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज करता येणार...








Thursday, January 1, 2026

RRB मध्ये भरती 2026

 RRB मध्ये भरती ! अर्ज प्रक्रियेला सुरुवात; 'या' तारखेपर्यंत करता येईल अर्ज


रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमध्ये भरतीला सुरुवात


ही भरती जाहिरात २० डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित


RRBच्या अधिकृत वेबसाइट rrbapply.gov.in ला भेट द्या


रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमध्ये भरतीला सुरुवात झाली आहे.


अर्ज करण्याच्या प्रक्रियेला वेग मिळाला असून उमेदवारांना २९ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी rrbapply.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) यांनी मिनिस्टीरियल आणि आयसोलेटेड कॅटेगरी भरती २०२६साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार २९ जानेवारी २०२६ पर्यंत RRBच्या अधिकृत संकेतस्थळावर

 rrbapply.gov.in

 येथे अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे विविध मंत्रीस्तरीय आणि स्वतंत्र (Isolated) श्रेणीतील पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ही भरती जाहिरात २० डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित करण्यात आली होती. त्यानुसार ३० डिसेंबर २०२५ रोजी रात्री १२ वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या फॉर्म भरावे..

धन्यवाद

Wednesday, December 10, 2025

मुंबई उच्च न्यायालय एकूण पदे : 2331

 

मुंबई उच्च न्यायालयाने लिपिक, शिपाई, स्टेनोग्राफर, चालक यासह विविध पदांसाठी 2331 जागांची मेगा भरती जाहीर केली. ही भरती मुंबई, नागपूर, औरंगाबाद खंडपीठांसाठी असून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 15 डिसेंबर 2025 पासून सुरू होणारय.

एकूण पदे : 2331

खंडपीठे : मुंबई, नागपूर, औरंगाबाद

अर्ज पद्धत : Online

अधिकृत वेबसाइट : bombayhighcourt.nic.in

अर्ज सुरू : 15 डिसेंबर 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 जानेवारी 2026

अर्ज शुल्क : सर्व वर्गांसाठी ₹1000

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा + मुलाखत 

लघुलेखक (हायर)


जागा : 19


आवश्यक पात्रता:


पदवीधर


शॉर्टहँड 100 WPM


इंग्रजी टायपिंग 40 WPM 


लघुलेखक (लोअर)


जागा : 56


पात्रता:


पदवीधर


शॉर्टहँड 80 WPM


इंग्रजी टायपिंग 40 WPM



3) लिपिक (Clerk)

जागा : 1332

पात्रता:

पदवीधर

GCC-TBC / ITI (इंग्रजी टायपिंग 40 WPM)

MS-CIT किंवा समतुल्य संगणक प्रमाणपत्र

4) वाहनचालक (Driver)

जागा : 37

पात्रता:

किमान 10वी उत्तीर्ण

LMV वाहन परवाना

3 वर्षांचा ड्रायव्हिंग अनुभव 

शिपाई / हमाल / फरश


जागा : 887


पात्रता:


किमान 7वी उत्तीर्ण


वयोमर्यादा


सामान्य उमेदवार : 18 ते 38 वर्षे


मागासवर्गीय उमेदवार : 5 वर्षे शिथिलता


Tuesday, December 2, 2025

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने भरती...

 सेंट्रल बँक ऑफ इंडियाने भरती जाहीर केली आहे. फॅकल्टी पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी www.centralbankofindia.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहेत. नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याजवळ आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही. तुमची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०२५ आहे. अर्ज करण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट वाहू नका. त्याआधीच अर्ज करावेत.

सेंट्रल बँकेतील या नोकरीसाठी २२ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतत. या नोकरीसाठी अर्ज करताना कोणतेही शुल्क भरायचे नाहीत.


Saturday, November 29, 2025

इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती 2025

 इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती 2025


इंडिया पोस्ट India Post पेमेंट बैंक Payments Bank


सरकारी बँक मध्ये नोकरी.


एकूण पदे : 0309 जागा.


PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक येथे


इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) भरती 2025: बँकिंग क्षेत्रात करिअरची मोठी संधी |




मित्रांनो, जर तुम्ही सरकारी बँकेत काम करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक जबरदस्त बातमी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) मध्ये भरती...




इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती 2025.


एकूण पदे : 0309 जागा.


सरकारी बँक मध्ये नोकरी.





www.ippbonline.com

Wednesday, November 26, 2025

महिला व बालविकास विभागात तब्बल २५८ पदांसाठी जाहिरात ..

 Mpsc मार्फत.महिला व बालविकास विभागात तब्बल २५८ पदांसाठी जाहिरात देण्यात आलेली आहे.

महिला व बालविकास आयुक्तालयांतर्गत अधीक्षक / निरीक्षक प्रमाणित शाळा व तत्सम संवर्गाकरीता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ची जाहिरात एमपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. एकूण पदे २५८ असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ डिसेंबर आहे.

महिला व बाल विकास आयुक्तालयांतर्गत अधिक्षक / निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था /रचना व कार्यपध्दती अधिकारी / अधिव्याख्याता / जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी /सांख्यिकी अधिकारी गट-ब (राजपत्रित) आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयांतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण), गट-ब या पदांवर निवडीद्वारे नियुक्तीकरीता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५ करिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

फक्त महिला व बाल विकास विभागातील आणि ग्राम विकास विभागातील कर्मचा-यांना खालील संवर्गातील पदावर निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महिला व बाल विकास आयुक्तालयांतर्गत अधिक्षक / निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था / रचना व कार्यपध्दती अधिकारी / अधिव्याख्याता / जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी / सांख्यिकी अधिकारी गट-ब (राजपत्रित) आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयांतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण), गट-ब या पदांवर निवडीद्वारे नियुक्तीकरीता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ आयोजित करण्यात येईल. प्रस्तुत परीक्षेचा दिनांक, परीक्षा केंद्र, परीक्षेचे स्वरुप (Online/Offline) स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.

२. संवर्गाचे नाव :- महिला व बाल विकास आयुक्तालयांतर्गत अधिक्षक / निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था / रचना व कार्यपध्दती अधिकारी / अधिव्याख्याता / जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी / सांख्यिकी अधिकारी गट-ब (राजपत्रित) आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयांतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण), गट-ब

३. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया/कालावधी – विषयांकित संवर्गाच्या जाहिरातीस अनुसरून ऑनलाईल पद्धतीने अर्ज सादर करण्याचा कालावधी खालीलप्रमाणे राहील :-

दिनांक २४ नोव्हेंबर, २०२५ पासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल. तर १४ डिसेंबर, २०२५ पर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी १४ डिसेंबर, २०२५ पर्यंत मुदत आहे.

Monday, November 17, 2025

9000 पेक्षा जास्त पदे

 २०२५ साठी एकूण 9000 पेक्षा जास्त पद भरणार आहेत. यामध्ये PGT, TGT, PRT तसेच प्राचार्य, उपप्राचार्य आणि विविध नॉन-टीचिंग पदांचा समावेश आहे. अर्ज प्रक्रिया १४ नोव्हेंबर पासून सुरु झाली असून 4 डिसेंबर 2025 ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी navodaya.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाणून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अधिक माहितीसाठी तुम्ही KVS pfd डाउनलोड करू शकतात.

या भरतीमध्ये कोणती पदे आहेत?

१. पीजीटी - १४६५ पदे

केंद्रीय विद्यालयात पदव्युत्तर शिक्षकांच्या १४६५ पदे उपलब्ध आहेत. विषयानुसार, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, वाणिज्य, संगणक विज्ञान इत्यादी विषयांमध्ये भरती केली जाईल.

२. TGT (टीजीटी) - २७९४ पदे

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदांसाठी, हिंदी, इंग्रजी, सामाजिक विज्ञान, संस्कृत, गणित, विज्ञान आणि विशेष शिक्षक यासारख्या विषयांमध्ये २७९४ पदे जाहीर करण्यात आली आहेत.

३. PRT (पीआरटी) - ३३६५ पदे

प्राथमिक शिक्षक (पीआरटी) भरतीमध्ये, सामान्य पीआरटी, विशेष शिक्षण पीआरटी आणि पीआरटी संगीत या पदांमध्ये ३३६५ रिक्त जागा भरायच्या आहेत.

४. प्राचार्य आणि उपप्राचार्य - १९२ पदे

प्राचार्य - १३४ पदे

उपप्राचार्य - ५८ पदे

सहाय्यक आयुक्त - ८ पदे

५. शिक्षकेतर - १३०२ पदे

विभागाच्या रचनेत ग्रंथपाल, वित्त अधिकारी, प्रशासन अधिकारी, कनिष्ठ/वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, स्टेनो, अनुवादक, सहाय्यक विभाग अधिकारी इत्यादींचा समावेश आहे.

अर्ज कसा करायचा?

- अधिकृत KVS/CBSE वेबसाइट उघडा.

- मुख्य पानावर दिसणाऱ्या "Recruitment 2025" किंवा "Apply Online" लिंकवर .

- आपले नवीन रजिस्ट्रेशन करा (मोबाईल नंबर व ईमेल आयडी आवश्यक).

- योग्य पद निवडा - PGT/TGT/PRT/Non-Teaching.

- अर्ज फॉर्म पूर्णपणे भरा

- वैयक्तिक माहिती

- शैक्षणिक पात्रता

- अनुभव (लागू असल्यास)

- आवश्यक कागदपत्रांचे स्कॅन अपलोड करा.

- फी ऑनलाइन पद्धतीने भरा (डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग).

- अर्ज सबमिट करा व त्याची प्रिंट कॉपी जतन करा.

Wednesday, October 29, 2025

पोलीस शिपाई भरती पुणे 2024 ..25


 महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) शिपाई नियम २०११ व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक १७/१०/२०२५ च्या आदेशांन्वये केलेल्या सुधारणांनुसार पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या आस्थापनेवर सन २०२४-२०२५ मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी १७०० व बॅण्ड्समन करीता ३३ अशी एकूण १७३३ पदे भरण्यासाठी पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे.



चालक पोलीस शिपाई भरती 2025

 महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम २०१९ व त्यानंतर शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा आणि दिनांक २७/१०/२०२५ च्या आदेशांन्वये केलेल्या सुधारणांनुसार पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या आस्थापनेवर सन २०२४-२०२५ मध्ये चालक पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी १०५ पदे भरण्यासाठी पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे.






Saturday, September 27, 2025

एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) भरती 7267 पदे

 B.Ed. असणार्‍या विद्यार्थ्यां साठी खूप imp आहे. एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS)


मध्ये ७२६७ पदांसाठी मेगा भरती जाहीर


झाली आहे!


अर्जाची शेवटची तारीख: २३ ऑक्टोबर


२०२५


अधिकृत वेबसाईट: tribal.nic.in

Monday, August 18, 2025

शरद पवार इन्सपायर फेलोशिप : शिक्षण 2026

 




*शरद पवार इन्सपायर फेलोशिप : शिक्षण*


   शिक्षण उद्यासाठी असते. उद्याचे सुजाण, सतर्क, सर्जनशील, कर्तबगार व सुसंस्कृत नागरिक घडविणे हे शिक्षणातून अपेक्षित असते. शिकावे कसे, शिकण्याचा आनंद कसा घ्यावा-द्यावा आणि आजन्म शिकत कसे राहावे हे शिकविते ते खरे शिक्षण. शिकता-शिकता जे उद्याची आव्हाने पेलायला सज्ज करते, उद्याच्या संधींचे सोने करायला शिकवते ते खरे शिक्षण.

     शिक्षण क्षेत्रात नवे काही करु पाहणाऱ्या, ध्येयाने झपाटलेल्या व त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या होतकरु गुणवंत शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्याना हक्काचं व्यासपीठ मिळावं, त्यांच्याकडून गुणवत्तापूर्ण काम व्हावे तसेच मुलभूत संशोधनास वाव मिळावा हा या फेलोशीपचा हेतू आहे.यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने २० प्राथमिक शिक्षक आणि १० माध्यमिक शिक्षकांना ही फेलोशिप दिली जाणार आहे. 

       सध्या देशभर आणि राज्यभर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०च्या अंमलबजावणीचे काम सुरू आहे.त्या संदर्भाने या धोरणात सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची प्रभावी अंमलबजावणी, त्यामधील साधने व तंत्राचा परिणामकारक रीतीने उपयोग ह्या बाबी अंतर्भूत आहेत. ही मूल्यांकन प्रक्रिया सातत्यपूर्ण आणि आकारिक क्षमता आधारित आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर, शिक्षण विकास मंच यांच्यावतीने यावर्षी शरद पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी शिक्षकांकडून *राष्ट्रीय शिक्षण धोरण -२०२० शालेय शिक्षणातील मूल्यांकन* प्रक्रियेला केंद्रस्थानी मानून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. यासाठी- https://www.sharadpawarfellowship.com/fellowships/education-fellowship/education-fellowship-primary-secondary-education या वेबसाईटवर *भूमिका, फेलोशिपचे तपशील, फेलोशिपची नियमावली* यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. 

       २०२६- २७च्या फेलोशिपसाठीची अर्ज प्रक्रिया १५ ऑगस्ट २०२५ पासून सुरु झाली आहे. तरी इच्छुक शिक्षकांनी दिनांक १२ऑक्टोबर २०२५ अखेर *https://www.sharadpawarfellowship.com/ या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करताना वेबसाईटवर फेलोशिपबाबत सविस्तर माहितीचे टीपण* दिले आहे.ते टीपण काळजीपूर्वक वाचावे, फार्म भरण्यासाठी,विषय निवडीसाठी त्याचा उपयोग होईल. 


टीप : प्रस्ताव लेखन कसे करावे? याकरिता हा खालील व्हिडिओ पहा- 


*https://youtu.be/agPkuW4MnVI?si=RWZFv8OU3_FRbDKl*

भारतीय जीवन विमा महामंडळाने 841 जागांची पदभरती..

 

भारतीय जीवन विमा महामंडळाने 841 सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO) आणि सहाय्यक अभियंता पदांसाठी 2025 ची भरती जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया 16 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली असून, 8 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करता येतील.

LIC AAO Recruitment 2025: भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ने सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO) आणि सहाय्यक अभियंता पदांसाठी 2025 ची बहुप्रतीक्षित भरती अधिसूचना जाहीर केली आहे. एकूण 841 पदांवर भरती होणार असून, अर्ज प्रक्रिया 16 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 8 सप्टेंबर 2025 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार LIC च्या अधिकृत वेबसाइट licindia.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
सहाय्यक अभियंता (Assistant Engineers) 81

सहाय्यक प्रशासकीय अधिकारी – विशेषज्ञ (AAO Specialist) 410

सहाय्यक प्रशासकीय अधिकारी – जनरलिस्ट (AAO Generalist) 350

एकूण 841
अर्ज सुरू होण्याची तारीख: 16 ऑगस्ट 2025

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 8 सप्टेंबर 2025

पूर्व परीक्षा: अद्याप जाहीर नाही (LIC च्या वेबसाइटवर वेळोवेळी अपडेट दिला जाईल)
अर्ज शुल्क (Application Fees)
SC/ST/PwBD उमेदवारांसाठी: ₹85 + ट्रान्सॅक्शन चार्जेस + GST

इतर सर्व उमेदवारांसाठी: ₹700 + ट्रान्सॅक्शन चार्जेस + GST
निवड प्रक्रिया (Selection Process)
LIC AAO व AE भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील तीन टप्प्यांद्वारे होईल.

पूर्व परीक्षा (Preliminary Exam) – फक्त स्क्रीनिंगसाठी, याचे गुण अंतिम निवडीत धरले जाणार नाहीत.

मुख्य परीक्षा (Main Exam) – अंतिम गुणवत्तेच्या यादीत विचारात घेतले जातील.

मुलाखत (Interview) – मुख्य परीक्षेतील गुण आणि मुलाखतीतील गुण एकत्र करून अंतिम निवड केली जाईल.







Saturday, August 16, 2025

DSSSB दिल्ली उच्च न्यायालयात विविध 334 पदे भरती 2025

 

दिल्लीमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळाने (DSSSB) दिल्ली उच्च न्यायालयात विविध पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. 

भरतीअंतर्गत एकूण 334 पदे भरली जातील, ज्यामध्ये कोर्ट अटेंडंट, रूम अटेंडंट आणि सिक्युरिटी अटेंडंट सारख्या महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. अर्ज प्रक्रिया 26 ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल आणि 24 सप्टेंबर 2025 पर्यंत चालेल.

या भरतीअंतर्गत एकूण 334 पदे भरली जातील, ज्यामध्ये कोर्ट अटेंडंटची 295 पदे, कोर्ट अटेंडंट (एस) ची 22 पदे, कोर्ट अटेंडंट (एल) ची 1 पदे, रूम अटेंडंट (एच) ची13 पदे आणि सुरक्षा अटेंडंटची 3 पदे समाविष्ट आहेत.

पात्रता आणि वयोमर्यादा
दिल्ली उच्च न्यायालयात या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी किमान शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण आहे. उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे, तर राखीव श्रेणींसाठी नियमांनुसार वयातसूट दिली जाईल.

अर्ज शुल्क
या भरतीसाठी अर्ज करताना, जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल, तर एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ते मोफत आहे. अर्ज शुल्क फक्त ऑनलाइन पद्धतीने भरता येते, ज्यामध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा समावेश आहे.

परीक्षा नमुना आणि मुलाखत

टियर-1 : पूर्वपरीक्षा म्हणजेच टियर-1 परीक्षा ही वस्तुनिष्ठ प्रकारची (MCQ) असेल. यात एकूण 100 प्रश्न असतील आणि एकूण गुण देखील 100 असतील, परीक्षेचा कालावधी 150 मिनिटे आहे. अभ्यासक्रमात हिंदी (25गुण), इंग्रजी (25 गुण), सामान्य ज्ञान (25 गुण - द्विभाषिक) आणि अंकगणित (25 गुण - द्विभाषिक) यांचा समावेश आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25गुणांची नकारात्मक गुणांकन आहे.


उत्तीर्ण गुण श्रेणीनुसार निश्चित केले जातील: अनारक्षित - 50 गुण, अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी/ईडब्ल्यूएस/पीडब्ल्यूडी/माजी सैनिक - 45 गुण. टियर-1मध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल, जर निवडलेल्या उमेदवारांची संख्या उपलब्ध रिक्त पदांच्या पाचपट पेक्षा जास्त नसेल.


टियर-2 : टियर-2 म्हणजेच मुलाखतीत एकूण 15 गुण असतील. या टप्प्यासाठी किमान पात्रता गुण निश्चित केलेले नाहीत. मुलाखतीचा उद्देश उमेदवाराची वैयक्तिक क्षमता, वर्तन आणि संवाद कौशल्यांचे मूल्यांकन करणे आहे. फक्त टियर-1 मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच या टप्प्यासाठी बोलावले जाईल आणि अंतिम निवडीसाठी त्याचे गुण जोडले जातील.


अर्ज कसे कराल

सर्वप्रथम DSSSB च्या अधिकृत वेबसाइटवर जा.


होमपेजवर दिलेल्या "ऑनलाइन अर्ज करा" लिंकवर क्लिक करा.

जर तुम्ही नवीन उमेदवार असाल तर आधार कार्ड आणि ईमेल/मोबाइल नंबर सारखी माहिती देऊन नोंदणी करा.

नोंदणीनंतर लॉगिन करा आणि अर्ज भरा.

सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशील योग्यरित्या भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा.

फॉर्म भरल्यानंतर आणि फी भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढा.


सैनिक स्कूल सातारा प्रवेश प्रक्रिया २०२७-२८ सुरू!

  सैनिक स्कूल सातारा प्रवेश प्रक्रिया २०२७-२८ सुरू! ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू; २ डिसेंबरपर्यंत अर्जाची मुदत सातारा : सैनिक स्कूल...