नौदलात काम करण्याची सुवर्णसंधी! भारताच्या नौदलाने नेवी सिविलियन एंट्रेंस टेस्ट (INCET-01/2024) चे नाटीफिकेशन जारी केले आहे. या परीक्षेकरिता उमेदवार 2 ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकतात.
नौदलाची ही परीक्षेद्वारे नौदलातील चार्जमॅन (एम्युनिशन वर्कशॉप), चार्जमॅन (फैक्ट्री), चार्जमॅन (मॅकेनिक),साइंटिफिक अस्टेंट, ड्रॉफ्ट्समॅन (कंस्ट्रक्शन) फायरमॅन, फायर इंजन ड्रायवर, ट्रेड्समॅन मेट, पेस्ट कंट्रोल वर्कर कुक इत्यादी पदांवर पर भरती केली जाणार आहे. जाणून घेऊया या भरतीबाबत.
चार्जमन (एम्युनिशन वर्कशॉप)-01
चार्जमन (फैक्ट्री)-10
चार्जमन (मैकेनिक)-18
साइंटिफिक अस्टेंट-04
ड्रॉफ्ट्समन (कंस्ट्रक्शन)-02
फायरमन-444
फायर इंजन ड्रायवर- 58
ट्रेड्समन मेट-161
पेस्ट कंट्रोल वर्कर-18
कुक-09
एमटीएस- 16
उमेदवारांना (राखीव प्रवर्ग, इडब्लूएस आणि महिला वगळून) 295 रुपये शुल्क भरावे लागेल. पेमेंट नेट बँकिंगद्वारे किंवा विसा /मास्टर/रुपे क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा युपीआय (UPI) वापरून ऑनलाइन केले जाऊ शकते.
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी (फक्त फायरमन आणि फायर इंजिन ड्रायव्हरसाठी), दस्ताऐवज पडताळणी आणि वैद्यकीय फिटनेस चाचणी यांचा समावेश असेल. निवड प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात प्रगती करण्यासाठी उमेदवारांना प्रत्येक टप्प्यात पात्रता प्राप्त करणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment