मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

Showing posts with label विज्ञान विषयावर टेस्ट. Show all posts
Showing posts with label विज्ञान विषयावर टेस्ट. Show all posts

बटुकेश्वर दत्त..

 


        *विस्मृतीत गेलेला क्रांतिकारक*

                 *बटुकेश्वर दत्त*

            

*जन्म: १८ नोव्हेंबर, १९१०*

      ( ओरी, पूर्व बर्दमान जिल्हा,     

             बंगाल, ब्रिटिश भारत )

*मृत्यू: २० जुलै, १९६५*

         ( नवी दिल्ली, भारत )

चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा

संघटना: हिंदुस्थान सोशालिस्ट  

          रिपब्लिकन असोसिएशन, 

          नौजवान भारत सभा

धर्म: हिंदू

वडील: गोठा बिहारी दत्त

पत्नी : अंजली दत्त

नागरिकता : भारतीय

विशेष माहीती : ८ एप्रिल १९२९ ला भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी प्रेक्षक दिर्घिकेमधून केंद्रिय असेंब्लीमध्ये मोकळ्या जागी बाँम्ब फेकला.

                      १५ ऑगस्ट १९४७ ला भारताने अगणित बलिदानं, अगणित वार झेलत स्वातंत्र्य मिळवलं. या स्वातंत्र्याच्या संग्रामात न जाणो कित्येक तरुणांच्या, कित्येक क्रांतिकारकांच्या, कित्येक देशभक्तांच्या प्राण्यांच्या आहुत्या दिल्या गेल्या आणि जे वाचलेले त्यांचं संपूर्ण आयुष्यही दिलं गेलं होतं.

                     पण १९४७ नंतर या सगळ्या स्वातंत्र्यसमरात सहभागी झालेले आणि हयात असलेले क्रांतिकारी जे जहाल गटातले होते त्यांचं पुढे काय झालं हे फारसे लोकांना माहिती नाही.

          स्वतंत्र भारतासाठी आपलं आयुष्य वेचलेल्या अशा कितीतरी क्रांतिकारकांनी अक्षरशः वैमनस्य आणि अत्यंत हलाखीच्या गरिबीत दिवस काढले. बरेच जण या गरीबीतच वारले. 

                   अशाच एका सरकारी उदासीन वागणुकीचा बळी पडलेल्या शहीद-ए- आझम असणाऱ्या भगतसिंगांचा सगळ्यात जवळचा मित्र बटुकेश्वर दत्त.

             ८ एप्रिल १९२९ ही घटना सगळ्यांच्या लक्षात आहे. आजही ब-याचशा पाठ्यपुस्तकातून शिकवली जाते की भगतसिंग आणि त्यांचे सहकारी बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतल्या असेंब्लीमध्ये खाली जागेत दोन बॉम्ब टाकले. ‘इन्कलाब जिंदाबाद’चे नारे दिले.

            सगळ्या गदारोळात तिथून पळून जाणं शक्य असतानाही दोघांनी आत्मसमर्पण केलं. कारण होतं निदान खटल्याच्या निमित्ताने का होईना संपूर्ण देशासमोर आपले विचार ठेवता येतील. पुढे काळानुसार (साण्डर्स वधाचा खटला) राजगुरू, सुखदेव यांना फाशी झाली मात्र दत्त यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली.

                  १९२९- १९४२ इतकी वर्षे त्यांनी अंदमानात अत्यंत हलाखीच्या दिवसात काढली. १९४२ ला अंदमानातून सुटल्यानंतर सुद्धा शांत न बसता ‘छोडो भारत’ अभियानात सुद्धा ते सहभागी झाले आणि त्यांना पुन्हा अटक झाली. या अटकेतुन ते सुटले, मात्र भारत स्वतंत्र झाल्यानंतर.

             बटुकेश्वर दत्त यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९०६ ला ओवारी नावाच्या गावात जे आत्ता पश्चिम बंगालमध्ये आहे तिथे झाला. बटुकेश्वर दत्त यांना जवळचे मित्र बिके, बट्टू अशा नावांनी हाक मारायचे. तिथल्याच पीपीएम हायस्कूलमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं.

       महाविद्यालयीन काळातच ते आझाद आणि भगतसिंगांसारख्या तरुणांच्या संपर्कात आले. ‘हिंदुस्तान सोशल रिपब्लिक असोसिएशन’ या जहाल क्रांतिकारी संघटनेच्या संपर्कात येऊन आपापल्या पद्धतीने का होईना पण भारताला स्वातंत्र्य मिळवायचे यासाठी ते काम करू लागले. 

          १९२९ या बॉम्ब हल्ल्याच्या प्रकरणानंतर काही काळासाठी त्यांना लाहोर जेलमध्ये भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह ठेवण्यात आले. तेथे त्यांनी आणि भगतसिंगांनी एक गोष्ट सरकारच्या निदर्शनास आणून दिली की आम्ही राजकीय कैदी असताना सुद्धा आम्हाला गुन्हेगारासारखं वागवले जात आहे.

             ते बंद व्हावं म्हणून त्यांनी जवळजवळ ४० दिवसांचं उपोषण केलं. त्यांच्या बऱ्याचशा मागण्या मान्य झाल्या पण पुढे भगतसिंग यांना फाशीची शिक्षा दिली गेली आणि बटुकेश्‍वर दत्त यांची रवानगी अंदमानात झाली.

               एक वेळ मृत्यू परवडला पण अंदमान नको अशी परिस्थिती असणाऱ्या या अंदमानात १९४२ पर्यंतची वर्ष अत्यंत हलाखीत, अत्यंत हाल अपेष्टा सहन करत त्यांनी काढली. वीर सावरकरांच्या चरित्रात सुद्धा काही वेळा या दत्तांचा उल्लेख येतो.

                १९४२ ला अंदमानातून सुटल्यानंतर ताबडतोब महात्मा गांधींनी सुरू केलेल्या ‘भारत छोडो’ आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. दिल्लीत निदर्शने करत असताना त्यांना पुन्हा अटक झाली ती चार वर्षांसाठी.

      १९४७ ला भारत वसाहतवादी सत्तेच्या तडाख्यातून मुक्त झाला आणि दत्त सारख्या अनेकांची सुटका झाली. ज्याच्यासाठी आतापर्यंत आपण आपले आयुष्य वेचले निदान त्या स्वतंत्र भारतात तरी क्रांतिकारकांना, देशभक्तांना योग्य स्थान, योग्य मान मिळेल ही अपेक्षा मात्र फोल ठरली.

              याचाच अर्थ या तरुणांनी क्रांतिकारकांनी आपले शरीर आणि आपले आयुष्य या स्वांतत्र्य कार्यात वाहून घेतलं, आपलं समर्पण दिले आहे, आपलं बलिदान दिले त्या सगळ्यांचे बलिदान व्यर्थ होते.

              अर्थात या सगळ्या शिक्षा भोगून राहिलेले क्रांतिकारक स्वतंत्र भारतात सुद्धा काही मान किंवा जगण्याला पुरेल अशी व्यवस्था सुद्धा मिळवू शकले नाहीत.

                इंग्रजांनी “मोस्ट डेंजरस मॅन” ठरवलेला हा मराठी क्रांतिकारक आपण साफ विसरलो आहोत.

🌞 *क्रांतिकारकांची अतुल्य देशभक्ती: स्वातंत्र्य सूर्य बघण्यासाठी मृत्यूलाही रोखून ठेवले!*

                  बटुकेश्वर दत्त सारख्या क्रांतिकारकांना सरकारच्या कार्यालयांमध्ये जगण्याला पुरतील एवढे पैसे मिळवणारी नोकरी मिळावी म्हणून कित्येक वर्षे हेलपाटे घालावे लागले. अर्थात तत्कालीन सरकारच्या धोरणानुसार ती काही त्यांना मिळाली नाही हे उघड आहे.

       अशातच त्यांनी लग्न केलं आणि अनेक व्यवसाय करून बघण्याचे अपयशी प्रयत्न केले. सतत चरितार्थादाखल होणारी उपासमार आणि हाल अपेष्टा यातून त्यांना बरेच आजार झाले. या आजारातूनच त्यांनी एक १९६५ ला दिल्लीच्या ए आय आय एम एस हॉस्पिटल मध्ये प्राण सोडला.

            त्यांचे दहन त्याच ठिकाणी करण्यात आलं ज्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी त्यांचे सहकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे करण्यात आलं होतं.

                    १९२९ मधला बॉम्ब फेकण्याचा प्रसंग आणि भारताचं मिळालेले स्वातंत्र्य या सगळ्या गडबडीत कुठेतरी अनेक क्रांतिकारकांच्या, अनेक देशभक्तांच्या कथा लुप्त झाल्या, हरवल्या.

                   दत्ताचं आयुष्य असंच कुठेतरी गायब झालं. दुर्लक्ष केलं केलं. 

         बॉम्बफेकीच्या प्रकरणानंतर बटुकेश्वर दत्तांच्या वकील असलेल्या असफ अली यांनी सांगितलं होतं की मुळात बटूकेश्वर दत्तांनी बॉम्ब फेकला नव्हता. बॉम्ब फेकला तर फक्त भगतसिंग यांनी पण अटक होत असताना बटुकेश्वर दत्त खोटं म्हणाले की, होय मी बॉम्ब फेकला आहे आणि त्यांना अटक झाली.

         एक सच्चा मित्र जो मित्राच्या शब्दाखातर त्याच्या बरोबर एका आत्मघातकी कटात सहभागी झाला, खोटे बोलून त्याच्या बरोबर आयुष्यभर पुरतील एवढ्या यातना सहन केल्या, अखंड भारत स्वतंत्र व्हावा हे स्वप्न बघितलं, त्याला काय मिळालं तर दुर्लक्षित दुर्दैवी आणि दारिद्र्य भरलेलं आयुष्य.

          आज आपण अशा अनेक क्रांतिवीरांच्या आठवणी काढल्या काय व त्यांच्यासाठी त्यांच्या नावाने कार्यक्रम पुरस्कार दिले गेले काय पण त्यांनी जगलेला आयुष्य आणि त्यांना स्वतंत्र भारतात मिळालेली वागणूक बदलू शकत नाही. 

 *...ते अमर हुतात्मे झाले....!!*


          

रासायनिक मूलद्रव्य आणि त्याच्या संज्ञा आधारित टेस्ट

रासायनिक मूलद्रव्ये आणि संज्ञा टेस्ट

रासायनिक मूलद्रव्ये आणि त्याच्या संज्ञा आधारित टेस्ट

1. सोन्याचे रासायनिक चिन्ह काय आहे?
Ag
Au
Fe
Cu
2. हायड्रोजनचे रासायनिक चिन्ह काय?
O
H
N
He
3. ऑक्सिजनचे आण्विक क्रमांक किती आहे?
6
7
8
9
4. कार्बनचे रासायनिक चिन्ह काय आहे?
C
Ca
Cu
Co
5. लोहाचे रासायनिक चिन्ह काय आहे?
Fe
F
Pb
Al
6. पाऱ्याचे रासायनिक चिन्ह काय आहे?
Mg
Hg
Mn
Mo
7. तांब्याचे रासायनिक चिन्ह काय आहे?
Cu
Co
Cr
Ca
8. शिसे या धातूचे रासायनिक चिन्ह काय आहे?
Pb
Pt
Pd
Po
9. चांदीचे रासायनिक चिन्ह काय आहे?
Si
Ag
Au
Ar
10. नायट्रोजनचे रासायनिक चिन्ह काय आहे?
Na
N
Ni
Ne
11. हीलियमचा वापर कुठे होतो?
फुग्यांमध्ये
खत बनविण्यासाठी
सिमेंट तयार करण्यात
औषधांमध्ये
12. अॅल्युमिनियमचे रासायनिक चिन्ह काय?
Au
Ag
Al
Ar
13. पोटॅशियमचे चिन्ह काय?
P
Po
K
Pt
14. सोडियमचे रासायनिक चिन्ह काय?
So
S
Na
N
15. गंधकाचे रासायनिक चिन्ह काय?
G
S
Si
Sr
16. हिलियम कोणत्या वायू समूहात मोडते?
नोबल गॅसेस
हॅलोजन
ऑक्सिजन समूह
धातू समूह
17. क्लोरीनचे रासायनिक चिन्ह काय?
Cr
C
Cl
Co
18. कॅल्शियमचा उपयोग कुठे होतो?
हाडे व दात मजबूत करण्यासाठी
इंधन म्हणून
औषध तयार करण्यात
फुग्यांमध्ये
19. निऑन वायूचा वापर कशासाठी होतो?
दिवे तयार करण्यासाठी
खत तयार करण्यासाठी
इंधनासाठी
औषध तयार करण्यासाठी
20. मॅग्नेशियमचे रासायनिक चिन्ह काय आहे?
Mn
Mg
Mo
Ma

रासायनिक नाव व रेणूसुत्रे आधारित टेस्ट

महत्त्वाची संयुगे आधारित टेस्ट

महत्त्वाची संयुगे, रासायनिक नाव, रेणुसूत्र आणि सामान्य नाव आधारित टेस्ट

1. पाण्याचे रासायनिक नाव काय आहे?
हायड्रोजन पेरॉक्साईड
कार्बन डायऑक्साइड
डायहायड्रोजन मोनोऑक्साईड ✅
नायट्रिक अॅसिड
2. मीठाचे रेणुसूत्र काय आहे?
NaCl ✅
KCl
CaCO₃
H₂SO₄
3. बेकिंग सोडाचे रासायनिक नाव काय आहे?
सोडियम कार्बोनेट
सोडियम बायकार्बोनेट ✅
अमोनियम क्लोराइड
कॅल्शियम ऑक्साईड
4. चुना (Quick Lime) चे रासायनिक नाव काय?
कॅल्शियम ऑक्साईड ✅
मॅग्नेशियम सल्फेट
सोडियम सल्फेट
पोटॅशियम नायट्रेट
5. पोटॅशियम नायट्रेट सामान्यतः कोणत्या नावाने ओळखले जाते?
मीठ
चुना
साल्टपीटर ✅
ब्लू व्हिट्रिऑल
6. सोडियम क्लोराइड म्हणजे काय?
सामान्य मीठ ✅
सोडा
चुना
बेकिंग सोडा
7. कॅल्शियम कार्बोनेटचा उपयोग कुठे होतो?
सिमेंट तयार करण्यात ✅
खतामध्ये
रंग बनविण्यात
औषधांमध्ये
8. सल्फ्युरिक ऍसिडचे रासायनिक सूत्र काय?
HCl
H₂SO₄ ✅
HNO₃
CH₃COOH
9. हायड्रोक्लोरिक ऍसिडचे सामान्य नाव काय?
सॉल्ट अॅसिड ✅
अॅसिटिक अॅसिड
सल्फ्युरिक अॅसिड
नायट्रिक अॅसिड
10. नायट्रिक अॅसिडचे सूत्र काय?
H₂SO₄
HNO₃ ✅
HCl
CH₄
11. ब्लिचिंग पावडरचे रासायनिक नाव काय?
कॅल्शियम ऑक्सीक्लोराइड ✅
सोडियम हायपोक्लोराइट
पोटॅशियम क्लोराइड
अमोनियम सल्फेट
12. अॅसिटिक अॅसिड म्हणजे काय?
व्हिनेगर ✅
सोडा
मीठ
चुना
13. कार्बन डायऑक्साइडचे रेणुसूत्र काय?
CO₂ ✅
CO
H₂O
CH₄
14. ग्लुकोजचे सूत्र काय?
C₆H₁₂O₆ ✅
C₂H₅OH
CH₃COOH
CO₂
15. अमोनियाचे सूत्र काय?
NH₃ ✅
H₂O
CO₂
NO₂
16. कॅल्शियम सल्फेट हेमिहायड्रेट म्हणजे काय?
प्लास्टर ऑफ पॅरिस ✅
चुना
ब्लिचिंग पावडर
बेकिंग सोडा
17. नायट्रस ऑक्साईड कोणत्या नावाने ओळखले जाते?
लाफिंग गॅस ✅
कार्बन मोनोऑक्साईड
मिथेन
सल्फर डायऑक्साइड
18. सल्फर डायऑक्साइडचा उपयोग कुठे होतो?
खाद्य पदार्थ जतन करण्यासाठी ✅
खत बनविण्यात
औषध निर्मितीत
इंधन म्हणून
19. मिथेनचे सूत्र काय?
CH₄ ✅
C₂H₆
C₃H₈
CO₂
20. इथेनॉलचे सामान्य नाव काय आहे?
अल्कोहोल ✅
व्हिनेगर
सोडा
मीठ

शोध व संशोधक आधारित टेस्ट

शोध व संशोधक आधारित टेस्ट

🔬 शोध व संशोधक आधारित टेस्ट 🔭

1. दिव्याचा शोध कोणी लावला?




2. टेलिफोनचा शोध कोणी लावला?




3. संगणकाचे जनक कोण?




4. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला?




5. स्टीम इंजिनचा शोध कोणी लावला?




6. रेडिओचा शोध कोणी लावला?




7. क्ष-किरणांचा शोध कोणी लावला?




8. रेडियमचा शोध कोणी लावला?




9. वायूचे नियम कोणी सांगितले?




10. वीज निर्मितीचा शोध कोणी लावला?




11. विमानाचा शोध कोणी लावला?




12. थर्मामीटरचा शोध कोणी लावला?




13. प्रिंटिंग प्रेसचा शोध कोणी लावला?




14. इंटरनेटचा शोध कोणत्या संस्थेने लावला?




15. डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला?




16. बारूदाचा शोध कोणी लावला?




17. बल्बमध्ये टंगस्टन फिलामेंटचा वापर कोणी केला?




18. टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला?




19. लसीचा शोध कोणी लावला?




20. दूरदर्शकाचा शोध कोणी लावला?




जीवनसत्वाचे स्त्रोत आधारित टेस्ट

जीवनसत्वे आणि त्यांचे स्त्रोत - चाचणी

💊 जीवनसत्वे आणि त्यांचे स्त्रोत आधारित टेस्ट 💊

1. जीवनसत्व A कोणत्या अन्नातून मिळते?




2. जीवनसत्व B₁ कमी झाल्यास कोणता आजार होतो?




3. सूर्यप्रकाशातून कोणते जीवनसत्व मिळते?




4. जीवनसत्व C कोणत्या फळात मुबलक प्रमाणात असते?




5. रात्रांधत्व कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होते?




6. जीवनसत्व K चे मुख्य कार्य काय?




7. दूधामध्ये कोणते जीवनसत्व असते?




8. जीवनसत्व E चे प्रमुख कार्य कोणते?




9. जीवनसत्व B₁₂ कोणत्या अन्नातून मिळते?




10. जीवनसत्व C चा अभाव झाल्यास कोणता आजार होतो?




11. जीवनसत्व D चा अभाव झाल्यास कोणता आजार होतो?




12. जीवनसत्व B₂ चे स्त्रोत कोणते?




13. हाडे मजबूत करण्यास कोणते जीवनसत्व मदत करते?




14. अंडी हे कोणत्या जीवनसत्वाचे स्त्रोत आहे?




15. जीवनसत्व K कोणत्या अन्नातून मिळते?




16. जीवनसत्व E चा मुख्य स्त्रोत कोणता?




17. जीवनसत्व B समूह मुख्यतः कुठून मिळतो?




18. जीवनसत्व C पाण्यात विरघळणारे आहे का?


19. रेटिनॉल हे कोणते जीवनसत्व आहे?




20. अॅसकॉर्बिक ऍसिड हे कोणते जीवनसत्व आहे?




जीवनसत्व अभावाने होणारे आजार आधारित टेस्ट

जीवनसत्वे आणि आजार - चाचणी

जीवनसत्वे आणि आजार - बहुपर्यायी चाचणी

1. जीवनसत्व 'A' च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?
स्कर्वी
रातांधळेपणा
रक्ताल्पता
बेरीबेरी
2. जीवनसत्व 'B₁' ची कमतरता कोणत्या रोगास कारणीभूत ठरते?
बेरीबेरी
स्कर्वी
गोइटर
हाडांचा रोग
3. जीवनसत्व 'C' च्या अभावामुळे कोणता रोग होतो?
स्कर्वी
रिकेट्स
रक्ताल्पता
बेरीबेरी
4. जीवनसत्व 'D' च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?
रातांधळेपणा
रिकेट्स
स्कर्वी
गोइटर
5. जीवनसत्व 'E' शरीरात कोणत्या कार्यासाठी उपयुक्त आहे?
त्वचा आणि पेशींचे संरक्षण
हाडे मजबूत करणे
दृष्टी सुधारणा
रक्त निर्मिती
6. जीवनसत्व 'K' चे कार्य काय?
रक्त गोठविणे
दात मजबूत करणे
त्वचेचा रंग राखणे
दृष्टी सुधारणा
7. जीवनसत्व 'B₂' ची कमतरता असल्यास कोणता आजार होतो?
रिकेट्स
अँजुलर स्टोमॅटायटिस
गोइटर
रातांधळेपणा
8. जीवनसत्व 'B₁₂' च्या अभावामुळे कोणता आजार होतो?
पर्निशस अॅनिमिया
गोइटर
स्कर्वी
बेरीबेरी
9. जीवनसत्व 'C' चे स्त्रोत कोणते?
दूध आणि मांस
संत्री, लिंबू, आवळा
तांदूळ
अंडी
10. सूर्यप्रकाशातून मिळणारे जीवनसत्व कोणते?
जीवनसत्व A
जीवनसत्व D
जीवनसत्व C
जीवनसत्व K
11. जीवनसत्व 'A' कोणत्या अन्नातून मिळते?
गाजर आणि लोणी
मांस
भात
साखर
12. जीवनसत्व 'B₃' ची कमतरता कोणता आजार निर्माण करते?
पेलेग्रा
रिकेट्स
गोइटर
रक्ताल्पता
13. जीवनसत्व 'K' मुख्यत्वे कोणत्या अन्नातून मिळते?
हिरव्या पालेभाज्या
धान्ये
गाजर
फळे
14. रिकेट्स या रोगाचा मुख्य कारण कोणते?
जीवनसत्व D ची कमतरता
जीवनसत्व A ची कमतरता
जीवनसत्व C ची कमतरता
जीवनसत्व E ची कमतरता
15. रक्तस्त्राव होण्यास जीवनसत्व 'K' ची कमतरता कारणीभूत असते का?
होय
नाही
काही वेळा
माहित नाही
16. जीवनसत्व 'B₆' च्या अभावामुळे कोणते लक्षण दिसते?
त्वचेवर जखमा
हाडे कमकुवत होणे
दृष्टी कमी होणे
रक्त गोठणे
17. जीवनसत्व 'E' च्या कमतरतेमुळे कोणता परिणाम होतो?
प्रजननात अडचणी
गोइटर
स्कर्वी
रक्ताल्पता
18. जीवनसत्वांचे प्रमुख कार्य काय आहे?
शरीराचे वाढ आणि दुरुस्ती
शरीराला उर्जा देणे
रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे
सर्व पर्याय बरोबर आहेत
19. जीवनसत्व 'A' च्या कमतरतेमुळे दृष्टीवर काय परिणाम होतो?
अंधत्व
रातांधळेपणा
रंगांधळेपणा
काहीही नाही
20. जीवनसत्वे शरीरात कशाप्रकारे कार्य करतात?
उर्जानिर्मितीत सहाय्यक म्हणून
हार्मोन्स तयार करण्यात
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात
सर्व पर्याय बरोबर आहेत

मानवी जीवनात खनिजाचे महत्त्व आधारित टेस्ट

मानवी जीवनात खनिजाचे महत्त्व - चाचणी

मानवी जीवनात खनिजाचे महत्त्व - चाचणी

1. लोह या खनिजाचा प्रमुख उपयोग कोणत्या कार्यासाठी होतो?
अन्न तयार करण्यासाठी
रक्तातील हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी
उर्जा निर्मितीसाठी
शरीरातील पाणी संतुलनासाठी
2. मानवाच्या हाडांच्या मजबुतीसाठी कोणते खनिज आवश्यक आहे?
झिंक
मॅग्नेशियम
कॅल्शियम
सल्फर
3. पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी कोणते खनिज उपयुक्त आहे?
क्लोरीन
आयोडीन
फ्लोरिन
फॉस्फरस
4. थायरॉईड ग्रंथीच्या कार्यासाठी कोणते खनिज आवश्यक आहे?
आयोडीन
सोडियम
तांबे
लोह
5. विजेच्या तारांसाठी कोणते धातू वापरले जाते?
तांबे
लोखंड
अॅल्युमिनियम
सोने
6. रक्ताभिसरणासाठी आवश्यक असलेले खनिज कोणते?
लोह
मॅग्नेशियम
झिंक
सोडियम
7. काच व सिमेंट बनविण्यासाठी कोणते खनिज आवश्यक असते?
सिलिका
कॅल्शियम
तांबे
मँगनीज
8. मानव शरीरात उर्जानिर्मितीमध्ये मदत करणारे खनिज कोणते?
फॉस्फरस
सोडियम
क्लोरीन
झिंक
9. दात मजबूत ठेवण्यासाठी कोणते खनिज उपयोगी आहे?
फ्लोरिन
सल्फर
पोटॅशियम
मँगनीज
10. शरीरातील पाण्याचे संतुलन राखणारे खनिज कोणते?
पोटॅशियम
सोडियम
झिंक
मॅग्नेशियम
11. स्टील बनवण्यासाठी लोखंडासोबत कोणते खनिज वापरले जाते?
मँगनीज
झिंक
सल्फर
तांबे
12. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये कोणते धातू वापरले जाते?
सोने
तांबे
पारा
लोह
13. खतांमध्ये कोणते खनिज मोठ्या प्रमाणावर वापरले जाते?
फॉस्फरस
सोडियम
झिंक
क्लोरीन
14. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो?
रक्ताल्पता
हाडे कमकुवत होणे
गोइटर
हृदयविकार
15. झिंक या खनिजाचा उपयोग कुठे होतो?
बॅटरी बनवण्यासाठी
प्लास्टिक बनवण्यासाठी
काच बनवण्यासाठी
धान्य तयार करण्यासाठी
16. रक्तात लोहाची कमतरता असल्यास कोणता विकार होतो?
गोइटर
अॅनिमिया
मधुमेह
स्थूलता
17. औषधनिर्मितीत कोणते धातू वापरले जाते?
तांबे
सोने
चांदी
लोह
18. मातीच्या सुपीकतेसाठी कोणते खनिज आवश्यक आहे?
नायट्रोजन
फॉस्फरस
पोटॅशियम
सर्व पर्याय बरोबर आहेत
19. मनुष्य शरीरात किती प्रमुख खनिजे आवश्यक आहेत?
5
10
16
20 पेक्षा जास्त
20. खनिज संसाधनांचा जपून वापर का करावा?
ते नूतनीकरणीय नाहीत
ते स्वस्त आहेत
ते नष्ट होत नाहीत
ते अमर्याद आहेत

शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर आधारित टेस्ट

शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर आधारित टेस्ट

शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर आधारित टेस्ट

1. थर्मामीटरचा वापर कशासाठी केला जातो?




2. बारोमीटरचा उपयोग कशासाठी होतो?




3. अ‍ॅमीटरचा वापर कशासाठी केला जातो?




4. मायक्रोस्कोपचा उपयोग कशासाठी होतो?




5. टेलिस्कोपचा वापर कशासाठी होतो?




6. स्पेक्ट्रोस्कोपचा उपयोग कशासाठी होतो?




7. व्हर्नियर कॅलिपर्सचा उपयोग कशासाठी होतो?




8. बारोमीटरमध्ये कोणता द्रव वापरला जातो?




9. स्फिग्मोमॅनोमीटरचा वापर कशासाठी केला जातो?




10. व्हॉल्टमीटरचा उपयोग कशासाठी होतो?




11. हायड्रोमीटरचा उपयोग कशासाठी होतो?




12. स्टॉपवॉचचा उपयोग कशासाठी होतो?




13. गॅल्व्हनोमीटरचा उपयोग कशासाठी होतो?




14. सेस्मोग्राफचा उपयोग कशासाठी होतो?




15. कम्पासचा उपयोग कशासाठी होतो?




16. पेरिस्कोपचा उपयोग कशासाठी होतो?




17. डायनॅमोचा उपयोग कशासाठी होतो?




18. मायक्रोमीटर स्क्रू गेजचा उपयोग कशासाठी होतो?




19. फोटोमीटरचा उपयोग कशासाठी होतो?




20. ऑडिओमीटरचा उपयोग कशासाठी होतो?




शास्त्र आणि त्यांचा अभ्यास आधारित टेस्ट

शास्त्र आणि त्यांचा अभ्यास आधारित टेस्ट

शास्त्र आणि त्यांचा अभ्यास आधारित टेस्ट

1. मानवी शरीराच्या रचनेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो?




2. वनस्पतींचा अभ्यास कोणत्या शास्त्रात होतो?




3. पृथ्वीचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो?




4. खगोल वस्तूंचा अभ्यास कोणते शास्त्र करते?




5. प्राण्यांचा अभ्यास कोणत्या शास्त्रात होतो?




6. जिवाणूंचा अभ्यास कोणते शास्त्र करते?




7. प्राचीन वस्तूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रात होतो?




8. हवामानाचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो?




9. मनुष्याच्या मनाचा आणि वर्तनाचा अभ्यास कोणते शास्त्र करते?




10. पदार्थांच्या रासायनिक रचनेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात होतो?




11. ध्वनीचा अभ्यास कोणते शास्त्र करते?




12. नकाशांचा अभ्यास कोणत्या शास्त्रात होतो?




13. पक्ष्यांचा अभ्यास कोणत्या शास्त्रात होतो?




14. मास्यांचा अभ्यास कोणत्या शास्त्रात होतो?




15. किड्यांचा अभ्यास कोणत्या शास्त्रात होतो?




16. वन्य प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास कोणत्या शास्त्रात होतो?




17. पृथ्वीवरील पाण्याच्या अभ्यासाला काय म्हणतात?




18. रुग्णांच्या रोगांचा अभ्यास कोणत्या शास्त्रात होतो?




19. खनिज पदार्थांचा अभ्यास कोणत्या शास्त्रात होतो?




20. वनस्पतींच्या रोगांचा अभ्यास कोणते शास्त्र करते?





कार्य आणि बल यावर आधारित टेस्ट

बल या घटकावर 20 बहुपर्यायी प्रश्न

बल या घटकावर 20 बहुपर्यायी प्रश्न

11. 'संवेग' म्हणजे काय?

a) वस्तुमान आणि त्वरण यांचा गुणाकार
b) वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार
c) बल आणि विस्थापन यांचा गुणाकार
d) वस्तुमान आणि आकारमान यांचा गुणाकार
योग्य उत्तर: b) वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार
स्पष्टीकरण: संवेग (p) = वस्तुमान (m) × वेग (v). ही एक सदिश राशी आहे.

12. जर वस्तूवर कोणतेही बाह्य बल कार्य करत नसेल, तर त्याचा संवेग:

a) वाढतो
b) कमी होतो
c) स्थिर राहतो
d) शून्य होतो
योग्य उत्तर: c) स्थिर राहतो
स्पष्टीकरण: न्यूटनच्या गतीच्या पहिल्या नियमानुसार, बाह्य बल नसल्यास वस्तूचा संवेग स्थिर राहतो (संवेगाच्या संरक्षणाचा नियम).

13. ताण बल (Tension force) हे कोणत्या प्रकारचे बल आहे?

a) असंपर्क बल
b) संपर्क बल
c) चुंबकीय बल
d) विद्युत बल
योग्य उत्तर: b) संपर्क बल
स्पष्टीकरण: ताण बल हे दोरी, दोरकाम किंवा रॉड यांसारख्या वस्तूंद्वारे प्रसारित होणारे संपर्क बल आहे.

14. 'केंद्राभिसारी बल' म्हणजे काय?

a) वर्तुळाकार मार्गावर फिरणाऱ्या वस्तूवर केंद्राकडे कार्य करणारे बल
b) केंद्रापासून दूर कार्य करणारे बल
c) सरळ रेषेत कार्य करणारे बल
d) गुरुत्वाकर्षण बल
योग्य उत्तर: a) वर्तुळाकार मार्गावर फिरणाऱ्या वस्तूवर केंद्राकडे कार्य करणारे बल
स्पष्टीकरण: केंद्राभिसारी बल हे वर्तुळाकार मार्गावर फिरणाऱ्या वस्तूला त्या मार्गावर ठेवण्यासाठी केंद्राकडे कार्य करते. F = mv²/r.

15. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे होणाऱ्या त्वरणाचे मूल्य किती असते?

a) 1.6 m/s²
b) 9.8 m/s²
c) 6.67 × 10⁻¹¹ m/s²
d) 3 × 10⁸ m/s²
योग्य उत्तर: b) 9.8 m/s²
स्पष्टीकरण: पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ गुरुत्वाकर्षणामुळे होणारे त्वरण सरासरी 9.8 m/s² इतके असते (g चे मूल्य).

16. खालीलपैकी कोणते बल सर्वात कमकुवत आहे?

a) गुरुत्वाकर्षण बल
b) विद्युतचुंबकीय बल
c) केंद्रीय बल
d) अणुबल
योग्य उत्तर: a) गुरुत्वाकर्षण बल
स्पष्टीकरण: गुरुत्वाकर्षण बल हे इतर मूलभूत बलांच्या तुलनेत सर्वात कमकुवत आहे, पण ते लांब पल्ल्यापर्यंत कार्य करते.

17. 'बल आघूर्ण' (Torque) म्हणजे काय?

a) बल आणि वेग यांचा गुणाकार
b) बल आणि विस्थापन यांचा सदिश गुणाकार
c) वस्तुमान आणि त्वरण यांचा गुणाकार
d) बल आणि कालावधी यांचा गुणाकार
योग्य उत्तर: b) बल आणि विस्थापन यांचा सदिश गुणाकार
स्पष्टीकरण: बल आघूर्ण (τ) = बल (F) × लंब अंतर (r). हे फिरण्याचा (घूर्णन) परिणाम करते.

18. जेव्हा दोन वस्तू एकमेकांवर बल प्रयुक्त करतात, तेव्हा त्यांच्या संवेगातील बदलाचे गुणोत्तर किती असते?

a) 1:1
b) त्यांच्या वस्तुमानांच्या गुणोत्तराएवढे
c) त्यांच्या वेगांच्या गुणोत्तराएवढे
d) शून्य
योग्य उत्तर: a) 1:1
स्पष्टीकरण: न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार, दोन वस्तूंमधील परस्पर बलांचे परिमाण समान असते, म्हणून संवेगातील बदलही समान (परंतु विरुद्ध दिशेने) असतो.

19. जर वस्तूवर कार्य करणारे सर्व बलांची सदिश बेरीज शून्य असेल, तर वस्तू:

a) त्वरणित होते
b) स्थिर वेगाने गतिमान राहते
c) विश्रांती अवस्थेत राहते
d) b किंवा c यापैकी कोणतेही
योग्य उत्तर: d) b किंवा c यापैकी कोणतेही
स्पष्टीकरण: न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार, बलांची सदिश बेरीज शून्य असल्यास वस्तू विश्रांती अवस्थेत राहील किंवा स्थिर वेगाने सरळ रेषेत गतिमान राहील.

20. 'आभासी बल' (Pseudo force) म्हणजे काय?

a) गैर-जडत्वीय चौकटीत निरीक्षण केलेले बल
b) दोन प्रभारांमधील बल
c) दोन वस्तुमानांमधील बल
d) अणूंमधील बल
योग्य उत्तर: a) गैर-जडत्वीय चौकटीत निरीक्षण केलेले बल
स्पष्टीकरण: आभासी बल हे केवळ त्वरणीत (गैर-जडत्वीय) संदर्भ चौकटीत दिसणारे बल आहे, जे न्यूटनच्या नियमांनुसार वास्तविक बल नसते.

ध्वनी या घटकावर आधारित 20 बहुपर्यायी प्रश्न

ध्वनी या घटकावर आधारित 20 बहुपर्यायी प्रश्न

ध्वनी या घटकावर आधारित 20 बहुपर्यायी प्रश्न

1. ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वात जास्त असतो?

a) हवा
b) पाणी
c) पोलाद
d) निर्वात
योग्य उत्तर: c) पोलाद
स्पष्टीकरण: ध्वनीचा वेग घन पदार्थांमध्ये सर्वात जास्त असतो. पोलादामध्ये ध्वनीचा वेग सुमारे 5960 मीटर/सेकंद असतो.

2. मानवी कानासाठी श्रवणीय ध्वनीची वारंवारता श्रेणी किती असते?

a) 20 Hz ते 20,000 Hz
b) 10 Hz ते 10,000 Hz
c) 50 Hz ते 50,000 Hz
d) 100 Hz ते 1,000 Hz
योग्य उत्तर: a) 20 Hz ते 20,000 Hz
स्पष्टीकरण: सामान्य मानवी कान 20 Hz ते 20 kHz (20,000 Hz) या वारंवारतेमधील ध्वनी ऐकू शकते.

3. खालीलपैकी कोणता ध्वनीचा गुणधर्म नाही?

a) तीव्रता
b) स्वरमान
c) तरंगलांबी
d) रंग
योग्य उत्तर: d) रंग
स्पष्टीकरण: रंग हा दृश्य प्रकाशाचा गुणधर्म आहे, ध्वनीचा नाही. ध्वनीचे मुख्य गुणधर्म म्हणजे तीव्रता, स्वरमान आणि तरंगलांबी.

4. ध्वनीच्या तीव्रतेचे एकक काय आहे?

a) हर्ट्झ (Hz)
b) डेसिबेल (dB)
c) न्यूटन (N)
d) पास्कल (Pa)
योग्य उत्तर: b) डेसिबेल (dB)
स्पष्टीकरण: ध्वनीच्या तीव्रतेचे (आवाजाच्या जोराचे) मोजमाप डेसिबेल (dB) या एककात केले जाते.

5. सोनार यंत्रात कोणत्या प्रकारच्या तरंगांचा उपयोग होतो?

a) प्रकाश तरंग
b) ध्वनी तरंग
c) रेडिओ तरंग
d) उष्णता तरंग
योग्य उत्तर: b) ध्वनी तरंग
स्पष्टीकरण: सोनार (SONAR - Sound Navigation and Ranging) यंत्रात उच्च वारंवारतेच्या ध्वनी तरंगांचा (अल्ट्रासॉनिक तरंग) उपयोग केला जातो.

6. 20 Hz पेक्षा कमी वारंवारतेच्या ध्वनीला काय म्हणतात?

a) अल्ट्रासॉनिक
b) इन्फ्रासॉनिक
c) श्रवणीय ध्वनी
d) सुपरसॉनिक
योग्य उत्तर: b) इन्फ्रासॉनिक
स्पष्टीकरण: 20 Hz पेक्षा कमी वारंवारतेच्या ध्वनीला इन्फ्रासॉनिक ध्वनी म्हणतात. हा ध्वनी मानवी कानाला ऐकू येत नाही.

7. ध्वनीच्या वेगावर कोणता घटक परिणाम करत नाही?

a) माध्यमाची घनता
b) माध्यमाचे तापमान
c) ध्वनीची तीव्रता
d) माध्यमाची लवचिकता
योग्य उत्तर: c) ध्वनीची तीव्रता
स्पष्टीकरण: ध्वनीचा वेग माध्यमाच्या घनता, तापमान आणि लवचिकतेवर अवलंबून असतो, पण ध्वनीच्या तीव्रतेवर अवलंबून नसतो.

8. ध्वनी तरंग कोणत्या प्रकारचे तरंग आहेत?

a) अनुप्रस्थ तरंग
b) रेखीय तरंग
c) अवनत तरंग
d) अनुदैर्ध्य तरंग
योग्य उत्तर: d) अनुदैर्ध्य तरंग
स्पष्टीकरण: ध्वनी तरंग हे अनुदैर्ध्य तरंग आहेत, म्हणजे कणांची हालचाल तरंगाच्या दिशेने होते.

9. हवेमध्ये ध्वनीचा वेग कोणत्या तापमानाला सर्वात जास्त असतो?

a) 0°C
b) 10°C
c) 20°C
d) 30°C
योग्य उत्तर: d) 30°C
स्पष्टीकरण: हवेमध्ये ध्वनीचा वेग तापमान वाढल्यास वाढतो. 30°C तापमानाला ध्वनीचा वेग सर्वात जास्त (सुमारे 349 m/s) असतो.

10. प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी मूळ ध्वनी आणि परावर्तित ध्वनीमध्ये किमान किती वेळ अंतर असावे लागते?

a) 0.05 सेकंद
b) 0.1 सेकंद
c) 0.5 सेकंद
d) 1 सेकंद
योग्य उत्तर: b) 0.1 सेकंद
स्पष्टीकरण: मानवी कानाला दोन ध्वनी वेगळे ऐकू येण्यासाठी त्यामध्ये किमान 0.1 सेकंदाचे अंतर असावे लागते.

11. खालीलपैकी कोणते उपकरण ध्वनीच्या परावर्तनाच्या तत्त्वावर कार्य करत नाही?

a) मेगाफोन
b) स्टेथोस्कोप
c) मायक्रोफोन
d) प्रतिध्वनी यंत्र (Echocardiogram)
योग्य उत्तर: c) मायक्रोफोन
स्पष्टीकरण: मायक्रोफोन ध्वनीचे विद्युत सिग्नलमध्ये रूपांतर करते, ते ध्वनी परावर्तनाच्या तत्त्वावर कार्य करत नाही.

12. ध्वनीच्या वारंवारतेचे एकक काय आहे?

a) मीटर
b) हर्ट्झ
c) डेसिबेल
d) पास्कल
योग्य उत्तर: b) हर्ट्झ
स्पष्टीकरण: ध्वनीच्या वारंवारतेचे (फ्रिक्वेन्सीचे) एकक हर्ट्झ (Hz) आहे. 1 Hz म्हणजे प्रति सेकंद एक दोलन.

13. ध्वनीच्या संदर्भात 'स्वरमान' म्हणजे काय?

a) ध्वनीची जोर
b) ध्वनीची उंची-खोली
c) ध्वनीची तीक्ष्णता
d) ध्वनीचा वेग
योग्य उत्तर: b) ध्वनीची उंची-खोली
स्पष्टीकरण: स्वरमान म्हणजे ध्वनीची उंची-खोली (pitch), जी ध्वनीच्या वारंवारतेवर अवलंबून असते. जास्त वारंवारतेचा ध्वनी उंच आणि कमी वारंवारतेचा ध्वनी खोल असतो.

14. मानवी स्वरयंत्रामध्ये ध्वनी कशाच्या कंपनामुळे निर्माण होतो?

a) फुप्फुस
b) स्वरतंतू
c) जीभ
d) नाकपुड्या
योग्य उत्तर: b) स्वरतंतू
स्पष्टीकरण: मानवी आवाज स्वरतंतूंच्या (vocal cords) कंपनामुळे निर्माण होतो. हवेचा प्रवाह स्वरतंतूंना कंपित करतो ज्यामुळे ध्वनी तरंग निर्माण होतात.

15. खालीलपैकी कोणते ध्वनी प्रदूषणाचे स्त्रोत नाही?

a) वाहनांचा आवाज
b) लाऊडस्पीकर
c) वाद्यांचा आवाज
d) पक्ष्यांचा किलबिलाट
योग्य उत्तर: d) पक्ष्यांचा किलबिलाट
स्पष्टीकरण: पक्ष्यांचा किलबिलाट नैसर्गिक आवाज असून तो ध्वनी प्रदूषणाचा भाग मानला जात नाही.

16. ध्वनीच्या संदर्भात 'अनुनाद' म्हणजे काय?

a) ध्वनीचे परावर्तन
b) ध्वनीचे अपवर्तन
c) ध्वनीची तीव्रता वाढवणे
d) वस्तूच्या नैसर्गिक वारंवारतेवर ध्वनीची तीव्रता वाढणे
योग्य उत्तर: d) वस्तूच्या नैसर्गिक वारंवारतेवर ध्वनीची तीव्रता वाढणे
स्पष्टीकरण: अनुनाद म्हणजे जेव्हा बाह्य ध्वनीची वारंवारता वस्तूच्या नैसर्गिक वारंवारतेशी जुळते, तेव्हा ध्वनीची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढते.

17. ध्वनीच्या वेगाचे योग्य क्रमाने अवरोही क्रम कोणता?

a) पोलाद > पाणी > हवा
b) पाणी > पोलाद > हवा
c) हवा > पाणी > पोलाद
d) पोलाद > हवा > पाणी
योग्य उत्तर: a) पोलाद > पाणी > हवा
स्पष्टीकरण: ध्वनीचा वेग पोलादामध्ये सर्वात जास्त (सुमारे 5960 m/s), पाण्यात मध्यम (सुमारे 1482 m/s) आणि हवेत सर्वात कमी (सुमारे 343 m/s) असतो.

18. ध्वनी लहरींच्या संदर्भात 'तरंगलांबी' म्हणजे काय?

a) ध्वनीच्या एका दोलनास लागणारा वेळ
b) ध्वनीच्या दोन क्रमिक संपीडनांमधील अंतर
c) ध्वनीच्या प्रसाराची दिशा
d) ध्वनीची तीव्रता
योग्य उत्तर: b) ध्वनीच्या दोन क्रमिक संपीडनांमधील अंतर
स्पष्टीकरण: तरंगलांबी म्हणजे ध्वनीत दोन क्रमिक संपीडनांमधील किंवा दोन क्रमिक विरलनांमधील अंतर होय.

19. 20,000 Hz पेक्षा जास्त वारंवारतेच्या ध्वनीला काय म्हणतात?

a) इन्फ्रासॉनिक
b) अल्ट्रासॉनिक
c) श्रवणीय ध्वनी
d) सुपरसॉनिक
योग्य उत्तर: b) अल्ट्रासॉनिक
स्पष्टीकरण: 20,000 Hz (20 kHz) पेक्षा जास्त वारंवारतेच्या ध्वनीला अल्ट्रासॉनिक ध्वनी म्हणतात. हा ध्वनी मानवी कानाला ऐकू येत नाही.

20. ध्वनीच्या संदर्भात 'डॉपलर परिणाम' म्हणजे काय?

a) ध्वनीचे परावर्तन
b) ध्वनी स्त्रोत आणि प्रेक्षक यांच्या सापेक्ष गतीमुळे वारंवारतेत बदल
c) ध्वनीचे अपवर्तन
d) ध्वनीचे विवर्तन
योग्य उत्तर: b) ध्वनी स्त्रोत आणि प्रेक्षक यांच्या सापेक्ष गतीमुळे वारंवारतेत बदल
स्पष्टीकरण: डॉपलर परिणाम म्हणजे जेव्हा ध्वनी स्त्रोत आणि प्रेक्षक यांच्यात सापेक्ष गती असते, तेव्हा प्रेक्षकाला ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता बदलते. उदाहरणार्थ, जवळ येणाऱ्या रेल्वेच्या हॉर्नचा आवाज उंच ऐकू येतो.

महिला व बालविकास विभागात तब्बल २५८ पदांसाठी जाहिरात ..

 Mpsc मार्फत. महिला व बालविकास विभागात तब्बल २५८ पदांसाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. महिला व बालविकास आयुक्तालयांतर्गत अधीक्षक / निरीक्षक प्...