WEL COME MY JOB....... BLOG आपले सर्वांचे सहर्ष स्वागत ... माझ्या WEBSITE ला भेट दिल्या बद्दल मी मनापासून आभारी आहे

नोकरीसाठी उपयुक्त जनरल नॉलेज

Tuesday, July 16, 2024

जालना येथे रोजगार मेळावा

 युथ स्किल डेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जालना येथे रोजगार मेळावा भरवण्यात आला आहे. राज्यातील रोजगाराच्या शोधात असणाऱ्या अनेक युवकांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे.

या मेळाव्यात युवकांना त्यांच्या स्किलच्या अनुसार नोकरी देण्यात येईल. या रोजगार मेळाव्यात मेटारोल ईएसएटी प्राइवेट लिमिटेड, विक्रम टी प्रोसेसर प्राइवेट लिमिटेड, एनआरबी बियरिंग्स लिमिटेड, एसआरजे स्टील प्राइवेट लिमिटेड, भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल प्राइवेट लिमिटेड, ओम साई मैनपावर प्राइवेट लिमिटेड, ओक्रोप इंजीनियरिंग प्राइवेट लिमिटेड, विनोद रॉय इंजीनियरिंग प्राइवेट लिमिटेड, भूमि क्यूटिक्स इंडस्ट्री प्राइवेट लिमिटेड, छत्रपति संभाजीनगर धूत ट्रांसमिशन प्राइवेट लिमिटेड, नवभारत फर्टिलाइजर्स लिमिटेड, कैनपैक इंडिया प्राइवेट लिमिटेड तसेच टैलेनसेतु सर्विसेज प्राइवेट लिमिटेड या १४ कंपन्यांनी भाग घेतला आहे. या कंपन्यांद्वारे मेळाव्यात इच्छुक उमेदवाराची मुलाखत घेतली जात आहे. संबंधित कंपनींनी अर्जकर्त्या उमेदवारांसाठी काही अटी शर्ती ठेवल्या आहेत. दहावी, बारावी किंवा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेदवार या मेळाव्यातील कोणत्याही कम्पनितन अर्ज करू शकता.



रोजगार मेळाव्याचा मुख्य हेतू बेरोजगार युवकांना किंवा जे युवक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळवून देणे आहे. या मेळाव्यात देशभरातून अनेक कंपनी भाग घेतात. अर्जकर्त्या उमेदवाराला त्याच्या स्किलनुसार काम देण्याचे कार्य या कंपन्या करतात. भारतातील वाढती बेरोजगारीची समस्या दूर करणे हेच या रोजगार मेळाव्याचे ध्येय असते. भारतातील अनेक राज्यात हे रोजगार मेळावे भरवले जातात. सध्या महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाने राज्यातील अनेक युवकांना रोजगार प्राप्ती होणार आहे. हा मेळावा सोमवार, दिनांक १५ जुलै २०२४ रोजी, जालन्यातील गव्हर्मेंट इंडस्ट्रियल ट्रेंनिंग इन्स्टिटयूट येथे आयोजित करण्यात आला असून. अनेक युवकांचा रोजगाराचा प्रश्न सोडवला जात आहे. या मेळाव्यात विविध कंपनींनी ५५१ रिक्त पदांसाठी मुलाखती आयोजित केल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्याची अधिकृत साईट rojgar.mahaswayam.gov.in जाऊन अर्ज भरावा.

No comments:

Post a Comment

जागतिक ध्यान दिवस

  २१ डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा केला जावा हा लिकटेंस्टिन या देशाने मांडलेला व भारतासह अनेक देशांनी अनुमोदन दिलेला प्रस्ताव सं...