Main Menu
h 2
Labels
- Exam परीक्षा (4)
- jk (57)
- चालू घडामोडी (24)
- टेस्ट TEST (28)
- टेस्ट TEST स्पर्धा परीक्षा टेस्ट (8)
- नोकरी जाहिरात (8)
- नोकरी जाहिरात. (2)
- नोकरी जाहिरात.. (53)
- महान / विशेष व्यक्ती (86)
- विज्ञान विषयावर टेस्ट (17)
- विशेष प्रश्नमंजुषा (19)
- सातारा प्रज्ञाशोध परीक्षा (1)
- स्कॉलरशिप नवोदय परीक्षा टेस्ट (9)
Bank of India bharti
रयत शिक्षण संस्था शिक्षक भरती...
असिस्टंट प्रोफेसर”पदाची133 पदांची भरती...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत “असिस्टंट प्रोफेसर”पदाची133 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती 2026 करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2026 आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती 2026
पदाचे नाव - असिस्टंट प्रोफेसर
पदसंख्या - 133 जागा
शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण -पुणे
अर्ज शुल्क -
खुल्या वर्गासाठी -Rs. 1,000/-
आरक्षित प्रवर्ग (SC / ST / DT-A / NT-B / NT-C / NT-D / SBC / OBC / SEBC / EWS / PwBD) -Rs. 500/-
अर्ज पद्धती - ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 01 जून 2026
अधिकृत वेबसाईट -www.unipune.ac.in
भूमी अभिलेख विभाग भरती 2025
नगर भूमि अभिलेख कार्यालयात भरती निघाली आहे. मराठी शाळेतून शिकलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य आहे. परिक्षा द्या आणि एक चांगली नोकरी मिळवा.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 ऑक्टोबर 2025
इच्छुकांनी अंतिम दिनांक यांच्या अगोदर फार्म भरून घ्यावा..
खालील वेबसाईटवरून फार्म भरावा
https://ibpsreg.ibps.in/gomsep25/
https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहितीसाठी भेट द्या..
राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक पदाच्या 137 जागा
राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक पदाच्या 137 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही पदभरती असून त्यासाठी अर्हता एमपीएससीने वेबसाईटवर जाहीर केली आहे
राज्य शासनाच्या गृह विभागाच्या अधिनस्त राज्य उत्पादन शुल्क विभागातील लिपिक संवर्ग आणि जवान संवर्गातील कर्मचाऱ्यांना दुय्यम निरीक्षक, गट क पदावर निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा मुंबई केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे
. अर्ज सादर करण्याचा कालावधी - 10 जून ते 30 जून
- ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख - 30 जून रात्री 11.59 मिनिटे
- चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख - 3 जुलै
- एकूण पदसंख्या - 137
- त्यामध्ये जवान संवर्गासाठी 115 पदे तर लिपिक संवर्गासाठी 22 पदे
- यापैकी दिव्यांग प्रवर्गासाठी एकूण सहा पदे
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असलेल्या उमेदवारासाठी 3 वर्षाची नियमित सेवा तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यासाठी 5 वर्षांची नियमित सेवा पूर्ण असणे बंधनकारक आहे.
परीक्षेसाठी एकच टप्पा असणार आहे. त्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा घेण्यात येणार आहे. 200 गुणांसाठी असलेल्या या परीक्षेसाठी दोन पेपर घेण्यात येणार आहेत.
SSC CGL 2025 भरती..
SSS (स्टाफ सिलेक्शन कमिशन) कडून यावर्षी संयुक्त पदवीधर पातळी परीक्षा (SSC CGL 2025) साठी 14 हजार 582 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार SSC च्या ssc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
9 जून पासून या पदासाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून 4 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये अर्ज करणारे उमेदवार 5 जुलै पर्यंत अर्जाचे शुल्क भरू शकतात. अर्जातील कोणतीही चूक दुरुस्त करायची असेल तर ती करण्याची संधी 9 ते 11 जुलै दरम्यान उपलब्ध असेल.
वेगवेगळ्या पदांसाठी भरती
या भरती अंतर्गत, केंद्र सरकारच्या विविध विभाग आणि मंत्रालयांमध्ये गट 'ब' आणि गट 'क' पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ग्रुप B मध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इनकम टॅक्स इंस्पेक्टर, सेंट्रल एक्साइज इंस्पेक्टर, नारकोटिक्स इंस्पेक्टर, सब-इंस्पेक्टर, रिसर्च असिस्टंट, पोस्टल निरीक्षक सारख्या पदांचा समावेश आहे. तसेच, ग्रुप C में ऑडिटर, टॅक्स असिस्टंट, पोस्टल असिस्टंट, एकाउंटंट, अपर डिव्हिजनल क्लर्क या पदांवर भरती केली जाणार आहे.
पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळ्या प्रकारे निश्चित करण्यात आली आहे, जसे की 18 ते 27 वर्षे, 18 ते 30 वर्षे किंवा 20 ते 30 वर्षे. वयाची गणना 1 ऑगस्ट 2025 च्या आधारे केली जाईल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयात सूट दिली जाईल.
अर्जाचे शुल्क किती?
सामान्य (Open) आणि ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. तर महिला, एससी (SC)/एसटी (ST) प्रवर्ग, अपंग आणि माजी सैनिकांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. कंप्यूटर-आधारित चाचणी (CBT) आणि त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी अशा दोन टप्प्यात निवड प्रक्रिया पार पाडली जाईल. टियर-1 आणि टियर-2 या दोन्ही परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारच्या असतील.
SSC-CGL टियर-1 परीक्षा 13 ते 30 ऑगस्ट 2025 दरम्यान घेतली जाईल. त्यानंतर, टियर-2 परीक्षा डिसेंबर 2025 मध्ये होणार..
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" 2025-26 जाहीर ..
तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्या सोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील "मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" 2025-26 जाहीर करण्यात आला आहे.
त्यानुसार या कार्यक्रमात 60 फेलोंची निवड करण्यात येणार आहे.
फेलोंच्या निवडी संदर्भातील निकष, नियुक्ती संदर्भातील अटी व शर्ती तसेच शैक्षणिक संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा व अंमलबजावणी बाबत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत हा कार्यक्रम सुरू करण्यात आला व यशस्वीपणे राबवण्यात आला. त्यानंतर 2023-24 या कालावधीतील कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्या नंतर आता 2025-26 साठी हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
अर्ज करण्यासाठी अटी
फेलोंच्या निवडीचे निकष : अर्जदार भारताचा नागरिक असावा.
शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान 60 % गुण आवश्यक) असावा.
अनुभव : किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील. तसेच, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप / अप्रेंटीसशिप /आर्टीकलशिपसह 1 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल. अर्जदारास तसे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल.
भाषा व संगणक ज्ञान: मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच, संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील.
भाषा व संगणक ज्ञान: मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच, संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील.
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान 21 वर्षे व कमाल 26 वर्षे असावे.
अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे विहीत केलेल्या ऑनलाईनअॅप्लिकेशन प्रणालीद्वारे उमेदवाराने अर्ज करावयाचा आहे.
अर्ज करण्यासाठी शुल्क किती?
अर्जाकरिता शुल्क 500 रुपये असतील. या कार्यक्रमात फेलोंची संख्या 60 इतकी निश्चित करण्यात आली आहे. त्यापैकी महिला फेलोंची संख्या फेलोंच्या एकूण संख्येच्या 1/3 राहील. 1/3 महिला फेलो उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरुष फेलोंची निवड करण्यात येईल. फेलोंचा दर्जा हा शासकीय सेवेतील गट-अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असेल.
निवड प्रक्रिया कशी असेल?
फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे लागेल. तसेच ऑनलाईन अर्ज करताना आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा Online (Objective Test) द्यावी लागेल.
ऑनलाईन परीक्षा देण्याची कार्यपद्धती संचालनालयाच्या
या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल व त्यातील अटी व शर्तीचे उमेदवाराने पालन करणे आवश्यक राहील. यापूर्वी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात काम केलेले फेलो पुनश्चः या कार्यक्रमांतर्गत फेलो निवडीसाठी पात्र असणार नाहीत. तसे फेलोंनी अर्जात नमूद करणे आवश्यक राहील.
वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या सुमारे 210 उमेदवारांना दिलेल्या विषयांपैकी एका विषयावरील निबंध विहीत तारखेस विहीत वेळेत ऑनलाईन पध्दतीने सादर करावा लागेल. वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या 210 उमेदवारांची मुलाखत मुंबई येथे घेण्यात येईल.
निवड झालेल्या फेलोंपैकी आवश्यकतेनुसार निवडक 20 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी दोन ते तीन फेलोंचा गट नियुक्त करण्यात येईल. या गटातील एक फेलो संबंधित जिल्हाधिकारी व एक ते दोन फेलो मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद यांच्या अधिनस्त काम पाहतील. फेलोंची नियुक्ती 12 महिने कालावधीसाठी असेल. यामध्ये वाढ करण्यात येणार नाही. तसेच फेलो रुजु झाल्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांनी त्याची नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल.
या कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या फेलोंना दरमहा मानधन रुपये 56,100 व प्रवासखर्च रुपये 5400 असे एकत्रित 61,500 रुपये देण्यात येतील.शैक्षणिक कार्यक्रम हा फेलोशिपचा अविभाज्य भाग असेल. निवड झालेल्या फेलोंसाठी आयआयटी, मुंबई यांच्या सहकार्यातून स्वतंत्र सार्वजनिक धोरण या विषयातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित केला जाईल.
या कार्यक्रमांतर्गत नियुक्त केलेल्या ठिकाणी काम करताना फेलोंना उपयोगी पडतील अशा विविध विषयांवर ऑफलाईन व ऑनलाईन व्याख्यानांचे आयोजन केले जाईल. ऑफलाईन व्याख्याने फेलोशिपच्या सुरुवातीस दोन आठवडे तसेच सहा महिन्यानंतर व शेवटी प्रत्येकी एक आठवडा, आयआयटी, मुंबई येथे आयोजित करण्यात येतील. याव्यतिरीक्त ऑनलाईन व्याख्याने वर्षभरात कार्यक्रमाच्या गरजेनुसार शनिवार, रविवार किंवा सार्वजनिक सुटीच्या दिवशी आयोजित करण्यात येतील. ऑफलाईन व ऑनलाईन सर्व व्याख्यानांना उपस्थित रहाणे फेलोंना अनिवार्य आहे. या कार्यक्रमाचा उद्देश फेलॉना सार्वजनिक हितासाठी काम करताना व धोरण निर्मिती करताना योग्यसाधने व शास्त्रीय पध्दींचा वापर करण्यासाठी मदत करणे तसेच विकास कार्यक्रम राबविण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये व क्षमता वाढविणे हा असेल.
सदर पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर फेलोंना संबंधित संस्थेमार्फत स्वतंत्र प्रमाणपत्र दिले जाईल. शासनाकडून फेलोशिप कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या संबंधित कार्यालय वा प्राधिकरणासोबत फेलोंनी करावयाचे काम (फील्ड वर्क) व शैक्षणिक कार्यक्रम हे दोन्ही फेलोशिपच्या कालावधीत यशस्वीपणे पूर्ण करणे फेलोंसाठी अनिवार्य राहील. शैक्षणिक कार्यक्रमाव्यतिरिक्त परिचय सत्र, विविध सामाजिक संस्थांना भेटी, मान्यवर व्यक्तींशी संवाद, प्रमाणपत्र प्रदान या उद्देशाने वर्षभरात इतर काही कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.
Railway Recruitment Boards (RRBs) job 2025
DRDO जेआरएफ पदांवर भरती2026
DRDO वॉक-इन मुलाखतीच्या माध्यमातून JRF पदांवर भरती होणार आहे. पात्र उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात, जी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आय...




