दरवर्षी लाखो विद्यार्थी उत्तीर्ण होऊन बाहेर पडत असतात. काही आपल्या आवडत्या क्षेत्रांमध्ये पुढे करिअर करतात तर काही लगेच स्पर्धापरिक्षांसाठी धावपळ सुरू करतात. त्यातच या विद्यार्थ्यांसाठी आणि पात्र उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
इंडिया पोस्टाकडून 44 हजारांहून अधिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे
इंडिया पोस्टाने GDS च्या बंपर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. त्यासाठी एक लिंक इंडिया पोस्टाकडून जारी करण्यात आली आहे. या लिंकमार्फत उमेदवार आपला अर्ज दाखल करु शकतो. जे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आहेत, ते सोमवार ( 15 जुलै 2024) पासून नोंदणी करु शकतात. यासाठी तुम्हाला इंडिया पोस्टाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे. या वेबसाईटवरुन तुम्हाला भरतीसाठी अर्ज करता येईल, तसेच संबंधित माहिती देखील या वेबसाईटवर उपलब्ध असेल. त्यासाठी indiapostgdsonline.gov.in. या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. ही पदे आंध्रप्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, पंजाब, यूपी, उत्तराखंड, एमपी, राजस्थान, झारखंड राज्यांसाठी काढण्यात आली आहे.
या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेला असावा. त्याचे वय 18 ते 40 वर्ष असावे. तसेच पात्र उमेदवाराला स्थानिक प्रदेशाच्या भाषेची व्यवस्थित माहिती असावी. उमेदवाराला सायकल चालवता यावी, अशी अट आहे. दहावीमध्ये इंग्रजी आणि गणित हे विषय अनिवार्य आहेत. ही पदे ग्रामीण डाक सेवक, शाखा पोस्ट मास्तर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्तर याकरता काढण्यात आली आहे.
या वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळा पदानुसार पगार असणार आहे. पोस्ट ऑफिस GDS, ABPM आणि GDS पोस्टचा पगार 10,000 रुपये ते 24470 रुपये प्रति महिना असेल तर बीपीएम पदाचा पगार 12 हजार ते 29,380 रुपयांपर्यंत असणार आहे
वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळा पदानुसार पगार असणार आहे. पोस्ट ऑफिस GDS, ABPM आणि GDS पोस्टचा पगार 10,000 रुपये ते 24470 रुपये प्रति महिना असेल तर बीपीएम पदाचा पगार 12 हजार ते 29,380 रुपयांपर्यंत असणार आहे
.
No comments:
Post a Comment