WEL COME MY JOB....... BLOG आपले सर्वांचे सहर्ष स्वागत ... माझ्या WEBSITE ला भेट दिल्या बद्दल मी मनापासून आभारी आहे

नोकरीसाठी उपयुक्त जनरल नॉलेज

Wednesday, July 31, 2024

Staff Selection Commission Recruitment 2024:

 कर्मचारी निवड आयोगात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवार एसएससीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ssc.gov.in येथे भेट देऊ शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.


या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे. म्हणजेच या भरतीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी असेल. आज रात्री ११.०० वाजल्यानंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही. त्यानंतर करेक्शन विंडो १६ ऑगस्ट रोजी उघडेल आणि १७ ऑगस्ट 2024 रोजी बंद होईल. संगणकावर आधारित परीक्षा ऑक्टोबर, नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात येणार आहे.


पात्रता:


या भरती मोहिमेत संस्थेतील एमटीएसची ४ हजार ८८७ पदे आणि सीबीआयसी आणि सीबीएनमधील हवालदाराची ३ हजार ४३९ पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज करण्यासाठी कट ऑफ तारखेपूर्वी मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता दहावी किंवा मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

असा करा अर्ज:


सर्वप्रथम ssc.gov.in येथे एसएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.

नोंदणी तपशील प्रविष्ट करा आणि सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर अकाऊंटमध्ये लॉगिन करा.

अर्ज भरा आणि अर्ज शुल्क भरा.

सबमिटवर क्लिक करा आणि पेज डाऊनलोड करा.

पुढील गरजेसाठी त्याची हार्ड कॉपी स्वत:जवळ ठेवा.

अर्ज शुल्क:


अर्ज शुल्क १००/- रुपये आहे. आरक्षणासाठी पात्र असलेल्या अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), अपंग (पीडब्ल्यूबीडी) आणि माजी सैनिक (ईएसएम) या महिला उमेदवार आणि उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. शुल्क केवळ भीम यूपीआय, नेट बँकिंग या ऑनलाइन पेमेंट मोडद्वारे किंवा व्हिसा, मास्टरकार्ड, मेस्ट्रो किंवा रुपे डेबिट कार्ड वापरून भरले जाऊ शकते. 

निवड प्रक्रियेत संगणक आधारित परीक्षा (सीबीई) आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीईटी) / शारीरिक मानक चाचणी (पीएसटी) यांचा समावेश असेल. पीईटी आणि पीएसटी केवळ हवालदार पदासाठी आहेत. अधिक संबंधित माहितीसाठी उमेदवार एसएससीची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.

No comments:

Post a Comment

RRB NTPC अंतर्गत १२ हजार जागांच्या भरती..

 RRB NTPC अंतर्गत १२ हजार जागांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध, १३ सप्टेंबरपासून अर्ज सुरू रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRB) ने RRB NTPC 2024 भरत...