WEL COME MY JOB....... BLOG आपले सर्वांचे सहर्ष स्वागत ... माझ्या WEBSITE ला भेट दिल्या बद्दल मी मनापासून आभारी आहे

नोकरीसाठी उपयुक्त जनरल नॉलेज

Thursday, July 18, 2024

कोकण पाटबंधारे प्रकल्प अंतर्गत रिक्त पद

 नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारमध्ये काम करण्याची नामी संधी मिळाली आहे. महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागातील कोकण पाटबंधारे प्रकल्प अंतर्गत रिक्त पद भरले जाणार आहेत.


या पद भरतीची जाहिरात शासनाकडून प्रकाशित केली गेली आहे. 25 जुलैपर्यंत या पदाकरिता उमेदवार अर्ज करु शकतात. अर्ज ऑफलाईन पदधत्तीने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.





उमेदवारासाठीची शैक्षणिक पात्रता

शासन मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी धारण करणारे सेवानिवृत्त अधिकारी/अभियंता

जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त,विवेक्षित काम केल्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक.

शारीरीक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक

पद

उपअभियंता/अधिकारी (स्थापत्य)


वयाची अट- 


उमेदवाराचे वय कमाल 65 वर्षे


कामाचे स्वरुप

मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांकरिता बांधकामाची अंदाजपत्रके तयार करणे, सर्वेक्षण, निविदा, कागदपत्रे तयार करणेव प्रकल्प, क्षेत्रीय स्थळी कामावर देखरेख ठेवणे इ

कामाचे स्वरुप

मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांकरिता बांधकामाची अंदाजपत्रके तयार करणे, सर्वेक्षण, निविदा, कागदपत्रे तयार करणेव प्रकल्प, क्षेत्रीय स्थळी कामावर देखरेख ठेवणे इत्यादी.


अर्जासंबंधी माहिती


अर्जाचे शुल्क 100 रुपये

 आहे 

अर्ज करण्याची तारीख अंतिम तारीख- 25 जुलै 2024 पर्यंत


अर्ज पाठवण्याचा पत्ता- कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभागीय पथक, अंबडपाल, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.


अर्ज हे वरील नमुद केलेल्या कार्यालयात सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत 24 जुलै 2024 पर्यंत सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत 100 रुपये किंमतीमध्ये विक्रीसाठी व पाहण्यासाठी उपलब्ध असतील.


उमेदवाराने पूर्ण भरलेले अर्ज 25 जुलै 2024 पर्यंत (टपालाने)अथवा स्व हस्ते स्वीकारले जातील.


अर्जाच्या पाकिटावर सेवानिवृत्त अधिकारी/अभियंता यांच्या कंत्राटी पद्धतीवर नेमणूक करण्याबाबत असे स्पष्ट लिहावे.

अर्ज स्वीकारण्याच्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.

No comments:

Post a Comment

जागतिक ध्यान दिवस

  २१ डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा केला जावा हा लिकटेंस्टिन या देशाने मांडलेला व भारतासह अनेक देशांनी अनुमोदन दिलेला प्रस्ताव सं...