इंडो तिबेटियन सीमा पोलीस भरती ITBP

 

बारावी पास (12th pass ) झालेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आले आहे. ती म्हणजे सध्या इंडो तिबेटियन सीमा पोलीस  यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे


एकूण जागा : 9451

पोलीस निरीक्षक : 321

पोलीस उपनिरीक्षक : 1544

कॉन्स्टेबल जीडी : 4640

हेड कॉन्स्टेबल : 3150. पात्रता : वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी संबंधित उमेदवाराने देशातील कोणत्याही बोर्ड मधून बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तसेच या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 27 या दरम्यान असणं आवश्यक आहे.

तर या पदासाठी नियुक्ती झालेल्या उमेदवाराला 21 हजार 700 ते 69 हजार 100 या दरम्यान वेतन मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार तिसऱ्या स्तरावरील हे वेतन असणार आहे.


या पदासाठी अर्ज करताना खुला प्रवर्ग ओबीसी आणि आर्थिक मागासवर्गीय उमेदवारांना शंभर रुपये एवढे शुल्क आकारले जाणार आहे तर आणि एसटी या उमेदवारांसाठी कोणतीही अर्ज फी नसणार आहे.


निवड प्रक्रिया : वरील सर्व पदांसाठी अर्ज केल्यानंतर उमेदवारांची निवड प्रक्रिया ही तीन पायऱ्यांमध्ये असणार आहे ज्यामध्ये…

– शारीरिक मापन चाचणी आणि शारीरिक मानक चाचणी

– लेखी परीक्षा

– कागदपत्र पडताळणी

त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम इंडो तिबेटियन सीमा पोलीस यांच्या https://recruitment.itbpolice.nic.in/rect/index.php या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
– त्यानंतर आपला ऑनलाईन या पर्यायावर क्लिक करा.
– त्यामध्ये तुमची सर्व योग्य माहिती भरा पुढील पर्यावर क्लिक करून तुमचा फोटो आणि सही अपलोड करा
– त्यानंतर अर्जासाठी लागणारे शुल्क भरा
– सबमिट झालेल्या अर्जाची प्रिंट आऊट काढा. ही प्रिंट तुम्हाला भविष्यात काम मिळू शकते.

https://recruitment.itbpolice.nic.in/rect/index.php


No comments:

Post a Comment

आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक 2025..

 आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक ३० चेंडू - ख्रिस गेल, (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया, २०१३) ३५ चेंडू - वैभव सूर्यवंशी, (रा...