आयबीपीएस मार्फत लिपिक पदांच्या तब्बल 6,128 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Institute of Banking personnel selection Recruitment For Clerk Post , Number of Post Vacancy – 6128 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये लिपिक ( Clerk ) पदांच्या एकुण 6,128 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Clerk Post , Number of Post Vacancy – 6128 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदाकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल तसेच संगणक साक्षर / ज्ञान असणे आवश्यक असेल ( MSCIT / CCC इ.)
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांसाठी आवेदन करण्याकरीता उमेदवाराचे दिनांक 01 जुलै 2024 रोजी किमान वय हे 20 वर्षे तर कमाल वय हे 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , तर यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : यांमध्ये जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 850/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता 175/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/crpcl14jun24/ या संकेतस्थळावर दिनांक 21 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
No comments:
Post a Comment