मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2025..

 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई ) घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची (सीटीईटी) घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार ८ फेब्रुवारी रोजी ही परीक्षा देशभरातील १३२ शहरांमध्ये आयोजित केली जाणार आहे.

राष्ट्रीय पातळीवर सीबीएसईतर्फे सीटीईटी ही परीक्षा घेण्यात येते. सीबीएसईतर्फे वर्षातून दोनवेळा परीक्षेचे आयोजन केले जाते. उमेदवारांना शिक्षक होण्यासाठीची पात्रता प्राप्त करण्यासाठी टीईटी किंवा सीटीईटी यातील कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होता येते. सीबीएसईने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, ८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सीटीईटीमध्ये पेपर १ आणि पेपर २ चा समावेश असणार आहे. एकूण २० भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी https://ctet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

No comments:

Post a Comment

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2025..

  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई ) घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची (सीटीईटी) घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार...