WEL COME MY JOB....... BLOG आपले सर्वांचे सहर्ष स्वागत ... माझ्या WEBSITE ला भेट दिल्या बद्दल मी मनापासून आभारी आहे

नोकरीसाठी उपयुक्त जनरल नॉलेज

Tuesday, July 16, 2024

जालना येथे रोजगार मेळावा

 युथ स्किल डेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जालना येथे रोजगार मेळावा भरवण्यात आला आहे. राज्यातील रोजगाराच्या शोधात असणाऱ्या अनेक युवकांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे.

या मेळाव्यात युवकांना त्यांच्या स्किलच्या अनुसार नोकरी देण्यात येईल. या रोजगार मेळाव्यात मेटारोल ईएसएटी प्राइवेट लिमिटेड, विक्रम टी प्रोसेसर प्राइवेट लिमिटेड, एनआरबी बियरिंग्स लिमिटेड, एसआरजे स्टील प्राइवेट लिमिटेड, भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल प्राइवेट लिमिटेड, ओम साई मैनपावर प्राइवेट लिमिटेड, ओक्रोप इंजीनियरिंग प्राइवेट लिमिटेड, विनोद रॉय इंजीनियरिंग प्राइवेट लिमिटेड, भूमि क्यूटिक्स इंडस्ट्री प्राइवेट लिमिटेड, छत्रपति संभाजीनगर धूत ट्रांसमिशन प्राइवेट लिमिटेड, नवभारत फर्टिलाइजर्स लिमिटेड, कैनपैक इंडिया प्राइवेट लिमिटेड तसेच टैलेनसेतु सर्विसेज प्राइवेट लिमिटेड या १४ कंपन्यांनी भाग घेतला आहे. या कंपन्यांद्वारे मेळाव्यात इच्छुक उमेदवाराची मुलाखत घेतली जात आहे. संबंधित कंपनींनी अर्जकर्त्या उमेदवारांसाठी काही अटी शर्ती ठेवल्या आहेत. दहावी, बारावी किंवा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेदवार या मेळाव्यातील कोणत्याही कम्पनितन अर्ज करू शकता.



रोजगार मेळाव्याचा मुख्य हेतू बेरोजगार युवकांना किंवा जे युवक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळवून देणे आहे. या मेळाव्यात देशभरातून अनेक कंपनी भाग घेतात. अर्जकर्त्या उमेदवाराला त्याच्या स्किलनुसार काम देण्याचे कार्य या कंपन्या करतात. भारतातील वाढती बेरोजगारीची समस्या दूर करणे हेच या रोजगार मेळाव्याचे ध्येय असते. भारतातील अनेक राज्यात हे रोजगार मेळावे भरवले जातात. सध्या महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाने राज्यातील अनेक युवकांना रोजगार प्राप्ती होणार आहे. हा मेळावा सोमवार, दिनांक १५ जुलै २०२४ रोजी, जालन्यातील गव्हर्मेंट इंडस्ट्रियल ट्रेंनिंग इन्स्टिटयूट येथे आयोजित करण्यात आला असून. अनेक युवकांचा रोजगाराचा प्रश्न सोडवला जात आहे. या मेळाव्यात विविध कंपनींनी ५५१ रिक्त पदांसाठी मुलाखती आयोजित केल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्याची अधिकृत साईट rojgar.mahaswayam.gov.in जाऊन अर्ज भरावा.

Central Railway invited applications for the vacant posts of "Apprentices

 

Central Railway invited applications for the vacant posts of "Apprentices". There are total of 2424vacancies are available. Interested and eligible candidates may apply online through given link.

Interested and eligible Applicants can apply before the 15th of August 2024 for Central Railway Recruitment 2024. The official website of Join Central Railway is https://rrccr.com.


पदाचे नाव - अप्रेंटिस

पदसंख्या - 2424 जागा

शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा - 15 - 24 वर्ष

अर्ज शुल्क - १००/-

अर्ज पद्धती -ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख - १५ ऑगस्ट २०२४

अधिकृत वेबसाईट - https://cr.indianrailways.gov.in/

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे.

उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सदर करू शकतात.

इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि थोडक्यात नाकारले जाणार नाहीत.

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२४ आहे.

होमगार्ड संघटनेअंतर्गत मोठी भरती

 

होमगार्ड संघटनेअंतर्गत मोठी भरती होणार आहे. ३४ जिल्ह्यातील एकूण ९७०० होमगार्ड पदे भरली जाणार आहे. यासाठी पत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावी पास उत्तीर्ण उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकणार आहेत 

होमगार्ड जवान या पदासाठी ९७०० जागा रिक्त आहेत. २० ते ५० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.शारिरीक विकलांग आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकत नाही.


१६ ऑगस्ट २०२४ पासून या भरती  सुरुवात होणार आहे. होमगार्ड नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.या नोकरीसाठी शारीरिक पात्रता चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर मैदानी चाचणी आणि कागदपत्रे पडताळणी केली जाईल.

या नोकरीसाठी उमेदवार ज्या जिल्ह्याचा रहिवासी आहे त्याच जिल्ह्यात नोकरी मिळणार आहे.त्यामुळे उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी जाऊन काम करणे गरजेचे नाही. याबाबत अर्ज प्रक्रिया १६ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.


ऑडिटर' पदावर सरकारी नोकरीची संधी; राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडेमी भरती

 

नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Government Job) तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडेमी, नागपूर अंतर्गत ऑडिटर पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. 

या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2024 आहे.


संस्था – राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडेमी, नागपूर

भरले जाणारे पद - ऑडिटर

पद संख्या - 15 पदे 

नोकरी करण्याचे ठिकाण - नागपूर


अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 जुलै 2024

असा करा अर्ज – (Government Job)

1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

2. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2024 आहे.

3. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

https://www.ddpdoo.gov.in/

Post job 2024

 



दरवर्षी लाखो विद्यार्थी उत्तीर्ण होऊन बाहेर पडत असतात. काही आपल्या आवडत्या क्षेत्रांमध्ये पुढे करिअर करतात तर काही लगेच स्पर्धापरिक्षांसाठी धावपळ सुरू करतात. त्यातच या विद्यार्थ्यांसाठी आणि पात्र उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

इंडिया पोस्टाकडून 44 हजारांहून अधिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे 

इंडिया पोस्टाने GDS च्या बंपर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. त्यासाठी एक लिंक इंडिया पोस्टाकडून जारी करण्यात आली आहे. या लिंकमार्फत उमेदवार आपला अर्ज दाखल करु शकतो. जे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आहेत, ते सोमवार ( 15 जुलै 2024) पासून नोंदणी करु शकतात. यासाठी तुम्हाला इंडिया पोस्टाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे. या वेबसाईटवरुन तुम्हाला भरतीसाठी अर्ज करता येईल, तसेच संबंधित माहिती देखील या वेबसाईटवर उपलब्ध असेल. त्यासाठी indiapostgdsonline.gov.in. या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. ही पदे आंध्रप्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, पंजाब, यूपी, उत्तराखंड, एमपी, राजस्थान, झारखंड राज्यांसाठी काढण्यात आली आहे. 

या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेला असावा. त्याचे वय 18 ते 40 वर्ष असावे. तसेच पात्र उमेदवाराला स्थानिक प्रदेशाच्या भाषेची व्यवस्थित माहिती असावी. उमेदवाराला सायकल चालवता यावी, अशी अट आहे. दहावीमध्ये इंग्रजी आणि गणित हे विषय अनिवार्य आहेत. ही पदे ग्रामीण डाक सेवक, शाखा पोस्ट मास्तर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्तर याकरता काढण्यात आली आहे.


या वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळा पदानुसार पगार असणार आहे. पोस्ट ऑफिस GDS, ABPM आणि GDS पोस्टचा पगार 10,000 रुपये ते 24470 रुपये प्रति महिना असेल तर बीपीएम पदाचा पगार 12 हजार ते 29,380 रुपयांपर्यंत असणार आहे 

वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळा पदानुसार पगार असणार आहे. पोस्ट ऑफिस GDS, ABPM आणि GDS पोस्टचा पगार 10,000 रुपये ते 24470 रुपये प्रति महिना असेल तर बीपीएम पदाचा पगार 12 हजार ते 29,380 रुपयांपर्यंत असणार आहे

.


जागतिक ध्यान दिवस

  २१ डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा केला जावा हा लिकटेंस्टिन या देशाने मांडलेला व भारतासह अनेक देशांनी अनुमोदन दिलेला प्रस्ताव सं...