भारतीय जीवन विमा महामंडळाने 841 सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO) आणि सहाय्यक अभियंता पदांसाठी 2025 ची भरती जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया 16 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली असून, 8 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करता येतील.
LIC AAO Recruitment 2025: भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ने सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO) आणि सहाय्यक अभियंता पदांसाठी 2025 ची बहुप्रतीक्षित भरती अधिसूचना जाहीर केली आहे. एकूण 841 पदांवर भरती होणार असून, अर्ज प्रक्रिया 16 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 8 सप्टेंबर 2025 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार LIC च्या अधिकृत वेबसाइट licindia.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
सहाय्यक अभियंता (Assistant Engineers) 81
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी – विशेषज्ञ (AAO Specialist) 410
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी – जनरलिस्ट (AAO Generalist) 350
एकूण 841
अर्ज सुरू होण्याची तारीख: 16 ऑगस्ट 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 8 सप्टेंबर 2025
पूर्व परीक्षा: अद्याप जाहीर नाही (LIC च्या वेबसाइटवर वेळोवेळी अपडेट दिला जाईल)
अर्ज शुल्क (Application Fees)
SC/ST/PwBD उमेदवारांसाठी: ₹85 + ट्रान्सॅक्शन चार्जेस + GST
इतर सर्व उमेदवारांसाठी: ₹700 + ट्रान्सॅक्शन चार्जेस + GST
निवड प्रक्रिया (Selection Process)
LIC AAO व AE भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील तीन टप्प्यांद्वारे होईल.
पूर्व परीक्षा (Preliminary Exam) – फक्त स्क्रीनिंगसाठी, याचे गुण अंतिम निवडीत धरले जाणार नाहीत.
मुख्य परीक्षा (Main Exam) – अंतिम गुणवत्तेच्या यादीत विचारात घेतले जातील.
मुलाखत (Interview) – मुख्य परीक्षेतील गुण आणि मुलाखतीतील गुण एकत्र करून अंतिम निवड केली जाईल.
No comments:
Post a Comment