रेल्वे भरती बोर्डाने २१९९७ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. याआधी शेवटची तारीख २ मार्च होती. तर अॅप्लिकेशन फी भरण्याची शेवटची तारीख ११ मार्च करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
रेल्वे ग्रुप डी पदांसाठी असिस्टंट ब्रिज, लोको शेड, असिस्टंट ऑपरेशन्स, असिस्टंट पी-वे, असिस्टंट ट्रॅक मशीन, पॉइंट्समॅन पदे भरली जाणार आहे.
www.rrbapply.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
रेल्वे ग्रुप डी पदांसाठी अर्जप्रक्रिया ३१ जानेवारीपासून सुरु झाली आहे. आता ११ मार्चपर्यंत अर्ज करु शकतात.१८ ते ३३ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, पीईटी, कागदपत्र पडताळणी, मेडिकल आणि मेरिट लिस्टद्वारे होणार आहे.
रेल्वेतील या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना बेसिक पगार १८००० रुपये मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांनी ५०० रुपये फी भरायची आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी २५० रुपये फी भरायची आहे.

No comments:
Post a Comment