मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद
ा

h 2

Showing posts with label नोकरी जाहिरात.. Show all posts
Showing posts with label नोकरी जाहिरात.. Show all posts

Monday, November 2, 2026

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा शिकाऊ भरती...2026

 






आवश्यक शैक्षणिक पात्रता, वय विद्यावेतन, इत्यादी बाबतचा तपशील सोबतच्या विहित नमुन्यातील मागणी पत्रात दिलेला आहे. एक वर्षांचे शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केल्यानंतर सदर शिकाऊ उमेदवारांस रा.प. महामंडळ, सातारा विभागात सहाय्यक पदाच्या सरळसेवा भरतीच्या वेळी सहाय्यक पदासाठी थेट अर्ज करता येईल. मात्र त्यांना महामंडळाच्या सेवेत सामावून घेण्याचे बंधन रा.प. महामंडळावर राहणार नाही. कृपया याची नोंद घ्यावी.


शिकाऊ उमेदवारीकरिता अर्ज करणारे उमेदवार सन २०२४, २०२५, २०२६ या वर्षी आय.टी.आय. परिक्षा उत्तीर्ण झालेले असावेत.


सदर प्रक्रियेत कालमर्यादा असल्याने आपल्या संस्थेतून आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना www.apprenticeshipindia.gov.in 

या संकेत स्थळावर रजिस्ट्रेशन करुन (Establishment Name DIVISIONAL CONTROLLER MSRTC SATARA E06162700168) या नावाने Establishment Search करून विहीत पात्रता पुर्ण करत असलेल्या व्यवसायाला उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. वरील पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतरच उमेदवारांची माहिती पोर्टलवर उपलब्ध होते व अशी माहिती उपलब्ध होणाऱ्या उमेदवारांचाच शिकाऊ उमेदवारीसाठी विचार करण्यात येईल.


१. वरील सर्व पदासाठी प्रशिक्षणाचा कालावधी/वयोमर्यादा रा.प. परिपत्रकीय सुचनांप्रमाणे राहिल.


२. ज्या उमेदवारांस संबंधित व्यवसाय (ट्रेड) कोर्स मिळालेनंतर एक वर्ष किंवा जास्त काळापर्यंत याआधी प्रशिक्षण घेतले असेल अगर कामाचा अनुभव घेतला असेल त्यांची निवड शिकाऊ उमेदवार म्हणून करता येणार नाही.


३. उपरोक्त संदर्भित पदातील व्यवसाय (ट्रेड) कोर्स, उत्तीर्ण झाले उत्तीणून उमेदवारास शिकाऊ उमेदवार म्हणून नियुक्त करावयाच्या तारखेपर्यंतचा कालावधी हा तीन वर्षांपेक्षा जास्त असला तरी, उमेदवारांनी शिकाऊ उमेदवारीसाठी त्यांचे नावाची नोंद उपरोक्त तीन वर्षाच्या कालावधीत मा. रिजनल बोर्ड ऑफ अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग यांचे कार्यालयात केलेली असणे आवश्यक आहे. गॅप तीन वर्षांपेक्षा जास्त असलेल्या व मा. रिजनल बोर्ड ऑफ अॅप्रेन्टिसशिप ट्रेनिंग यांचेकडे मुदतीत नावे न नोंदविलेल्या उमेदवारांचा शिकाऊ उमेदवारीसाठी विचार केला जाणार नाही.


४. शिकाऊ उमेदवाराने भरती प्रक्रिया शुल्क म्हणून खुल्या प्रवर्गासाठी रु.५९०/ जी.एस.टी. सह व मागासवर्गीयांसाठी रु.२९५/- जी.एस.टी. सह "M.S.R.T.Corporation Fund Account Satara" यांचे नावे काढलेला राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट (डी.डी.), ऑफलाईन अर्ज (ऑफलाईन छापील अर्ज या कार्यालयात देण्यात येईल) व इतर आवश्यक कागदपत्रांसह विभागीय कार्यालय राज्य परिवहन सातारा येथे प्रत्यक्ष हजर राहुन कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) दि. १७/११/२०२६ पर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. भरती प्रक्रिया शुल्क इतर कोणत्याही स्वरुपात स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.


५. शिकाऊ उमेदवारी रा.प. महामंडळामध्ये मिळाल्यानंतर जे शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण कालावधी पूर्ण होण्यापूर्वी प्रशिक्षण सोडून जातील अशा शिकाऊ उमेदवारांकडून एक महिन्याचे विद्यावेतन वसूल करण्यात येईल.


रा.प. महामंडळात शिकाऊ उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांस पूर्ण वर्षात २४० दिवस प्रशिक्षणासाठी हजर राहणे बंधनकारक आहे. जे शिकाऊ उमेदवार २४० दिवस प्रत्यक्ष हजर राहणार नाहीत असे उमेदवार अखिल भारतीय व्यवसाय परिक्षेसाठी पात्र होणार नाहीत. रा.प. महामंडळाकडून भविष्यात घेतल्या जाणाऱ्या सरळसेवा भरती प्रक्रियेमध्ये शिकाऊ उमेदवारीस अनुसरून कोणतेही प्राधान्य दिले जाणार नाही हे कृपया उमेदवारांना अवगत करणेत यावे.

Wednesday, October 28, 2026

दि. हिंदुस्थान को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई 100 पदे भरती..

 दि. हिंदुस्थान को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई लिपिक आणि शिपाई पदांच्या भरतीसाठी जाहिरात


दि. हिंदुस्थान को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई ही महाराष्ट्र राज्यात कार्यक्षेत्र असलेली सहकारी बँक असून, बँकेच्या महाराष्ट्रात एकूण 26 शाखा आहेत.


बँकेमध्ये रिक्त असलेल्या पदांसाठी खालीलप्रमाणे भरती करण्यात येणार आहे.


* लिपिक पदे: 60


* शिपाई पदे: 50


* एकूण रिक्त पदे: 110


### अर्ज करण्याची माहिती


* अर्ज पद्धत: ऑनलाइन


* अर्ज सुरू होण्याची तारीख: 17 ऑक्टोबर 2026


* अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 ऑक्टोबर 2026, सायंकाळी 5 वाजेपर्यंत


* परीक्षा शुल्क: ₹1,000 + 18% GST + व्यवहार शुल्क

 अधिकृत वेबसाइट


अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्जासाठी जाहिरातीत दिलेली वेबसाइट:

https://sznsbal.com



 जाहिरातीत दिलेली अर्जाची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2026 आहे. 


Wednesday, August 5, 2026

संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ..

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. उमेदवारांच्या मागणीचा विचार करून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 10 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत, तर ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 13 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.

एकूण 5,707 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, पूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकानुसार विविध मागण्यांचा समावेश करून पदसंख्या वाढविण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नसून, त्यांनी 'My Account' या पर्यायातून संबंधित माहिती अद्ययावत करावी




Monday, July 27, 2026

DRDO जेआरएफ पदांवर भरती2026

DRDO वॉक-इन मुलाखतीच्या माध्यमातून JRF पदांवर भरती होणार आहे. पात्र उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात, जी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाईल.



सायंटिफिक ग्रुप साठी देखील आहे. ज्या उमेदवारांकडे २ वर्षांचा अनुभव असेल, त्यांची या पदासाठी निवड केली जाऊ शकते. चला, पात्रता आणि इतर तपशीलांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.


कोणत्या पात्रतेची गरज आहे?


गणित: प्रथम श्रेणी पोस्ट ग्रॅज्युएशन आणि नेट उत्तीर्ण.



संगणक विज्ञान : प्रथम श्रेणीसह B.E/B.Tech + वैध NET/GATE स्कोर किंवा M.E/M.Tech.


इलेक्ट्रॉनिक्स : प्रथम श्रेणीसह B.E/B.Tech + वैध NET/GATE स्कोर किंवा M.E/M.Tech पदवी.


भौतिकशास्त्र : प्रथम श्रेणी/पोस्ट ग्रॅज्युएट पदवी आणि NET उत्तीर्ण.


वयोमर्यादा: वॉक-इन मुलाखतीच्या तारखेपर्यंत कमाल वय २८ वर्षे आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल.


किती पगार मिळेल?


गणित पदासाठी अर्ज करणारे उमेदवार ५ ऑगस्ट २०२६ रोजी वॉक-इन मुलाखतीसाठी जाऊ शकतात. याशिवाय संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि भौतिकशास्त्र या विषयांच्या जेआरएफ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवावे. लवकरच मुलाखतीच्या तारखेची घोषणा होऊ शकते.  पदावर दरमहा ३७,००० रुपये वेतन दिला जाईल. मुलाखतीच्या वेळी अर्ज तसेच पदवी आणि इतर कागदपत्रे सादर करावी लागतील.

मुलाखतीसाठी कुठे जावे लागेल?


मुलाखतीच्या तारखा वेगवेगळ्या असू शकतात. तथापि, त्याचे आयोजन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात केले जाऊ शकते. पात्र उमेदवारांना सकाळी ९ ते ११ या वेळेत मुलाखतीसाठी सांगितलेल्या पत्त्यावर जावे लागेल. मुलाखतीसाठी ‘मेन गेट रिसेप्शन,  हाऊस, दिल्ली-११००५४’ येथे जावे लागेल. लक्षात ठेवा की, मुलाखतीच्या वेळी सोबत लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, कॅमेरा आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास परवानगी असणार नाही. तसेच, मुलाखतीला जाण्यापूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.


अशी करा अर्ज प्रक्रिया? अधिकृत वेबसाइटवर संबंधित अर्ज डाउनलोड करण्याची लिंक मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर अर्ज डाउनलोड करा आणि विचारलेली सर्व माहिती भरा. त्यानंतर भरलेला फॉर्म स्कॅन करून saghr.sag@gov.in या ईमेलवर पाठवा. लक्षात ठेवा की, या अर्जाची हार्ड कॉपी मुलाखतीच्या दिवशी सोबत घेऊन जावी लागेल.

Friday, April 10, 2026

MpSC भरती जाहिरात.2020

 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी) मार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त भरती २०२६ ची बहूप्रतीक्षित जाहिरात अखेर प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उप निरीक्षक अश तीन पदांचा समावेश आहे. 

एकूण ५५२ जागांचा समावेश असून यासाठी महाराष्ट्राती ३७ परीक्षा केंद्रावर रविवार १४ जूनला परीक्षा घेण्यात येणार आहे 




सैनिक स्कूल सातारा प्रवेश प्रक्रिया २०२७-२८ सुरू!

  सैनिक स्कूल सातारा प्रवेश प्रक्रिया २०२७-२८ सुरू! ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू; २ डिसेंबरपर्यंत अर्जाची मुदत सातारा : सैनिक स्कूल...