सैनिक स्कूल सातारा प्रवेश प्रक्रिया २०२७-२८ सुरू!
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू; २ डिसेंबरपर्यंत अर्जाची मुदत
सातारा : सैनिक स्कूल सातारा येथे शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी इयत्ता सहावी आणि नववीच्या प्रवेश परीक्षेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थी व पालकांसाठी ही महत्त्वाची संधी असून, प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत २ डिसेंबर २०२६ अशी आहे.
इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी ३१ मार्च २०२७ रोजी विद्यार्थ्यांचे वय १० ते १२ वर्षे, तर इयत्ता नववीच्या प्रवेशासाठी १३ ते १५ वर्षे असणे आवश्यक आहे.
प्रवेशासाठी इच्छुक पालकांनी ३ नोव्हेंबर २०२६ ते २ डिसेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहिती, पात्रता निकष, परीक्षा पद्धती आणि अर्ज भरण्यासाठी खालील अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
अधिकृत संकेतस्थळ :
https://exams.nta.nic.in/sainik-school-society/
पालकांसाठी आवाहन : आपल्या पाल्याला सैनिक शाळेत शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करावा. अंतिम तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

No comments:
Post a Comment