आवश्यक शैक्षणिक पात्रता, वय विद्यावेतन, इत्यादी बाबतचा तपशील सोबतच्या विहित नमुन्यातील मागणी पत्रात दिलेला आहे. एक वर्षांचे शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केल्यानंतर सदर शिकाऊ उमेदवारांस रा.प. महामंडळ, सातारा विभागात सहाय्यक पदाच्या सरळसेवा भरतीच्या वेळी सहाय्यक पदासाठी थेट अर्ज करता येईल. मात्र त्यांना महामंडळाच्या सेवेत सामावून घेण्याचे बंधन रा.प. महामंडळावर राहणार नाही. कृपया याची नोंद घ्यावी.
शिकाऊ उमेदवारीकरिता अर्ज करणारे उमेदवार सन २०२४, २०२५, २०२६ या वर्षी आय.टी.आय. परिक्षा उत्तीर्ण झालेले असावेत.
सदर प्रक्रियेत कालमर्यादा असल्याने आपल्या संस्थेतून आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना www.apprenticeshipindia.gov.in
या संकेत स्थळावर रजिस्ट्रेशन करुन (Establishment Name DIVISIONAL CONTROLLER MSRTC SATARA E06162700168) या नावाने Establishment Search करून विहीत पात्रता पुर्ण करत असलेल्या व्यवसायाला उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. वरील पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतरच उमेदवारांची माहिती पोर्टलवर उपलब्ध होते व अशी माहिती उपलब्ध होणाऱ्या उमेदवारांचाच शिकाऊ उमेदवारीसाठी विचार करण्यात येईल.
१. वरील सर्व पदासाठी प्रशिक्षणाचा कालावधी/वयोमर्यादा रा.प. परिपत्रकीय सुचनांप्रमाणे राहिल.
२. ज्या उमेदवारांस संबंधित व्यवसाय (ट्रेड) कोर्स मिळालेनंतर एक वर्ष किंवा जास्त काळापर्यंत याआधी प्रशिक्षण घेतले असेल अगर कामाचा अनुभव घेतला असेल त्यांची निवड शिकाऊ उमेदवार म्हणून करता येणार नाही.
३. उपरोक्त संदर्भित पदातील व्यवसाय (ट्रेड) कोर्स, उत्तीर्ण झाले उत्तीणून उमेदवारास शिकाऊ उमेदवार म्हणून नियुक्त करावयाच्या तारखेपर्यंतचा कालावधी हा तीन वर्षांपेक्षा जास्त असला तरी, उमेदवारांनी शिकाऊ उमेदवारीसाठी त्यांचे नावाची नोंद उपरोक्त तीन वर्षाच्या कालावधीत मा. रिजनल बोर्ड ऑफ अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग यांचे कार्यालयात केलेली असणे आवश्यक आहे. गॅप तीन वर्षांपेक्षा जास्त असलेल्या व मा. रिजनल बोर्ड ऑफ अॅप्रेन्टिसशिप ट्रेनिंग यांचेकडे मुदतीत नावे न नोंदविलेल्या उमेदवारांचा शिकाऊ उमेदवारीसाठी विचार केला जाणार नाही.
४. शिकाऊ उमेदवाराने भरती प्रक्रिया शुल्क म्हणून खुल्या प्रवर्गासाठी रु.५९०/ जी.एस.टी. सह व मागासवर्गीयांसाठी रु.२९५/- जी.एस.टी. सह "M.S.R.T.Corporation Fund Account Satara" यांचे नावे काढलेला राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट (डी.डी.), ऑफलाईन अर्ज (ऑफलाईन छापील अर्ज या कार्यालयात देण्यात येईल) व इतर आवश्यक कागदपत्रांसह विभागीय कार्यालय राज्य परिवहन सातारा येथे प्रत्यक्ष हजर राहुन कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) दि. १७/११/२०२६ पर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. भरती प्रक्रिया शुल्क इतर कोणत्याही स्वरुपात स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
५. शिकाऊ उमेदवारी रा.प. महामंडळामध्ये मिळाल्यानंतर जे शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण कालावधी पूर्ण होण्यापूर्वी प्रशिक्षण सोडून जातील अशा शिकाऊ उमेदवारांकडून एक महिन्याचे विद्यावेतन वसूल करण्यात येईल.
रा.प. महामंडळात शिकाऊ उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांस पूर्ण वर्षात २४० दिवस प्रशिक्षणासाठी हजर राहणे बंधनकारक आहे. जे शिकाऊ उमेदवार २४० दिवस प्रत्यक्ष हजर राहणार नाहीत असे उमेदवार अखिल भारतीय व्यवसाय परिक्षेसाठी पात्र होणार नाहीत. रा.प. महामंडळाकडून भविष्यात घेतल्या जाणाऱ्या सरळसेवा भरती प्रक्रियेमध्ये शिकाऊ उमेदवारीस अनुसरून कोणतेही प्राधान्य दिले जाणार नाही हे कृपया उमेदवारांना अवगत करणेत यावे.


No comments:
Post a Comment