मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

महिला व बालविकास विभागात तब्बल २५८ पदांसाठी जाहिरात ..

 Mpsc मार्फत.महिला व बालविकास विभागात तब्बल २५८ पदांसाठी जाहिरात देण्यात आलेली आहे.

महिला व बालविकास आयुक्तालयांतर्गत अधीक्षक / निरीक्षक प्रमाणित शाळा व तत्सम संवर्गाकरीता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ची जाहिरात एमपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. एकूण पदे २५८ असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ डिसेंबर आहे.

महिला व बाल विकास आयुक्तालयांतर्गत अधिक्षक / निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था /रचना व कार्यपध्दती अधिकारी / अधिव्याख्याता / जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी /सांख्यिकी अधिकारी गट-ब (राजपत्रित) आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयांतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण), गट-ब या पदांवर निवडीद्वारे नियुक्तीकरीता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५ करिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

फक्त महिला व बाल विकास विभागातील आणि ग्राम विकास विभागातील कर्मचा-यांना खालील संवर्गातील पदावर निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महिला व बाल विकास आयुक्तालयांतर्गत अधिक्षक / निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था / रचना व कार्यपध्दती अधिकारी / अधिव्याख्याता / जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी / सांख्यिकी अधिकारी गट-ब (राजपत्रित) आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयांतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण), गट-ब या पदांवर निवडीद्वारे नियुक्तीकरीता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ आयोजित करण्यात येईल. प्रस्तुत परीक्षेचा दिनांक, परीक्षा केंद्र, परीक्षेचे स्वरुप (Online/Offline) स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.

२. संवर्गाचे नाव :- महिला व बाल विकास आयुक्तालयांतर्गत अधिक्षक / निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था / रचना व कार्यपध्दती अधिकारी / अधिव्याख्याता / जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी / सांख्यिकी अधिकारी गट-ब (राजपत्रित) आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयांतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण), गट-ब

३. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया/कालावधी – विषयांकित संवर्गाच्या जाहिरातीस अनुसरून ऑनलाईल पद्धतीने अर्ज सादर करण्याचा कालावधी खालीलप्रमाणे राहील :-

दिनांक २४ नोव्हेंबर, २०२५ पासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल. तर १४ डिसेंबर, २०२५ पर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी १४ डिसेंबर, २०२५ पर्यंत मुदत आहे.

No comments:

Post a Comment

महिला व बालविकास विभागात तब्बल २५८ पदांसाठी जाहिरात ..

 Mpsc मार्फत. महिला व बालविकास विभागात तब्बल २५८ पदांसाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. महिला व बालविकास आयुक्तालयांतर्गत अधीक्षक / निरीक्षक प्...