मुंबई येथील उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्यातील जिल्हा न्यायाधीशांच्या ८९ रिक्त पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. पदाची वेतनश्रेणी, पात्रता निकष, अनुभव, वय, इत्यादी माहिती सविस्तर जाहिरातीत नमूद केलेली आहे. ही सविस्तर जाहिरात व अर्ज, उच्च न्यायालयाच्या https://bombayhighcourt.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरून दिनांक ३० जानेवारी, २०२६ रोजी सकाळी १०.३० नंतर प्राप्त होऊ शकेल. ऑनलाईन अर्ज सदर संकेतस्थळामार्फत दिनांक १७ फेब्रुवारी, २०२६ च्या सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर सदर संकेतस्थळ दुवा (वेबलिंक) बंद करण्यात येईल.
रिक्त पदांत बदल संभवतो. जो केवळ अधिकृत संकेतस्थळावर सुचित केला जाईल, तशा परिस्थितीत पुन्हा नव्याने अर्ज मागवले जाणार नाहीत.


No comments:
Post a Comment