समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत गट क संवर्गामधील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक अशा विविध पदांच्या एकूण २१९ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
समाज कल्याण विभाग पुणेअंतर्गत गट क संवर्गामधील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक अशा विविध पदांच्या एकूण २१९ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून त्यासाठी ११ नोव्हेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
समाज कल्याण आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील एकूण २१९ रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी, सदर पदांसाठी आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. समाज कल्याण आयुक्तालयाच्या https://sjsa.mahararashtra.gov.in या संकेतस्थळावर ११ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक -५ पदे, गृहपाल (महिला) - ९२ पदे, गृहपाल (सर्वसाधारण) - ६१ पदे, समाज कल्याण निरीक्षक - ३९ पदे, उच्चश्रेणी लघुलेखक - १० पदे, निम्नश्रेणी लघुलेखक -३ पदे, लघुटंकलेखक - ९ पदे अशा एकूण २१९ जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवीचे शिक्षण घेतलेले असावे. शिवाय महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४३ दरम्यान असणार आहे. तर यासाठी खुल्या प्रवर्गाला १ हजार रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे तर राखीव प्रवर्गासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क असणार आहे.