1500 पदासाठी उमेदावार ऑनलाइन अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 24 ऑक्टोबरपासून बँकेच्या
www.unionbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटवर सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 नोव्हेंबर 2024 आहे. चला जाणून घेऊया अधीक माहिती.
अशी आहे शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये स्थानिक बँक अधिकारी (LBO) पदासाठी अर्ज करणारा उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. यासोबतच उमेदवाराचे किमान वय 20 वर्षांपेक्षा कमी आणि कमाल वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल. 1 ऑक्टोबर 2024 ही तारीख लक्षात घेऊन वयाची गणना केली जाईल.
अशी केली जाईल निवड
या पदासाठी उमेदवाराची ऑनलाइन परीक्षा / गट चर्चा, स्क्रीनिंग टेस्ट किंवा वैयक्तिक मुलाखत घेत निवड केली जाईल. या परिक्षेसाठी सामान्य, EWS, OBC गटातील उमेदवारांना 850 रुपये अर्ज फी तर SC, ST, PWBD गटातील उमेदवारांना 175 रुपये अर्ज फी द्यावी लागणार आहे.
इतका मिळणार पगार
या भरतीप्रक्रीयेंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमाह 48480 ते 85920 इतके वेतन दिले जाईल.
असा करा अर्ज
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी प्रथम बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
संकेतस्थळावर मुख्यपृष्ठावर जात भरती ऑप्शनवर जा आणि नंतर वर्तमान भरती या ऑप्शनला क्लिक करा.
नवीन पृष्ठावरील Click Here For Apply वर क्लिक करा.
यानंतर एक नवीन पोर्टल उघडेल जिथे नोंदणी लिंकवर क्लिक करून प्रथम नोंदणी करा.
नोंदणी केल्यानंतर, उमेदवारांनी इतर तपशील, स्वाक्षरी, छायाचित्र अपलोड करावे.
शेवटी, उमेदवारांनी विहित शुल्क जमा करावे आणि पूर्णपणे भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घ्यावी.
No comments:
Post a Comment