जुन्या वाहनांवर 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (एचएसआरपी) बसवण्यासाठी शासनाने पुन्हा एकदा ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. यानंतरही ज्या वाहनांवर 'एचएसआरपी' प्लेट नसेल, त्यांच्यावर १ डिसेंबरपासून वायुवेग पथकाद्वारे कायदेशीर कारवाई केली जाईल
१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या राज्यातील सर्व वाहनांना 'एचएसआरपी' लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही मोहीम १ जानेवारी २०२५ पासून सुरू झाली असून, तीनदा मुदतवाढ देण्यात आली. विशेष म्हणजे, अंतिम मुदत १५ आॅगस्ट, २०२५ पर्यंत होती. मात्र, काही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे ही मुदत वाढवण्यात येत असल्याचे कारण पुढे करीत परिवहन आयुक्त भिमनवार यांनी चौथ्यांदा मुदतवाढ दिली. तसे पत्र गुरुवारी सर्व आरटीओ कार्यालयात धडकले.
No comments:
Post a Comment