महाराष्ट्रातील महत्वाच्या संघटना व त्यांचे संस्थापक:

महाराष्ट्रातील महत्वाच्या संघटना व त्यांचे संस्थापक:


1. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन

 - फिरोजशहा मेहता  


2. बॉम्बे असोसिएशन

  - जगन्नाथ शंकरशेठ  


3. डेक्कन एज्यूकेशन सोसायटी

  - टिळक, आगरकर  


4. प्रार्थना समाज 

 - डॉ. आत्माराम पांडुरंग  


5. परमहंस सभा/मंडळी, ज्ञान प्रसारक सभा, मानवधर्म सभा

  - दादोबा पांडुरंग तर्खडकर  


6. भारत सेवक समाज 

 - गोपाळ कृष्ण गोखले  


7. सत्यशोधक समाज 

- महात्मा फुले  


8. आर्य समाज

 - स्वामी दयानंद सरस्वती  

9. डिप्रेस्ड क्लासेस मिशन, यंग थिईस्ट युनियन, अस्पृश्यता निवारक मंडळ

 - विठ्ठल रामजी शिंदे  


10. रयत शिक्षण संस्था

 - कर्मवीर भाऊराव पाटील  


11. भिल सेवा मंडळ

  - ठक्कर बाप्पा  


12. बहिष्कृत हितकारिणी सभा, समाज समता संघ, लेबर पार्टी ऑफ इंडिया, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन

  - डॉ. बाबासाहेब आंबेडकर  


13. भारत कृषक समाज

 - डॉ. पंजाबराव देशमुख  


14. स्त्री विचारवती संस्था

  - सरस्वतीबाई जोशी  


15. न्यू इंग्लिश स्कूल

 - टिळक, आगरकर, चिपळूणकर  


16. भारतीय सामाजिक परिषद

  - न्या. महादेव गोविंद रानडे  


17. मिल हॅण्ड असोसिएशन

 - नारायण मेघाजी लोखंडे


 *

महाराष्ट्रातील साहित्य, वृत्तपत्रे व त्यांचे संपादक:

 



 महाराष्ट्रातील साहित्य, वृत्तपत्रे व त्यांचे संपादक:


1. दर्पण - बाळशास्त्री जांभेकर  

2. दिग्दर्शन (मासिक) - बाळशास्त्री जांभेकर  

3. प्रभाकर (साप्ताहिक) - भाऊ महाजन  

4. केसरी (मराठी) - लोकमान्य टिळक  

5. मराठा (इंग्रजी साप्ताहिक) - लोकमान्य टिळक  

6. सुधारक - गो. ग. आगरकर  

7. उपासना (साप्ताहिक) - वि. रा. शिंदे  

8. सुबोध पत्रिका - प्रार्थना समाज  

9. स्वराज्य पत्र (साप्ताहिक) - शि. म. परांजपे  

10. दिनबंधू (साप्ताहिक) - कृष्णराव भालेकर  

11. समाज स्वास्थ (मासिक) - रघुनाथ धोंडो कर्वे  

12. काँग्रेस, साधना (साप्ताहिक) - साने गुरुजी  

13. विद्यार्थी - साने गुरुजी  

14. हितेच्छू (साप्ताहिक) - गोपाळ हरी देशमुख  

15. काळ (साप्ताहिक) - शि. म. परांजपे  

16. स्वराज्य - शि. म. परांजपे  

17. शालापत्रक - कृष्णशास्त्री चिपळूणकर

पक्षी/प्राणी यांचे हृदयाचे कप्पे


मानवी शरीर म्हणजे अविष्कार आहे 

यामध्ये प्रत्येक प्राण्याची शरीर रचना वेगळी आहे  

हृदयाचे कप्पे सुद्धा वेगवेगळे आहेत ते खालील प्रमाणे

पक्षी/प्राणी यांचे हृदयाचे कप्पे


1. मानव = 4


2. माकड, कावळा, घार = 4


3. हत्ती, अजगर = 4


4. मगर = 4


5. ससा = 4


6. वाघ, घोडा = 4


7. मासे = 2


8. बेडूक, कासव, सरडा, साप = 3


9. पोपट, कबुतर = 4


10. मोर, शहामृग, इमू = 4

कृषिविषयक प्रमाणे व एकके:

 कृषिविषयक प्रमाणे व एकके:


1. 1 एकर = 43,560 चौ. फूट

2. 1 एकर = 40 गुंठे

3. 1 एकर = 1,702 बिघा

4. 1 एकर = 0.40671 हेक्टर

5. 1 एकर = 4,840 चौ. यार्ड

6. 1 विघा = 25,600 चौ. फूट

7. 1 बिघा = 23.5 गुंठा

8. 1 चौ. मैल = 640 एकर

9. 1 गुंठा = 1,089 चौ. फुट

10. 1 गुंठा = 1 आर

11. 1 हेक्टर = 2.5 एकर

12. 1 हेक्टर = 100 गुंठा

13. 1 हेक्टर = 100 आर

14. 1 एकर = 40 आर

छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळ:*

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याच्या राज्यकारभार चालण्यासाठी निर्माण केलेल्या अष्टप्रधान मंडळ खालील प्रमाणे


1. मोरो त्रिंबक पिंगळे - मुख्य प्रधान  

   - राज्यकारभार चालवणे आणि जिंकलेल्या प्रदेशाचे व्यवस्थापन करणे.


2. रामचंद्र निळकंठ मुजुमदार- अमात्य  

   - राज्याचा जमाखर्च पाहणे.


3. अण्णाजी दत्तो- सचिव  

   - सरकारी आज्ञापत्रे तयार करणे.


4. दत्ताजी त्रिंबक वाकनीस- मंत्री  

   - पत्रव्यवहार सांभाळणे.


5. हंबीरराव मोहिते - सेनापती  

   - सैन्याची व्यवस्था पाहणे आणि राज्याचे रक्षण करणे.


6. रामचंद्र त्रिंबक डबीर- सुमंत  

   - परराज्याशी संबंध ठेवणे.


7. निराजी रावजी- न्यायाधीश  

   - न्यायदान करणे.


8. मोरेश्वर पंडितराव - पंडित  

   - धार्मिक व्यवहार पाहणे.



बृहन्मुंबई महानगर पालिकेने कार्यकारी सहाय्यक पदाच्या 30 जागांवर भरती जाहीर

 सरकारी नोकरीच्या शोधात असेलल्या उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे. देशातील सर्वात मोठ्या महानगर पालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगर पालिकेने कार्यकारी सहाय्यक पदाच्या 30 जागांवर भरती जाहीर केली आहे.

कोणत्याही शाखेतून पदवीधर झालेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. 5 ऑगस्टपासून ही भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या अर्ज मागवण्यात आले आहेत.


अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हे लक्षात घ्या की या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 ठेवण्यात आली आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात देखील प्रकाशित करण्यात आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, इतर आवशक्यक बाबी, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत यासंदर्भातील सविस्तर माहिती जाहिरातीत देण्यात आली आहे.

भरतीमध्ये एकूण 30 रिक्त जागा भरल्या जाणार


बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 30 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे किंवा मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुमचा अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवा.



बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात असेल नोकरी


या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याचा पत्ता आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.



आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा


सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास,12वी पास असावा आणि सोबत मान्यताप्राप्त विद्यापीठातून कला,विज्ञान,वाणिज्य/कायदा पदवीधर असावा. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्ष दरम्यान असावे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आवश्यक नाही.

निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईत नोकरी


या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात नोकरी मिळणार आहे. त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही. महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन देखील दिले जाईल. पण हे लक्षात घ्या की ही पदं कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. त्यामुळे कायमस्वरुपी नोकरीच्या सवलती यात लागू नसतील. या भरतीसाठी अर्ज करण्याचा पत्ता आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.



अर्ज करण्याची प्रक्रिया


या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावेत.

अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज 09 ऑगस्ट 2024 पर्यंत पाठवावा.

अर्ज करताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत.

अपूर्ण किंवा चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जातील याची अर्जदारांनी नोंद घ्यावी.

राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरावी आणि संबंधित सर्व कागदपत्रे जोडावीत.

फोटो जोडत असताना तो आत्ताचा असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.

पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलवर किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.

अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता - बा.य.ल.नागर धर्मा रुग्णालय,डॉ.ए.एल.नायर रोड, मुंबई सेन्ट्रल, मुंबई - 400008


महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागा मध्ये विविध पदांच्या भरती

 DTP Maharashtra Recruitment 2024 – महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागा मध्ये विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 289 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात 30 जुलै 2024 पासून झाली असून ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.



रचना सहाय्यक (Rachna Sahayyak) : मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (B. E. / B. Tech. Civil) किंवा Civil Rural Engineering किंवा Architecture किंवा Construction Technology

निन्मश्रेणी लघुलेखक (Lower Grade Stenographer) : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास + शॉर्टहँड स्पीड 100 श.प्र.मि. आणि इंग्लिश टायपिंग स्पीड 40 श.प्र.मि. किंवा 30 श.प्र.मि. मराठी टायपिंग.

उच्चश्रेणी लघुलेखक (Higher Grade Stenographer) : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास + शॉर्टहँड स्पीड 120 श.प्र.मि. आणि इंग्लिश टायपिंग स्पीड 40 श.प्र.मि. किंवा 30 श.प्र.मि. मराठी टायपिंग.

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा



अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन


वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे


अर्ज फी : 1000/- रुपये (SC / ST : 900/- रुपये )


वेतन श्रेणी :


रचना सहाय्यक (Rachna Sahayyak) : 38,600/- ते 1,22,800/- रुपये

निन्मश्रेणी लघुलेखक (Lower Grade Stenographer) : 38,600 ते 1,22,800/- रुपये

उच्चश्रेणी लघुलेखक (Higher Grade Stenographer) : 41,800 ते 1,32,300/- रुपये

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र



अर्ज सुरु होण्याची तारीख : 30 जुलै 2024


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024


अधिकृत वेबसाईट : dtp.maharashtra.gov.in

Mahavitaran Beed Bharti 2024

 महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत इलेक्ट्रिशियन, वायरमन या पदांच्या रिक्त जागा आहे. त्या पदांच्या एकूण 46 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी इच्छुकानी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करायचा आहे. त्याचप्रमाणे 8 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्वाची माहिती | Mahavitaran Beed Bharti 2024

  • पदाचे नाव - इलेक्ट्रिशियन, वायरमन
  • पदसंख्या - 46 जागा
  • इलेक्ट्रिशन - 23 जागा
  • वायरमन - 23 जागा
  • वयोमर्यादा - 18 वर्ष
  • नोकरीचे ठिकाण - बीड
  • अर्ज पद्धती- ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 8 ऑगस्ट 2024
  • शैक्षणिक पात्रता - दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण

अर्ज कसा करावा ? | Mahavitaran Beed Bharti 2024

  • त्या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा
  • 8 ऑगस्ट २०२४ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • खाली दिलेल्या लिंक वरून देखील तुम्ही थेट अर्ज करू शकता

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) पद भरती

 

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने आज ibps.in या अधिकृत वेबसाइटवर प्रोबेशनरी ऑफिसर्स/मॅनेजमेंट ट्रेनीज (CRP PO/MT) साठी भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली.

महत्त्वाच्या तारखा

अर्जाची ऑनलाइन नोंदणी केव्हा सुरु होईल – ०१/०८/२०२४

अर्जाची नोंदणीची शेवटची तारीख – २१/०८/२०२४

अर्ज तपशील दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख – २१/०८/२०२४

तुमचा अर्ज प्रिंट करण्याची शेवटची तारीख – ०५/०९/२०२४

ऑनलाइन शुल्क भरणा्याची शेवटची – २१/०८/२०२४ 

IBPS PO 2024: अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता


उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे नोंदणीच्या तारखेला एक वैध मार्कशीट/प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे ज्यामध्ये ते पदवीधर असल्याचे दर्शविते आणि पदवीमध्ये मिळालेल्या गुणांसह.


IBPS PO 2024 साठी अर्ज कसा करावा


IBPS PO 2024: अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता

उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे नोंदणीच्या तारखेला एक वैध मार्कशीट/प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे ज्यामध्ये ते पदवीधर असल्याचे दर्शविते आणि पदवीमध्ये मिळालेल्या गुणांसह.


अर्ज करण्यासाठी थेट लिंक येथे आहे – https://ibpsonline.ibps.in/crppo14jul24/ / https://www.ibps.in/index.php/specialist-officers-xiv/

केंद्र शासन सेवेत 10 वी पात्रता धारकांसाठी सफाई कर्मचारी , माळी , न्हावी इ. पदांसाठी मोठी पदभरती









 केंद्र शासन सेवेत 10 वी पात्रता धारकांसाठी सफाई कर्मचारी , माळी , न्हावी इ. पदांसाठी मोठी पदभरती , राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विही कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indo – Tibetan Border Police Recruitment for Barber / Cleaner / Gardenr & Sub Inspector Post , Number of Post Vacancy – 160 )

 Education Qualification ) :

पद क्र .01 व 02 साठी : सदर पदांकरीता उमदेवार हे इयत्ता 10 वी उत्तीण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.03 साठी : इयत्ता 10 वी उत्तीर्ण आयटीआय प्रमाणपत्र / डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.04 साठी : उमेदवार हे इंग्रजी विषयांसह हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी , ट्रांसलेशन डिप्लोमा ..

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधार उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment.itbpolice.nic.in/rect/index.php या संकेतस्थळावर दिनांक 26 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता 01 ते 03 साठी 100/- रुपयेतर पद क्र.04 साठी 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईज , मागास प्रवर्ग / माजी सैनिक / महिलांसाठी परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

हे 

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने विविध पदांसाठी भरती जाहीर..

  इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनि...