DTP Maharashtra Recruitment 2024 – महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागा मध्ये विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 289 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात 30 जुलै 2024 पासून झाली असून ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
रचना सहाय्यक (Rachna Sahayyak) : मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (B. E. / B. Tech. Civil) किंवा Civil Rural Engineering किंवा Architecture किंवा Construction Technology
निन्मश्रेणी लघुलेखक (Lower Grade Stenographer) : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास + शॉर्टहँड स्पीड 100 श.प्र.मि. आणि इंग्लिश टायपिंग स्पीड 40 श.प्र.मि. किंवा 30 श.प्र.मि. मराठी टायपिंग.
उच्चश्रेणी लघुलेखक (Higher Grade Stenographer) : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास + शॉर्टहँड स्पीड 120 श.प्र.मि. आणि इंग्लिश टायपिंग स्पीड 40 श.प्र.मि. किंवा 30 श.प्र.मि. मराठी टायपिंग.
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे
अर्ज फी : 1000/- रुपये (SC / ST : 900/- रुपये )
वेतन श्रेणी :
रचना सहाय्यक (Rachna Sahayyak) : 38,600/- ते 1,22,800/- रुपये
निन्मश्रेणी लघुलेखक (Lower Grade Stenographer) : 38,600 ते 1,22,800/- रुपये
उच्चश्रेणी लघुलेखक (Higher Grade Stenographer) : 41,800 ते 1,32,300/- रुपये
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
अर्ज सुरु होण्याची तारीख : 30 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट : dtp.maharashtra.gov.in
No comments:
Post a Comment