WEL COME MY JOB....... BLOG आपले सर्वांचे सहर्ष स्वागत ... माझ्या WEBSITE ला भेट दिल्या बद्दल मी मनापासून आभारी आहे

नोकरीसाठी उपयुक्त जनरल नॉलेज

Tuesday, August 6, 2024

बृहन्मुंबई महानगर पालिकेने कार्यकारी सहाय्यक पदाच्या 30 जागांवर भरती जाहीर

 सरकारी नोकरीच्या शोधात असेलल्या उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे. देशातील सर्वात मोठ्या महानगर पालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगर पालिकेने कार्यकारी सहाय्यक पदाच्या 30 जागांवर भरती जाहीर केली आहे.

कोणत्याही शाखेतून पदवीधर झालेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. 5 ऑगस्टपासून ही भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या अर्ज मागवण्यात आले आहेत.


अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हे लक्षात घ्या की या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 ठेवण्यात आली आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात देखील प्रकाशित करण्यात आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, इतर आवशक्यक बाबी, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत यासंदर्भातील सविस्तर माहिती जाहिरातीत देण्यात आली आहे.

भरतीमध्ये एकूण 30 रिक्त जागा भरल्या जाणार


बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 30 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे किंवा मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुमचा अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवा.



बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात असेल नोकरी


या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याचा पत्ता आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.



आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा


सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास,12वी पास असावा आणि सोबत मान्यताप्राप्त विद्यापीठातून कला,विज्ञान,वाणिज्य/कायदा पदवीधर असावा. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्ष दरम्यान असावे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आवश्यक नाही.

निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईत नोकरी


या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात नोकरी मिळणार आहे. त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही. महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन देखील दिले जाईल. पण हे लक्षात घ्या की ही पदं कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. त्यामुळे कायमस्वरुपी नोकरीच्या सवलती यात लागू नसतील. या भरतीसाठी अर्ज करण्याचा पत्ता आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.



अर्ज करण्याची प्रक्रिया


या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावेत.

अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज 09 ऑगस्ट 2024 पर्यंत पाठवावा.

अर्ज करताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत.

अपूर्ण किंवा चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जातील याची अर्जदारांनी नोंद घ्यावी.

राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरावी आणि संबंधित सर्व कागदपत्रे जोडावीत.

फोटो जोडत असताना तो आत्ताचा असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.

पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलवर किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.

अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता - बा.य.ल.नागर धर्मा रुग्णालय,डॉ.ए.एल.नायर रोड, मुंबई सेन्ट्रल, मुंबई - 400008


No comments:

Post a Comment

RRB NTPC अंतर्गत १२ हजार जागांच्या भरती..

 RRB NTPC अंतर्गत १२ हजार जागांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध, १३ सप्टेंबरपासून अर्ज सुरू रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRB) ने RRB NTPC 2024 भरत...