महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार मुख्य परीक्षा २१ सप्टेंबर रोजी होणार असून, या परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना २२ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे..
एमपीएससी’तर्फे गट ‘क’ सेवेअंतर्गत उद्योग निरीक्षक ३९ पदे, तांत्रिक सहायक ९ पदे, कर सहायक ४८२ पदे, लिपिक-टंकलेखक १७ पदे अशा एकूण १६१८ पदांच्या भरतीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी १ जून रोजी घेण्यात आलेल्या पूर्वपरीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात एकूण २६ हजार ७४० उमेदवार पात्र ठरले. पात्र उमेदवारांसाठीची मुख्य परीक्षा अमरावती छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नवी मुंबई नागपूर पुणे जिल्हा केंद्रांवर आयोजित २१ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना २२ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरता येणार आहे. तर, २५ ऑगस्टपर्यंत बँक चलनाद्वारे शुल्क भरता येणार आहे.
गट ‘क’ सेवेअंतर्गत भरती
उद्योग निरीक्षक : ३९ पदे
तांत्रिक सहायक : ९ पदे
कर सहायक : ४८२ पदे
लिपिक-टंकलेखक : १७ पदे
एकूण : १६१८ पदे
पूर्वपरीक्षेतून पात्र उमेदवार : २६ हजार ७४०
पात्र उमेदवारांसाठीची मुख्य परीक्षा : २१ सप्टेंबर
ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : २२ ऑगस्टपर्यंत
बँक चलनाद्वारे शुल्क भरता येणार : २५ ऑगस्टपर्यंत
No comments:
Post a Comment