Main Menu
h 2
Labels
- Exam परीक्षा (4)
- jk (57)
- चालू घडामोडी (24)
- टेस्ट TEST (28)
- टेस्ट TEST स्पर्धा परीक्षा टेस्ट (8)
- नोकरी जाहिरात (5)
- नोकरी जाहिरात.. (49)
- महान / विशेष व्यक्ती (75)
- विज्ञान विषयावर टेस्ट (17)
- विशेष प्रश्नमंजुषा (17)
- सातारा प्रज्ञाशोध परीक्षा (1)
- स्कॉलरशिप नवोदय परीक्षा टेस्ट (9)
जागतिक हरित क्रांती आधारित टेस्ट..
जागतिक हरित क्रांती – MCQ टेस्ट
दूरसंचार क्रांती आधारित टेस्ट..
दूरसंचार क्रांती – भारत (MCQ टेस्ट)
हरित क्रांती आधारित टेस्ट..
हरित क्रांती आधारित बहुपर्यायी चाचणी
धवल क्रांती वर आधारित टेस्ट..
धवल क्रांती (White Revolution)
धवल क्रांती म्हणजे भारतातील दुग्ध उत्पादनात झालेली ऐतिहासिक वाढ होय. या क्रांतीमुळे भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला.
🔹 धवल क्रांतीची प्रमुख माहिती
- सुरुवात: 1970 साली
- मुख्य कार्यक्रम: ऑपरेशन फ्लड (Operation Flood)
- नेतृत्व: डॉ. वर्गीज कुरियन
- टोपणनाव: भारताचे दुग्ध पुरुष (Father of White Revolution)
🔹 उद्दिष्टे
- दूध उत्पादन वाढवणे
- शेतकरी व दुग्ध उत्पादकांचे उत्पन्न वाढवणे
- ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे
- दूध संकलन, प्रक्रिया व वितरण सुधारणा
🔹 महत्त्वाचे परिणाम
- दूध उत्पादनात प्रचंड वाढ
- सहकारी दुग्धसंस्था (जसे अमूल) बळकट झाल्या
- ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती
- शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न
🔹 भारतातील प्रसिद्ध दुग्ध सहकारी संस्था
- अमूल (गुजरात)
- वारणा (महाराष्ट्र)
- मदर डेअरी (दिल्ली)
🔹 धवल क्रांतीचे महत्त्व
धवल क्रांतीमुळे भारतात पोषण, आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य वाढले. ही क्रांती भारतीय कृषी इतिहासातील एक मैलबाचा दगड मानली जाते.
धवल क्रांती आधारित बहुपर्यायी चाचणी
दादासाहेब गायकवाड...
*दादासाहेब गायकवाड*
(भारतीय सामाजिक कार्यकर्ते)
पूर्ण नाव : भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड *जन्म : १५ ऑक्टोबर १९०२*
(दिंडोरी) *मृत्यू : २९ डिसेंबर १९७१*
(नवी दिल्ली)
नागरिकत्व : भारतीय
पक्ष : भारतीय रिपब्लिकन पक्ष
पद : राज्यसभा सदस्य
पुरस्कार : सामाजिक कार्यामध्ये पद्मश्री (इ.स. १९६८) दादासाहेब गायकवाड हे भारतीय राजकारणी, समाजसेवक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी होते. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या चळवळीत प्रगल्भ, विश्वसनीय व्यक्तिमत्व म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाड होय. गायकवाड आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष होते तसेच पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते. मुंबई विधानसभेचे सदस्य (आमदार), लोकसभा सदस्य व राज्यसभा सदस्य (खासदार) म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे.
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दादासाहेब गायकवाड, नाशिक सामाजिक कार्य*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतं, "माझ्या आत्मचरित्रात अर्धा भाग भाऊराव गायकवाड असणार आहे. तो नसला, तर माझे चरित्र पूर्ण होणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या म्हणण्यातच दादासाहेब गायकवाड यांचे आंबेडकरी चळवळीत व बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या रिपब्लिकन पक्षातील महत्त्वाचे स्थान दिसून येते. बाबासाहेबांच्या अनेक कामांत दादासाहेबांचा सहभाग होता. मार्च २, इ.स. १९३०च्या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वेळी डॉ. आंबेडकरांना दादासाहेबांची खूप मदत झाली. अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि बाबासाहेबांच्या पुढाकाराने दिलेल्या लढ्याचा एक भाग म्हणजे हा सत्याग्रह होता. काळाराम मंदिर हे नाशिक मधील प्रसिद्ध रामाचे मंदिर आहे.
अनेक आंदोलनांत आंबेडकरांना साथ त्यांनी दिली होती. कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे स्वतः दलित समाजातून आले असल्याने दलितांच्या व्यथा व त्यांना भोगाव्या लागणाऱ्या यातना या गोष्टींचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. म्हणूनच दलित समाजाविषयींचा त्यांचा कळवळा हा आंतरिक उमाळ्यातून आलेला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथील दलित जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जो व्यापक संघर्ष सुरू केला त्या संघर्षात बाबासाहेबांना साथ देण्यासाठी सुरुवातीच्या काळात पुढे आलेल्या दलित युवकांपैकी कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे एक होत. २० मार्च, १९२७ चा महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि २ मार्च, १९३० चा प्रत्यक्षात ३ मार्च, १९३० रोजी केला गेलेला नाशिक येथील काळाराम मंदिरप्रवेश सत्याग्रह, या सत्याग्रहांमध्ये त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या बरोबरीने भाग घेतला होता. डॉ. आंबेडकरांनी सुरू केलेल्या इतर चळवळीं मध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात दादासाहेबांनी भाग घेतला होता. संयुक्त महाराष्ट्रसमितीचे एक प्रमुख नेते म्हणून ते ओळखले जात होते.
🌀 *धर्मांतर*
१४ ऑक्टोबर इ.स. १९५६ मध्ये दादासाहेब गायकवाड यांनी डॉ. आंबेडकरांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
⚜️ *राजकीय कारकीर्द*
इ.स. १९३७ ते १९४६ या काळात गायकवाड मुंबई विधानसभेचे, तर इ.स. १९५७ ते १९६२ या काळात लोकसभेचे सदस्य होते. १९५७–५८ मध्ये ते लोकसभेत रिपब्लिकन पक्षाचे नेते होते. इ.स. १९६२ ते ६८ दरम्यान ते राज्यसभेवर सदस्य म्हणून कार्यरत होते.
🔮 *रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व*
भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाल्यावर त्या पक्षाचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले. पुढे या पक्षाची फाटाफूट झाल्यावर त्याच्या एका प्रभावी गटाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. रिपब्लिकन पक्षात ऐक्य निर्माण करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले; पण दुर्दैवाने त्यामध्ये त्यांना यश आले नाही. तथापि, दलित समाजातील सर्वांत मोठ्या गटाने गायकवाडांच्या नेतृत्वालाच मान्यता दिली होती.
१९३७ मध्ये मुंबई राज्याच्या विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली होती. भारतीय संसदेच्या लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे ते अनुक्रमे १९५७ ते १९६२ आणि १९६२ ते १९६८ सदस्य होते. लोकसभेचे सदस्य म्हणून कार्यरत असताना दुसरे सदस्य प्रकाशवीर शास्त्री यांनी धर्मांतराविरुद्ध विधेयक आणण्याच्या केलेल्या प्रयत्नाच्या निषेधार्थ त्यांनी लोकसभेत मनुस्मृती फाडून १९२७ मध्ये डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करून केलेल्या प्रतीकात्मक निषेधाची आठवण करून दिली. भारत सरकारने ‘पद्मश्री’ हा किताब देऊन त्यांच्या सार्वजनिक कार्याचा व समाजसेवेचा गौरव केला होता.
सन २००१-०२ मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करून त्यांच्या कार्याची स्मृती जागवली.
📚 *चरित्रे/गौरवग्रंथ*
दादासाहेब यांच्या मृत्यूनंतर त्यांचे गुणवर्णन करणारे आणि त्यांची कार्याची माहिती देणारे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यांतले काही हे ---
’डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दादासाहेब गायकवाडांना पत्रे’ या नावाचा मराठी व इंग्रजी ग्रंथ प्रा. वामन निंबाळकर यांनी संपादित केला आहे.
’आंबेडकरी चळवळीतील दादासाहेब गायकवाड यांचे योगदान’—लेखक डॉ. अविनाश दिगंबर फुलझेले
दादासाहेब गायकवाड यांच्या कार्याची माहिती देणारा ’पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ नावाचा गौरवग्रंथ रंगनाथ डोळस यांनी लिहिला आहे.
अरुण रसाळ यांचा ’जननायक कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ हा ग्रंथ
भावना भार्गवे यांचा ’लोकाग्रणी दादासाहेब गायकवाड’ हा ग्रंथ
कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे एक चरित्र त्यांचे जावई आणि आंबेडकरी चळवळीच्या महत्त्वपूर्ण कालखंडाचे साक्षीदार अॅड. हरिभाऊ पगारे यांनी लिहिले आहे.
दि.रं. भालेराव यांनीही ’कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ या नावाचे एक छोटे चरित्रवजा पुस्तक लिहिले आहे.
🎖️ *पुरस्कार व सन्मान*
कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाद्वारे २००२ पासून दिला जाणारा पुरस्कार आहे.
दादासाहेबांच्या नावाने महाराष्ट्र राज्य सरकारची ’कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना' या नावाची एक योजना २००४ पासून आहे. २०१२ साली तिचा लाभ ३८ भूमिहीनांना झाला होता. मात्र त्यापूर्वी केवळ २५० लोकांना जमिनी मिळाल्या होत्या.
भारत सरकारने गायकवाडांना १९६८ मध्ये पद्मश्री हा पुरस्कार दिला.
नाशिकमध्ये एका सभागृहाला ’दादासाहेब गायकवाड सभागृह’ नाव दिले आहे.
मुंबईत अंधेरीभागात 'दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र' नावाची संस्था आहे.
दादासाहब गायकवाड यांचा परिचय करून देणारी एक १३ मिनिटांची ‘डॉक्युमेंटरी फिल्म’ आहे
RRB मध्ये भरती 2026
RRB मध्ये भरती ! अर्ज प्रक्रियेला सुरुवात; 'या' तारखेपर्यंत करता येईल अर्ज
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमध्ये भरतीला सुरुवात
ही भरती जाहिरात २० डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित
RRBच्या अधिकृत वेबसाइट rrbapply.gov.in ला भेट द्या
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमध्ये भरतीला सुरुवात झाली आहे.
अर्ज करण्याच्या प्रक्रियेला वेग मिळाला असून उमेदवारांना २९ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी rrbapply.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) यांनी मिनिस्टीरियल आणि आयसोलेटेड कॅटेगरी भरती २०२६साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार २९ जानेवारी २०२६ पर्यंत RRBच्या अधिकृत संकेतस्थळावर
येथे अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे विविध मंत्रीस्तरीय आणि स्वतंत्र (Isolated) श्रेणीतील पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ही भरती जाहिरात २० डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित करण्यात आली होती. त्यानुसार ३० डिसेंबर २०२५ रोजी रात्री १२ वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या फॉर्म भरावे..
धन्यवाद
डॉ. पंजाबराव उपाख्य.. भाऊसाहेब देशमुख
*शिक्षण महर्षी, कृषीरत्न*
*डॉ. पंजाबराव उपाख्य*
*भाऊसाहेब देशमुख*
*जन्म : २७ डिसेंबर १८९८*
(पापळ, अमरावती, महाराष्ट्र )
*मृत्यू : १० एप्रिल १९६५*
(दिल्ली)
राष्ट्रीयत्व : भारतीय
टोपणनाव : भाऊसाहेब
नागरिकत्व : भारतीय
प्रशिक्षण संस्था : श्री शिवाजी
शिक्षण संस्था
पेशा : समाज सेवक , राजकारण
मूळ गाव : पापळ
राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय
काँग्रेस
जोडीदार : विमलाबाई
पंजाबराव देशमुख उच्च शिक्षण घेऊन ते स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. इ.स. १९३६ च्या निवडणुकी पश्चात ते शिक्षणमंत्री झाले. स्वतंत्र भारतात ते भारताचे कृषी मंत्री होते. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात अंदाजे १,०००च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी, तसेच पदविका तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय अशी अनेक महाविद्यालये सुरू करून त्या संस्था शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान देत आहेत.
'भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा' हे पंजाबराव देशमुखांचे ब्रीदवाक्य होते.
🔴 *डॉ.पंजाबराव देशमुख यांचे : चरित्र & कार्य"*
⚜ *बहुजनांच्या शिक्षणाचे शिल्पकार आणि कृषिक्रांतीचे अग्रदूत*
भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुख यांचे चरित्र आणि कार्य हिमलयापेक्षा उत्तुंग आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. देशातील शेतकरी आणि महाराष्ट्रातील शिक्षणाची अवस्था भाऊसाहेबांनी अनुभवली होती.
"चिखलात पाय आणि पायात काटा,अशाच वात् ग्रामीण विद्यार्थ्यांच्या वाट्याला असतात" या वास्तवाचे भान असलेल्या भाऊसाहेबांचा जन्म २७ डिसेंबर १८९८ रोजी अमरावती जिल्ह्यातील पापड या गावी झाला. शेतकरी कुटुंबात जन्मास आलेल्या पंजाबरावांच्या आईचे नाव राधाबाई आणि वडील शामरावबापू असे होते. इयत्ता ३ री पर्यंतचे शिक्षण पापड या गावीच झाले. ४था वर्ग नसल्याने एक वर्ष पुन्हा ३ र्याच वर्गात शिक्षण घ्यावे लागले. पुढे भाऊसाहेबांचे आजोळ सोनेगावच्या जवळच असलेल्या चांदूर रेल्वेच्या प्राथमिक शाळेत चौथा वर्ग पूर्ण केला.
माध्यमिक शिक्षण (कारंजा) लाड येथे तर matric चे शिक्षण अमरावतीच्या हिंदू हायस्कूल मधून पूर्ण केले.
पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मधून इंटरमिडीएटचे शिक्षण घेऊन उच्च शिक्षणासाठी भाऊसाहेब इंग्लंड ला गेले. तेथे त्यांनी ‘वेद वाड:मयातील धर्माचा उद्गम आणि विकास' (१९२०) मध्ये OXFORD विद्यापीठाच्या डॉक्टरेट (पी.एच.डी.) हि पदवी संपादन केली. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या बळावर प्रकांड पांडित्य संपादन करणारे भाऊसाहेब कधीच पोथीनिष्ठ नव्हते तर ते होते कृतीनिष्ट.
बहुजनांचे दु:ख दूर करणारे डॉक्टर व अन्याय दूर करण्यासाठी झगडणारे ते Baristar होते.
♻ *"भाऊसाहेबांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य"*
🔮 *महाराष्ट्राच्या शिक्षणाचे शिल्पकार दोन भाऊ-*
त्यात भाऊसाहेब पंजाबराव देशमुख व कर्मवीर भाऊराव पाटील हे आहेत.देशातील सर्वात मोठ्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना भाऊसाहेबांनी १९३१ मध्ये अमरावती येथे केली. यानंतर विदर्भाचा ‘शैक्षणिक विकास भारतीय शेती शेतकरी आणि बहुजन उद्धाराची चळवळ' हे भाऊसाहेबांच्या जीवनाचे ध्येय ठरले. बहुजनांच्या शिक्षणातील अडचण हि प्रतीगाम्यांची मनुवादी विचारधारा आहे हि मनुवादी विचारधारा नेस्तनाबूत करण्यासाठी अखंड प्रयत्न केले. शोषितांचे उद्धारकर्ते आणि कृषकांचे कैवारी असलेल्या भाऊसाहेबांनी "जगातील शेतकऱ्यांनो संघटीत व्हा" हा मंत्र दिला. देशाचे कृषिमंत्री असताना १९५९ ला शेतकऱ्यांसाठी ‘जागतिक कृषि प्रदर्शनाचे" आयोजन केले.तसेच जपानी भातशेतीचा त्यांचा प्रयोग उल्लेखनीय आहे. ते कृषि विद्यापीठाच्या कल्पनेचे जनक आहेत.
शिक्षण, शेती, सहकार, अश्पृश्योद्धार, जातीभेद निर्मुलन, धर्म इ. विविध क्षेत्रात त्यांनी अवाढव्य कार्य केले. ग्रामीण समाज पोथीनिष्ठ आणि परंपरानिष्ट असल्याने त्यांच्यात अज्ञान, अंधश्रद्धा, दैववाद, अवैज्ञानिकता, देवभोळेपणा खच्चून भरल्यामुळेच हा समाज शिक्षणापासून वंचित राहिला हे त्यांना ठाऊक होते. तसेच ब्राम्हणी वर्णवर्चस्ववाद हा ग्रामीण बहुजन समाजाला पद्धतशीरपणे शिक्षणापासून दूर ठेवण्यासाठीचा प्रयत्न होता. खऱ्या अर्थाने भारतातील बहुजन समाज हा गुलामगिरीच्या शृंखलांनी जखडलेला होता आणि १०% सेटजी, भटजी, लाटजी हा वर्ग सरकारी नोकऱ्या, उच्चपदे, सोयी सवलतीचा लाभ घेत होता.
जुलै १९२६ नंतर भारतात परत आल्यावर चातुर्वर्णप्रणीत जातीव्यवस्था , अश्पृश्यता, अज्ञान, दारिद्र्य, पारतंत्र्य यासाठी स्वत:ला पूर्णत: वाहून घेतले. १९२७ सालच्या मोशीच्या हिंदुसभेचा अधिवेशनाचा डॉ.पंजाबराव देशमुखांनी ताबा घेतला व आपल्या ओजस्वी भाषणातून सबंध श्रोतावर्ग काबीज केला. चातुर्वर्ण, अश्पृश्यता,जातीभेद याचा निषेध ठराव वामनराव घोरपडे यांनी मांडला व भाऊसाहेब याला अनुमोदन देताना म्हणाले, "आमची गुलामगिरी नष्ट करण्याकरिता अस्पृशता निवारणा सारख्या सुधारणांच्या चिठ्ठ्या हिंदूधर्माला जोडून आम्ही त्याची भोके बुजविण्याचा प्रयत्न करीत आहोत. चातुर्वर्ण व्यवस्थेचा रांजन दुरुस्त झाला नाही तर तो रांजनच फोडून टाकण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही." हे भाऊसाहेबांचे उर्वरित कार्य शिवश्री. पुरुषोत्तम खेडेकर, डॉ.आ.ह.साळुंके, इतिहासाचार्य मा. म. देशमुखांसारख्या कोट्यावधी बहुजन बांधवांनी १२ जानेवारी २००५ रोजी मातृतीर्थ सिंधखेड राजा येथे शिवधर्माचे प्रगटन करून केले आहे. आता चातुर्वर्ण व्यवस्थेचा रांजन फुटल्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता अशी लोकशाही या देशात अस्तित्वात येईल.
डॉ.पंजाबराव देशमुखांच्या बहुजन उद्धाराच्या कार्यावर चिडलेल्या मनुवाद्यांनी त्यांच्या खुनाचाही प्रयत्न केला. पण भाऊसाहेब डगमगले नाहीत, पुढे त्यांनी २६ नोव्हेम्बर १९२७ रोजी सोनार कुटुंबात जन्मलेल्या कु. विमल वैद्य या युवतीशी आंतरजातीय विवाह करून मराठा-सुवर्णकार नातेसंबंध जुळवून आणले. त्यांनी १९३० मध्ये अस्पृश्य पित्तर केला. तसेच हिंदू देवस्थान संपत्ती बिल १९३२ मध्ये आणले. भाऊसाहेबांनी डॉ. बाबासाहेबांसोबत १९२७ मध्ये अमरावती येथील अंबादेवी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला. मंदिर प्रवेशामागे ईश्वर भक्तीचा त्यांचा उद्देश नव्हता. भाऊसाहेबांचा देवावर विश्वासच नव्हता. ते म्हणत ,"मूर्तीत देव असेल तर मूर्तीत देव घडविणारा कारागीर हा देवाचा बापच ठरेल."
खरोखरच आजही डॉ. भाऊसाहेबांचे कार्य शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षक, संस्थाचालक, शिक्षणतज्ञाना तसेच बहुजन समाजाला प्रेरणादायी आहे.
🌀 *संक्षिप्त जीवन*
डॉ. पंजाबराव देशमुख ( भाऊसाहेब देशमुख)
*मूळ आडनाव - कदम*
१९२७- शेतकरी संघाच्या प्रचारासाठी 'महाराष्ट्र केसरी' हे वर्तमानपत्र चालविले.
वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास' या प्रबंधाबद्दल डॉक्टरेट.
१९३३ - शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद कायदा पारiत करण्यात मोठा वाटा. त्यामुळे त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणतात.
१९२६ - मुष्टिफंड या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय काढले.
१९२७ - शेतकरी संघाची स्थापना.
१९३२ - श्री. ए. डब्ल्यू. पाटील यांच्या सहकार्याने श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना.
? - ग्रामोद्धार मंडळाची स्थापना.
१९५० - लोकविद्यापीठाची स्थापना (पुणे), त्याचे नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रूपांतर झाले.
१९५५ - भारत कृषक समाजाची स्थापना व त्याच्याच विद्यमाने 'राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना.
१९५६ - अखिल भारतीय दलित संघाची स्थापना.
१८ ऑगस्ट १९२८ - अमरावती अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह .
१९३० - प्रांतिक कायदे मंडळावर निवड. शिक्षण, कृषी, सहकार खात्याचे मंत्री
लोकसभेवर १९५२, १९५७, १९६२ तीन वेळा निवड.
१९५२ ते ६२ केंद्रीय मंत्रिमंडळात कृषिमंत्री. भारताचे पहिले कृषिमंत्री.
देवस्थानची संपत्ती सरकारने ताब्यात घेऊन विधायक कार्य करावे या उद्देशाने १९३२ मध्ये हिंदू देवस्थान संपत्ती बिल मांडले.
प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना.
१९६० - दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरवले.
📚 *पंजाबराव देशमुखांच्या जीवनावरील पुस्तके*
सूर्यावर वादळे उठतात. (नाटक, लेखक बाळकृष्ण द. महात्मे)
शिरीषकुमार मेहता..
*बालशहीद*
*शिरीषकुमार मेहता*
*जन्म : 28 डिसेंबर 1926*
(नंदुरबार , महाराष्ट्र , भारत)
*वीरमरण : 9 सप्टेंबर 1942*
*(वय 15)*
(नंदुरबार , महाराष्ट्र , भारत)
राष्ट्रीयत्व : भारतीय
साठी प्रसिद्ध : भारतीय स्वातंत्र्य
चळवळ
पाताळगंगा नदीच्या काठी चार डोंगराच्या कुशीत वसलेल्या नंदनगरी अर्थात नंदुरबार शहराची पूर्वापार ओळख ही व्यापाऱ्यांची वसाहत म्हणूनच. या गावात १९२६ मध्ये एका व्यापाऱ्याच्या घरात शिरीषकुमारांचा जन्म झाला. त्याच्यासह पाच संवगड्यांनी स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची आहुती दिली. त्यामुळे या गावाचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोचले. नंदुरबार हे आता कुठे अंदाजे एक लाख लोकसंख्येचे छोटेसे गाव आहे. परस्परांना ओळखणारे आणि स्नेह जाणणारे लोक आहेत. घराघरांतून चालणारा व्यापार आणि देवाणघेवाण हे महत्त्व जाणून पूर्वापार अनेक ज्येष्ठ प्रवाशांनी या गावाला भेटी दिल्या आहेत. प्रसिद्ध प्रवासी ट्वेनियरने १६६० ला श्रीमंत आणि समृद्धनगरी असे नंदुरबारचे वर्णन केले आहे, तर नंद नावाच्या गवळी राजाने हे गाव वसविल्याची आख्यायिका आहे. ऐन-ए-अकबरी (इ.स. १५९०) मध्ये नंदुरबारचा उल्लेख किल्ला असलेले आणि सुबक घरांनी सजलेले शहर असा आहे.
नंदुरबारमध्ये बाळा शंकर इनामदार नावाचे एक व्यापारी होते. त्यांचा तेलाचा व्यापार होता. त्यांना मुलगा नसल्याने ते काहीसे दु:खी होते. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी दुसरा विवाह केला. त्यांना कन्याप्राप्ती झाली. ही कन्या त्यांनी पुष्पेंद्र मेहता यांना सोपवली. १९२४ ला पुष्पेंद्र व सविता यांचा विवाह झाला. २८ डिसेंबर १९२६ ला या दांपत्याच्या पोटी, मेहता घराण्यात शिरीषकुमारचा जन्म झाला. या काळात देशातील अन्य गावे व शहरांप्रमाणेच नंदुरबारचेही वातावरण स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणेने भारलेले होते. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सामान्यांनी काय करायचे तर हाती तिरंगा झेंडा घेऊन प्रभातफेरी, मशाल मोर्चे काढायचे. देशप्रेमांनी ओतप्रोत घोषणा द्यायच्या! नंदुरबारमधील अशा कामात मेहता परिवाराचा सहभाग होता. शिरीष वयपरत्वे शाळेत जाऊ लागला होता आणि त्याच्यावर महात्मा गांधी व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मोठा प्रभाव होता. त्या काळात "वंदे मातरम्' आणि "भारत माता की जय' असा जयघोष करणाऱ्या कोणालाही पोलिस अटक करू शकत होते.
🇮🇳 *नहीं नमशे, नहीं नमशे !*
महात्मा गांधींनी ९ ऑगस्ट १९४२ ला इंग्रजांना "चले जाव'चा आदेश दिला. त्यानंतर गावोगावी प्रभात फेऱ्या, ब्रिटिशांना इशारे दिले जाऊ लागले. बरोबर महिनाभरानंतर, ९ सप्टेंबर १९४२ ला नंदुरबारमध्ये निघालेल्या प्रभात फेरीत आठवीत शिकत असलेला शिरीष सहभागी झाला होता. गुजराथी मातृभाषा असलेल्या शिरीषने प्रभात फेरीत घोषणा सुरू केल्या, "नहीं नमशे, नहीं नमशे', "निशाण भूमी भारतनु'. भारत मातेचा जयघोष करीत ही फेरी गावातून फिरत होती. मध्यवर्ती ठिकाणी ती फेरी पोलिसांनी अडवली. शिरीषकुमारच्या हातात झेंडा होता. पोलिसांनी ही मिरवणूक विसर्जित करण्याचे आवाहन केले. या बालकांनी ते आवाहन झुगारले आणि "भारत माता की जय', "वंदे मातरम्'चा जयघोष सुरूच ठेवला. अखेर पोलिसांनी गोळीबार सुरू केला. एका पोलिस अधिकाऱ्याने मिरवणुकीत सहभागी मुलींच्या दिशेने बंदूक रोखली. तेव्हा त्या अधिकाऱ्याला एका चुणचुणीत मुलाने सुनावले, *"गोळी मारायची तर मला मार!'*. ती वीरश्री संचारलेला मुलगा होता, शिरीषकुमार मेहता! संतापलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या बंदुकीतून सुटलेल्या, एक, दोन, तीन गोळ्या शिरीषच्या छातीत बसल्या आणि तो जागीच कोसळला. त्याच्यासोबत पोलिसांच्या गोळीबारात लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशिधर केतकर, घनश्यामदास शहा हे अन्य चौघेही शहीद झाले.
बॕरिस्टर नाथ बापू पै..
*बॕरिस्टर नाथ बापू पै* (स्वातंत्र्य सैनिक) *जन्म : 25 सप्टेंबर 1922* वेंगुर्ला , भारत ...
