मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

Mpsc 1618 पदांची भरती 2025

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार मुख्य परीक्षा २१ सप्टेंबर रोजी होणार असून, या परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना २२ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे..


एमपीएससी’तर्फे गट ‘क’ सेवेअंतर्गत उद्योग निरीक्षक ३९ पदे, तांत्रिक सहायक ९ पदे, कर सहायक ४८२ पदे, लिपिक-टंकलेखक १७ पदे अशा एकूण १६१८ पदांच्या भरतीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी १ जून रोजी घेण्यात आलेल्या पूर्वपरीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात एकूण २६ हजार ७४० उमेदवार पात्र ठरले. पात्र उमेदवारांसाठीची मुख्य परीक्षा  अमरावती छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नवी मुंबई  नागपूर पुणे जिल्हा केंद्रांवर आयोजित २१ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना २२ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरता येणार आहे. तर, २५ ऑगस्टपर्यंत बँक चलनाद्वारे शुल्क भरता येणार आहे.


गट ‘क’ सेवेअंतर्गत भरती

उद्योग निरीक्षक : ३९ पदे


तांत्रिक सहायक : ९ पदे


कर सहायक : ४८२ पदे


लिपिक-टंकलेखक : १७ पदे


एकूण : १६१८ पदे

पूर्वपरीक्षेतून पात्र उमेदवार : २६ हजार ७४०


पात्र उमेदवारांसाठीची मुख्य परीक्षा : २१ सप्टेंबर 


ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : २२ ऑगस्टपर्यंत


बँक चलनाद्वारे शुल्क भरता येणार : २५ ऑगस्टपर्यंत


धातू अधातू आधारित टेस्ट

धातू आणि अधातू - टेस्ट

🔍 धातू आणि अधातू - २० प्रश्नांची टेस्ट 🔍

पदार्थांची गुणवैशिष्ट्ये आधारित टेस्ट

पदार्थांची गुणवैशिष्ट्ये - त्वरित तपासणी

🌟 पदार्थांची गुणवैशिष्ट्ये - २० प्रश्नांची विशेष टेस्ट 🌟

FIDE Women's World Cup 2025

मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा 💐 💐 💐 




 जॉर्जियातील बटुमी येथे संपन्न झालेल्या FIDE Women's World Cup 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन भारतीय खेळाडू दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांच्यात झालेला सामना बुद्धिबळातील भारताच्या उल्लेखनीय कामगिरीचं प्रतीक ठरला. विजेतेपद, ग्रँडमास्टर टायटल आणि भारतीय लेकींचा अंतिम सामना हा भारतीय बुद्धिबळाचा सुवर्णक्षणच म्हणावा लागेल!


सामन्या अंती विजेत्या बुद्धिबळपटू FIDE Women's World Cup जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय ठरणार होत्या आणि तो मान दिव्या देशमुख ह्यांनी पटकाविला त्याबद्दल दिव्या देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांचं, टीमचं मनापासून अभिनंदन. तसंच गेली अनेक वर्ष भारतासाठी गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या उपविजेत्या कोनेरू हम्पी ह्यांचंही कौतुक करावं तितकं कमीच आहे. खरं तर आज आपल्या देशाला विजेत्या आणि उपविजेत्या अशा एक नव्हे तर दोन ग्रँडमास्टर लाभल्या. जय हिंद ! 🇮🇳

भारतीय रेल्वेमध्ये 30307 पदांची भरती ..

 

भारत सरकारच्या रेल्वे विभागामध्ये विविध पदांची भरती होणार असून त्याच्यात तपशील खालील प्रमाणे आहे

फॉर्म भरण्याची सुरुवात 30 ऑगस्ट 2025 

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2025...

तरी नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्वांनी वेळेत अर्ज भरावा धन्यवाद..




युनेस्को'ने जागतिक वारसास्थळ 2025

 छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांचा युनोस्कोने जागतिक वारसा स्थळात केला समावेश...

युनेस्को'ने जागतिक वारसास्थळात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ गड-किल्ले हे जागतिक वारसा संकल्पने खाली नामांकित केले आहेत. त्यात महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडूचा जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले पन्हाळा गडचा समावेश झाला आहे.


साल्हेर किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड, खांदेरी किल्ला, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजय दुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूमधील जिंजी किल्ला यांचा समावेश केला आहे . 

ग्राउंड स्टाफ आणि लोडर पदे भरती 2025

 

विमानतळावर नोकरी करण्याचे स्वप्न बघणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. IGI Aviation Services Pvt. Ltd. कडून 1,446 पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, यामध्ये ग्राउंड स्टाफ आणि लोडर पदांचा समावेश आहे. 

इच्छुक उमेदवारांना 21 सप्टेंबर 2025 पूर्वी अर्ज सादर करावा लागेल. (Airport Jobs 2025)


ग्राउंड स्टाफ - 1,017 पदे


लोडर - 429 पदे


एकूण - 1,446 पदे


शैक्षणिक पात्रता काय आहे? :


ग्राउंड स्टाफ - किमान 12वी पास (मान्यताप्राप्त मंडळातून)


लोडर - किमान 10वी पास (मान्यताप्राप्त मंडळातून)


ग्राउंड स्टाफ - 18 ते 30 वर्षे


लोडर - 20 ते 40 वर्षे


निवड प्रक्रिया कशी असेल? :


निवड पूर्णपणे लेखी परीक्षेवर आधारित असेल.


परीक्षा स्वरूप:


100 बहुपर्यायी प्रश्न (MCQ)


विषय - सामान्य ज्ञान, गणितीय क्षमता, तर्कशक्ती, इंग्रजी, विमानचालन


- नकारात्मक गुण नाहीत


ग्राउंड स्टाफ - ₹25,000 ते ₹35,000 दरमहा


लोडर - ₹15,000 ते ₹25,000 दरमहा


अर्ज प्रक्रिया कशी कराल? :


अधिकृत वेबसाईटवर जा:

 https://igiaviationdelhi.com


ऑनलाईन अर्ज फॉर्म भरावा.


आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत


ग्राउंड स्टाफ: ₹350


लोडर: ₹250


अर्ज अंतिम सबमिट करावा


महत्त्वाच्या तारखा:


अर्ज करण्याची अंतिम तारीख - 21 सप्टेंबर 2025

जगन्नाथ शंकर शेठ यांच्यावर आधारित टेस्ट

जगन्नाथ शंकर शेठ आधारित २० प्रश्नांची चाचणी

जगन्नाथ शंकर शेठ आधारित २० प्रश्नांची चाचणी

1. जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म कधी झाला?
1803
1810
1821
1790
2. त्यांनी कोणत्या शहरात शिक्षण प्रसारासाठी काम केले?
पुणे
मुंबई
नागपूर
कोल्हापूर
3. त्यांनी कोणती संस्था स्थापन केली?
मुंबई नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी
आर्य समाज
सत्यशोधक समाज
सेवक समाज
4. जगन्नाथ शंकर शेठ यांनी कोणत्या भाषेच्या प्रचारासाठी प्रयत्न केला?
उर्दू
इंग्रजी
हिंदी
मराठी
5. त्यांनी कोणत्या चळवळीला पाठिंबा दिला होता?
भारत छोडो आंदोलन
सामाजिक सुधारणा चळवळ
स्वदेशी आंदोलन
नागरिक असहकार आंदोलन
6. मुंबई विद्यापीठ स्थापनेत त्यांचा काय सहभाग होता?
कुलगुरू होते
सह-संस्थापक
देणगीदार
काहीही नाही
7. त्यांनी कोणत्या वर्षी जन्म घेतला?
1803
1857
1875
1820
8. शंकर शेठ कोणत्या समाजाशी संबंधित होते?
मुस्लिम समाज
जैन समाज
हिंदू समाज
पारशी समाज
9. त्यांनी कोणत्या प्रकारच्या सुधारणा सुचवल्या?
शैक्षणिक
धार्मिक
राजकीय
वरील सर्व
10. मुंबईतील पहिले इंग्रजी शाळा स्थापनेत त्यांचे योगदान होते का?
होय
नाही
11. त्यांनी कोणत्या व्यवसायात काम केले?
शिक्षक
व्यापारी
डॉक्टर
वकील
12. जगन्नाथ शंकर शेठ यांचे निधन कधी झाले?
1865
1880
1895
1900
13. त्यांच्या स्मरणार्थ कोणती संस्था कार्यरत आहे?
शंकर शेठ प्रतिष्ठान
शंकर शेठ स्मृती संघ
शंकर शेठ विद्यालय
शंकर शेठ संग्रहालय
14. त्यांच्या कार्याचे क्षेत्र कोणते होते?
ग्रामीण विकास
कला
शैक्षणिक क्षेत्र
शेती
15. त्यांचे एक नाव काय होते?
जगन्नाथ कोतवाल
भाई कोतवाल
नरसिंह शेठ
विनायक पाटील
16. मुंबईत त्यांना काय म्हणून गौरवले गेले?
मुंबईचे तात्या
शिक्षणपिता
भाई कोतवाल
मुंबईचे सेनापती
17. त्यांच्या नावाने कोणते शैक्षणिक संस्थान आहे?
शंकर शेठ कॉलेज
भाई कोतवाल विद्यालय
मुंबई शैक्षणिक संस्था
डेक्कन कॉलेज
18. शंकर शेठ यांनी कोणती मूलभूत सेवा दिली?
पाणीपुरवठा
शिक्षण
आरोग्य
पोलिस सेवा
19. कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांशी त्यांनी सहकार्य केले?
लॉर्ड कर्झन
माउंटबॅटन
माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
मॅकाले
20. शंकर शेठ यांना कोणत्या नावाने ओळखले जाते?
शिक्षणपिता
धर्मपिता
न्यायपिता
राष्ट्रपिता

वि . वि चिपळूणकर आधारित टेस्ट

वि.वि. चिपळूणकर आधारित २० प्रश्नांची चाचणी

वि.वि. चिपळूणकर आधारित २० प्रश्नांची चाचणी

1. वि.वि. चिपळूणकर यांचे पूर्ण नाव काय आहे?
वासुदेव वामन चिपळूणकर
विनायक वामन चिपळूणकर
विष्णू वासुदेव चिपळूणकर
वामन विनायक चिपळूणकर
2. वि.वि. चिपळूणकर कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
साहित्य
क्रीडा
संगीत
वैद्यकशास्त्र
3. वि.वि. चिपळूणकर यांनी कोणत्या भाषेत लेखन केले?
इंग्रजी
मराठी
संस्कृत
हिंदी
4. वि.वि. चिपळूणकर यांचा जन्म कधी झाला?
1850
1851
1852
1854
5. 'निबंधमाला' हे पुस्तक कोणाचे आहे?
टिळक
आगरकर
चिपळूणकर
फडके
6. वि.वि. चिपळूणकर कोणत्या चळवळीचे प्रणेते होते?
शिक्षण
पुनर्जागरण
महिला चळवळ
सामाजिक समता
7. 'निबंधमाला' मध्ये एकूण किती निबंध आहेत?
10
12
14
16
8. चिपळूणकरांनी कोणत्या शैलीचा प्रभाव मराठीवर टाकला?
संस्कृतप्रचुर शैली
अरबी शैली
इंग्रजी शैली
फारसी शैली
9. वि.वि. चिपळूणकर कोणत्या पत्रिकेचे संपादक होते?
केसरी
इंदू प्रकाश
ज्ञानोदय
विविधज्ञानविस्तार
10. वि.वि. चिपळूणकर यांनी कोणता तत्वज्ञानाचा प्रभाव घेतला होता?
ग्रीक
ब्रिटिश
जर्मन
फ्रेंच
11. 'साहित्याचा समाजाशी संबंध' या विषयावर कोणाचा प्रभाव होता?
टिळक
आगरकर
चिपळूणकर
फुले
12. चिपळूणकरांचा मृत्यू कोणत्या वयात झाला?
30 वर्षे
32 वर्षे
35 वर्षे
38 वर्षे
13. त्यांनी कोणत्या युरोपीय लेखकांचे भाषांतर केले?
मिल
बर्क
माक्स
डार्विन
14. चिपळूणकरांच्या निबंधाचे वैशिष्ट्य काय होते?
विनोदी
गंभीर आणि चिकित्सक
धार्मिक
संवादप्रधान
15. त्यांनी कोणत्या क्षेत्रातील विचार मांडले?
शेती
तंत्रज्ञान
साहित्य
वास्तुकला
16. चिपळूणकर हे कोणत्या राज्याचे रहिवासी होते?
महाराष्ट्र
गुजरात
कर्नाटक
गोवा
17. वि.वि. चिपळूणकर यांच्या वडिलांचे नाव काय होते?
वासुदेव
विनायक
विष्णू
वामन
18. चिपळूणकर यांनी कोणती संस्था स्थापली होती?
न्यू इंग्लिश स्कूल
डेक्कन एज्युकेशन सोसायटी
ज्ञानप्रसारक मंडळी
महाराष्ट्र साहित्य परिषद
19. वि.वि. चिपळूणकर यांचे लेखन कोणत्या प्रकारचे होते?
कथा
कविता
निबंध
आत्मचरित्र
20. वि.वि. चिपळूणकर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते?
आधुनिक मराठीचे जनक
नवजागरणाचा प्रणेता
निबंध सम्राट
वरील सर्व

भारतातील कटक मंडळे (Cantonment Boards)

 भारतातील कटक मंडळे (Cantonment Boards) ही संरक्षण मंत्रालयाच्या (Ministry of Defence) अंतर्गत येणारी प्रशासकीय संस्था आहेत. ही मंडळे कटक क्षेत्रांमध्ये (Cantonment areas) राहणाऱ्या नागरी लोकांसाठी नागरी प्रशासन (municipal administration) चालवतात.

मुख्य वैशिष्ट्ये:

 * स्थापना: ही मंडळे कटक कायदा, २००६ (Cantonments Act, 2006) अंतर्गत स्थापन केली जातात.

 * प्रशासन: ही मंडळे संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली येतात.

 * कार्य: पाणीपुरवठा, प्राथमिक शिक्षण, स्वच्छता, रस्ते, पूल, बाजारपेठांची देखभाल, रोग प्रतिबंधक उपाययोजना इत्यादी नागरी सुविधा पुरवण्याची जबाबदारी त्यांची असते.

 * संरचना: प्रत्येक कटक मंडळामध्ये निवडून आलेले प्रतिनिधी तसेच पदसिद्ध (ex-officio) आणि नामनिर्देशित (nominated) सदस्य असतात. स्टेशन कमांडर (Station Commander) हा मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो आणि भारतीय संरक्षण भू-संपदा सेवा (Indian Defence Estates Service - IDES) अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer - CEO) असतो, जो मंडळाचा सदस्य-सचिव म्हणूनही काम करतो.

 * वर्गीकरण: कटक मंडळांचे त्यांच्या लोकसंख्येनुसार चार श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाते.

 * कटक (Cantonment) आणि लष्करी स्थानक (Military Station) यातील फरक: कटक म्हणजे असे क्षेत्र जिथे लष्करी आणि नागरी लोकसंख्या दोन्ही असते, तर लष्करी स्थानक हे पूर्णपणे लष्करी कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या आस्थापनांसाठी असते.

भारतात एकूण ६१ कटक मंडळे आहेत, जी २० राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेली आहेत.

भारतातील काही प्रमुख कटक मंडळे (राज्यांनुसार) खालीलप्रमाणे आहेत:

 * महाराष्ट्र: अहमदनगर, औरंगाबाद, देहूरोड, देवळाली, कामठी, खडकी, पुणे.

 * उत्तर प्रदेश: आग्रा, अलाहाबाद, अयोध्या, बरेली, कानपूर, लखनौ, मथुरा, मेरठ, वाराणसी, इत्यादी.

 * उत्तराखंड: अल्मोडा, डेहराडून, नैनिताल, रानीखेत, रुडकी, इत्यादी.

 * मध्य प्रदेश: जबलपूर, महू, मोरेर, पचमढी, सागर.

 * पश्चिम बंगाल: बॅरकपूर, जलापहार, लेबोंग.

 * राजस्थान: अजमेर, नसीराबाद.

 * पंजाब: अमृतसर, फिरोजपूर, जालंधर.

 * दिल्ली: दिल्ली कॅन्ट.

 * गुजरात: अहमदाबाद.

 * तेलंगणा: सिकंदराबाद.

 * कर्नाटक: बेळगाव.

 * केरळ: कन्नूर.

याव्यतिरिक्त, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, बिहार, झारखंड, मेघालय आणि तामिळनाडूमध्येही कटक मंडळे आहेत.


भारतरत्न इंदिरा गांधी..

          *भारतरत्न इंदिरा गांधी*   (५ वी व ८ वी भारतीय पंतप्रधान)      *जन्म : १९ नोव्हेंबर १९१७*             (मुघलसराई)    *मृत्यू : ३१ ऑक...