मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा 💐 💐 💐
जॉर्जियातील बटुमी येथे संपन्न झालेल्या FIDE Women's World Cup 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन भारतीय खेळाडू दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांच्यात झालेला सामना बुद्धिबळातील भारताच्या उल्लेखनीय कामगिरीचं प्रतीक ठरला. विजेतेपद, ग्रँडमास्टर टायटल आणि भारतीय लेकींचा अंतिम सामना हा भारतीय बुद्धिबळाचा सुवर्णक्षणच म्हणावा लागेल!
सामन्या अंती विजेत्या बुद्धिबळपटू FIDE Women's World Cup जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय ठरणार होत्या आणि तो मान दिव्या देशमुख ह्यांनी पटकाविला त्याबद्दल दिव्या देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांचं, टीमचं मनापासून अभिनंदन. तसंच गेली अनेक वर्ष भारतासाठी गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या उपविजेत्या कोनेरू हम्पी ह्यांचंही कौतुक करावं तितकं कमीच आहे. खरं तर आज आपल्या देशाला विजेत्या आणि उपविजेत्या अशा एक नव्हे तर दोन ग्रँडमास्टर लाभल्या. जय हिंद ! 🇮🇳
No comments:
Post a Comment