अभिनंदन टीम इंडिया..
इंडियाने 2025 च्या अंडर-19 महिला टी20 विश्वचषकाचे विजेतेपद जिंकले आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने पराभव करून विजेतेपद पटकावले. 19 वर्षांखालील महिला संघाचे हे सलग दुसरे विजेतेपद होते.
टी20 विश्वचषकातील सलग विजयासाठी बीसीसीआयने भारतीय महिला अंडर19 संघाचे अभिनंदन केले आहे. विजेत्या संघाला 5 कोटी रुपये आणि मुख्य प्रशिक्षक नुशीन अल खादीर यांच्या नेतृत्वाखालील सपोर्ट स्टाफला 5 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे."
No comments:
Post a Comment