sbi job 1500 पदभरती 2024









स्टेट बँक........ कॉम्प्युटर/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पदे....एकूण पदे 1500.... पात्रता बी ई, एम ई, एम एस सी इत्यादी ...वय... कमाल 38 वर्षे....अर्ज मुदत 4 ऑक्टोबर 2024.



जाहिरात डाऊनलोड करा 
लिंक 

RRB NTPC अंतर्गत १२ हजार जागांच्या भरती..

 RRB NTPC अंतर्गत १२ हजार जागांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध, १३ सप्टेंबरपासून अर्ज सुरू

रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRB) ने RRB NTPC 2024 भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 13 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. भरतीद्वारे एकूण 11 हजार 558 पदांची नियुक्ती केली जाणार आहे.

रेल्वेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या तरूणांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRB) ने RRB NTPC 2024 भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना प्रसिद्ध (Notification released) केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 13 सप्टेंबरपासून सुरू (Application process starts from 14th September) होणार आहे. भरतीद्वारे एकूण 11 हजार 558 पदांची नियुक्ती केली जाणार आहे. या भरतीसाठी पात्रता पूर्ण करणारे सर्व उमेदवार अर्ज सुरू होताच RRB indianrailways.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑक्टोबर 2024 निश्चित करण्यात आली आहे.  


भरतीची अधिसूचना संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आली असून त्यात परीक्षेशी संबंधित महत्त्वाचे तपशील देण्यात आले आहेत. RRB NTPC पात्रतेनुसार, पदवीपूर्व पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे आहे. तर पदवीधर पदांसाठी ती 18 ते 30 वर्षे आहे. पदवीपूर्व पदांसाठी विहित शैक्षणिक पात्रता पदवी आहे, तर पदवीधर पदांसाठी ती १२वी उत्तीर्ण आहे. RRB NTPC परीक्षेच्या निवड प्रक्रियेमध्ये CBT 1, CBT 2, टायपिंग कौशल्य चाचणी / संगणक आधारित अभियोग्यता चाचणी आणि दस्तऐवज पडताळणी / वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश होतो.


रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRB) ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार या भरतीद्वारे एकूण 11 हजार 558 पदांची नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये अंडर ग्रॅज्युएट पोस्ट अंतर्गत एकूण 3 हजार 445 पदांची नियुक्ती केली जाईल. तर पदवीधर पोस्ट अंतर्गत 8 हजार 113 पदांवर नियुक्ती केली जाईल. भरतीचा पोस्ट निहाय तपशील प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेत देण्यात आला आहे. त्यासाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळ indianrailways.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आलेली अधिसूचना वाचावी लागेल.

ITBP Constable Recruitment 2024

 ITBP Constable Recruitment 2024: इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्सद्वारे (ITBP) कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार ITBP च्या अधिकृत वेबसाइट recruitment.itbpolice.nic.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील ८१९ पदे भरण्यात येणार आहेत.


ITBP Constable Recruitment 2024: केव्हा सुरू होईल नोंदणी?

नोंदणी प्रक्रिया 2 सप्टेंबर रोजी सुरू होईल आणि १ ऑक्टोबर 2024 रोजी समाप्त होईल

ITBP Constable Recruitment 2024 रिक्त जागा तपशील

पुरुष : ६९७ पदे

महिला: १२२ पदे


ITBP Constable Recruitment 2024 पात्रता निकष

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांच्याकडे मान्यता प्राप्त मंडळाकडून मॅट्रिक किंवा इयत्ता दहावी पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा १८ ते२५ वर्षांच्या दरम्यान असावी.

ITBP Constable Recruitment 2024 निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेमध्ये शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), शारीरिक मानक चाचणी (PST), लेखी परीक्षा, मूळ कागदपत्रांची पडताळणी आणि तपशीलवार वैद्यकीय परीक्षा (Detailed Medical Examination )/ पुनरावलोकन वैद्यकीय परीक्षा (Review Medical examination ) यांचा समावेश असेल. उमेदवारांच्या तंदुरुस्तीचे मूल्यांकन करण्यासाठी वैद्यकीय तपासणी CAPF आणि AR मध्ये GO आणि NGO साठी भरतीसाठी एकसमान मार्गदर्शक तत्त्वांच्या संदर्भात घेतली जाईल.

अर्जाची फी ₹१००/- आहे. महिला, माजी सैनिक आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कामध्ये सूट देण्यात आली आहे.

इंडियन बँकेत विविध पदांसाठी ३०० जागांची भरती

 

इंडियन बँकेत विविध पदांसाठी ३०० जागांची भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात देखील झाली आहे.

१३ तारखेपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही बँकेत नोकरी शोधत असाल, तर तुम्ही इंडियन बँकेत या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकता. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया 

भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २ सप्टेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया एकून ३०० पदांसाठी सुरू आहे. हे करण्यासाठी तुम्हाला इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइट, indianbank.in वर जावे लागेल. येथून तुम्ही अर्ज देखील करू शकता, रिक्त पदांबद्दल तपशीलवार माहिती मिळवू शकता


या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. यासोबतच उमेदवाराचे वय २० ते ३० वयोगटातील उमेदवार हे आरामात भरतीसाठी अर्ज करू शकतात.


निवड कशी होईल?


या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा ही द्यावी लागणार आहे. त्यानंतर मुलाखत होईल आणि मगच उमेदवाराची निवड ही केली जाईल.


फी किती असेल?


या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १००० रुपये फीस ही द्यावी लागेल. आरक्षित श्रेणीमध्ये येणाऱ्या उमेदवारांना १७५ रुपये फीस लागेल. पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात

अर्ज करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा, म्हणजेच indianbank.in.



काही महत्वाचे निर्देशांक व भारताचा क्रमांक

 काही महत्वाचे निर्देशांक व भारताचा क्रमांक 


✅ ग्लोबल Gender Gap index 2024 प्रथम देश - आइसलँड व  भारत - 129 वा क्रमांक 


✅ "जागतिक सायबर क्राईम इंडेक्स" नुसार भारताचा क्रमांक 10 ,, स्थान प्रथम - रशिया


✅ "वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स-2024" मध्ये प्रथम - नॉर्वे,,भारताचा क्रमांक - 159


✅ जागतीक FIFA क्रमवारी - प्रथम देश अर्जेटिना  •भारत 99 वा.


✅ जागतिक आनंद निर्देशांक - फिनलंड •भारत 126 


✅ जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक• प्रथम - डेन्मार्क•भारत 40 वा 


✅ जागतिक ऊर्जा प्रसारण निर्देशांक •प्रथम देश- स्वीडन•भारत 67 सावा 


✅ जगातील पत्रकारिता स्वतंत्रता निर्देशांक-प्रथम-नॉर्वे •भारत 161 वा 


✅ वैश्विक लैंगिक अंतर निर्देशांक - प्रथम

देश- आइसलँड •भारत 127 वा 


✅ जागतिक दहशदवाद निर्देशांक प्रथम देश-अफगाणिस्थान •भारत 13 वा 


✅ शाश्वत विकास अहवाल 2023 प्रथम देश - फिनलॅंड •भारत 112 वा 


✅ ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 प्रथम देश- बेलारूस,भारत 111 वा


✅ निवडणूक लोकशाही निर्देशांक प्रथम देश -डेन्मार्क •भारत 108 वा


✅ हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2023 प्रथम देश जपान •भारत 85 वा.


कोकण रेल्वेत होणार 190 रिक्त जागांसाठी भरती

 

भारतीय रेल्वेच्या कोकण रेल्वे विभागाने देखील दहावी, बारावी उत्तीर्ण असलेल्या व पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली

असून कोकण रेल्वे विभागांमध्ये भारतीय रेल्वेच्या माध्यमातून आता रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरतीमध्ये विविध प्रकारची रिक्त पदे भरण्यात येणार आहे व पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करणे गरजेचे आहे.

कोकणरेल्वेतहोणार 190 रिक्तजागांसाठीभरती

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतीय रेल्वेच्या माध्यमातून कोकण रेल्वे विभागामध्ये अनेक रिक्त पदे भरण्याकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून त्यानुसार वरिष्ठ विभाग अभियंता,

स्टेशन मास्टर तसेच कमर्शियल पर्यवेक्षक इत्यादी पदांसोबत काही इतर पदांच्या 190 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याकरिता पदानुसार जे उमेदवार पात्र असतील त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांच्या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 


भारतीय रेल्वेच्या कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेमध्ये सीनियरसेक्शनइंजिनिअर पदाच्या पाच जागा, स्टेशनमास्टर पदासाठी दहा जागा, कमर्शियलसुपरवायझर पाच जागा, गुड्सट्रेनमॅनेजर एकूण पाच जागा, टेक्निशियन III( मेकॅनिकल) एकूण 20 जागा,

टेक्निशियन III( इलेक्ट्रिकल) एकूण पंधरा जागा, ESTM-III(S&T) पदासाठी एकूण 15 जागा, असिस्टंटलोकोपायलट पदासाठी 15 जागा, पॉईंट्समन एकूण 60 जागा, ट्रॅकमेंटेनर-I पदासाठी 35 जागा अशा सगळ्या मिळून 190 रिक्त जागांवर ही भरती केली जाणार आहे.

भरती प्रक्रियेच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी असणार आहे. या भरतीमध्ये दहावी, बारावी उत्तीर्ण व त्यासोबत कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तसेच काही पदांसाठी बारावीत फिजिक्स आणि मॅथ या विषयात उत्तीर्ण असण्यासोबतच इंजिनिअरिंग मधील विविध विषयांमधील पदवी आवश्यक असणार आहे.


जर आपण पदवी संदर्भात पाहिले तर( सिविल/ मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल) आयटीआयट्रेड( इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ वायरमन/ आर्मिचर आणि कॉइल वाईंडर/ फिटर/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ मेकॅनिस्ट/ डिझेल मेकॅनिक/ मेकॅनिक( मोटर वेहिकल)/ मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक/ मेकॅनिक रेडिओ & टीव्ही/ रेफ्रिजरेषण


आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक/ ट्रॅक्टर मेकॅनिक/ टर्नर) इत्यादींचा समावेश आहे किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा जसे की ( मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल) असणे आवश्यक 

आहे. 

या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील त्यांचे वय एक ऑगस्ट 2024 दरम्यान किमान 18 ते 39 असणे गरजेचे आहे. एससी आणि एसटी उमेदवारांना वयात पाच वर्ष तर ओबीसी उमेदवारांना तीन वर्षे सूट देण्यात आलेली आहे.


या भरतीसाठी जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील ते उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत व अर्जाची प्रक्रिया 16 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 ऑक्टोबर 2024 पर्यंत असणार आहे.

भरतीमध्ये अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना पदनिहाय दरमहा अठरा हजार ते 44 हजार 900 रुपयांपर्यंत पगार येणार आहे.


याभरतीचीअधिकृतजाहिरातपाहण्यासाठी खाली ल लिंक वरती क्लिक करा



konkanrailway.com या संकेतस्थळावर क्लिक करून अधिकची माहिती घेता येईल.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये तब्बल 5347 जागेसाठी महाभरती, अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ ..

 ( Education Qulification ) : सदर पदांस आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच आयटीआय अथवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित करण्यात आलेली 02 वर्षांची वीजतंत्री / तारतंत्री पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्र उत्तीण असणे आवश्यक असणार आहेत .


वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास / आ.दु.घ प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/  या संकेतस्थळावर दि .20 मे 2024 पर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग साठी 250/- रुपये तर मागास प्रवर्ग / आ.दु.घ /अनाथ प्रवर्ग करीता 125/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .



इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने विविध पदांसाठी भरती जाहीर..

  इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनि...