इंडियन बँकेत विविध पदांसाठी ३०० जागांची भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात देखील झाली आहे.
१३ तारखेपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही बँकेत नोकरी शोधत असाल, तर तुम्ही इंडियन बँकेत या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकता. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २ सप्टेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया एकून ३०० पदांसाठी सुरू आहे. हे करण्यासाठी तुम्हाला इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइट, indianbank.in वर जावे लागेल. येथून तुम्ही अर्ज देखील करू शकता, रिक्त पदांबद्दल तपशीलवार माहिती मिळवू शकता
निवड कशी होईल?
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा ही द्यावी लागणार आहे. त्यानंतर मुलाखत होईल आणि मगच उमेदवाराची निवड ही केली जाईल.
फी किती असेल?
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १००० रुपये फीस ही द्यावी लागेल. आरक्षित श्रेणीमध्ये येणाऱ्या उमेदवारांना १७५ रुपये फीस लागेल. पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात
अर्ज करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा, म्हणजेच indianbank.in.
No comments:
Post a Comment