मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

HSRP नंबर प्लेट बसण्यासाठी मुदत वाढ..

 

वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने जुन्या वाहनांवर 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (HSRP) बसवण्याची अंतिम तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे.


मुदतवाढ सरकारने चौथ्यांदा दिली असून, अजूनही राज्यातील अनेक वाहनमालकांनी ही आवश्यक नंबर प्लेट बसवलेली नाही. त्यामुळे त्यांच्या गैरसोयीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.



मुदतवाढीचा इतिहास


मूळ अंतिम तारीख: मार्च 2025

पहिली वाढ: एप्रिल 2025 अखेरपर्यंत

दुसरी वाढ: जून 2025 अखेरपर्यंत

तिसरी वाढ: 15 ऑगस्ट 2025 पर्यंत

चौथी आणि सध्याची वाढ: नोव्हेंबर 2025 अखेरपर्यंत


केंद्र सरकारच्या आदेशानुसार, देशातील सर्व वाहनांसाठी HSRP बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्रात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व जुन्या वाहनांवर ही प्लेट बसवावी लागेल.

भूमी अभिलेख विभाग भरती 2025

 



भूमि अभिलेख विभाग नोकरी 2025


नगर भूमि अभिलेख कार्यालयात भरती निघाली आहे. मराठी शाळेतून शिकलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य आहे. परिक्षा द्या आणि एक चांगली नोकरी मिळवा.


अर्ज करण्याचा अंतिम दिनांक  24 ऑक्टोबर 2025 

इच्छुकांनी अंतिम दिनांक यांच्या अगोदर फार्म भरून घ्यावा..

खालील वेबसाईटवरून फार्म भरावा

https://ibpsreg.ibps.in/gomsep25/

https://mahabhumi.gov.in  या संकेतस्थळावर अधिक माहितीसाठी भेट द्या..



सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2026..


 सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा फॉर्म भरणे सुरू 

दिनांक 10 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरण्यासाठी मुदत


फॉर्ममध्ये चुकीचे दुरुस्ती 2 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर 2025 

फार्मची फी 850 

एस सी व एसटी साठी 750 रुपये

फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट ..

https://exams.nta.nic.in/sainik-school-society/https://nta.ac.in/





भारतरत्न नानाजी देशमुख...



          *भारतरत्न नानाजी देशमुख*

      (चंडिकादास अमृतराव देशमुख)

            (सामाजिक कार्यकर्ता)


    *जन्म : ११ ऑक्टोबर १९१६*

कडोळी, ता. हिंगोली जि. परभणी, महाराष्ट्र,

(आता - कडोळी, ता. जि. हिंगोली, महाराष्ट्र)

    *मृत्यू : २७ फेब्रुवारी २०१०*

राष्ट्रीयत्व : भारतीय

नागरिकत्व : भारतीय

प्रशिक्षणसंस्था : बिर्ला तंत्रशास्त्र संस्था, पिलानी, राजस्थान

धर्म : हिंदू

वडील : अमृतराव देशमुख

पुरस्कार : भारतरत्न- (जाने २०१९)                                              चंडिकादास अमृतराव देशमुख ऊर्फ नानाजी देशमुख हे मराठी सामाजिक कार्यकर्ते होते. भारतीय शासनाने त्यांना त्यांच्या कार्यासाठी आधी पद्मविभूषण आणि नंतर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवले. १९९७ मधे पुणे विद्यापीठाने त्यांना ’डॉक्टर ऑफ लेटर्स’ ही पदवी प्रदान केली.

💁🏻‍♂️  *चरित्र*

                    हिंगोली जिल्ह्यातील कडोळी या गावी जन्मलेल्या नानाजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते. लहानपणी भाजी विकून पैसे मिळवून शिक्षण पूर्ण करणारे नानाजी संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या संपर्कात आले व संघाशी कायमचे जोडले गेले. पुढे काही वर्षे त्यांनी देशाच्या राजकारणात प्रमुख भूमिका निभावली. राजकारण किंवा सत्ताकारणाच्या मर्यादा लक्षात घेऊन अखेरीस त्यांनी शाश्र्वत विकास साधणारे समाजकार्य करायचे ठरवलेसाचा:स्पष्टीकरण हवे भारतीय संस्कृतीच्या आधारावर मनुष्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो या विचाराला मध्यवर्ती स्थान देऊन रचनात्मक कामाचे अनेक प्रकल्प नानाजी देशमुख यांनी देशभरात उभे केले.

                प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व नंतर उत्तर प्रदेशात पूर्णवेळ कार्यकर्ते असलेल्या नानाजींनी संघाचे तत्कालीन प्रमुख (सरसंघचालक) श्री गोळवलकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय चारित्र्याच्या आधारावर एक नवीन राजकीय पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न केले. यातूनच जनसंघाची स्थापना झाली. दीनदयाळ उपाध्याय, सुंदरलाल भंडारी, अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्यासमवेत नानाजी जनसंघ पक्षाच्या माध्यमातून कार्यरत होते. नंतर जनता पक्षाच्या माध्यमातूनही ते राजकारणात सक्रिय सहभागी झाले. पांचजन्य, राष्ट्रधर्म व स्वदेस या नियतकालिकांचे कामही त्यांनी काही काळ पाहिले. दरम्यानच्या काळात आचार्य विनोबा भावेंच्या भूदान चळवळीतही ते सहभागी झाले होते. सुमारे दोन महिने ते विनोबाजींबरोबर प्रवास करत होते. पण त्यानंतरच्या काळात मनुष्यविकास व सामाजिक विकास याबाबतच्या पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्मिक मानवतावाद या तत्त्वज्ञानाचा प्रभाव त्यांच्यावर पडला. याच तत्त्वज्ञानाच्या आधारावर रचनात्मक, विधायक कामांची उभारणी करण्याचा ध्यास घेतलेल्या नानाजींनी जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्रिपद नाकारले. त्या काळात राजनीतीतील चाणक्य म्हणून त्यांचा दिल्लीत दबदबा होता, अनेक महत्त्वाची सत्तापदे त्यांच्याकडे सहजगत्या येत होती. पण त्यांनी तो मोह निग्रहाने नाकारून, राजकारण-संन्यास घेऊन अखंडपणे सेवाकार्य करण्याचा निर्णय घेतला. या विचारातूनच त्यांनी दीनदयाळ संशोधन संस्था स्थापन केली.

                   पुढील काळात त्यांनी दीनदयाळ शोध संस्थानच्या माध्यमातून सर्वप्रथम उत्तर प्रदेशामधील गोंडा जिल्ह्यात सिंचनाचे कार्य केले. सुमारे ४०,००० कूपनलिकांच्या माध्यामातून त्याठिकाणच्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचे काम केले. त्यानंतर मध्य प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात ८० दुर्गम, पहाडी गावांमधील जनतेला विविध प्रकल्पांद्वारे आत्मनिर्भर व उद्योगशील बनवण्यावर त्यांनी मुख्य लक्ष केंद्रित केले. पाणी अडवा - पाणी जिरवा या योजनेतून सिंचनक्षेत्रात वाढ, गोवंशसंवर्धन, पारंपरिक कृषी पद्धतींचा विकास व प्रसार, गुरुकुल पद्धतीने शालेय शिक्षण, उद्योजकता विद्यापीठाच्या मार्गाने स्वयंरोजगाराला प्राधान्य, आरोग्यधाम योजनेअंतर्गत आयुर्वेदिक वनौषधींविषयी संशोधन व याच पद्धतीचे अनेक प्रकल्प चित्रकूट परिसरात कार्यान्वित केले. येथेच नानाजींनी चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय हे भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ स्थापन केले. हे प्रकल्प सक्षमतेने चालवण्यासाठी त्यांनी समाजसेवेची इच्छा असणाऱ्या दांपत्यांना त्यांनी समाजशिल्पी बनवले. या समाजशिल्पींच्या माध्यमातून दीनदयाळ शोध संस्थेची विधायक, विकासात्मक कामे वेगाने, योग्य दिशेने व निष्ठेने चालू आहेत. आर्थिक, औद्योगिक व सामाजिकदृष्ट्या स्वयंपूर्ण गावांची संकल्पना येथे अस्तित्वात आलेली दिसते.

                या सर्व कार्याला धर्माचे अधिष्ठान असावे या हेतूने व आपल्या सर्वांच्या जीवनात काय आदर्श असावेत हे सूचित करण्यासाठीच चित्रकूटमध्ये अभूतपूर्व असे श्रीरामदर्शन हे कायमस्वरूपी प्रदर्शन उभे करण्यात आले आहे. रामायणातील घटना डोळ्यासमोर उभ्या करणाऱ्या या प्रदर्शनासह येथे प्राणिसृष्टीही उभी करण्यात आली आहे. वास्तवातील जंगलात प्राण्यांचे हुबेहूब पुतळे बसवण्यात आले आहेत.

           चित्रकूट हे त्यांचे कर्मस्थान होते. आरोग्यधाम व गोशाळा उद्यमिता विद्यापीठ, ग्रामोद्योग विद्यालय, आश्रमशाळा गुरुकुल, ग्रंथालय, मातृसदन, दंतचिकित्सा केंद्र इत्यादी त्यांनी तेथे उभारली. ग्रामीण लोकांचे जीवनमान उंचावण्यास व त्यांना स्वावलंबी बनविण्याचा त्यांना ध्यास होता. त्यांनी सुमारे इ.स. १९९० चे दरम्यान मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यांतील प्रत्येकी सुमारे २५० गावे दत्तक घेतली व त्या गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. शिक्षण, स्त्रियांना गृहोद्योग, स्वच्छता, शुद्ध बोलणे इत्यादी शिकविण्यास त्यांनी कार्यकर्त्यांचा एक चमू उभारून ग्रामविकासाचे काम चालवले. नानाजींच्या याच कामाचे फलित म्हणजे चित्रकूट क्षेत्रातील ८० खेड्यांमधील कोर्टामध्ये चालू असलेले जवळजवळ ६० टक्के खटले लोकांनी मागे घेतले व एकत्र बसून त्यावर निर्णय घेतले. चित्रकूटबरोबरच भारतातील इतर राज्यांमधील सर्वात मागास जिल्हे निवडून त्या ठिकाणी दीनदयाळ शोध संस्थानच्या माध्यमातून काम सुरू आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील होमरी येथे प्रकल्प कार्यरत आहे. सोनदरा गुरुकुल, कृषिविकास, आरोग्य शिक्षण, योगाभ्यास, कलांचे शिक्षण व औद्योगिक प्रशिक्षण या प्रकल्पांद्वारे येथे काम चालते.

         आणीबाणीनंतरच्या काळात (इ.स. १९७७) नानाजी काही काळ लोकसभेचे सदस्य होते. इ.स. १९९९ मध्ये त्यांची राज्यसभेवरही निवड करण्यात आली.


📜 *पुरस्कार*

               देशमुखांच्या सामाजिक कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना १९९९ साली पद्मविभूषण हा किताब बहाल केला. २०१९ साली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

       

         

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज..



          *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज*


        (महाराष्ट्रातील समाजसुधारक,      

    स्वातंत्र्यसेनानी, कवी, गायक)


मूळ नाव : माणिक बंडोजी इंगळे


   *जन्म : ३० एप्रिल, १९०९*

      (यावली, जि. अमरावती)

   *निर्वाण : ११ ऑक्टोबर, १९६८*

       (मोझरी, जि. अमरावती)

गुरू : आडकोजी महाराज

भाषा : मराठी, हिंदी

साहित्यरचना : ग्रामगीता, 

                     अनुभव सागर 

                      भजनावली,   

                      सेवास्वधर्म, 

                      राष्ट्रीय भजनावली

कार्य : अंधश्रद्धा निर्मूलन, 

           जातिभेद निर्मूलन

वडील : बंडोजी

आई : मंजुळाबाई

             तुकडोजी महाराज  यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.

     तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. त्यांनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. "आते है नाथ हमारे" हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.

        भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.

          अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्‌मयसेवेची पूर्तीच होय. स्वत:ला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती.

       खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्‍न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्‍न केले.

                    सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.

   तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंडव्रतासारखे चालवीत आहेत.

           महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.

               देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला.

                   ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्ये कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते.

                   तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण आश्विन कृष्ण पंचमी शके १८९० (११ ऑक्टोबर, १९६८) रोजी झाले.

     राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारे केले जाते.


               ग्रामगीता हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या शिवाय हिंदीतून लिहिलेला लहरकी बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांचे ग्रामगीता ग्रंथामधील विचार सर्व सामान्यापर्यंत पोहचावे याकरिता महाराष्ट्र शासनाने ग्रामगीता हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून, सवलतीच्या १० रुपये या किंमतीत उपलब्ध करून दिला आहे.


📒 *साहित्य संमेलने*

             तुकडोजी महाराज यांच्या नावाने (१) तुकडोजी महाराज साहित्य संमेलन आणि (२) तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन अशी दोन संमेलने भरतात.

 

📚 *पुस्तके*

            अनुभव सागर भजनावली (कवी - तुकडोजी महाराज)

आठवणी (सचित्र) : राष्ट्रसंत जन्मशताब्दीच्या (गंगाधर श्रीखंडे)

ग्रामगीता (कवी - तुकडोजी महाराज)

डंका तुकाडोजींचा (राजाराम कानतोडे)

राष्ट्रसंत तुकडोजी (बालसाहित्य, लेखक - प्रा. राजेंद्र मुंढे)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (चरित्र, लेखक - डॉ. भास्कर गिरधारी)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मौलिक विचार (संकलन - लेखक - प्रा. राजेंद्र मुंढे). (लोकवाङ्मय प्रकाशन)

राष्ट्रसंताची अमृतधारा : भाग १, २, ३ (तुकडोजी महाराज)

राष्ट्रीय भजनावली (कवी - तुकडोजी महाराज)

लहरकी बरखा (हिंदी)

सेवास्वधर्म (कवी - तुकडोजी महाराज)


📙 *ग्रामगीता*

       ग्रामगीता या ग्रंथात तुकडोजी महाराज म्हणतात :


संत देहाने भिन्न असती। परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती।

साधने जरी नाना दिसती। तरी सिद्धान्तमति सारखी।।


        संत तुकडोजी महाराज यांनी अनेक भजने/कविता लिहिल्या. त्यातीलच ही एक :


या झोपडीत माझ्या

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली

ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे

प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या

दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥३॥

जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला

भिती नं यावयाला, या झोपडीत माझ्या ॥४॥

महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने

आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥५॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा

कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥६॥

पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे

शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥७॥


       राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे एक भजन. हे भजन जपान येथे झालेल्या विश्वधर्म परिषदेत म्हटले होते.


*हे भजन दिल्ली येथील राजघाटावर नियमीत ऐकविले जाते. :-*

           हर देश में तू ...

हर देश में तू , हर भेष में तू , तेरे नाम अनेक तू एकही है ।

तेरी रंगभुमि यह विश्वभरा, सब खेलमें, मेलमें तु ही तो है ॥टेक॥

सागर से उठा बादल बनके, बादल से फ़टा जल हो कर के ।

फ़िर नहर बनी नदियाँ गहरी,तेरे भिन्न प्रकार तू एकही है ॥१॥

चींटी से भी अणु-परमाणुबना,सब जीव जगत् का रूप लिया ।

कहिं पर्वत वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा,तू एकही है ॥२॥

यह दिव्य दिखाया है जिसने,वह है गुरुदेवकी पूर्ण दया ।

तुकड्या कहे कोई न और दिखा, बस! मै और तू सब एकही है ॥३॥

       

          

डॉ. कुमुद बन्सल राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2025

यशवंतराव चव्हाण सेंटर शिक्षण विकास मंच.. 
डॉ. कुमुद बन्सल राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2025

नामांकन प्रक्रिया २ ऑक्टोबर 2025 ते 17 ऑक्टोबर 2025..


 
इच्छुकांनी अर्ज करावेत 

 

राष्ट्रपिता महात्मा गांधी आधारित टेस्ट

महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित टेस्ट

महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित टेस्ट

1. महात्मा गांधी यांचा जन्म कोठे झाला?

2. महात्मा गांधी यांनी कोणत्या देशात वकिलीची सुरुवात केली?

3. महात्मा गांधी यांनी कोणत्या चळवळीची सुरुवात 1930 मध्ये केली?

4. महात्मा गांधी यांचे मूळ नाव काय होते?

5. महात्मा गांधी यांनी कोणत्या तत्त्वावर आधारित जीवन जगले?

6. महात्मा गांधी यांचा दक्षिण आफ्रिकेतील पहिला सत्याग्रह कधी झाला?

7. महात्मा गांधी यांनी कोणत्या पुस्तकातून स्वातंत्र्य संग्रामाचे तत्त्व मांडले?

8. महात्मा गांधी यांचे निधन कधी आणि कसे झाले?

9. महात्मा गांधी यांनी कोणत्या चळवळीत खादीला प्रोत्साहन दिले?

10. महात्मा गांधी यांनी कोणत्या वर्षी भारतात सत्याग्रह सुरू केला?

11. महात्मा गांधी यांचा "दोस्त मोहम्मद" कोण होता?

12. महात्मा गांधी यांनी कोणत्या चळवळीत ब्रिटिश कायद्यांचा विरोध केला?

13. महात्मा गांधी यांनी कोणत्या तारखेला स्वातंत्र्य मिळाल्याचे पाहिले?

14. महात्मा गांधी यांनी कोणत्या आंदोलनात उपवासाचा वापर केला?

15. महात्मा गांधी यांचा "साबरमती आश्रम" कोठे आहे?

16. महात्मा गांधी यांनी कोणत्या तत्त्वाला प्राधान्य दिले जे त्यांचे जीवनचरित्रात दिसते?

17. महात्मा गांधी यांनी कोणत्या चळवळीत ब्रिटिश कपडे जाळले?

18. महात्मा गांधी यांचा जयंती दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

19. महात्मा गांधी यांनी कोणत्या आंदोलनात "राम नाम" घेतले?

20. जर महात्मा गांधी 1 ऑक्टोबर 2025 ला जिवंत असते, तर त्यांनी कोणत्या विषयावर भर दिला असता?

बरोबर उत्तरांची यादी

  • प्रश्न 1: अ) पोरबंदर, गुजरात - गांधींचा जन्म.
  • प्रश्न 2: अ) दक्षिण आफ्रिका - वकिलीची सुरुवात.
  • प्रश्न 3: अ) दांडी सत्याग्रह - 1930 मध्ये सुरू.
  • प्रश्न 4: अ) मोहनदास करमचंद गांधी - मूळ नाव.
  • प्रश्न 5: अ) अहिंसा आणि सत्य - जीवन तत्त्व.
  • प्रश्न 6: अ) 1906 - दक्षिण आफ्रिकेतील पहिला सत्याग्रह.
  • प्रश्न 7: अ) हिंद स्वराज - स्वातंत्र्य तत्त्वे.
  • प्रश्न 8: अ) 30 जानेवारी 1948, गोळी झाडून - निधन.
  • प्रश्न 9: अ) स्वदेशी चळवळ - खादी प्रोत्साहन.
  • प्रश्न 10: अ) 1915 - भारतात सत्याग्रह सुरू.
  • प्रश्न 11: अ) त्यांचा जवळचा सहकारी - दोस्त मोहम्मद.
  • प्रश्न 12: अ) असहकार चळवळ - ब्रिटिश कायद्यांचा विरोध.
  • प्रश्न 13: अ) 15 ऑगस्ट 1947 - स्वातंत्र्य पाहिले.
  • प्रश्न 14: अ) दंगली थांबवण्यासाठी - उपवासाचा वापर.
  • प्रश्न 15: अ) अहमदाबाद, गुजरात - साबरमती आश्रम.
  • प्रश्न 16: अ) सत्याग्रह - जीवनचरित्रातील तत्त्व.
  • प्रश्न 17: अ) स्वदेशी चळवळ - ब्रिटिश कपडे जाळले.
  • प्रश्न 18: अ) 2 ऑक्टोबर - जयंती दिन.
  • प्रश्न 19: अ) त्यांच्या मृत्यूच्या वेळी - "राम नाम" घेतले.
  • प्रश्न 20: अ) शांतता आणि पर्यावरण संरक्षण - 1 ऑक्टोबर 2025 चा संभाव्य दृष्टिकोन.

एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) भरती 7267 पदे

 B.Ed. असणार्‍या विद्यार्थ्यां साठी खूप imp आहे. एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS)


मध्ये ७२६७ पदांसाठी मेगा भरती जाहीर


झाली आहे!


अर्जाची शेवटची तारीख: २३ ऑक्टोबर


२०२५


अधिकृत वेबसाईट: tribal.nic.in

पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील

                              

          *पद्मभुषण कर्मवीर*

         *भाऊराव पाटील*


    *जन्म : २२ सप्टेंबर १८८७*

         (कुंभोज, महाराष्ट्र)

     *मृत्यू : ९ मे १९५९*


टोपणनाव : कर्मवीर

पुर्ण नाव : भाऊराव पायगौडा 

                 पाटील

पेशा : समाजसुधारणा, 

                            शिक्षणप्रसार

प्रसिद्ध कामे : रयत शिक्षण संस्था

पुरस्कार : पद्मभूषण (१९५९)


              कर्मवीर भाऊराव पाटील हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' ही योजना सुरू करुन मोठे काम केले. ते जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला.


कर्मवीर भाऊराव यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगौडा पाटील असे होते. आईचे नाव गंगाबाई होते. त्यांचे मूळ गाव कर्नाटक राज्यात दक्षिण कन्नड जिल्यातील मूडब्रिदी गावचे. कर्मवीर यांचे पुर्वज नशीब अजमावण्यासाठी महाराष्ट्रात आले. पूर्वीचे त्यांचे आडनाव देसाई होते. पुढे ते एतवडे जि. सांगली येथे स्थिर झाले. पुढे त्यांच्या घराण्यात पाटीलकी आली त्यामुळे त्यांचे देसाई हे नाव जाऊन पाटील हे नाव रूढ झाले .कोल्हापूर जिल्यात हातकनंगले नावाचा तालुका आहे .या तालुक्यात बाहुबली चा डोंगर आहे. या डोंगरावर पार्श्व्नाथाचे सुंदरभव्य स्मारक आहे. या डोंगराच्या कुशीत कुंभोज नावाचे छोटेशे गाव आहे या गावी २२सप्टेंबर 1887रोजी (आश्विन शुद्ध पंचमी ,ललिता पंचमी ) कर्मवीरांचा जन्म झाला. त्यांचे बालपण कुंभोज या गावी गेले. भाऊरावांच्या आईला इतर जातीचीच नव्हे तर ब्राह्मणाची शिवाशिवही चालत नसे, एवढे हे कर्मठ घराणे होते. असे असले तरी भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. त्यांचे बालपण कुंभोजमधील अस्पृश्य मुलांच्यात , खेळण्यात गेले. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा आणि इतरही काही गावांत झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला. कर्मवीर लहानपणापासून बेडर वृत्तीचे होते. ते पट्टीचे पोहणारे होते.


🏢 *शिक्षण संस्था*

    पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदि मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला.


दिनांक ऑक्टोबर ४, इ.स. १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी यांनी रयत शिक्षण संस्थेला १,११,१११ रुपयांची देणगी दिली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. संस्थेची काही अशी उद्दिष्टे होती -


*शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.*


*मागासलेल्या वर्गांतील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.*


*निरनिराळ्या जातिधर्मांतील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे*


*अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्‍या विकासाचे वळण लावणे.*


*संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे.*


*सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.*


*बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.*


ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.


साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली. २५ फेब्रुवारी, इ.स. १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली. जून १६, इ.स. १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली साताऱ्यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले. बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी भाऊराव पाटलांना सातार्‍यात हायस्कूल काढण्यासाठी ४००० रुपये दिले, व बडोद्यात महाराजांच्या राज्यारोहणास साठ वर्षे झाल्यानिमित्त होणाऱ्या समारंभाचे आमंत्रण दिले.


त्या देणगीतून भाऊरावांनी देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले ‘फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. इ.स. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर इ.स. १९५४ साली कऱ्हाड येथे ‘सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज‘ची स्थापना केली. शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली, म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे इ.स. १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे भाऊरावांच्या डोळ्यासमोर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. ‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ - या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.


महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती. रयत शिक्षण संस्था हि आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे. महाराष्ट्र व कर्नाटक मिळून ६७५ शाखा आहेत.त्यामध्ये २० पूर्वप्राथमिक ,२७ प्राथमिक,४३८ माध्यमिक, ८ अध्यापक विद्यालय,२ आय.टी.आय व ४१ महाविद्यालयांचा समावेश आहे.


ह.रा. महाजनी यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे. सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन आहे. तेथे भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, इ.स. १९५९ रोजी मालवली. कर्मवीरांचे पूर्ण नाव भाऊसाहेब पायगौंडा पाटील. वडिलांचे नाव पायगौंडा तर आई चे नाव गंगाबाई होते. कर्मवीरांचे मूळ घराणे कर्नाटक राज्यातील,दक्षिण कन्नड जिल्यातील मुडबीद्री गावचे. देसाई हे त्यांचे आडनाव. कर्मवीरांचे पूर्वज नशीब अजमावण्यासाठी महाराष्ट्रात आले.व एतवडे बुद्रुक. जि. सांगली येथे स्थिरावले.


📯  *रयतगीत-*


रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. || धृ ||


कर्मवीरांचे ज्ञान पीठ हे शक्तीपीठ हे ठरते आहे. शाहू-फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मुरते आहे. धर्म जातीच्या पार गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.|| १ ||


गरिबांसाठी लेणी मोडून , लक्ष्मी वाहिनी झाली आई. कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेऊनि, ज्ञानसाधना करतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. || २||


दिन-दलितांसाठी आण्णा तुमची झिजली चंदन काया अनाथ जीवा सदा लाभली मातृ हृदयी तुमची माया. शून्या मधुनी नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||३||


जीवनातला तिमिर जावा, प्रबोधनाची पहाट व्हावी, इथे लाभले पंख लेवुनी उंच भरारी नभात घ्यावी प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||४|| ... गीतकार - विठ्ठल वाघ


📚 *पाटीलांची चरित्रे*

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार : कर्मवीर भाऊराव पाटील (प्रा. प्रभाकर नानकर)

कर्मवीर भाऊराव पाटील (बा.ग. पवार)

कर्मवीर भाऊराव पाटील (प्रा.डॉ. रमेश जाधव)

कर्मवीर भाऊराव पाटील (संध्या शिरवाडकर)

कर्मवीर भाऊराव पाटील (सौ. सुधा पेठे)

कर्मवीर भाऊराव पाटील : काल आणि कर्तृत्व (डॉ. रा.अ. कडियाळ)

कुमारांचे कर्मवीर (द.ता भोसले) इंग्रजी अनुवाद Karmaveer Bhauraao Patil)

ग्रामीण महाराष्ट्राची शिक्षण परंपरा - कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिक्षणानंद बापूजी साळुंखे (रा. ना. चव्हाण)

थोर रयतसेवक कर्मवीर भाऊराव पाटील (लीला शांतिकुमार शाह)

समाजसेवक कर्मवीर भाऊराव पाटील (तृप्ती अंतरकर)

माणसातील देव, अजित पाटील


🎖 *सन्मान*

                सन १९५९ : पद्मभूषण

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर

      

        

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक ( YCMOU)

 🚨यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक ( YCMOU)


@जुलै 2025 या सत्राकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढविण्यात आलेली आहे.


1.जुलै 2025 सत्राकरिता ज्या शिक्षणक्रमाला ऑनलाईन प्रवेश घ्यायचा आहे, त्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या website ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील होमपेजवर जाऊन Admission या टॅबवर Prospectus (माहितीपुस्तिका) शैक्षणिक सत्र जुलै 2025) या ठिकाणी विविध शिक्षणक्रमांच्या माहितीपुस्तिका उपलब्ध आहेत.


YCMOU च्या संकेतस्थळावर 👉 ycmou.digitaluniversity.ac


Home Page → Admission टॅब → Prospectus (माहितीपुस्तिका) (जुलै 2025 सत्र)


2. प्रवेश अर्ज कसा करायचा?


ऑनलाईन पद्धतीने अर्ज पूर्णपणे व अचूक भरावा.


संबंधित शिक्षणक्रमाचे शुल्क ऑनलाईन भरून अर्ज सादर करावा.


3. महत्त्वाचे निर्देश


दिलेल्या मुदतीतच अर्ज व शुल्क भरून प्रवेश निश्चित करावा.


उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.


तांत्रिक अडचणी आल्यास कार्यालयीन वेळेत (सकाळी 10.30 ते सायं 5.30) संपर्क साधावा.


4. संपर्क क्रमांक (Helpline Numbers):


दूरध्वनी: 0253-2230580, 2230106, 2230714, 2231715


मोबाईल: 9307579874, 9307567182, 9272046725


#YCMOU #OnlineAdmission #जुलै2025सत्र #DistanceEducation #NashikUniversity #AdmissionOpen #विद्यार्थीमाहिती #HigherEducation #MaharashtraEducation

MpSC भरती जाहिरात.2020

  महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी) मार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त भरती २०२६ ची बहूप्रतीक्षित जाहिरात अखेर प्रसिद्ध झाली...