नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने नीट यूजी 2025 च्या परीक्षेची तारीख आणि अर्ज प्रक्रियेशी संबंधित महत्वाची माहिती जारी केली आहे.
ही परीक्षा 4 मे 2025 रोजी होणार आहे. इच्छुक उमेदवार 7 फेब्रुवारी 2025 ते 7 मार्च 2025 पर्यंत (रात्री 11:50 वाजेपर्यंत)
अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
नीट यूजी 2025 पात्रता निकष
वयाची अट :
• किमान वय 31 डिसेंबर 2025 रोजी 17 वर्ष असावे.
• कमाल वयोमर्यादेवर कोणतेही बंधन नाही.
शैक्षणिक पात्रता :
• उमेदवार फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी/बायोलॉजीसह बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.
• बारावीबोर्डाच्या परीक्षेतील किमान गुण प्रवर्गानुसार निश्चित करण्यात आले आहेत.
राष्ट्रीयत्वः
भारतीय नागरिक, ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (ओसीआय), भारतीय वंशाच्या व्यक्ती (पीआयओ) आणि परदेशी नागरिक अर्ज करू शकतात.
नीट यूजी 2025 परीक्षा पॅटर्न
प्रत्येक अचूक उत्तरासाठी +4 गुण मिळतील आणि चुकीच्या
उत्तरासाठी -1 गुण कापले जातील.
परीक्षा कालावधी: 180 मिनिटे (3 तास)
परीक्षेचे माध्यम : हिंदी, इंग्रजी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू अशा 13 भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
नीट यूजी 2025 अर्ज प्रक्रियेसाठी अर्ज कसा करावा?
• neet.nta.nic.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
• "नीट यूजी 2025 अर्ज फॉर्म" लिंकवर क्लिक करा.
• नवीन नोंदणी करून लॉगिन करा.
• अर्जात वैयक्तिक, शैक्षणिक आणि इतर माहिती भरा.
• फोटो, स्वाक्षरी आणि इतर कागदपत्रे अपलोड करा.
• श्रेणीनुसार ऑनलाइन (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, नेट बँकिंग) शुल्क भरा.
• फॉर्म सबमिट करा आणि कन्फर्मेशन पेजची प्रिंटआऊट घ्या.
नीट यूजी 2025 साठी महत्वाच्या टिप्स
• अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करा आणि शेवटच्या तारखेची वाट पाहू नका.
• परीक्षेचा पॅटर्न आणि अभ्यासक्रम नीट समजून घ्या आणि चांगली तयारी करा.
Post a Comment