महावितरण
जाहीर सूचना
अधीक्षक अभियंता, महावितरण सातारा मंडल कार्यालय, पहिला मजला कृष्णानगर, सातारा या आस्थापनेवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (एस.एस.सी., एच.एस.सी.) यांचे १०+२ बंधा मधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पुर्ण बीजतंत्री / तारतंत्री प्रमाणपत्र प्राप्त उमेदवारांकडुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी दि. २३/०२/२०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत www.apprenticeshipindia. gov.in या संकेतस्थळरावर, खालील आस्थापनेवर उमेदवाराने ITI Electrician किंवा ITI Wireman यापैकी जो कोर्स उत्तीर्ण झाला आहे त्या कोर्ससाठी एकाच अस्थापनेवर (एकाच विभागासाठी) Online अर्ज सादर करावा. यापूर्वी शिकाऊ उमेदवारी पुर्ण केली असल्यास पुन्हा अर्ज करु नये.
१) सातारा विभागासाठी आस्थापना नाव EXECUTIVE ENGINEER MSEDCL SATARA DIVISION-E10212700040
२) कराड विभागासाठी आस्थापना नाव EXECUTIVE ENGINEER MSEDCL KARAD DIVISION-E10212700063
३) फलटण विभागासाठी आस्थापना नाव EXECUTIVE ENGINEER MSEDCL PHALTAN DIVISION-E10212700061
४) वाई विभागासाठी आस्थापना नाव EXECUTIVE ENGINEER MSEDCL WAI DIVISION-E10212700064
५) वडुज विभागासाठी आस्थापना नाव EXECUTIVE ENGINEER MSEDCL VADUJ DIVISION-E10212700048
६) सातारा मंडल कार्यालयासाठी MAHARASHTRA STATE ELECTRICITY DIST. CO. LTD. SATARA CIRCLE E06162700015 टिप :-
१) दि. २३/०२/२०२५ नंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
२) उमेदवाराने www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक असून सदरचे प्रोफाईल १००% भरलेले असावे व आधार लिंक असणे गरजेचे आहे.
३) निवड झालेल्या उमेदवारांना नियमाप्रमाणे विद्यावेतन अदा केले जाईल तसेच प्रशिक्षण कालावधी एक वर्षांचा राहिल.
४) भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवाराने राजकीय दबाव आणल्यास आपली उमेदवारी रद्द समजण्यात येईल याची नोंद घ्यावी.
(५) शिकाऊ उमेदवार निवड प्रक्रियेत आवश्यकता भासल्यास बदल करण्याचे सर्व अधिकार निम्नस्वाक्षरीकार यांना राहतील.
PRO/BMTZ/196/2024-25
अधिक्षक अभियंता, सातारा
No comments:
Post a Comment