१) मायकेल जॅक्सन कोण होता ?
अमेरिकन गायक, गीतकार, नर्तक
२) अथर्ववेदाच्या संहितेला कोणत्या ऋषींचे नाव देण्यात आले आहे ?
अथर्व ऋषी
३) इंजिनचा वेग मोजण्यासाठी जे एकक वापरले जाते त्याला काय म्हणतात ?
अश्व शक्तीहॉर्स पॉवर
४) 'मूषक' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
उंदीर
५) कोणत्या प्राण्याला अश्व म्हणतात ?
घोडा
6. भारतीय कुक्कुटपालन उद्योगाचे जनक कोण ?
पद्मश्री डॉ. बी. व्ही. राव
7.न्युझीलंडच्या कोणत्या क्रिकेटपटूला त्याचे संघ सहकारी 'लायन ऑफ मुंबई' असे म्हणतात ?
एजाज पटेल
8.यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्रांचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन कोणत्या वेदात असते ?
यजुर्वेद
9.'मुलगी' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
तनया, दुहिता, कन्या, तनुजा, लेक, सुता, पुत्री, आत्मजा
10. रोमन संख्याचिन्ह पद्धतीत कोणत्या संख्येसाठी चिन्ह वापरले जात नाही ?
शून्य
11. वेद वांड्मयावर आधारलेली संस्कृती कोणत्या नावाने ओळखली जाते ?
वैदिक संस्कृती
12.वैदिक वांड्मयाची भाषा कोणती होती ?
संस्कृत
13. वैदिक वांड्मयातील मूळ ग्रंथ कोणता ?
ऋग्वेद
14. ऋचा म्हणजे काय ?
स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य
15.ऋचांनी बनलेला वेद म्हणजे कोणता वेद होय ?
ऋग्वेद
16. बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते ?
गौतम बुद्ध
17. गौतम बुद्धाचे मूळ नाव काय होते ?
सिद्धार्थ
18. गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला ?
लुंबिनी, नेपाळ
19.यातना' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
दुःख, वेदना
20. गौतम बुद्धांच्या आईवडिलांचे नाव काय ?
शुद्धोधन व मायादेवी
No comments:
Post a Comment